VishwaRaj

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

Piles Causes

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीला असंख्य कारणां मुळे मुळव्याध होऊ शकतो. एखाद्याला माहिती असली पाहिजेत अशी मूळव्याधाची कारणे खालीलप्रमाणे :


▪️आहार :


जसे माहित आहे की, आहार म्हणजे असंख्य पोषण घटक जे एखादी व्यक्ती अन्नपदार्थांच्या स्वरूपा मध्ये सेवन करत असते. सर्व आवश्यक पोषण घटक घेण्यासाठी, प्रत्येकाला पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे हे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्या अन्ना मधुन खनिजे, जीवनसत्वे, आवश्यक फॅटी ऍसिड्स, आवश्यक अमायनो ऍसिड्स, कार्बोदके, फॅट आणि प्रथिने या पोषण घटकांचे शोषण करावे लागते. संशोधना मधुन असे सिद्ध झाले आहे की, योग्य आहार सेवन केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर, दीर्घ आयुष्यावर, आणि जीवनाच्या मूल्यांवर खुप मोठा परिणाम होतो.
बऱ्याच तज्ञांनी हे मान्य केले आहे की, आहारामध्ये थोड्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यास शौचास व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे मूळव्याधाची लक्षणे सुरु होतात. यामुळे कुंथने, बद्धकोष्टता, आणि मुळव्याध निर्माण होतो. रक्तवाहिन्या मधुन रक्तप्रवाह परत जात असतो म्हणुन प्रेशर निर्माण होते त्यामुळे कदाचित हे होत असावे. ज्या कोणाला मूळव्याधाचा त्रास असेल त्यांनी त्रास बरा करण्यासाठी जास्तीत जास्त तंतुमय पदार्थांचे आहारात सेवन करावे त्याच बरोबर पुरेसे पाणी आणि इतर पातळ पदार्थ प्यावेत.

▪️अनुवांवशिकता :


अनुवांवशिकता म्हणजे प्रजननाच्या मार्फत एका पिढी कडुन दुसऱ्या पिढीला काही विशिष्ट गुण पास करणे होय. या कारण मुळे पुढच्या पिढीला मागच्या पिढीचे जेनेटिक्स फिगर्स प्राप्त होतात. अनुवांवशिकतेचा अभ्यास करणे यालाच जेनेटिक्स असे म्हणतात.

जर मूळव्याधा संबंधित कोणतीही पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तर, या विकाराचा धोका अजुन वाढतो. कारण की हा असा घटक आहे की जो बदलता येत नाही, ज्या व्यक्तींना मूळव्याधाची निश्चीत फॅमिली हिस्ट्री असेल त्यामुळे त्यांना मुळव्याध होतो म्हणुन त्यांनी स्वतः ला हायड्रेटेड ठेवावे, पुरेसे तंतुमय पदार्थ सेवन करावेत, नियमितपणे व्यायाम करावा, शौचास करताना कुंथु नये, आणि टॉयलेट मध्ये जास्तीत जास्त काळ थांबणे टाळावे.

▪️लठ्ठपणा :


शारीरिक चरबी वाढण्याचे सरासरी प्रमाण हे जेव्हा व्यक्तीच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करू शकते तेव्हा त्याला लठ्ठपणा म्हणतात. ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स हा ( बी एम आय ) 30 किंवा त्या पेक्षा जास्त असतो त्या लोकांना लठ्ठ असे म्हणले जाते.
लठ्ठपणा हा मूळव्याधाची लक्षणे निर्माण करतो आणि तो काही कारणाने हृदय विकाराच्या मोठ्या धोक्याशी, स्लिप ऍपनिया, मधुमेह प्रकार 2, कर्करोग आणि नैराश्य यांच्याशी संबंधित असतो. तसेच तो मूळव्याधाच्या मोठ्या धोक्याशी सुद्धा संबंधित असतो. हे कदाचित अती जास्त वजनामुळे ओटी पोटाच्या भागावर अती प्रमाणात दाब पडतो त्यामुळे होत असावे. या वजनामुळे गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या वाहिन्यां वर अती जास्त प्रमाणात तणाव निर्माण होतो.

▪️गरोदरपणा :


गरोदरपणा म्हणजे असा कालावधी ज्या मध्ये स्त्रीच्या गर्भाशया मध्ये बाळाची वाढ होत असते. सामान्यपणे, गरोदरपणाचा कालावधी हा 37 आठवड्यां पासून ते 40 आठवड्यां पर्यंत असतो ( 8 ते 9 महिने ). गरोदरपणाच्या या काळामध्ये, एखाद्या स्त्रीला चयापचय क्रिये संबंधी, हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी, रक्ता संबंधी, श्वासना संबंधी, किडनी संबंधी आणि भावनांच्या संबंधी बदल होतात.
गरोदरपणा मुळे देखील मूळव्याधाचा त्रास निर्माण होतो कारण त्या वेळी पायाचा रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसतो, खासकरून गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसां मध्ये जेव्हा मातेच्या पोटा मधील प्रेशर वाढलेले असते तेव्हा. अभ्यासा नुसार असे सिद्ध झाले आहे की, जवळपास 38 टक्के गरोदर स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या सम्पूर्ण काळामध्ये वेळोवेळी बद्धकोष्टातेच्या त्रासाचा अनुभव येतो. लोहाच्या गोळ्या – आयर्न घेण्याच्या प्रक्रिये मुळे आणि अन्नपचनसंस्थेच्या मार्गा मधुन जाताना अन्नाची संथ गती या कारणांमुळे बद्धकोष्टता होऊ शकते आणि याला गरोदरपणा मधील हार्मोन्स देखील कारणीभूत असतात. आणि यामुळे मुळव्याध निर्माण होतो.

▪️खुप दिवसांपासूनची बद्धकोष्टता :


बद्धकोष्टता निर्माण होते जेव्हा शौचास लहान, अवघड किंवा बाहेर पडण्यास अतिशय कडक असते तेव्हा. तसेच बद्धकोष्टता म्हणजे अनियमितपणे शौचास होणे, आठवड्या मधुन तीन पेक्षाही कमी वेळा पोट साफ होणे होय. जे रुग्ण बद्धकोष्टते मुळे त्रस्त असतात त्यांना कुंथन्याची देखील गरज पडते आणि त्यांना पोट गच्च असल्याची भावना होत राहते.
बद्धकोष्टते मुळे मूळव्याधाची लक्षणे निर्माण होतात ज्याची कारणे विवीध आसतात, आहारामध्ये तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने, कमी प्रमाणात पाणी पिल्याने, हायपोथायरॉईडिजम मुळे, हायपरकॅलेमीया मुळे, ऑब्सस्ट्रक्टिव्ह इंटेस्टीनल डिसीज मुळे, आणि मधुमेहा मुळे. मुळव्याध निर्माण करणाऱ्या कारणां पैकी बद्धकोष्टता हे सर्वात मोठे कारण समजले जाते. तसेच पूर्वी पासून असणाऱ्या मूळव्याधाला बद्धकोष्टता ही अजुन वाढवते आणि तिथे रक्ताच्या गुठळ्या निर्माण करते.

▪️खुप दिवसांपासूनचे जुलाब :


जुलाब, हे अजुन एक कारण आहे ज्यामुळे मुळव्याध हा विकार निर्माण होतो. जेव्हा तुम्हाला दिवसा मधुन किमान तीन वेळा पातळ जुलाब होत असतील तेव्हा तुम्हाला मूळव्याध निर्माण होऊ शकतो. खुप दिवसांपासूनचे जुलाब म्हणजे तुम्ही कमीत कमी चार आठवड्यां पासून रोज जुलाब होण्याच्या समस्येने त्रस्त आहात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, मालऍबसॉर्पशन सिंड्रोम, आणि खुप दिवसांपासूनचा जंतु संसर्ग, औषधाचे साईड इफेक्ट्स, इंडोक्राईन डिसऑर्डर, फुड ऍलर्जी, आणि इनफ्लामेट्री बॉवेल डिसीज या कारणां मुळे खुप दिवस जुलाब होऊ शकतात.
खुप दिवसांपासूनच्या जुलाबा मुळे सर्वांगीण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर निगेटिव्ह परिणाम होतो. हे जुलाब अडचणीत अनन्या पासून ते अशक्तपणा, अक्षमता आणि जीवघेणे होण्या पर्यंत वाढू शकतात. या खुप दिवसांच्या जुलाबा मुळे मुळव्याध देखील निर्माण होतो.

▪️वृद्धत्व :


वृद्धत्व ही एक प्रक्रिया आहे ज्या मध्ये एखादी व्यक्ती वृद्ध होण्यास सुरु झालेली असते. जरी ही प्रक्रिया सर्व प्राणी मात्रांना लागू पडत असली तरी, ही संज्ञा मुख्यत्वे मानवासाठी वापरली जाते. वृद्धत्वा मध्ये शरीरात विवीध बदल होतात ( दोन्ही आतून आणि बाहेरून ) जे मानवाला वेळे नुसार जाणवत असतात आणि मूळव्याध हा विकार निर्माण करतात. या बदलां मध्ये मानसिक, सामाजिक आणि शारीरिक बदलांचा समावेश आहे. बरेचसे आजार हे वृद्धापकाळा मुळे निर्माण होतात.
वृद्धापकाळाचे कारण काय आहे हे जरी स्पष्ट नसले तरी, सैद्धांतिकदृष्ट्या वृद्धत्व हे बायोलॉजिकल संस्थे मध्ये अनियंत्रित बदलांची वाढ झाल्या मुळे निर्माण होते. उदाहरणार्थ, या मध्ये डि एन ए ऑक्सिडेशन आणि डि एन ए मीथायलेशन चा समावेश आहे. मूळव्याधा मध्ये, वृद्धत्व हे सपोर्ट करणाऱ्या स्ट्रक्चरला कमजोर बनवते. या कारणामुळे मुळव्याध निर्माण होतो आणि नंतर प्रोलॅप्स म्हणजे गुदद्वार बाहेर येणे ही समस्या देखील निर्माण होते. मानवा मध्ये सपोर्ट स्ट्रक्चर हे कमजोर झाले आहेत हे तिशी नंतर शोधले जाऊ शकते.

▪️दीर्घकाळ टॉयलेट मध्ये बसणे :


बऱ्याच लोकांना खराब सवयी असतात जसे की नखे कुरतडणे, इंटरनेट वर जास्तीत जास्त आणि खुप काळ विनाकारण घालवणे. अजुन एक खराब सवय म्हणजे टॉयलेट सीट वर तासन तास बसून रहाणे. बरेच लोक शौचास करत असताना वाचणे किंवा फोन वर गेम खेळणे इत्यादी गोष्टींमध्ये वेळ खर्च करत असतात. अभ्यासा नुसार असे सिद्ध झाले आहे की, जवळपास 90 टक्के लोक त्यांचा मोबाईल बाथरूम मध्ये वापरतात.
जंतूनच्या सानिध्यात येण्या शिवाय, टॉयलेट वर बसण्या मुळे गुदाशया वर विनाकारण प्रेशर येते, ज्याच्यामुळे मूळव्याधाची लक्षणे निर्माण होतात. तज्ञांनी असे नमूद केले आहे की, टॉयलेट वर दीर्घ काळ बसण्या मुळे गुदद्वाराच्या सभोवतालच्या भागा मधुन रक्तप्रवाह हृदयाकडे व्यवस्थित प्रवाहित होत नाही त्या मध्ये बाधा निर्माण होते.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...