VishwaRaj

आणीबाणीच्या / इमर्जन्सी परिस्थिती मध्ये कोणती पावले उचलली पाहिजेत?

आणीबाणीची परिस्थिती ही कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी निर्माण होऊ शकते. ही अशी परिस्थिती असते जिथे ताबडतोब हालचाली करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची गरज असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक उपचार आणि आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कॉल करणे होय. आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कॉल केल्याने तुम्हाला कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीस प्रतिसाद देण्यास आणि उपचार करण्यास मदत होईल. लक्षात ठेवा तुमची कृती एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकते.

 काही परिस्थिती या वैद्यकीय स्थिती असल्याचे तुमच्या निदर्शनास येऊ शकते त्या खालील प्रमाणे :  

  • रक्तस्त्राव
  • भाजणे
  • हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक
  • श्वासोच्छवासा मध्ये समस्या
  • छातीमध्ये वेदना
  • अपस्मार
  • शॉक लागणे
  • विषबाधा
  • डोक्याला मार लागणे

 आणि जेव्हा या वरील गोष्टी घडतात तेव्हा, तुम्ही आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत.

 आणीबाणीच्या काळामध्ये अनुसरण करावयाच्या 4 पायऱ्या :

 तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला काहीही झाले असल्यास खाली दिल्या प्रमाणे तुम्ही पावले उचलली पाहिजेत. तुम्हाला जर वाटत असेल की परिस्थिती आणीबाणीची आहे तर खाली दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.

पायरी 1- जर आणीबाणीची परिस्थिती असेल तर ती ओळखा :

 जर परिस्थिती आणीबाणीची असेल तर सर्वात पहिली पायरी म्हणजे तुम्ही ती परिस्थिती ओळखणे होय. विशिष्ठ निर्देशक तपासून तुम्ही आणीबाणीची परिस्थिती आहे का ते ठरवू शकता. निर्देशक हे विशिष्ट क्रमाने असतात.

  • डोळ्याची बाहुली विस्फारलेले असणे
  • अस्पष्ट बोलणे
  • श्वासोच्छवासा मध्ये समस्या
  • छातीमध्ये वेदना
  • गुंगी येणे
  • अस्पष्ट गोंधळ असणे
  • अनैसर्गिक त्वचेचा रंग
  • चेहरा पांढरट पडणे
  • शुद्ध हरपणे
  • घाम येणे

पायरी 2 – योग्य ती कृती करणे/ कारवाई करणे:

 हे प्रत्येकालाच माहीत आहे की आणीबाणीच्या परिस्थितीचा वेळ हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे, तुम्हाला परिस्थिती कळल्या बरोबर लगेचच तुम्ही, योग्य ती कृती केली पाहिजे. तुम्ही जी कृती करणार असाल त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

  • मदतीसाठी फोन करणे
  • रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबा मधील सदस्यांना आरामदायक स्थिती देण्याचा प्रयत्न करणे
  • ज्या व्यक्तीस त्रास होत असेल त्या व्यक्तीस प्रथम उपचार देणे
  • त्या परिस्थितीमध्ये इतर कोणतीही सेवा तुम्ही देऊ शकत असाल तर ती पुरवणे

 वैद्यकीय परिस्थिती मध्ये लोक बऱ्याच मार्गांनी मदत करू शकतात, पण ते करण्यासाठी तुम्ही प्रथम कृती केली पाहिजे. काहीवेळा, वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे हे लोक ओळखू शकत नाहीत, तर इतर वेळेला ते कृती करण्यास अज्ञानी असतात. तथापि, लोक मदत करत नाहीत याची इतर कारणे देखील असू शकतात. परंतु जर तुम्ही कृती करू शकत असाल तर ती तुम्ही केली पाहिजे, कारण त्यामुळे एखाद्याचे आयुष्य वाचू शकते.

पायरी 3 – वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळणाऱ्या प्रोफेशनल्सला फोन करणे :

 कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी निर्माण होईल हे केव्हाही निश्चित नसते, तुमच्या समोर आलेली परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते. परंतु, सर्वात प्रथम तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे रुग्णास सहानुभूती, विश्वास देणे की त्याला योग्य ती मदत नक्की मिळेल. या सहानुभूती मुळे रूग्ण नेहमी शांत होतो. पुढची कृती म्हणजे वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळणाऱ्या प्रोफेशनल्सला फोन करणे कारण ते घटनास्थळी आल्या बरोबर लगेचच उपचार सुरू करू शकतात.

पायरी 4 – आणीबाणीची परिस्थिती हाताळणारे प्रोफेशनल्स येईपर्यंत रुग्णाची काळजी घ्या :

 अतिशय धोक्याची परिस्थिती असल्या शिवाय रुग्णास जागेवरून हलू नका. कारण तुम्हाला माहित नसते कि इजा कोठे झालेली आहे, इजा कदाचित अंतर्गत आणि न दिसणारी असू शकते, त्यामुळे ही स्थिती आणीबाणीची परिस्थिती हाताळणाऱ्या प्रोफेशनल्स वर सोडणे अतिशय उत्तम ठरते.

 चार अशा वैद्यकीय स्थिती आहेत  ज्यांना तत्काळ जीवघेणी आणीबाणी असे मानले जाते, त्या खालील प्रमाणे :

  • श्वास न घेणे
  • शुद्ध हरपणे
  • गंभीर रक्तस्त्राव
  • हाताची नाडी न लागणे

 त्यामुळे वैद्यकीय मदत येईपर्यंत, रुग्णच्या श्वासोच्छ्वासाच्या गतीमध्ये बदल होत आहे का आणि तिची किंवा त्याची शुद्ध हरपत आहे का हे तपासा. कदाचित अशी स्थिती असू शकते जी प्रथमदर्शी गंभीर वाटत नाही, परंतु अखेरीस ही स्थिती अतिशय गंभीर होईल.

 रुग्णाला आरामदायक स्थिती  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा परंतु त्याचे किंवा तिचे शरीर अजिबात हलवू नका. जास्त गरम होणे किंवा थंडी वाजणे यापासून तिचे किंवा त्याचे रक्षण करा तसेच सर्व काही ठीक होईल याची खात्री द्या, यामुळे रुग्णाची मानसिकता जरा शांत होते.

  • वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीसाठी करावयाची तयारी:

 आयुष्य हे अनपेक्षित आहे, त्यामुळेच आधीपासून तयारीत राहणे केव्हाही उत्तम असते. योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणे हे वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती दरम्यान अतिशय परिणामकारक आणि अतिशय मदतीचे ठरते. त्यामुळे खाली दिलेल्या सूचनांचे तुम्ही पालन करत आहात का याची खात्री करून घ्या.

  • प्रथमोपचाराची पेटी तयार करा आणि ती तुमच्या घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी नेहमी ठेवा :

 उपचारापेक्षा प्रतिबंध हा केव्हाही उत्तम असतो. त्यामुळे तुमची प्रथमोपचाराची पेटी तयार करण्याची खात्री करा ज्यामध्ये कात्री, रोलर बँडेज, अँटीसेप्टीक क्रीम, वेदनाशामक गोळ्या, स्टराईल कॉटन आणि थर्मामीटर यांचा समावेश असेल. याच बरोबर या सर्व वस्तू एक्सपायर  होण्याआधी त्या बदलण्याची देखील खात्री करून घ्या. कृपया ही पेटी सुरक्षित आणि सहजपणे सापडेल अशा ठिकाणी ठेवा.

  • तुमचे वैयक्तिक तपशील नेहमी तुमच्या बरोबर ठेवा:

 तुमच्या बद्दलचे आवश्यक ते वैयक्तिक तपशील एका कार्ड वर लिहिणे आणि हे कार्ड नेहमी बरोबर ठेवणे सुरक्षित असते. या तपशीला मध्ये तुमचा पत्ता, नाव, संपर्क क्रमांक – कॉन्टॅक्ट नंबर, आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये कोणत्या व्यक्तीला संपर्क करायचा त्याचे नाव, तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची यादी, तुमच्या डॉक्टरांचे नाव इत्यादी.

  • तुमची वैद्यकीय फाईल व्यवस्थित तयार करा :

 जेव्हा-केव्हा तुम्ही वैद्यकीय तपासण्या करून घेत असाल, तेव्हा त्याचे रिपोर्टस व्यवस्थित फाइलमध्ये लावून ठेवा ते फेकून देऊ नका. सि टी स्कॅन, एम आर आय आणि एक्स-रे यांचे सुद्धा रिपोर्ट व्यवस्थित सांभाळून ठेवा.

  • महत्वाचे संपर्क क्रमांक स्पीड डाईल वर सेव्ह करा :

 आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आवश्यक पडतील असे सर्व संपर्क क्रमांक तुमच्या स्पीड डाईल वर सेव्ह करून ठेवा. या संपर्क क्रमांकां मध्ये तुमचा जीवन साथी, पालक, शेजारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या क्रमांकांचा समावेश असेल.

  • तुमच्या जवळील वैद्यकीय दवाखान्यांची व्यवस्थित माहिती करून घ्या :

 तुम्ही नियमितपणे जिथे जात असाल त्याच्या आसपास असलेल्या सर्व वैद्यकीय दवाखान्यांचे पत्ते आणि नावे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. यामध्ये तुमच्या कामाचे ठिकाण, नातेवाईकांचे घर, मित्रांचे घर इत्यादी ठिकाणांचा समावेश असेल.

  • वैद्यकीय विमा काढून घ्या :

 प्रत्येकाचा वैद्यकीय विमा हा काढलेला असला पाहिजे. बरेच लोक आजारांनी ग्रासलेले आहेत आणि बरेच जण त्यावर उपचार करू शकत नाहीत कारण ते आजार वैद्यकीय विमा मध्ये कव्हर झालेले नसतात. मेडिकल कॉस्ट चा सध्याचा खर्च दिला तर तो कव्हर होणे अतिशय महत्त्वाचे असते. परंतु सही करण्यापूर्वी सर्व नियम व अटी व्यवस्थितपणे वाचून घ्या.

  • वैद्यकीय आणीबाणीच्या संबंधीत आवश्‍यक ती माहिती जाणून घ्या :

 ठरावीक वैद्यकीय आणीबाणीची लक्षणे माहीत असल्यास खूप उशीर होण्यापूर्वी गंभीर परिस्थिती ओळखण्या मध्ये त्याची मदत होईल. डोक्याला मार लागणे, स्ट्रोक, अपस्मार, श्वासोच्छवासाच्या समस्या, भाजणे आणि हृदय विकाराचा झटका या काही सामान्यपणे आढळणार्‍या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती आहेत.

  • पाणी वाढण्याची परिस्थिती हाताळण्यासाठी मूलभूत प्रशिक्षण:

 लाईफ सपोर्ट कोर्सेस चे मूलभूत प्रशिक्षण घेणे सर्वोत्तम आहे. प्रत्येक हॉस्पिटल मध्ये हे कोर्सेस घेतले जातात. बऱ्याच लोकांचे प्राण वाचवण्या मध्ये याचा उपयोग होऊ शकतो, खास करून जेव्हा परिस्थिती अतिशय गंभीर असते तेव्हा. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाचे हृदय बंद पडलेले असते किंवा व्यक्ती बेशुद्ध पडलेली असते.

  • निष्कर्ष:

 आणीबाणीच्या परस्थिती या नेहेमी भितीदायक आणि गोंधळात पाडणाऱ्या असतात. अशावेळी कोणताही ठोस निर्णय घेणे सहज सोपे नसते त्यामुळे येथे क्रमाक्रमाने नमूद करण्यात आलेल्या सूचनांचे व्यवस्थित अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, वैद्यकीय प्रोफेशनल्सला बोलावण्या खेरीज  आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी जेवढ्या शक्य असेल तेवढ्या लोकांना बोलवा. जर तुमच्या जवळ तुमची प्रथमोपचाराची पेटी असेल तर, गरजेच्या ठिकाणी तिचा उपयोग करा. शेवटी, रुग्णास आरामदायक वाटण्यासाठी मदत करा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...