VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील मूत्रसंस्थाशास्त्र केंद्र हे स्त्री आणि पुरुषांमधील किडनीचे विकार, मूत्राशयाच्या पिशवीचे विकार, मूत्रवाहिनीचे विकार, मूत्रमार्गाचे विकार असे मूत्रसंस्थेचे विकार आणि पुरुष जननेंद्रीयाचे विकार, अंडकोषाचे विकार, टेस्टीजचे विकार, प्रोस्टेटचे विकार असे पुरुष प्रजनन संस्थेचे विकार इत्यादींचे रोगनिदान आणि उपचार करण्यामध्ये अतिशय निष्णात आहे.

Show More

उपचार आणि सेवा:-

आम्ही देत असलेले उपचार :-

मूत्रसंस्था विकारांमध्ये आमच्या रुग्णांना उत्तमातील उत्तम उपचार अगदी माफक दरामध्ये मिळावे यासाठी आम्ही आमच्या कौशल्यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही उपचार देत असलेले काही मूत्रसंस्था विकार:-

 या विकारामध्ये रुग्णाला लघवीवर नियंत्रण राहत नाही त्यामुळे लघवी केव्हाही अनियंत्रित रित्या अपोआप बाहेर येत राहते ज्यामुळे रुग्ण लाजेखातर सामाजिक पेचा मध्ये पडतो.

युरीनरी इनकॉन्टिनन्सची डायबेटीज, ओव्हर रिएक्टिव ब्लॅडर, गरोदरपणा किंवा प्रसूती, मूत्राशयाच्या पिशवीच्या स्नायूंची कमजोरी, वाढलेले प्रोस्टेट इत्यादी  सामान्य कारणे आहेत.

या विकारामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार नेहमीपेक्षा वाढलेला असतो. हा विकार जास्त करून वयस्कर पुरुषांमध्ये दिसून येतो आणि हा प्रोस्टेट कॅन्सरचा प्रकार नसतो. रुग्णाला सतत लघवी लागल्याची भावना होत असते आणि लघवी करून आल्यानंतर देखील जड पणाची भावना राहते.

 लोकांवर परिणाम करणारा मूत्र संस्थेचा किडनी स्टोन हा एक सामान्य विकार आहे. मूत्र संस्थेमधील खडे हे मुत्रपिंड, मूत्र वाहिका, मुत्राशयाची पिशवी, मूत्रमार्ग यांमध्ये आढळून येतात. हे खडे मूत्रविसर्जना मध्ये  अडथळा निर्माण करतात त्यामुळे अतिशय तीव्र वेदना होऊ शकतात. मुत्रसंस्थे मधील लहान आकाराचे खडे हे वेळेनुसार स्वतःहून विरघळतात आणि लघवीवाटे बाहेर पडतात परंतु मोठ्या आकाराचे खडे काढण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते.

 युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे मुख्यत्वे जीवाणूंच्या ( बॅक्टेरिया) संसर्गामुळे होते. लघवी करत असताना रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये जळजळ होत असते आणि लघवी झाल्यानंतर देखील पूर्णपणे मुत्राशयाच्या पिशवीमध्ये अजूनही लघवी असल्याची भावना होत राहते.

 मूत्र मार्गावरील तज्ञांच्या सल्ल्याने ( यूरोलॉजिस्ट ) अँटिबायोटिक्स आणि इतर काही औषधांच्या मदतीने या विकारावर उपचार केले जातात.

 हा पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे. पुरुषांच्या प्रजनन संस्थेमधील प्रोस्टेट ही ग्रंथी वीर्य तयार करण्याचे कार्य करते. या कॅन्सर वर विविध औषधे, विविध उपचार पद्धती, शस्त्रक्रिया  इत्यादींद्वारे उपचार केले जातात.

 कॅन्सर म्हणजे असामान्यपणे अमर्याद झालेली पेशींच्या संख्येची वाढ होय यामुळे बाधित अवयवांमध्ये लंप म्हणजे मोठी गाठ तयार होते त्यामुळे त्या अवयवाचे सामान्य कार्य सुरळीत पार पडत नाही. कॅन्सर वर नेहमी शस्त्रक्रिया, किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी याद्वारे  उपचार केले जातात.

 मूत्रपिंडा मध्ये काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ साठले जातात आणि नंतर त्यांचे रुपांतर खड्यांमध्ये होते त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या वेदना निर्माण होतात.

 या विकारावर पुरक उपचार, शस्त्रक्रिया किंवा काही लेझर प्रक्रिया याद्वारे उपचार केले जातात.

या विकारामध्ये मूत्राशयाच्या पिशवी वरिल नियंत्रण गमावलेले असते त्यामुळे अनियंत्रित रित्या लघवी आपोआप बाहेर येते.

 या विकारावर काही पेलव्हीक फ्लोअर चे व्यायाम आणि काही सवयींमध्ये बदल करून उपचार केले जातात.

ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये मूत्रपिंडा मध्ये गळुंचा (सिस्ट ) पुंजका निर्माण होतो आणि मूत्रपिंडाचे सामान्य कार्यामध्ये बिघाड होतो. या विकारावर हीमोडायलेसीस, पेरीटोनियल डायलेसीस, रिनल रिप्लेसमेंट थेरपी / मूत्रपिंड बदलणे किंवा मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया यांद्वारे उपचार केले जातात.

 वरील विकारां बरोबरच प्रोस्टेट कॅन्सर, ब्लॅडर प्रोलॅप्स, ब्लॅडर कॅन्सर, इरेक्टाइल डिसफंक्शन, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, प्रोस्टेटाइटीस, इंटरस्टीशियल सिस्टायटीस, हीमॅचुरिया इत्यादी मूत्रसंस्थेचे विकार सामान्यपणे आढळतात.

उपचार पद्धती

विश्वराज हॉस्पिटल मध्ये आम्ही मूत्रसंस्थेच्या विविध प्रकारच्या बऱ्याच विकारांवर उपचार आणि सेवा पुरवत आहोत. त्या पुढील प्रमाणे :-

 या उपचार पद्धती मध्ये मूत्रपिंडाचा कॅन्सर किंवा मूत्रपिंडाला गंभीर दुखापत झालेली असेल आणि मूत्रपिंड निकामी झाले असेल तर शस्त्रक्रिया तज्ञ / सर्जन मूत्रपिंड शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकतात.

 ही एक शस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे या प्रक्रियेमध्ये व्यवस्थित रक्तप्रवाह होण्यासाठी अशुद्ध रक्त वाहिनी आणि शुद्ध रक्त वाहिनी यांमध्ये एक जोडणी निर्माण करून त्या एकमेकांना जोडल्या जातात. ही उपचार पद्धती मुख्यत्वे डायलेसिस च्या वेळी उपयोगी पडते.

मूत्रपिंड जर जंतुसंसर्ग किंवा इतर विकार यामुळे निकामी झाले असेल तर हिमोडायलेसिस च्या सहाय्याने त्या व्यक्तीचे रक्त शुद्ध केले जाते. या प्रक्रियेलाच सामान्य डायलेसिस असेही म्हणतात.

 या प्रक्रियेमध्ये मूत्रपिंडाचा एक छोटा भाग काढून सूक्ष्मदर्शक( मायक्रोस्कोप ) यंत्राखाली तपासला जातो. मूत्रपिंडाच्या विकारांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांचे रोग निदान करण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

 ही एक शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे यामध्ये एक पातळ नलिका मूत्रपिंडा मध्ये घातली जाते. या नलिकेला युरेटेरिक स्टेंट म्हणतात की जी लघवीचा प्रवाह व्यवस्थित व्हावा म्हणून मुत्रपिंडा मधील अडथळा टाळण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाते.

 ही एक शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये युरेटेरोस्कोप च्या सहाय्याने मूत्रपिंडा मधील खडा शोधला जातो. युरेटेरोस्कोप हा मूत्रमार्ग आणि मूत्राशयाची पिशवी यांच्या मार्फत जिथे खडा आहे तिथपर्यंत नेला जातो.

 ही एक परीक्षण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये तज्ञ सर्जन सिस्टोस्कोप च्या सहाय्याने मुत्राशयाची पिशवी आणि मूत्रमार्ग यांच्या आतील आवरणाचे परीक्षण करतात. हा सिस्टोस्कोप आतून पोकळ असतो आणि त्याच्या टोकाला लेन्स लावलेली असते.

 ही एक सामान्य रेडिओलॉजिकल प्रक्रिया आहे. विशेष एक्स-रे च्या साह्याने मूत्रमार्ग आणि मूत्राशयाच्या पिशवीचा फोटो/ एक्स-रे काढला जातो.

 ही एक मूत्रपिंडाची काही थोड्या दिवसांमध्ये होणारी गंभीर हानी असते. काही औषधे, डायलेसिस, युरेटेरल स्टेंट किंवा फ्लूड रिप्लेसमेंट च्या साह्याने यावर उपचार केले जातात.

ही एक त्वचेवर लहान छिद्र करून त्यामार्फत मूत्रपिंडा मधील लहान आकाराचे खडे काढण्याची प्रक्रिया आहे.

 मूत्रसंस्थे मधील विकारांची ही शेवटची पातळी असते. मूत्र विकाराची वाढ मंद करणे आणि अवयवा मधील पुढील बिघाड कमी करणे याद्वारे या पातळीवर उपचार केले जातात. शेवटी शस्त्रक्रियेद्वारे मूत्रपिंड बदलून उपचार करावे लागतात.

 या प्रक्रियेमध्ये रुग्ण मूत्रविसर्जन करत असताना यूरोलॉजिस्ट मूत्रमार्ग आणि मूत्राशयाच्या पिशवीची तपासणी करतात. ही प्रक्रिया नेहमी वेसीकोयुरेटेरल रिफ्लेक्स चे निदान करण्यासाठी केली जाते.

 या विकारांमध्ये मूत्रपिंडा मधील ग्लोमेरूलाय या भागामध्ये सूज निर्माण झालेली असते तसेच तिथे डाग पडलेले असतात. आहारामध्ये काही विशिष्ट बदल करून आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस घेऊन या विकारावर उपचार केले जातात.

 ही एक डायलिसिसची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये पोटावरील आवरणाचा उपयोग करून रक्त शुद्ध करण्याची क्रिया केली जाते.

 ही एक विशेष एक्स-रे प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मूत्राशयाच्या पिशवी मधील विकार तपासण्यासाठी वापरली जाते.

मूत्रविकार रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण

मूत्रसंस्थेचे कर्करोग, प्रोस्टेट चे आजार, मूत्रविकारांवर दुर्बीनिद्वारे शस्त्रक्रिया, मूत्रविकारांवरील पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, मूत्रमार्गामधील खडे, लिंगामध्ये ताठरता नसने, लहान बालकांमधील मूत्रविकार, के टी पी लेझर, मूत्रमार्गा मधील खड्यांवरील शस्त्रक्रिया (आर आय आर एस, मिनी पी सि एन एल ), प्रोस्टेट साठी लेझर शस्त्रक्रिया, प्रोस्टेट कर्करोगसाठी शस्त्रक्रिया, पुरुषांमधील मूत्रपिंड आणि मुत्राशयाच्या ट्युमर मुळे आरोग्याच्या समस्या इत्यादी विकारांवर मूत्रसंस्था शास्त्र विभाग संपूर्ण रोगनिदान आणि उपचार पूरवत आहे.

पायाभूत सुविधा

 विश्वराज हॉस्पिटल मधील मूत्रसंस्था विकार केंद्र हे अत्याधुनिक रोग निदान आणि उपचारात्मक उपकरणांनी सुविद्य आहे. युरोफ्लोमेट्री, अल्ट्रासाउंड, डॉप्लर आणि लिथोट्रिप्सी इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. इंडोस्कोपिक प्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णांना अति उत्तम उपचार तसेच त्यांचा एकांत आणि आसपासचे आरामदायी वातावरण यासाठी हे केंद्र पूर्णपणे समर्पित आहे.

Show More

Department Of Urology

All About Urology

The Department of Urology is the branch of medical science that deals with the diagnosis and treatment of male and female urinary tract that includes organs like kidneys, bladder, ureters, and urethra. This department also treats various diseases of male reproductive organs like the penis, scrotum, testes, prostate, etc. 

An expert physician who treats urology diseases is a urologist that has a wide knowledge of internal medicine, pediatrics, gynecology, and some other parts of health care as well.

The practices of a urologist include two ways of treating such diseases, one way is a medical treatment which is also a non-surgical one, which is used to treat benign prostatic hyperplasia and urinary tract infections. The other way is a surgical way in which a urologist treats diseases like prostate cancer, kidney stones, traumatic injury, congenital abnormalities, and stress incontinence with the help of surgeries.

Under urology, there are various other segments, like Endourology, Laparoscopy, Neurourology, female urology, Pediatric urology, Andrology, Reconstructive urology, etc. Each of these segments, under Urology, has certain types of diseases and treatments related to it.

Urology Diseases

Urology diseases are diseases that affect the urinary tract and its organs. These diseases can affect a person of any age. In the female, these diseases affect their urinary tract while in male, they can affect their urinary tract along with reproductive organs. Some Urology diseases are:

Urology Treatments and Services

Infrastructure at Urology Department

At VishwaRaj Hospital, we believe that our Infrastructure and all the technologies are present to provide the best services on time. The infrastructure at VishwaRaj hospital provides all endoscopy procedure inclusion of Cystoscopy, V.I.U, TURP, RIRS, URS PCNL. We also have expert urologists that have vast experience of doing laparoscopic Urology Surgery, diagnosis, and treatment of Male Sexual dysfunction, Holmium Laser for prostate, and calculus disease. We also have other facilities like E.S.W.L, Urodynamic, Cadaveric Transplant, Renal Transplantation, etc.

The Department of Urology is supported by an array of state-of-the-art equipment, modular operation theatres, and A-class machines to offer services that are unique & superior. The state-of-the-art Urology Unit offers minimally invasive, scar-less options for urologic procedures and medical management of kidney disease.  Our Urology unit works as a cohesive team with interdisciplinary interactions between Urologists, Nephrologists, and Medical Oncologists to address all related issues of patients.

Urology Treatments & Services At VishwaRaj Hospital

Treatments & Cure
Services

Our Expert Doctors- Urology Department

Dr Parag (2)

2 वर्षांचा कामाचा अनुभव

डॉ. पराग गुल्हाने

युरोलॉजी विभाग

एम बी बी एस, एम एस ( सर्जरी), डी एनबी (युरो)

नियोजित भेटी नुसार

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Male
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Albumin
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Globulin
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • HBA1C
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • USG Abdomen & Pelvis
    • Haemogram (Cbc)
    • Psa-Prostate Specific Antigen
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Physician Consultation(Package)
    ₹6820/- ₹8525/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- यूरोलॉजी विभाग

    Dr Parag (2)

    2 वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. पराग गुल्हाने

    युरोलॉजी विभाग

    एम बी बी एस, एम एस ( सर्जरी), डी एनबी (युरो)

    नियोजित भेटी नुसार

    यूरोलॉजी ब्लॉग्ज

    यूरोलॉजी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    मूत्रविज्ञान शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.