VishwaRaj

तोंडाच्या शस्त्रक्रिये मधुन बरे होण्यासाठी उपाय

कोणत्याही कारणामुळे तुमची तोंडाची शस्त्रक्रिया झाली असेल तर, त्या नंतर काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. ही काळजी आणि खबरदारी तुम्हाला जलद आणि उत्तमरित्या बरे होण्या साठी मदत करेल. तुम्ही तोंडाची शस्त्रक्रिया करून घेण्याची काही कारणे म्हणजे अक्कल दाढ काढून टाकणे आणि नवीन दात बसवणे. याचबरोबर, जर तुम्हाला तुमच्या हिरड्या आणि दात यांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर, तुम्हाला त्यावर उपचार करण्याची आवश्यकता पडते.

Oral Surgery - VishwaRaj Hospital

🔹शस्त्रक्रिये नंतर करावयाच्या आणि न करावयाच्या गोष्टी :


शस्त्रक्रिये नंतर शस्त्रक्रिया तज्ञ तुम्हाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्यास सांगत नाहीत म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही बरे होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणे हलक्यात घेऊ शकता. तुम्ही डाक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे आणि त्यातील काही मुद्दे खाली नमूद केलेले आहेत :

🔹करावयाच्या गोष्टी :

शस्त्रक्रिये नंतर काही आवश्य करावयाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

▪️पुरेशी विश्रांती घ्या :

शस्त्रक्रिया झाल्या नंतर जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा संपुर्ण दिवस विश्रांती घ्या. उपचार प्रक्रिये दरम्यान जर डॉक्टरांनी तुम्हाला झोपेचे औषध दिले असेल तर तुम्हाला आधीपासूनच गुंगी आल्या सारखे वाटत असेल. त्यामुळे शस्त्रक्रिये नंतर तुम्हाला कोणी नातेवाईक घरी घेऊन येईल याची दक्षता घ्या. याशिवाय, अती परिश्रमाची कामे टाळली तर ते उत्तम ठरेल. कोणत्याही प्रकारचे जड ओझे उचलू नका, कारण त्यामुळे रक्तस्त्राव होईल आणि रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतील. तसेच, जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा एक जास्तीची उशी डोक्या खाली ठेवा त्यामुळे डोके वर उचलले जाईल.

▪️डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा :

जर डॉक्टरांनी तुम्हाला माऊथवॉश किंवा टूथब्रश वापरण्यास मनाई केली असेल तर ते वापरण्याचा प्रयत्न करू नका. उपचारां नंतर तुमचे तोंड सेन्सेटीव्ह झालेले असेल त्यामुळे तेव्हा दात ब्रश करणे योग्य ठरणार नाही कारण त्यामुळे जंतु संसर्ग होण्याची शक्यता आहे. कदाचित डॉक्टर सुद्धा तुम्हाला सेन्सेटीव्ह भागाला ब्रश न करण्याचा सल्ला देतील आणि तुम्ही इतर भाग स्वच्छ करू शकता. याशिवाय, डॉक्टर तुम्हाला दिवसातून दोन वेळा तुमचे तोंड मिठाच्या पाण्याने चुळा भरून साफ करण्यास सांगतील. जास्त करून मिठाचा अर्धा चमचा आणि 8 आऊंस कोमट पाणी असे प्रमाण असेल. या सवयी मुळे वेदना कमी होण्यास आणि जंतु संसर्ग टाळण्यास मदत होईल.

▪️बर्फाने शेका :

कदाचित तुमच्या चेहऱ्यावर सुज असेल आणि तुम्हाला तिथे जखम देखील असेल. त्यामुळे, पहिले 24 तास तुम्ही तुमच्या जबड्या वर किंवा जिथे तुम्हाला वेदना होत असतील तिथे आईस बॅग लावा. याची पद्धत अशी आहे की तुम्ही आईस बॅग जवळपास 30 मिनिटे लावा आणि त्यानंतर थोडा वेळ थांबा व पुन्हा आईस बॅग लावा. अशा प्रकारे बर्फाने शेकत राहा त्यामुळे 2 ते 3 दिवसांमध्ये सुज कमी होईल. तथापि, जर परिस्थिती जास्त गंभीर झाली किंवा तुम्हाला ताप आला किंवा जखमे मध्ये पु झाला तर, त्वरित तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधा. हे जंतु संसर्गा मुळे असे होऊ शकते.

▪️रक्तस्त्राव थांबवा :

शस्त्रक्रिये नंतर, शस्त्रक्रिया झालेल्या भागामधून तुम्हाला रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्राव मंद होण्यासाठी तुम्ही फोल्डेड गॉज हळुवारपणे चाऊ शकता. तथापि, 24 तासां नंतर जर रक्तस्राव थांबला नाही तर, याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरां बरोबर चर्चा करू शकता. तसेच, जर रक्तस्त्राव अतिप्रमाणात असेल व त्यामुळे तुम्हाला सारखा गॉज बदलावा लागत असेल तर तुमच्या डॉक्टरांना याबद्दल कल्पना द्या.

▪️ आरोग्यपूर्ण व पौष्टिक आहाराचे सेवन करा जामध्ये जीवनसत्व अ आणि क यांचा समावेश असेल :

तुम्ही फक्त पौष्टिक आहारच खात आहात आणि त्यामध्ये जीवनसत्व अ आणि क यांचा समावेश आहे याची खात्री करून घ्या. तोंडाच्या शस्त्रक्रिये नंतर या जीवनसत्वां मुळे लवकरात लवकर रिकव्हरी होण्यास मदत होते. याच बरोबर उत्तम रिसल्ट साठी त्यांचे सप्लीमेंट्स देखील घ्या.

▪️जखमेवरील रक्ताच्या गुठळीचे रक्षण करा / काळजी घ्या :

जखम बरी होत असताना त्यावर तयार झालेल्या रक्ताच्या गुठळीची जर तुम्ही काळजी घेतली तर त्याची तुम्हाला मदत होईल कारण ती बरी होत असते. तुम्ही कोणत्याही प्रकारे त्या जखमेला डिस्टर्ब करू नका किंवा धक्का लावू नका कारण तिची बरे होण्याची प्रक्रिया चालु असते नाहीतर जखमेला बरे होण्यास जास्त कालावधी लागेल. त्यामुळे शस्त्रक्रिये नंतर किमान 3 दिवस तरी स्ट्रॉ वापरणे, धूम्रपाण करणे किंवा दारू पिणे इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळा. त्याचबरोबर, सतत थुंकी थुंकीने देखील टाळण्याचा प्रयत्न करा.

▪️तुम्ही काय आहार सेवन करत आहात याची नोंद ठेवा :

मऊ आणि थंड असलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तथापि, अती थंड, खुप चावायला लागणारे किंवा अती तिखट तेलकट पदर्थांपासून दूरच राहा. शस्त्रक्रिये नंतर तुम्ही खाऊ शकता असे घन पदार्थांचे पर्याय म्हणजे ओटमील, योगर्ट, आणि ऍपल सॉस इत्यादी.

▪️तुमची वेदनाशामक औषधे वेळेवर घ्या :

शस्त्रक्रियेच्या सुरवातीच्या काळामध्ये तुम्हाला वेदना कमी करण्यासाठी औषधांची आवश्यकता पडेल. त्यामुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला वेदनाशामक औषधे लिहुन देतील, ही औषधे वेळेवर घेणे अवश्य लक्षात ठेवा. तुमचे डॉक्टर तुम्हाला कदाचित ओव्हर द काउंटर मिळणारी एन एस ए आय डी किंवा ऍसिटामिनोफेन या प्रकारची वेदनाशामक औषधे घेण्याचा सल्ला देतील. या औषधांमुळे कमीत कमी 48 तास तरी तुम्हाला वेदने पासून आराम मिळेल.

▪️काही असामान्य अढळल्यास लक्ष दया :

सुज येणे, जंतु संसर्ग होणे, ताप येणे इत्यादी इतर गुंतागुंतीची लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिलीत तर त्याकडे लक्ष दया. जर तुम्हाला गिळताना किंवा श्वास घेताना त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना याबाबत कल्पना दया. काही लोकांना शस्त्रक्रिया तज्ञांनी दिलेल्या भुलीची देखील ऍलर्जीक रिऍक्शन होऊ शकते.

🔹न करावयाच्या गोष्टी :

तोंडाची शस्त्रक्रिया झाल्या नंतर तुम्ही खाली नमूद केलेल्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत :

▪️स्वतःला नको असलेली कामे करण्यास भाग पाडू नका :

लक्षात ठेवा, शस्त्रक्रिये नंतर तुमची स्थिती ही नाजूक बनलेली असते. त्यामुळे, अती जड ओझे उचलणे किंवा जिम मध्ये जाणे अशा प्रकारची मर्यादे पलीकडील कामे करू नका. तुम्हाला व्यवस्थित काळजी आणि विश्रांतीची आवश्यकता असेल त्यानंतर तुम्ही रिकव्हर व्हाल. तुम्ही पुन्हा रनिंग किंवा वर्कआऊट केव्हा सुरु करू शकता ते तुमच्या डॉक्टरांना विचारा.

▪️अती गरम पेय किंवा अन्नाचे सेवन करू नका :

जखमे जवळील बधिरपणा कमी झाल्या शिवाय अती गरम पातळ पदार्थ किंवा अन्न यांचे सेवन करण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने तुमच्या तोंडामधील टाळा किंवा जीभ भाजली जाण्याची शक्यता टाळता येईल. तुम्हाला अजुन काही समस्या वाढवण्यापेक्षा शस्त्रक्रिये मधुन बरे होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.

▪️कडक पदार्थ किंवा खुप चावायला लागणारे पदार्थ टाळा :

गाजर किंवा पॉपकॉर्न सारख्या पदार्थांना खुप चवण्याची आवश्यकता असते परंतु अशा पदार्थां मुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे असे पदार्थ शस्त्रक्रिये नंतर 6 ते 8 आठवड्यां नंतर खाण्यास सुरवात करा. याशिवाय, चिप्स सारखे क्रंची पदार्थ देखील टाळा.

▪️धूम्रपाणाला नाही म्हणा :

धूम्रपाणाला नाही म्हणणे हे तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उत्तम आहे. तथापि, शस्त्रक्रिये नंतर कमीत कमी पुढील 24 तास धूम्रपाण करत नाही ना याची खात्री करून घ्या. याशिवाय, जर तुम्हाला धूम्रपाण बंद करण्यासाठी मदत हवी असेल तर, तुम्ही तुमच्या शस्त्रक्रिया तज्ञां बरोबर समुपदेशन करू शकता.

▪️दारू पिणे टाळा :

शस्त्रक्रिये नंतर जर तुम्ही पहिल्या 24 तासां मध्ये दारूचे सेवन केले तर, याचा परिणाम तुमच्या रिकव्हरी वर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेदनेने त्रस्त असाल किंवा औषधे घेत असाल तेव्हा दारूचे सेवन करत नाही ना याची खात्री करून घ्या.

▪️निष्कर्ष :

वर नमूद केलेले सर्व उपाय तुम्हाला तुमच्या रिकव्हरी फेज मध्ये तुम्हाला उपयुक्त ठरतील. त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही या उपयांचे पालन करत आहात याची खात्री करा. तसेच, तुम्ही योग्य वेळी बरे होत आहात हे तपासण्या साठी शस्त्रक्रिये नंतरच्या तपासणी सत्रांना हजेरी लावा. जर तुम्हाला दुसरी कोणती समस्या जाणवत असेल तर, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन घेऊ शकता.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...