VishwaRaj

मूळव्याधाला प्रतिबंधित करण्यासाठीचे सोपे मार्ग

Tips To Prevent Piles (Hemorrhoids)

मुळव्याध हा एक अतिशय सामान्यपणे निर्माण होणारा विकार आहे जो जीवनामध्ये एकदा तरी होतो. जरी तो खुप गंभीर विकार नसला तरी त्याच्यामुळे होणाऱ्या वेदना या अतिशय अस्वस्थनीय आणि इरिटेटिंग असतात. त्वचेला होणारी खाज आणि त्वचेवर पडणारा ताण हे खरे तर खुप वेदनादायक असतात. तुमच्या आरोग्यास कोणतीही हानी न पोहोचवता तुम्हाला मुळव्याध कायमचा टाळण्यासाठी सहज व सोपे उपाय फॉलो करण्याची आवश्यकता असते.

▪️जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा जा :


हे सामान्य व्यवहारज्ञाना सारखे वाटत नाही का, परंतु असे बरेच लोक आहेत जे ही गोष्ट टाळतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा बाथरूम मध्ये जाणे देखील टाळतात. जर तुम्ही बाथरूम वापरण्यात उशीर करत असाल आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही जात नसाल, तेव्हा तुमची शौचास ही कडक बनते आणि तुमच्या आतड्यांमध्ये कोरडी होते. यामुळे ती सहजपने बाहेर येणे अवघड होऊन जाते. या नंतर, जेव्हा तुम्ही शौचास करताना प्रेशर देता आणि कुंथतता, तेव्हा तुम्हाला मुळव्याध निर्माण होण्याच्या शक्यता वाढतात. दुसऱ्या केस मध्ये बोलायचे झाले तर, जेव्हा तुम्हाला जाण्याची गरज नसते तेव्हा शौचास करताना विनाकारण अजिबात कुंथु नका. कुंथण्या मुळे तुमच्या रक्त वाहिन्यांच्या कुशन्स वर अधिक प्रेशर वाढते, हे एक कारण आहे ज्यामुळे मुळव्याध निर्माण होऊ शकतो. विशेषकरून, कुंथण्या मुळे गुदद्वाराच्या आतमध्ये असणारा मुळव्याध हा त्याच्या बाहेर येऊन मूळव्याध निर्माण करतो.

▪️ बाथरूम मध्ये दीर्घकाळ थांबणे टाळा :


सरासरी वेळ जो तुम्ही बाथरूम मध्ये घालवता तो सुद्धा एक मौल्यवान वेळ आहे जो विनाकारण खर्च करण्यापेक्षा इतर कोणत्याही परिणामकारक मार्गाने उपयोगात आणता येऊ शकतो. जर तुमच्या टॉयलेट मध्ये वॉटर टँक वर मॅगझीन्स किंवा पुस्तकांचा ढीग लागला असेल तर ते सर्व काढून टाकल्याची खात्री करून घ्या आणि त्यांना रूम मध्ये ठेवा, कारण तुमचे बाथरूम तुमची स्टडी रूम नाही आहे. टॉयलेट मध्ये तुमचा फोन घेऊन जाणे सुद्धा टाळावे कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून त्याचे फिड्स ब्राउझिंग करण्याचे ज्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट किंवा ट्विटर यांचा समावेश असतो आणि गेम खेळण्याची ती जागा नाही आहे.
बाथरूम मध्ये दीर्घ काळ थांबणे टाळावे आणि मुळव्याधा मधून रक्तस्त्राव होणे सुद्धा टाळावे. कारण जेवढा जास्त वेळ तुम्ही टॉयलेट मध्ये घालवणार असता, तेवढे तुम्ही शौचास करत असताना जास्तीचा फोर्स लावत असता. याचबरोबर, ज्या पोझिशनमध्ये तुम्ही बसलेला असता त्या पोझिशनमुळे तुमच्या गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर जास्तीचे प्रेशर निर्माण होते. हे दोन्ही घटक मुळव्याध निर्माण होण्याचा धोका वाढवतात.

▪️ तंतुमय पदार्थ असणाऱ्या आहाराचे सेवन करा :


मुळव्याधाला नैसर्गिकरीत्या टाळण्यासाठी, तुम्हाला शौचास मऊ आणि सहजपणे होण्याची आवश्यकता आहे. आहारा मधील स्मार्ट पर्याय निवडून आणि हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिऊन तुम्ही योग्य ती युनिफॉर्मिटी मिळवू शकता.
तुमच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतील तर ते मुळव्याधाचे सर्वात सामान्य कारण आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर जास्तीत जास्त तंतुमय पदार्थ सेवन करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे आणि 100% होल ग्रेन्स यांचा समावेश असतो.
जर आवश्यकता असेल, तर फायबरचे सप्लिमेंट घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन घ्या. परंतु तुम्हाला प्रथम असे सुचवण्यात येईल की तुमच्या आहारामधील अन्नपदार्थांमधून तंतुमय पदार्थ सेवन करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करा. तंतुमय पदार्थ हे तुम्हाला बद्धकोष्टता टाळण्यासाठी मदत करू शकतात, बद्धकोष्ठता ही कुंथन्यासाठी कारणीभूत असते जो मुळव्याध निर्माण होण्याचा धोकादायक घटक आहे.
याचबरोबर, तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि असे अन्नपदार्थ टाळा ज्यामुळे तुमच्या पचनास त्रास होईल. काही लोकांसाठी, डेरी प्रॉडकट्स मध्ये असणारा लॅक्टोज हा त्रासदायक घटक मानला जातो. उलट पक्षी, काही लोकांसाठी, ग्लुटेन किंवा अति प्रमाणात रिफाइंड अन्नपदार्थ हे त्रासदायक घटक म्हणून काम करतात आणि तुम्हाला अस्वस्थ बनवतात.

▪️ पुरेसे पाणी प्या :


दारूचे सेवन करणे बंद करा. बऱ्याच अभ्यासा नंतर असे सिद्ध झाले आहे की, अतिप्रमाणा मध्ये दारूचे सेवन केल्याने मुळव्याध निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ शकता. आरोग्याचा 75 टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. तुम्ही हायड्रेटेड राहिल्यामुळे तुम्हाला शौचास मऊ होण्यास मदत होते आणि तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.
भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या किंवा इतर पातळ पदार्थ उदाहरणार्थ फळांचा ज्यूस आणि क्लिअर सूप्स यांचे सेवन करा त्याचबरोबर तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास नैसर्गिक रित्या मुळव्याधाला टाळण्यासाठी चे हे सर्वात परिणामकारक औषध ठरते. या पातळ पदार्थांमुळे तंतुमय पदार्थ त्यांचे काम उत्तम पद्धतीने करू शकतात.

▪️ नियमितपणे व्यायाम करा :


दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक हालचाली या सदा सर्वकाळ करण्याची शिफारस केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीने हे करणे गरजेचे आहे. व्यायाम तुम्हाला आरोग्यपूर्ण ठेवतो आणि तुम्हाला आजार होण्यापासून टाळतो. त्याच पद्धतीने, मुळव्याधाला टाळण्यासाठी तुम्ही माफक प्रमाणामध्ये व्यायाम केला पाहिजे. शारीरिक हालचाली या तुम्हाला आतड्यांच्या आणि पचनाच्या समस्या, ज्यामध्ये मुळव्याधाचा देखील समावेश असतो त्या सुधारण्यास किंवा टाळण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही बैठे काम करत असता किंवा बसून असता तेव्हा तुमच्या शरीराच्या कार्यप्रणाली संस्था या मंद झालेल्या असतात, ज्यामध्ये तुमच्या आतड्यांचा देखील समावेश असतो.
व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामधील टाकाऊ पदार्थ हे तुमच्या आतड्यामधून पुढे जाण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्टता, आणि कोरडी, कठीण शौचास होण्या पासून टाळण्यासाठी देखील मदत होते. चालणे, कमी अंतरावर पळणे, बायकिंग किंवा योगा अशा प्रकारच्या विवीध ऍक्टिव्हिटीज मधून तुम्ही काही निवडू शकता आणि ऍक्टिव्ह जीवनशैली सुरू करू शकता.
रक्तस्त्राव होणारा मुळव्याध टाळण्यासाठी, व्यायाम करत असताना महत्त्वाची काळजी घेणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे – जड वस्तू उचलणे, वेट लिफ्टिंग स्क्वॅट्स आणि इतर अशा हालचाली ज्या पोटावर प्रेशर निर्माण करतील त्या पूर्णपणे टाळा. जर तुम्ही मुळव्याधाला टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर, या व्यायाम प्रकारांमुळे काहीतरी चांगले होण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते.

▪️ तुमच्या डॉक्टरांना भेट द्या:


जर तुम्ही मुळव्याधाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाल्याचे निरीक्षण केले असेल तर किंवा रक्त स्त्राव वाढला असेल तर, तुमच्या डॉक्टरांना भेट द्या आणि व्यवस्थित चेकअप करून घ्या. तुमच्या लक्षणांच्या संबंधित ज्यांचे मूल्यमापन केले असेल त्या सर्व डिटेल्स बाबत चौकशी करा. मुळव्याधाच्या उपचारांच्या सर्वच प्रकारांमध्ये शस्त्रक्रियेची गरज लागत नाही आणि इतर आजार आहेत की नाही ते तपासण्यासाठी तुम्हाला मूल्यांकन करण्याची गरज लागू शकते.
मुळव्याधाला कायमचे टाळण्यासाठी खाली दिलेले उपाय फॉलो करा. हे उपाय आचरणात आणण्यासाठी अगदी सोपे आहेत आणि परिणामकारकरीत्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित फिट होऊ शकतील. त्यामुळे, मुळव्याधाची कोणतीही लक्षणे निर्माण होण्या पासून टाळण्यासाठी हे उपाय करण्यास सुरू करा आणि इतर कोणत्याही आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील याचा उपयोग होईल. स्वतःला मुळव्याधाच्या समस्यांनी त्रस्त होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सर्वोत्तम रिझल्ट पाहण्यासाठी दिलेल्या सूचनांचा अवलंब करण्यास सुरुवात करा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...