VishwaRaj

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे दोन महत्त्वाचे फायदे म्हणजे ती कमीत कमी चिरफाड करावी लागणारी प्रक्रिया आहे आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतर बरे होण्याचा दर हा ओपन शस्त्रक्रिये पेक्षा जलद आहे.
तथापि, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतर तुम्हाला सर्वोत्तम रिकव्हरी होण्यासाठी विशिष्ट सूचनांचे पालन करावेच लागते ज्यामध्ये जीवनशैली, व्यायाम आणि आहार यांचा समावेश असतो.
याशिवाय, तुम्हाला लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतर कसे झोपावे याबद्दल सुद्धा काळजी घेणे गरजेचे असते.

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतरच्या योग्य असणाऱ्या झोपण्याच्या पोझिशन्स – स्थिती :
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिये नंतर झोपणे आणि योग्य प्रकारे आराम करणे हे तुमच्या रिकव्हरी साठी अतिशय गरजेचे असते. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिये मधुन गेल्या नंतर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मेंटेन करणे हे अतिशय महत्वाचे असते.
खाली काही झोपेच्या पद्धती – पोझिशन्स नमूद केलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शस्त्रक्रिये नंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही.

▪️तुमच्या पाठीवर झोपणे :


कोणत्याही शस्त्रक्रिये मधुन गेल्या नंतर एक सर्वोत्तम झोपण्याची स्थिती म्हणजे तुमच्या पाठीवर सरळ झोपणे होय. जर तुम्हाला तुमच्या पायावर, हिप्स – कंबरेवर, मणक्यावर, आणि हातांवर शस्त्रक्रिया झालेली असेल तर ही झोपण्याची स्थिती तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा पोचवेल. याशिवाय, जर तुम्ही तुमच्या शरीराच्या खाली उशी ठेवली तर, ती तुम्हाला अजुन आधार आणि आराम मिळवून देईल.
तुमचे हात, पाय आणि अंगठे कोणत्या स्थिती मधे असतील हे प्रत्येक परिस्थिती नुसार ठरेल. तथापि, जेव्हा पाठ एकदम सरळ आणि तुमचे हात तुमच्या दोन्ही बाजूस, पाय पुर्ण सरळ, आणि अंगठे छताच्या दिशेने वर झालेले असतील तेव्हा ही सर्वोत्तम स्थिती असेल. या स्थितीमुळे तुम्हाला स्वतः ला तटस्थपने एकसंध ठेवण्यास मदत होते. म्हणुन जेव्हा कसे झोपावे याची शंका असेल तेव्हा तुमच्या पाठीवर झोपावे.

▪️तुमच्या एका बाजूवर झोपणे :


अशा काही परिस्थिती आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपण्याचा सल्ला दिला जात नाही. याव्यतिरिक्त, जर तुम्ही हिप किंवा मणक्याच्या शस्त्रक्रिये मधुन गेला असाल तर एका बाजूवर झोपणे अतिशय घातक असेल. तथापि, जर तुम्हाला तुमचे डॉक्टर त्याची परवानगी देत असतील, तर तुम्ही एका बाजूवर झोपु शकता परंतु तुमचे गुडघे किंवा घोटे यांच्या मध्ये एखादा फिक्स सपोर्ट घेऊनच. रात्री कशा पद्धतीने झोपणे सुरक्षित आहे याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन घेऊ शकता.

▪️तुमच्या पोटावर झोपणे :


शस्त्रक्रिये नंतर डॉक्टर तुम्हाला पोटावर झोपण्याचा सल्ला देणार नाहीत. या झोपण्याच्या स्थिती मुळे तुमच्या मणक्याला हानी पोहोचू शकते आणि तुमच्या हिप एरिया वर सुद्धा प्रेशर येऊ शकते. जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर तुमच्या या झोपण्याच्या सवयी वर नियंत्रण ठेवा. तुमच्या पाठीवर किंवा एका बाजूवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती आहे.

▪️जलद रिकव्हरी साठी करावयाची इतर तयारी :


तुमचा रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या समस्या टाळण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्यावर तुम्हाला काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे खाली काही टिप्स दिलेल्या आहेत :

▪️तयारीत रहा :


शस्त्रक्रियेच्या शेवटच्या क्षणी तयारीत रहाणे फार कठीण असते. तथापि, तुम्ही जेवढे जास्तीत जास्त तयारीत राहाल, तेवढी रिकव्हरीची संधी उत्तम राहील. शस्त्रक्रियेच्या पूर्वी तुम्ही प्रत्येक गोष्टीची तयारी करून ठेवली पाहिजे. मेडिकल स्टोअर चे राउंड कमी करणे म्हणजे शस्त्रक्रिये नंतर चा ताण कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. तुम्ही जेवढा जास्तीत जास्त आराम कराल तेवढा तुमचा रिकव्हरीचा रेट वाढेल.

▪️मदतीचा हात तुमच्या बाजूला तयार ठेवा :


तुमच्या शस्त्रक्रियेच्या पहिल्या आठवड्या दरम्यान, अशी कोणी तरी व्यक्ती जवळ असणे गरजेचे आहे जी तुम्हाला काही हवे असल्यास आणून देऊन मदत करू शकेल.
ती व्यक्ती कोणीही असु शकेल तुमचा जीवनसाथी, फॅमिली फ्रेंड, रूम मेट, किंवा हेल्थ केअर स्टाफ सुद्धा. तुम्हाला योग्य काळजीची गरज असते मग तुमची अवयव काढण्याच्या प्रक्रियेची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा साधी रोगनिदानसूचक. कोणीतरी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असेल तर ते उत्तम ठरेल कारण जेवण बनवणे, स्वछता ठेवणे, गुंतागुंतीच्या समस्यांवर लक्ष ठेवणे, मदतीसाठी डॉक्टरां पर्यंत पोचणे इत्यादी साठी तुम्हाला कोणाची तरी मदत लागतेच.
मदत करणारी ती व्यक्ती तुम्ही वेळेवर औषध घेत आहात की नाही, आराम करताय का, रोजचा व्यायाम करताय का इत्यादी गोष्टींची काळजी घेऊ शकते.

▪️हालचाल करत राहा :


शस्त्रक्रिये नंतर तुमच्या शरीराला आरामाची गरज असते, तथापि, हे गरजेचे आहे की, प्रत्येक दोन तासांनी तुम्ही उठून तिथल्या तिथे फेऱ्या मराव्यात त्यामुळे पोटात तयार झालेला गॅस बाहेर पडण्यास मदत होईल, परंतु डॉक्टरांच्या सल्या नुसार हे करावे.
सुरवात करण्यास घाबरू नका. सुरवात एकदम हळू करा आणि तुमच्या कॅपॅसिटी नुसार फिरायला लागा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही फक्त बाथरूम पर्यंत जाऊ शकता तर, तेवढे तुम्ही जा. परंतु हळू हळू तुमचे चालण्याचे प्रयत्न हे नर्सच्या स्टेशन पर्यंत वाढवा. जेव्हा तुम्ही हॉस्पिटल मध्ये असाल तेव्हा नर्स तुम्हाला ही प्रक्रिया करण्यास मदत करतील, परंतु तुम्ही घरी पोहोचल्या नंतर हे रूटीन चालु ठेवा. काही दिवसां नंतर, तुम्ही संध्याकाळी बाहेर जाऊन चालण्यासाठी देखील सक्षम झालेले असाल.

▪️तुमच्या पोटाला स्प्लिंट लावा :


तुमच्या पोटाला बरे होण्यासाठी आणि तुम्हाला सरळ उभे होल्ड करण्यासाठी आधाराची गरज असते. जर तुम्हाला पोटा मध्ये वेदना होत असतील, तर उशीला कवटाळणे उत्तम राहील, किंवा उशी सरळ पोटाला बांधून टाका. तुमचे काम पुन्हा सुरु करण्याची घाई करू नका. ही एक चांगली कल्पना नसेल कारण खुप वेळ सरळ बसल्याने सुद्धा पोटाच्या भागावर मोठ्या प्रमाणात प्रेशर पडेल. तुमच्या पोटावर खुप जास्त प्रमाणात ताण दिल्याने, तुमच्या वेदना वाढू शकतात, आणि त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात.

▪️फ्लेक्सिबल राहा :


प्रत्येकाचा हा प्लॅन असतो की शस्त्रक्रिये दरम्यान, आणि शस्त्रक्रिये नंतर ते काय करणार आहेत, हे उत्तम आहे, परंतु तुम्ही फ्लेक्सिबल सुद्धा असले पाहिजे. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिये मधुन पुन्हा रिकव्हर होणे हे अप्रत्याशित किंवा अनपेक्षित असु शकते. तुम्हाला कदाचित गुंतागुंतीची समस्या निर्माण होऊ शकते, ज्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा दोन दिवसां पेक्षा जास्त कालावधी हॉस्पिटल मध्ये भरती व्हावे लागेल. परंतु निराश किंवा तणावपूर्ण होऊ नका. तुम्ही बऱ्याच दिवसांनी रिकव्हर व्हाल असा सल्ला जर तुमच्या डॉक्टरांनी दिला असेल तर तो धरून बसू नका. प्रत्येक शस्त्रक्रिया ही वेगळी असते, आणि रिकव्हरी साठी लागणारा वेळ हा प्रत्येक व्यक्ती नुसार वेग वेगळा असतो. तथापि, तुम्ही शस्त्रक्रिये नंतर दोन आठवड्यांनी घरी परत येण्याचा प्लॅन करू शकता. खुप मोठ्या शस्त्रक्रिये साठी, छोटी छोटी पावले उचला, आणि स्वतः ला रिकव्हर होण्यासाठी 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी द्या.

▪️निष्कर्ष :


प्रत्येकजण वेग वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट करतो, आणि त्या नुसार त्याला काळजीची आवश्यकता असते. त्यामुळे तुमच्या शरीराचे ऐका आणि स्वतः वर विश्वास ठेवा. या गोष्टींना वेळ द्या आणि रिकव्हरी होण्यासाठी थोडा संयम बाळगा विशेष करून मोठ्या शस्त्रक्रिये नंतर. तुमचे शरीर तुम्हाला संकेत देईल जेव्हा तुम्हाला झोपेची गरज असेल तेव्हा आणि कोणती स्थिती तुमच्यासाठी आरामदायक असेल. ते फॉलो करा आणि जर तुम्हाला कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर, तुमच्या डॉक्टरां बरोबर त्याची चर्चा करा. तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केली असेल त्या प्रमाणे तुमची औषधे आणि दररोजचा व्यायाम कंटिन्यू करा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...