VishwaRaj

लहान मुलांमध्ये सामान्यपणे आढळणारे हिवाळ्या मधील आजार आणि त्यांची लक्षणे

हिवाळा आलेला आहे आणि तुमच्या मुलांना जास्तीच्या काळाची आवश्यकता आहे! तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती कमजोर आहे त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटत आहे का? चला तर मग आज ही चुकीची धारणा मोडून काढूया! हिवाळ्यामध्ये कोणत्याही मुलाला होऊ शकणारा सर्वात सामान्य आजार म्हणजे फ्ल्यू होय, तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती कमजोर असल्यामुळे हा आजार होतो असे नाही तर, याचे कारण म्हणजे थंड वातावरणा मध्ये फ्ल्यू चा विषाणू अगदी व्यवस्थित राहू शकतो.

हिवाळ्या मधील आजारांमुळे लगेचच तुमची मुले आजारी पडण्याचे अजून मुख्य कारण म्हणजे जास्त कालावधी साठी घरामध्येच राहणे हे होय. बाहेर गेल्याने सर्दी आणि फ्ल्यू होईल या भीतीमुळे, तुमच्या पैकी बर्‍याच स्त्रिया स्वतःच्या मुलांना घरामध्येच ठेवतात आणि थंड वातावरणा पासून आपल्या मुलांचे रक्षण करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे असा विचार करतात. पालक म्हणून तुम्ही ही सर्वात मोठी चूक करू शकता. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे, घरामध्ये राहील्या मुळे मुलांमध्ये अतिशय जवळीक वाढते ज्याच्या परिणामी खूप मोठ्या गतीने विषाणू एकमेकांमध्ये पसरले जातात आणि संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला जातो.

आम्ही तुमच्या मुलांच्या आजाराच्या सुरवातीच्या काळामध्ये तुम्हाला काळजी घेता यावी यासाठी तुमच्याकरिता हिवाळ्या मधील काही आजारां विषयी आणि त्यांच्या लक्षणां विषयी खाली माहिती देत आहोत.

1)फ्ल्यू :-
हा आजार इन्फ्लुएन्झा या नावाने देखील ओळखला जातो. फ्ल्यू हा इतर विषाणूं पैकी सर्वात सामान्यपणे आढळणारा श्वसन मार्गाचा आणि हिवाळ्या दरम्यान मुलांमध्ये आढळणारा संसर्गजन्य विषाणू आहे.

लक्षणे:- फ्ल्यूशी संबंधित लक्षणे खालील प्रमाणे
▪️ वाहते नाक
▪️ खोकला येणे
▪️उच्च ताप (103 ते 104 डिग्री फेरेनाईट च्या दरम्यान )
▪️ शरीर आणि स्नायूंमध्ये वेदना होणे
▪️चोंदणे – कंजेशन
▪️ जुलाब किंवा उलट्यांची शक्यता
▪️लालसर डोळे ( डोळे आल्याचे सौम्य लक्षण )

2) आर एस व्ही : रेस्पायरेटरी सिन्सीटीयल व्हायरस ( आर एस व्ही )
2 वर्षाखालील मुलांमध्ये सामान्यपणे आढळणारा हा अजुन एक जंतुसंसर्गाने होणारा श्वसन मार्गाचा आजार आहे आणि यामुळे पुढे ब्रॉन्कीओलायटीस हा आजार उद्भवतो. आर एस व्ही बरोबर संबंधित लक्षणे पुढील प्रमाणे :
▪️ जलद गतीने श्वसन क्रिया होणे
▪️ वाहते नाक
▪️ ताप येणे
▪️ खोकला होणे
▪️ नाक चोंदणे – कंजेशन

3)स्ट्रेप थ्रोट :
5 ते 15 या वयोगटा मधील मुलांमध्ये आढळणाऱ्या इतर संसर्गां पैकी हे एक संसर्गजन्य जिवाणूंचे इन्फेक्शन आहे. स्ट्रेप थ्रोट मुळे निर्माण होणारी लक्षणे खालील प्रमाणे :
▪️ गिळण्यामध्ये समस्या जाणवणे
▪️ ताप येणे
▪️ डोके दुखणे
▪️ पोटामध्ये दुखणे
▪️ घशामध्ये खवखव होणे
▪️ लाल रॅशेस बरोबर खोकला आणि वाहते नाक

4) पोटाचा फ्ल्यू – स्टमक फ्ल्यू :
यालाच स्टमक बग असे म्हणतात. स्टमक फ्ल्यू हा व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरायटीस आहे म्हणजे विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे होणारा जठराचा व आतड्याचा दाह आणि हा नोरोव्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो. पोटाचा संसर्ग निर्माण करणारे हे विषाणू अत्यंत संसर्गजन्य मानले जातात जे मुलांमध्ये अतिशय गंभीर लक्षणे निर्माण करतात आणि ही लक्षणे वेळोवेळी वेगवेगळी असतात.
स्टमक फ्लू बरोबर संबंधित लक्षणे खालील प्रमाणे :
▪️ अतिसार ( पाण्यासारखे )
▪️ पोटामध्ये वेदना होणे
▪️ उलट्या होणे
▪️ ताप येणे ( अतिशय सौम्य )
▪️ थकवा येणे
▪️ डोके दुखणे

5) कॉमन कोल्ड – सर्दी :
हिवाळ्या दरम्यान मुलांना मध्ये आढळणारा विषाणूंच्या संसर्गां पैकी हा एक सहजपणे होणारा विषाणूंचा संसर्ग आहे. हिवाळ्या दरम्यान 5 ते 14 दिवस सर्दी निर्माण करणारे बरेच विषाणू आहेत.
सर्दीमुळे अतिशय सामान्यपणे आढळणारी लक्षणे खालील प्रमाणे :
▪️ खोकला येणे
▪️ ताप येणे
▪️ वाहते नाक
▪️ घशामध्ये खवखव होणे
▪️ चोंदणे – कंजेशन

हिवाळ्या दरम्यान मुले आजारी पडू नयेत म्हणून आम्ही येथे काही सोप्या आणि पाळाव्यातच अशा सूचना नमूद करत आहोत:
▪️ फ्लूची लस घ्या
▪️ पौष्टिक आहार सेवन करा
▪️ भरपूर पाणी प्या
▪️ पुरेसा आराम करा
▪️ वारंवार हात धुवा

▪️ निष्कर्ष:
हिवाळ्या दरम्यान जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे तुमच्या मुलांमध्ये दिसू लागली तर, त्वरित तुमच्या बालरोग तज्ञांचे समुपदेशन घ्या. जेव्हा परिस्थिती अतिशय गंभीर आणि नियंत्रणा बाहेर असेल तेव्हा तुमच्या जवळील पी आय सी यु – बालरोग अतिदक्षता विभाग असलेल्या हॉस्पिटल मध्ये जा. पी आय सी यु हा विभाग खास करून गंभीर विकारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी निर्माण केलेला असतो.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...