VishwaRaj

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे पुरेसे आहे. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या ऍक्टिव्हीटीज करणे देखील अवघड जाते त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला अस्वस्थ बनवते. परंतु आहारामध्ये पुरेश्या प्रमाणात तंतुमय पदार्थांचा समावेश करून तो सेवन केल्याने तुम्ही या समस्ये मधुन बाहेर पडू शकता. मूळव्याधाच्या आजारासाठी आहारामध्ये तुम्ही तंतुमय पदार्थांचा समावेश केला पाहिजे कारण मूळव्याधा बरोबर डिल करण्यासाठीचा हा एक परिणामकारक मार्ग आहे.
तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याची गरज आहे अशा काही तंतुमय पदार्थांची यादी पुढीलप्रमाणे :

▪️होल ग्रेन्स – पुर्ण धान्य :


हे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही की होल ग्रेन्स हे पोषणघाटकांचे पॉवरहाऊस आहेत. याचे कारण की त्या मधु अंकुर, कोंढा आणि इंडोस्पर्म – भ्रूणपोष यांचा समावेश असतो त्या विरुद्ध रिफाईंड ग्रेन्स मध्ये फक्त इंडोस्पर्मचा समावेश असतो. होल ग्रेन्स मध्ये तंतुमय पदार्थां सारखे फायदेशीर घटक असतात.
होल ग्रेन्स मध्ये विशेषकरून इनसोल्यूबल म्हणजे न विरघळणारे तंतुमय पदार्थ भरपुर प्रमाणात असतात आणि त्यामुळेच मूळव्याधाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीने त्यांचा आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे. यामुळे तुमच्या पचनाच्या प्रक्रियेचे कार्य अगदी सहजपणे होण्यास मदत होते, ज्यामुळे पुढे जाऊन तुमच्या वेदना खुप कमी होण्यास मदत होते आणि मूळव्याधाशी संबंधित असणारी अस्वस्थता देखील कमी होते.
तुम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की होल ग्रेन्स मध्ये पुर्ण गव्हाचे पीठ आणि ब्रेड यांच्या पेक्षाही जास्त पदार्थ समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, असे काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचे तुम्ही सेवन करू शकता त्या मध्ये बार्ली, कॉर्न, क्विनोआ, ब्राऊन राईस, होल रे, आणि ओट्स यांचा समावेश आहे.
जेव्हा तुम्ही मूळव्याधाची लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ओटमिलचा समावेश करण्याच्या उत्तम पर्यायाची शिफारस मोठ्या प्रमाणात केली जाते.
त्या मध्ये विशिष्ट प्रकारचा सोल्युबल तंतुमय पदार्थ असतो त्याला बीटा ग्लुकान असे म्हणतात, जो तुमच्या आतड्यांच्या आतील भागासाठी उत्तम असतो, कारण तो प्रीबायोटिक्स प्रमाणे काम करतो. तुमच्या आतड्यांमधील फ्रेंडली बॅक्टेरियांची वाढ उत्तेजित करून हे प्रीबायोटिक्स होस्ट वर परिणाम करतात. ओटमील विकत घेत असताना, तुम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की, स्टील कट ओट्स हे शिजण्यासाठी बराच काळ घेतात परंतु ते कमी प्रोसेस्ड असतात.

▪️ब्रोकोली आणि इतर क्रूसिफेरस म्हणजे कोबीवर्गीय भाजीपाला :


कोबीवर्गीय भाजीपाल्या मध्ये ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोलार्ड्स, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, अरुगुला, वॉटरक्रेस, बॉक चॉय, काले, मुळा, टूर्निप, आणि कोबी यांचा समावेश असतो.
जरी या भाज्या मुख्यत्वे त्यांच्या अँटीकॅन्सर गुणांसाठी माहित असल्या तरी, त्यांच्या मध्ये पुरेश्या प्रमाणात इनसोल्यूबल तंतुमय पदार्थ उपलब्ध असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती मूळव्याधाच्या समस्ये साठी यांचा आहारामध्ये समावेश करू शकते.
उदाहरणार्थ, 1 कप कच्ची ब्रोकोली ही जवळपास आहारामधील 2 ग्रॅम तंतुमय पदार्थ देते, हे सर्व इनसोल्यूबल तंतुमय पदार्थ असतात. या पदार्थांमुळे तुमच्या शौचाचा आकार आणि वजन वाढवते आणि तुम्हाला नियमितपणे शौचास होते.
याव्यतिरिक्त, कोबीवर्गीय पालेभाज्या मध्ये ग्लुकोसिनोलेट्स ( हे एक वनस्पती मधील केमिकल आहे ज्याचे विघटन तुमच्या आतड्यां मधील बॅक्टेरिया करतात ) असतात.
तुमच्या आतड्यांमधील बॅक्टेरियाची विविधता ही तुमच्या अन्नपचन संस्थेला जास्तीत जास्त बळकट बनवते, याचबरोबर तुमची प्रतिकार शक्ती देखील वाढवते. या बॅक्टेरिया बरोबर भाज्यां मधील इनसोल्यूबल तंतुमय पदार्थ, कोबीवर्गीय पालेभाज्यांना मूळव्याधाच्या रुग्णांसाठी आहारामध्ये समाविष्ट करण्याचा सर्वोत्तम पर्याय बनवते.

▪️रूट व्हेजीटेबल्स – कंदमूळ भाज्या :


रताळे, टूर्निप्स, बीटरूट, रुटाबॅगास, गाजर, आणि बटाटा यांसारख्या रूट व्हेजीटेबल्स मध्ये भरपुर प्रमाणात पोषण घटक असतात.
त्यांच्यामध्ये आतडयांना आरोग्यपुर्ण असणारे तंतुमय पदर्थ भरपुर प्रमाणात असतात, प्रत्येक सर्व्हिग मध्ये जवळपास 3 ते 5 ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात.
जेव्हा तुम्ही ट्यूबर्सचे सेवन करणार असाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यांच्यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ हे त्यांच्या त्वचे मध्ये असतात त्यामुळे त्यांची त्वचा न काढता त्यांचे सेवन करा.
याव्यतिरिक्त, शिजवलेला आणि गार केलेल्या पांढऱ्या बटाट्यामध्ये एक प्रकारचे कार्बोहायड्रेट असते त्याला रेजिस्टंट स्टार्च असे म्हणतात, जे तुमच्या अन्नपचनसंस्थे मधून पचन न होता पुढे पास होते. सोल्युबल तंतुमय पदार्थां प्रमाणे, ते तुमच्या आतड्यांमधील फ़्रेंडली बॅक्टेरियांना वाढण्यासाठी मदत करते.
तसेच ते बद्धाकोष्टतेला कमी करत असल्यामुळे, त्याच्यामध्ये मुळव्याधाच्या लक्षणांना कमी करण्याची गुणवत्ता असते. म्हणून, मुळव्याधाच्या समस्यांसाठी घेण्यात येणाऱ्या आहारामध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता.

▪️ शिमला मिर्ची :


अजून एक सर्वोत्तम भाजी जी तुम्हाला मुळव्याधा मध्ये मदत करू शकते ती म्हणजे शिमला मिर्ची होय.
चिरलेल्या शिमला मिर्चीच्या 1 कपामध्ये जवळपास 2 ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात. जरी यादीमध्ये नमूद केलेल्या इतर भाज्यांपेक्षा शिमला मिर्ची मध्ये तंतुमय पदार्थ कमी असले तरी, ती खूप हायड्रेटिंग आहे आणि तिच्यामध्ये 93% पाण्याचा अंश असतो.
शिमला मिर्ची मधील पाण्याची सुसंगतता आणि त्याचबरोबर त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे तुम्हाला शौचास अगदी सहजपणे होते आणि शौचास करताना कुंथने देखील टाळले जाते. म्हणून, मुळव्याधाच्या विकारासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये शिमला मिर्चीचा समावेश करू शकता.

▪️ काकडी आणि खरबूज :


काकडी आणि खरबूज हे कुकरबीटस फॅमिली ग्रुप चा भाग आहेत. शिमला मिर्ची प्रमाणे, यांना सुद्धा चवदार मानले जाते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि पाणी असते जे तुमच्या अन्नपचन संस्थेमध्ये प्रवाहित केले जाते.
जेव्हा तुम्ही काकडी खाणार असाल तेव्हा याची खात्री करा की तिची त्वचा काढली जाणार नाही, कारण त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तंतुमय पदार्थ मिळण्याचा फायदा होईल.

▪️ पीयर्स – नाशपाती :


एका मध्यम आकाराच्या पियर मध्ये जवळपास 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ उपलब्ध असतात, जे तुम्हाला दिवसभरामध्ये गरजेच्या असणाऱ्या तंतुमय पदार्थांच्या 22 % असतात.
या फळाची साल न काढल्याची खात्री करून घ्या आणि मगच ते खा, कारण त्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात जे मुळव्याधाला रोखण्यास मदत करतात.
मुळव्याधाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीने आहारामध्ये याचा समावेश केला तर ते मुळव्याधाला कमी करण्याचा स्त्रोत बनवू शकते.
पियर हे स्वतः नुसते एक स्नॅक म्हणून खूप परिणामकारक असल्याचे मानले जाते. किंवा ते शिजवून किंवा सूप्स आणि सॅलड मध्ये टॉस करून सुद्धा घेता येऊ शकते.

▪️ सफरचंद :


पियर प्रमाणेच, सफरचंदा मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ उपलब्ध असतात.
उदाहरणार्थ, एका मध्यम आकाराच्या सफरचंदा मध्ये जवळपास 5 ग्रॅम तंतुमय पदार्थ उपलब्ध असतात.
याव्यतिरिक्त, या तंतुमय पदार्थां पैकी काही पेक्टिन नावाचे तंतुमय पदार्थ असतात, हे सोल्युबल प्रकारचे तंतुमय पदार्थ असतात जे अन्नपचन संस्थेच्या मार्गामध्ये जेल प्रमाणे समानता निर्माण करतात. यामुळे तुमची शौचास मऊ होते आणि तिचे वजन व आकार वाढला जातो म्हणुन जास्त कुंथावे लगता नाही. तसेच मुळव्याधाशी संबंधित असलेली अस्वस्थता देखील कमी होते.
म्हणून, मुळव्याध असणाऱ्या रुग्णांच्या आहारामध्ये सफरचंदाचा समावेश करण्यास सुरुवात करा आणि त्याच्या वेदनांपासून आराम मिळवा.

▪️ केळी :


केळा मध्ये पेक्टिन आणि रेजिस्टंट स्टार्ट हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. केळ हे मुळव्याधाच्या समस्यांसाठी तुमच्या आहारामध्ये घेण्यासारखा सर्वोत्तम अन्नघटक आहे. ते मुळव्याधाची लक्षणे कमी करते.
एका मध्यम आकाराच्या केळामध्ये जवळपास 3 ग्रॅम तंतुमय पदार्थ उपलब्ध असतात.
पेक्टिन हे तुमच्या अन्नपचन संस्थेच्या मार्गामध्ये जेल चे उत्पादन करते आणि रेजिस्टंट स्टार्ट हे तुमच्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ करते.
मुळव्याधाची लक्षणे बरी करण्यासाठी हे वरील कॉम्बिनेशन सर्वोत्तम आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.