VishwaRaj

मूळव्याधा पासून आराम मिळविण्यासाठी काही परिणाम कारक औषधे

Some Effective Remedies To Get Relief From Piles

मुळव्याध हा एक अतिशय सामान्यपणे आढळणारा आणि एखाद्याला होऊ शकणारा विकार आहे. जवळपास 70 टक्के लोक मूळव्याधाचा अनुभव एका टप्प्यावर घेतात. जरी मुळव्याध काही आठवड्यांमध्ये स्वतः हुन बरा होत असला तरी, तो सौम्य ते गंभीर लक्षणे निर्माण करतो. मूळव्याधा पासून आराम मिळविण्या साठी काही परिणाम कारक औषधे पुढीलप्रमाणे :

▪️विच हॅझल :


विच हॅझल हे औषध मूळव्याधाची दोन मुख्य लक्षणे कमी करण्यास मदत करते – खाज सुटणे आणि वेदना होणे ही दोन लक्षणे. हे औषध नैसर्गिक अँटी इनफ्लामेट्री म्हणजे सुज कमी करणारे औषध म्हणुन काम करते ज्याच्यामुळे सुज कमी देखील होऊ शकते. एखादी व्यक्ती विच हॅझल या औषधाचे पातळ औषध खरेदी करून ते डायरेक्ट मूळव्याधा वर लाऊ शकते. याच औषधाचे अँटी इचिंग वाईप्स म्हणजे खाज रोकणारे वाईप्स आणि साबण असेही प्रकार उपलब्ध आहेत.

▪️ऍलो वेरा – कोरफड :


कोरफड या वनस्पती पासून काढलेल्या गरापासून केलेले औषध जुन्या काळापासून मूळव्याधा मध्ये नैसर्गिक रित्या आराम मिळविण्यासाठी वापरले जाते. या मध्ये अँटी इनफ्लामेट्री म्हणजे सुज कमी करणारे गुण असतात त्यामुळे इरीटेशन कमी होण्यास मदत होते. मूळव्याधा साठी कोरफडीच्या जेलचे फायदे या बद्दल जरी पुरेसे क्लिनिकल संशोधन झाले नसले तरी, वरून लावण्यासाठी हे जेल अतिशय सुरक्षित समजले जाते. हे जेल इतर बऱ्याच प्रॉडक्ट्स मध्ये घटक म्हणुन वापरले जाते, परंतु तुम्ही मूळव्याधा साठी फक्त प्युअर कोरफड जेलचाच वापर केला पाहिजे. कोरफडीच्या झाडाच्या पानांन पासून डायरेक्ट त्याचा गर कापून घेणे अतिशय सोपे असते. काही लोकांना कोरफडीची ऍलर्जी असते, सामान्यपणे ते लोक लसूण किंवा कांद्याला सुद्धा ऍलर्जीक असतात. तुमच्या हातावर थोड्या प्रमाणात जेल घेऊन ते चोळा आणि ऍलर्जी होतेय का ते चेक करा. 24 ते 48 तास वाट पहा. जर त्या नंतर कोणतीही रिऍक्शन झाली नाही तर ते सुरक्षित असल्याचे समजता येईल.

▪️इप्सम सॉल्ट बरोबर गरम पाण्याने अंघोळ :


गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणे ही एक प्रकारची मूळव्याधाची उपचार पद्धत आहे ज्यामुळे आराम मिळु शकतो. या उपचारा मुळे मूळव्याधाने जे इरिटेशन निर्माण होते ते कमी केले जाते. तुम्ही सीट्स बाथ करू शकता या साठी टॉयलेट सीट वर बसेल असा लहान प्लास्टिक टब तुम्ही वापरू शकता. किंवा तुमच्या बाथ टब मध्ये पुर्ण अंघोळ करू शकता. रिपोर्ट्स नुसार, शौचास जाऊन आल्या नंतर प्रत्येक वेळी 20 मिनिटे गरम पाण्याने अंघोळ केल्यास अतिशय फायदा होतो. अंघोळीच्या पाण्यामध्ये जर इप्सम सॉल्ट वापरले तर वेदना कमी होण्यास खुप मोठी मदत होते आणि बराच आराम मिळतो.

▪️ओव्हर द काउंटर ऑईन्टमेंट :


ओव्हर द काउंटर ऑईन्टमेंट म्हणजे मलम आणि क्रीम या प्रत्येक मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध असतात. यामुळे त्वरित आराम मिळु शकतो. काही मलम लावल्या मुळे सुज देखील कमी होते आणि तुमचा मुळव्याध कमी होण्यास लवकर मदत होते. जर तुम्ही हायड्रोकॉर्टीसॉन बरोबर मलम वापरत असाल तर, असा सल्ला दिला जातो की ती औषधे एकत्र वापरताना एका आठवड्या पेक्षा जास्त दिवस वापरू नये.

▪️सुदिंग वाईप्स :


शौचास केल्या नंतर टॉयलेट पेपर वापरल्या मुळे तुमचा मूळव्याधाचा त्रास वाढू शकतो. बेबी वाईप्स मुळे तुम्ही स्वतः ला स्वच्छ ठेऊ शकता आणि त्यामुळे अजुन इरिटेशन वाढणार नाही. इमप्रूव्हमेंट वाढवण्यासाठी, तुम्ही अशा वाईप्स वापरू शकता ज्यांना सुथिंग अँटी पाईल्स घटक लावलेले असतील उदा. विच हॅझल किंवा कोरफड. हे औषध म्हणुन काम करते आणि नैसर्गिक रीत्या मूळव्याधाला आराम देते. फक्त वाईप्स निवडताना त्या अल्कोहोल फ्री, परफ्युम रेसीस्टंट किंवा इतर इरिटेटिंग घटक नसलेल्या आहेत ना याची खात्री करून घ्या. या घटकांमुळे लक्षणे कमी होण्या ऐवजी वाढतात.

▪️आईस पॅक्स – बर्फ :


गुदद्वाराला आईस पॅक्स किंवा कोल्ड कॉम्प्रेसेस 15 मिनिटां साठी लावा म्हणजे त्यामुळे तेथील सुज कमी होईल. मोठ्या आणि वेदना दायक मूळव्याधा साठी ही एक अतिशय परिणाम कारक उपचार पद्धत आहे. बर्फ डायरेक्ट त्वचेवर लाऊ नका, त्या ऐवजी बर्फ कापडा मध्ये किंवा पेपर टॉवेल मध्ये गुंडाळा आणि मग लावा म्हणजे फ्रोझन सेन्सेशन होणार नाहीत.

▪️स्टुल सॉफ्टनर्स :


रिपोर्ट नुसार, स्टुल सॉफ्टनर्स म्हणजे शौचास मऊ करणारे घटक किंवा फायबर्स सप्लिमेंट्स वापरणे ही एक मूळव्याधाचा त्रास कमी करणारी उपचार पद्धती आहे. या मुळे शौचास मऊ होते, बद्धकोष्टता होत नाही आणि शौचास लवकर, सहज आणि वेदना रहित होण्यास मदत होते. अशी काही औषधे आहेत जी शौचास मऊ होण्यास मदत करतील, ही औषधे पावडर, कॅप्सूल, आणि लिक्विड या स्वरूपात मिळतात. जी तुम्ही तोंडा वाटे दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकता.

▪️सैलसर कॉटनचे कपडे वापरा :


तुमचे पॉलीईस्टरचे टाईट कपडे न वापरता अल्ट्रा ब्रिदेबल कॉटन कपडे ( विशेषकरून कॉटन अंडरवेअर ) वापरणे हे सुद्धा एक मूळव्याधा पासून आराम देणारे नैसर्गिक औषध म्हणुन काम करते. यामुळे गुदद्वाराचा भाग हा स्वच्छ आणि कोरडा राहण्यास मदत होते. यामुळे लक्षणे कमी होऊ शकतात. इरिटेशन कमी करण्यासाठी परफ्युम रेसीस्टंट डिटरजंट किंवा फॅब्रिक सॉफ्टनर्स वापरा.

▪️पुरेसे पाणी प्या :


जेव्हा तुम्हाला तुमच्या मूळव्याधा मुळे जळजळ होत असेल तेव्हा तुम्ही भरपुर पाणी प्या. पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे (जवळपास 1.5 ते 2 लिटर किंवा दिवसातून 6 ते 8 ग्लास ) हे अजुन एक औषध आहे ज्याने तुम्ही मूळव्याधा पासून कायमची सुटका मिळवू शकता. या मुळे तुम्हाला नियमितपणे मऊ शौचास होण्यास सुरवात होईल आणि कुंथावे लागणार नाही. तुम्ही संपुर्ण दिवस हायड्रेटेड राहत आहात का याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळ सतत एक पाण्याची बॉटल भरून ठेवत जा. तसेच तुमच्या स्वतः च्या काळजीच्या दैनंदिन सवयी मध्ये एक कप चहाचा वाढवा किंवा तुमचे हायड्रेशन वाढवण्यासाठी पाण्याचा वापर करा.

▪️रक्ताची गुठळी काढा :


गुदद्वाराच्या बाहेर असणारा मूळव्याधा हा अतिशय वेदना दायक रक्ताची गुठळी निर्माण करू शकतो. जरी ही हानिकारक नसली तरी, ती स्वतः हुन बरी होण्यास कमीत कमी 2 आठवड्यांचा कालावधी घेऊ शकते. जर वेदनेची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली आणि जर असह्य बनली तर, तुमच्या डॉक्टरांना रक्ताची गुठळी असणारा मूळव्याधा काढायला सांगा. ही साधी प्रक्रिया त्याच जागे पुरती भूल देऊन ओ पी डी मध्ये 10 मिनिटां मध्ये केली जाते. मूळव्याधा पासून कायमचा आराम मिळविण्या साठी ही एक सोपी आणि परिणाम कारक उपचार पद्धती आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की पहिले 24 ते 48 तास हे नेहमी अतिशय वेदना दायक असतात, आणि रक्ताची गुठळी काढण्यासाठी देखील हाच वेळ अतिशय योग्य असतो.

▪️अतिशय गंभीर मूळव्याधा साठी :


नैसर्गिक औषध उपचार केल्या नंतर आणि ओ पी डी लेवल वरील उपचार प्रक्रिया केल्या नंतर देखील जर तुम्हाला तुमचा मुळव्याध त्रास देऊन निराश करत असेल तर, हिच वेळ आहे जेव्हा तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट केले पाहिजे आणि शस्त्रक्रिये बाबत डिटेल्स घेतले पाहिजेत. शस्त्रक्रिये द्वारे मुळव्याध काढून टाकल्या नंतर ( हिमोऱ्हॉईडेक्टॉमी ) बरे होत असताना अतिशय मोठ्या प्रमाणात वेदना होऊ शकतात. परंतु ही प्रक्रियाच मूळव्याधा पासून कायमची सुटका मिळविण्या साठीची सर्वात परिणाम कारक उपचार पद्धती आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...