VishwaRaj

व्हेरीकोज व्हेन्स साठी लेझर उपचार

व्हेरीकोज व्हेन्स या मोठ्या झालेल्या आणि पिळलेल्या रक्तवाहिन्या असतात ज्या वाहिन्यांमधील वाढलेल्या रक्त दाबामुळे निर्माण होतात. याचे मुख्य कारण म्हणजे सतत उभे रहाणे किंवा सरळ चालणे यांमुळे शरीराच्या खालील भागा मध्ये म्हणजे पाय किंवा पायाचा पंजा यांमध्ये दाब निर्माण होतो. व्हेरीकोज व्हेन्स या सौम्य किंवा गंभीर स्वरूपाच्या असु शकतात. गंभीर स्वरूपाच्या व्हेरीकोज व्हेन्स मध्ये व्यक्तीच्या पायामध्ये किंवा पायाच्या पंजा मध्ये अस्वस्थता आणि वेदना होतात.
व्हेरीकोज व्हेन्स या कोणत्याही वयामध्ये किंवा बहुतेक करून विशिच्या मध्ये किंवा म्हातारपणा मध्ये निर्माण होऊ शकतात.

व्हेरीकोज व्हेन्स चे 3 प्रकारच्या असतात :


▪️सीफॅनस व्हेरीकोज व्हेन्स :


या आकाराने मोठ्या किंवा सीफॅनस रक्तवाहिन्या असतात ज्या पायामध्ये असतात, या वाहिन्या सुज आल्याने नेहमीच्या अकरापेक्षा मोठ्या होतात आणि त्वचेच्या बाहेर फुगल्या सारख्या येतात. या वाहिन्यांना नेहमी कोणताच रंग नसतो परंतु त्यांचे स्वरूप हे आकाराने मोठे आणि दोरखंडा सारखे असते. आणि त्या त्वचेच्या बाहेर फुगल्या सारख्या आल्याने सहजपणे लक्षात येऊ शकतात.

▪️रेटीक्युलर व्हेरीकोज व्हेन्स:


रेटीक्युलर व्हेरीकोज व्हेन्स या जाड गाठी सारख्या पसरलेल्या असतात आणि त्यांनी विस्तृत भाग व्यापलेला असतो. त्या लाल, हिरव्या आणि पर्पल रंगाच्या असु शकतात. या वाहिन्या एवढ्या उठून दिसत नाहीत कारण त्या त्वचे मधुन फुगून बाहेर आलेल्या नसतात.

▪️स्पाईडर व्हेन्स :


स्पाईडर व्हेन्स या कोष्ट्याच्या जाळ्यासारख्या आकारामध्ये पसरलेल्या असतात. आणि या व्हेन्स इतर व्हेरीकोज व्हेन्स पेक्षा लहान व पातळ असतात. या व्हेन्स लाल किंवा निळ्या रंगाच्या असतात. तसेच या शरीराच्या कोणत्याही भागावर सामान्यपणे निर्माण होतात.

व्हेरीकोज व्हेन्स होण्याची कारणे म्हणजे कमकुवत आणि हानी झालेल्या वाहिन्यांच्या झडपा. या लहान झडपांना पायामधील स्नायुंच्या आकुंचना मुळे हानी पोहोचते. या झडपा पंप सारख्या काम करतात, तसेच ईलॅस्टीक सारख्या वाहिन्यांची आवरणे रक्ताला पुन्हा हृदया मध्ये जाण्या साठी मदत करतात. या कारणामुळे रक्त पुन्हा मागे प्रवाहित होत नाही आणि वाहिनी मध्ये पुन्हा येत नाही ज्याच्या मुळे वाहिनी तणली जाऊन तिला पीळ पडला जात नाही.

असे बरेच घटक आहेत ज्यांच्या मुळे व्हेरीकोज व्हेन्स निर्माण होऊ शकतात, उदा. पुढीलप्रमाणे :

 

– कुटुंबातील हिस्ट्री – अनुवांवशिकता
– वय
– एखाद्या ठिकाणी दीर्घ काळ उभे रहाणे किंवा बसने
– लठ्ठपणा
– गरोदरपणा (सामान्यपणे प्रसूतीच्या 3 – 12 महिन्यां नंतर वैद्यकीय उपचारां शिवाय सुधारणा होते )

▪️लक्षणे :


व्हेरीकोज व्हेन्सच्या काही रुग्णांमध्ये वेदना निर्माण होत नाहीत परंतु लक्षणे असु शकतात ती खालीलप्रमाणे :


– वाहिन्या पिळलेल्या आणि फुगलेल्या असतात.
– वाहिन्यांचा रंग डार्क पर्पल किंवा निळा झालेला असतो.

व्हेरीकोज व्हेन्सच्या काही रुग्णांमध्ये वेदना असतात, आणि लक्षणे खालीलप्रमाणे असु शकतात :


– व्हेरीकोज व्हेन्सच्या सभोवतालची त्वचा ही रंगीत झालेली असते आणि तिच्यावर डाग पडलेले असतात.
– पायामध्ये वेदना आणि जडपणा ची भावना आलेली असते.
– एकाच जागेवर दीर्घ काळासाठी उभे राहिले किंवा बसले तर वेदना वाढतात.
– पाया मधील स्नायूंना क्रॅम्पस येणे, पायाला सुज येणे, जळजळ होणे आणि सोअरनेस येणे अशी लक्षणे उद्भवतात.
– एका किंवा एका पेक्षा जास्त वाहिन्यांच्या सभोवताली खाज सुटणे.

▪️शस्त्रक्रिया पर्याय : (लेझर उपचार ) :


▪️लेझर उपचार :


या प्रक्रिये मध्ये, छेद घेतला जात नाही किंवा सुयांचा वापर देखील केला जात नाही. या प्रक्रिये दरम्यान, डॉक्टर लहान आकाराच्या व्हेरीकोज व्हेन्स किंवा स्पाईडर व्हेन्स वर लाईटचा जोरदार स्फोट करून त्या वाहिन्या बंद करतात. याच्यामुळे व्हेरीकोज व्हेन्स हळू हळू कमी होतात आणि नंतर नाहीश्या होतात.

▪️कॅथेटर – असिस्टेड प्रोसिजर्स युझिंग रेडिओफ्रिक्वेन्सी किंवा लेझर एनर्जी :


ही प्रक्रिया मोठ्या आकाराच्या व्हेरीकोज व्हेन्सच्या उपचारा साठी केली जाते. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर ” कॅथेटर ” नावाची पातळ ट्यूब मोठ्या व्हेरीकोज व्हेन मध्ये इन्सर्ट करतात – घुसवतात. आणि रेडिओफ्रिक्वेन्सी किंवा लेझर एनर्जीच्या सह्याने कॅथेटरचे टोक गरम करतात. जेव्हा कॅथेटर बाहेर खेचला जातो, तेव्हा तयार झालेली गरमी मोठ्या वाहिन्यांना कोलॅप्स करते आणि बंद करून त्यांचा संपुर्ण नाश करते.

▪️हाय लायगेशन आणि व्हेन स्ट्रिपिंग :


या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर वरील वहिनी ही खोलवर असणाऱ्या वहिनीला जुळण्या आधी बांधून टाकता आणि लहानशी प्रक्रिया करून त्या वहिनीला काढून टाकतात. परंतु, वाहिनी काढून टाकल्यामुळे पायाच्या रक्ताभिसरणा मधील रक्त प्रवाहित करण्याचे राहत नाही कारण खोलवर असणाऱ्या वाहिन्या मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाहित करत असतात.

▪️मोठ्या वाहिन्यांची स्क्लेरोथेरपी आणि फोम स्क्लेरोथेरपी :


स्क्लेरोथेरपीची प्रक्रिया ही व्हेरीकोज व्हेन्स किंवा स्पाईडर व्हेन्स काढून टाकण्यासाठी केली जाते. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर लहान किंवा मध्यम आकाराच्या व्हेरीकोज व्हेन्स मध्ये डायरेक्ट सॉल्ट सोल्युशन किंवा फोम इंजेक्ट करतात ज्याच्यामुळे रक्त वाहिन्यांना इरिटेशन आणि स्कार तयार होते त्यामुळे या वाहिन्या कोलॅप्स होतात आणि बंद होतात व रक्त गोठण्यास मदत करतात. या स्कार तयार झालेल्या रक्त वाहिन्या काही आठवड्यांमध्ये नाहीश्या होतात.
मोठ्या वाहिन्यांची फोम स्क्लेरोथेरपी ही प्रक्रिया सीफॅनस व्हेरीकोज व्हेन्स किंवा रेटीक्युलर व्हेरीकोज व्हेन्स नाहीश्या करण्यासाठी केली जाते. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर मोठ्या वाहिनी मध्ये फोम सोल्युशन इंजेक्ट करतात आणि तिला बंद करून सील करतात.

▪️इंडोस्कोपीक व्हेन सर्जरी :


ही प्रक्रिया फक्त अशा रुग्णांमध्ये केली जाते ज्यांना पायाचा अल्सर असतो किंवा ज्यांच्यामध्ये शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रिया विरहित उपचार फेल झालेले असतील. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर अगदी लहान व्हिडीओ कॅमेरा वापरतात. हा कॅमेरा रुग्णाच्या पायामध्ये इन्सर्ट केला जातो म्हणजे घुसवला जातो, ज्यामुळे व्हेरीकोज व्हेन्स दिसण्यास मदत होते आणि त्या बंद केल्या जातात. नंतर डॉक्टर लहानश्या कारविंग द्वारे त्या व्हेरीकोज व्हेन्स काढून टाकतात.

▪️ऍम्ब्यूलेटरी फ्लेबेक्टॉमी :


या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर रुग्णाच्या पायाचे तेवढेच भाग बधिर करतात जे जे पंक्चर करायचे असतात. आणि या नंतर डॉक्टर लहान आकाराच्या व्हेरीकोज व्हेन्स या त्वचेवर केलेल्या छोट्या पंक्चर्स मधुन काढून टाकतात. याचबरोबर, या प्रक्रिये मध्ये, डाग पडण्याची शक्यता अगदीच कमी असते.

▪️शस्त्रक्रिया का करावी?


जर व्हेरीकोज व्हेन्स वर वेळीच उपचार केले नाहीत तर, त्या व्यक्तीला खाली नमूद केलेल्या संभाव्य धोक्यांना सामोरे जावे लागते –
– रक्तस्त्राव
– पायाचा अल्सर
– डिप व्हेन थ्रोम्बोसीस (डि व्ही टी )
– सुपरफेशियल थ्रोम्बोफ्लेबायटीस

▪️फायदे :


जर रुग्णाने व्हेरीकोज व्हेन्सच्या इतर शस्त्रक्रिया उपचारां ऐवजी आधुनिक लेझर उपचार करून घेतले तर रुग्णाला खाली नमूद केलेल्या फायद्यांचा अनुभव येईल :
– अगदी कमी वेदना
– सुधारित ऍपीअरन्स
– जास्तीत जास्त हलचाल
– कार्यक्षम जिवशैली
– उत्तम झोप

▪️निष्कर्ष :


ज्या व्यक्तीला व्हेरीकोज व्हेन्स झाल्याची लक्षणे अनुभवास येत असतील त्या व्यक्तीने त्वरित व्हेरीकोज व्हेन्स वरील उपचार सुरु करावेत. जर तुम्ही व्हेरीकोज व्हेन्स वरील सर्वोत्तम उपचार मिळविण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुण्यामधील विश्वराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या सर्वोत्तम हॉस्पिटलला भेट देऊ शकता जिथे तुम्हाला सर्वोत्तम डॉक्टर्स भेटतील जे तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्सच्या कारणां पासून आराम मिळवून देऊ शकतील.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...