VishwaRaj

एम आय टी ची नर्सिंग ची विश्वराज इन्स्टिट्यूट :

 द एमआयटी ग्रुप ऑफ इनस्टीट्युशन

एम आय टी च्या संस्थांच्या ग्रुपने महाराष्ट्रामधील तांत्रिक शिक्षणाचा क्रांतिकारी प्रसार सुरू केला त्यामुळे ज्ञानामध्ये वंचित असलेल्या समाजासाठी जो की काही तुरळक शासकीय इंजीनियरिंग संस्थांवर अवलंबून होता त्याला उत्तम प्रतीच्या शिक्षणाची सोय झाली. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही एम आय टी च्या संस्थांच्या ग्रुपची प्रमुख संस्था माईर्स म्हणजे “महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंजीनियरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च पुणे ” या ट्रस्ट च्या अंतर्गत 1983 मध्ये स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रा मधील खाजगी इंजिनिअरिंग संस्थां पैकी एम आय टी ही एक संस्था आहे. प्रोफेसर डॉ. विश्वनाथ डी. कराड, एमआयटी ग्रुपचे फाउंडर, या साध्या आणि समर्पक शिक्षकाचे, उत्तम प्रतीचे शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचावे आणि जात व धर्म यांपेक्षा मेरीट च्या आधारावर मुलांना शिक्षण मिळावे हे स्वप्न पूर्ण झाले. मजबूत नैतिक पायावर एमआयटी ग्रुप ची सुरुवात झाली हेच एम आय टी ला अगदी विशेष बनवते. समग्र सामाजिक विकासाच्या धोरणाच्या 5 मुख्य तत्वां बरोबर शिक्षण देणे हे एमआयटीचे जीवन-मिशन आहे.


▪️ स्पिरिट ऑफ इन्क्वायरी विकसित करणे आणि शैक्षणिक उत्कृष्टता संपादन करणे.
▪️ शिस्त आणि स्वभाव वृत्तीची संवेदना बिंबवणे.
▪️ सामाजिक वचनबद्ध तेचे चैतन्य विकसित करणे.
▪️ समाजामध्ये शांततापूर्ण वातावरणाची संस्कृती वाढवणे.
▪️ उद्योग आणि संस्था यांमधील संबंध मजबूत बनवणे.

आज जवळपास 32 वर्षांच्या उत्कृष्टतेच्या प्रवासानंतर एम आय टी ग्रुपच्या 64 संस्था आहेत ज्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रा मधून 12 पेक्षा जास्त कॅम्पसेस मध्ये 6500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पुरवत आहे.

माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स मध्ये इंजीनियरिंग, मेडिसिन – वैद्यकीय, फार्मसी, मरीन इंजीनियरिंग, म्युझिक, संगीत, डिस्टन्स एज्युकेशन, टेलिकॉम मॅनेजमेंट, डिझाईन, फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, इनोवेटीव स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि याच बरोबर प्री-प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी व हायर सेकंडरी स्कूल एज्युकेशन अशा विवीध क्षेत्रांमध्ये मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे जिथे प्रत्येक स्ट्रीम मध्ये सर्वोत्तम रँकिंग मिळत आहे. जन्मजात ज्ञान शोधण्याची सवय ही पहिली शाळांमध्ये असते, एमआयटी च्या शाळेच्या विभागा अंतर्गत आय बी, आय सी एस इ, सी बी एस इ, एस एस सी आणि एच एस सी या सर्व बोर्डसचे शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गरजेमुळे उच्चतम मानकां नुसार पुरवले जाते. शाळेचा हा विभाग “ विश्वशांती गुरुकुल “ या नावाने वर्ष 2007 मध्ये सुरू करण्यात आला आणि आता या गुरुकुलच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 7 शाखा आहेत. या विशेष रचना असलेल्या गुरुकुल प्रणालीच्या शाळां खेरीज एम आय टी ग्रुपमध्ये स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्राच्या नियमां नुसार मराठी मिडीयम आणि इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण पुरवणाऱ्या शाळा देखील आहेत.

31 जुलै 2015 मध्ये, एम आय टी ग्रुपला आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी चे एम आय टी चे विद्यापीठ पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी मधील राज बाग कॅम्पस मध्ये सुरु करण्यास परवानगी मिळाली. लिबरल आर्ट, फॅशन आणि डिझाइन, फिल्मस अँड ब्रॉडकास्टिंग, मारी टाइम एज्युकेशन, एरोनॉटिकल अँड एरोस्पेस इंजीनियरिंग, फूड टेक्नॉलॉजी आणि इतर वैद्यकीय क्षेत्रांमधील कोर्सेस देण्याची सुविधा हे विद्यापीठ करेल. आमचा विशेष जोर हा मूल्यांकनाच्या फुली फ्लेक्झिबल क्रेडिट सिस्टीम च्या जागतिक पद्धती आत्मसात करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गाने अभ्यासक्रम वितरित करणे यावर असेल.

गुणवत्तापूर्ण शिक्षणा शिवाय एमआयटी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स हा मूल्यांवर आधारित शिक्षण प्रणालीवर विश्वास ठेवतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्मिकता यांच्या बरोबर समाजामध्ये शांततेचा संदेश पसरवण्यासाठी मूल्यांवर आधारित सार्वत्रिक शैक्षणिक प्रणाली वाढवण्याच्या च्या कारणासाठी चॅम्पियनिंग आणि माईर एम आय टी च्या ‘ विश्व शांती केंद्र ‘ उभारण्याच्या कामाच्या कौतुका खातर युनेस्को, पॅरिस यांनी मानवी अधिकार, लोकशाही, शांती आणि सहिष्णुता यांची युनेस्को चेयर मे 12, 1998 रोजी एम आय टी ला दिली.

प्रो. डॉ. विश्वनाथ डी कराड हे विश्वशांती डोम, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, माईर एम आय टी पुणे चे ‘ विश्वशांती केंद्र ‘, मानवी अधिकार, लोकशाही, शांती आणि सहिष्णुता यांची युनेस्को चेयर, एम आय टी चे विश्वशांती विद्यापीठ, श्री क्षेत्र आळंदी परिसर विकास समिती, संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज देणगी व्याख्यान माला ट्रस्ट इत्यादी विवीध उपक्रमांचे संस्थापक आहेत.

शिवाय, प्रो. डॉ. विश्वनाथ डी कराड यांना इंजिनिअरिंग आणि तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी साठी 1992 या वर्षा मधील राष्ट्रीय पुरस्कार, श्री क्षेत्र आळंदी – देहू, तालुका पुणे येथे ग्रामीण विकास या क्षेत्रा अंतर्गत पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण करून या तीर्थ क्षेत्रांचा कायापालट करण्याच्या प्रशंसनीय कामगिरी साठी माधव – मंदाकिनी पुरस्कार अशा प्रकारच्या विवीध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विवीध संस्थांचे ते सदस्य आहेत.

विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ला का निवडावे?

▪️ उच्चतम व्यावसायिकतेच्या वातावरणा बरोबर सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा
▪️ सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा, प्रत्येक प्रयोगशाळे मध्ये प्रात्यक्षिक प्रयोगाचे सेटप
▪️ सक्षम आणि समर्पक विद्याशाखा
▪️ एकात्मिक शिक्षण पद्धती
▪️ विद्यार्थ्यांसाठी मैत्रीपूर्ण शिकण्याचे मॉड्यूल्स
▪️ प्रचंड मोठ्या प्रमाणातील क्लीनिकल एक्सपोजर
▪️ सर्वोत्कृष्ट वाचनालय आणि माहिती केंद्र
▪️ नियमितपणे सेमिनार्स चे आयोजन आणि शिक्षक व विद्यार्थ्यांचे विश्लेषणात्मक कौशल्य वाढवण्यासाठी परिसंवाद
▪️ विद्यार्थ्यांना वैयक्तिक अटेंशन मिळते ( मेंटॉरशीप )
▪️ गुणवान विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके
▪️ घरासारखे वातावरण आणि आरोग्यदायी जेवणाबरोबर मुले आणि मुलींसाठी वेगवेगळी हॉस्टेलची सुविधा
▪️ योगा आणि मनोरंजनाचे केंद्र

बेसिक बीएससी नर्सिंग साठी प्रवेश प्रक्रिया :
हे कॉलेज महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक ( एम यु एच एस ) बरोबर संलग्न आहे. या कॉलेजची 40 जागांची क्षमता आहे. डी एम ई आर महाराष्ट्र हे ( द नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट )नीट या प्रवेश परीक्षेमधील गुणांच्या मेरीट नुसार विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( ए टी ए ) यांच्याद्वारे परीक्षा घेतल्या जातात. 50 जागांपैकी 85% (34 जागा ) ऍडमिशन डी एम ई आर यांच्या माध्यमातून होतात आणि 15 % (6 जागा ) या साठी राखीव असतात. ज्या उमेदवारांना या कोट्या मधून ऍडमिशन मिळवायचे असते त्यांना मॅनेजमेंट मार्फत ऍडमिशन दिले जाते.

Eligibility for Admission:- B.Sc. Nursing

  1. HSC Examination ( 10 + 2 ) ( Science faculty ) or equivalent with English, Physics, Biology (Botany & Zoology) Subject with 45% marks for open category and 40 % marks for reserve category is essential.
  2. Common Entrance Test i.e. NEET is compulsory.
  3. The minimum age for admission shall be 17 years on 31st December of the year in which admission is sought. The maximum age limit for admission shall be 35 years. The candidate shall be medically.

Duration of course: – 4 years including internship

Intake:- 40 seats

गंभीर विकारांमध्ये सर्वोत्तम सेवा पुरवत असल्यामुळे विश्वराज हॉस्पिटल ला त्याचा अभिमान आहे