VishwaRaj

डरमॅटॉलॉजीस्ट - त्वचारोगतज्ञांनी हिवाळ्या मध्ये आरोग्यपुर्ण त्वचा राखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीची दिनचर्या सांगितली

हिवाळा कोणाला आवडत नाही? या प्रश्नाला उत्तर कदाचित “तुमची त्वचा ” हे आहे. ऋतू बदलेल तशी तुमची त्वचा सुद्धा बदलत रहाते आणि हिवाळा हा त्वचे साठी सर्व ऋतुं पैकी सर्वात घातक ऋतू मानला जातो. या ऋतू मधील थंड हवेची झुळूक ही त्वचे मधील सर्व ओलावा / आर्दता शोषुन घेते आणि त्यामुळे त्वचा कोरडी, खवलेयुक्त बनते आणि तिला खाज देखील सुटते. सौंदर्य हा दुय्यम भाग आहे परंतु अशा विचित्र वातावरणामध्ये तुमच्या त्वचेला आरोग्यपूर्ण ठेवणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे.
या लेखा मध्ये विश्वराज हॉस्पिटल (पुणे) मधील तज्ञ त्वचारोगतज्ञांनी हिवाळ्या मधील आरोग्यपुर्ण त्वाचेसाठीची दिनचर्या कशी असावी या संबंधी काही टिप्स सुचवल्या आहेत त्या आम्ही तुमच्या बरोबर शेअर करत आहोत.

खाली नमूद केलेले आरोग्यपुर्ण त्वचेच्या काळजीचे रूटीन जे त्वचारोगतज्ञांनी सुचवले आहे ते आरोग्यपुर्ण त्वचेसाठी संपूर्ण हिवाळ्यामध्ये फॉलो करा.

1) उबदार राहा / ठेवा :
तुमचे शरीर गरम करणे आणि हिवाळ्या दरम्यान शरीर उबदार ठेवणे यामध्ये खुप मोठा फरक आहे. तुम्ही अंघोळीसाठी / शॉवर साठी कोमट पाण्याचा वापर करत आहात का आणि अती कडक / जास्त तापमानाचे उष्ण पाणी वापरत नाही ना याची खात्री करा. नेहमी लक्षात ठेवा, अती उष्ण पाणी डायरेक्ट त्वचेवर ओतल्याने त्वचेची परिस्थिती खराब होऊ शकते कारण उष्ण पाण्याबरोबर जास्त काळासाठी संपर्क आल्याने सुद्धा तुमची त्वचा कोरडी बनु शकते. अंघोळी नंतर लगेचच मॉईशचराईझर लावायला अजिबात विसरू नका.

2) हिवाळ्या मध्ये सुटणाऱ्या खाजे पासून सुटका मिळवा :
हिवाळ्यामधील खाज ही गंभीरपने / अती प्रमाणात कोरड्या पडलेल्या त्वचेमुळे निर्माण होते त्यामुळे सीरॅमाईड्स असलेले मॉईशचराईझर लावत असल्याची खात्री नक्की करा. सीरॅमाईड्स हे तुमच्या त्वचेमध्ये पहिल्या पासूनच असते जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते आणि कोरडेपणा बरोबर सामना करते. तरीसुद्धा, वातावरणामधील विवीध घटक आणि दैनंदिन क्रियाकलाप यांमुळे सीरॅमाईड्सचा नाश होतो आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंघोळ केल्या केल्या सीरॅमाईड्स असलेले मॉईशचराईझर लावल्याची नेहमी खात्री करा कारण त्यावेळी तुमची त्वचा थोडी ओलसर असते त्यामुळे ओलसरपणा त्वचेमध्येच लॉक होईल आणि तुमच्या त्वचेवर संरक्षणात्मक थर धरून ठेवला जाईल.

3) बाहेर जाताना जरा हुशारीने कपडे परिधान करा :
सततची थंड वाऱ्याची झुळूक त्वचेला लागल्यास त्याचा अतिशय गंभीर परिणाम त्वचेवर होईल. त्यामुळे तुमचे शरीर हात मोजे, लोकरी स्वेटर, स्कार्फ इत्यादी कपडे घालून व्यवस्थित झाकून घ्या आणि तुमच्या त्वचेला सजेसे असेल तेच सुत निवडा.

4)सनस्क्रीन लावा :
बरीच वर्षे चालत आलेली ही चुकीची धारणा आहे की तुम्ही हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन लावू शकत नाही. चला तर मग आज ही चुकीची धारणा मोडून काढूया, हिवाळ्यामध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावणे हे सर्वात महत्वाचे स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो केले पाहिजे. ऊनाच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर डाग पडण्याची समस्या, कमी वयामध्ये त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचेमधील कोलॅजीन नाहीसे होणे आणि त्वचेचा कर्करोग इत्यादी समस्या निर्माण होतात. सनस्क्रीन लावल्यामुळे तुमच्या त्वचेचा एकसारखा टोन राखला जातो, त्वचेवरील डाग व खुना कमी आणि बऱ्या होतात.

5)हायड्रेटेड राहा :
त्वचेची काळजी फक्त बाहेरील बाजूने घेणे हाच एक पर्याय नाहीये, तर तुमच्या शरीराचा ओलावा आतून टिकवणे आणि आतूनच हायड्रेटेड रहाणे तितकेच महत्वाचे आहे. संपुर्ण दिवसभरा मध्ये भरपूर पाणी पिण्याची सवय लावुन घ्या. पाणी हे तुमची तहानच भागवत नाही तर तुमच्या त्वचेला बरेच फायदे करून देते. कोमट चहा पिणे हा अजुन एक पर्याय आहे जो तुम्ही आत्मसात करून शरीराचे हायड्रेशन वाढवू शकता.

▪️निष्कर्ष :
वरील सर्व टिप्स या फक्त हिवाळ्या मधील आरोग्यपुर्ण त्वचेसाठीच्या दिनाचर्येसाठी आहेत. तथापि, हिवाळ्या मध्ये तुम्ही जर त्वचेच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त असाल तर, आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ की तुम्ही जवळील त्वचारोगतज्ञांचे समुपदेशन घ्या जे तुम्हाला हिवाळ्या मधील त्वचेच्या संबंधित समस्यांवर उपाय करण्यास आणि त्यातून बाहेर येण्यास मदत करतील.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...