VishwaRaj

गरोदरपणाचे टप्पे आणि लक्षणे

आम्ही गरोदरपणाचे प्लॅनिंग करत असताना करावयाच्या आणि न करावयाच्या गोष्टीं बद्दल सांगितलेले आहे. या आताच्या ब्लॉग मध्ये आम्ही सर्व स्त्रियांना (अशा स्त्रिया ज्या गरोदरपणाचे प्लॅनिंग करत आहे किंवा अशा स्त्रिया ज्या आधीपासूनच त्यांच्या आयुष्या मधील गरोदरपाणाचा सुंदर टप्पा अनुभवत असतील ) गरोदरपणाच्या सुंदर प्रवासा मधुन नेणार आहोत.

गरोदरपणाचे मुख्यत्वे 3 टप्पे असतात :-
1)पहिले ट्रायमेस्टर:-
आठवडा 1 – आठवडा 12
2)दुसरे ट्रायमेस्टर:-
आठवडा 13 – आठवडा 28
3)तिसरा आठवडा :-
आठवडा 29 – आठवडा 40

चला तर मग आपण पटकन पाहुया की गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्या नुसार गरोदरपणाची लक्षणे काय असतात आणि स्त्री च्या शरीरामध्ये आठवड्या नुसार बाळाची वाढ कशी होते.

1)पहिले ट्रायमेस्टर :
(आठवडा 1 – आठवडा 12)
गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळा दरम्यान म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टर दरम्यान तुमच्या शरीरा मधील हार्मोन्स मध्ये बरेच बदल होतात ज्याचा परिणाम तुमच्या शरीरामधील अवयवांवर देखील होतो. हार्मोन्स मधील हे बदल गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्या मधील लक्षाणांना देखील सक्रिय करतात. तुमची मासिक पाळी थांबण्या शिवाय, गरोदरपणाच्या पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये तुमच्या शरीरामध्ये खाली दिल्या प्रमाणे इतर बरेच बदल होतात :-
▪️ मोठ्या प्रमाणामध्ये मानसिकते मधील बदल
▪️ नेहमी थकल्यासारखे वाटणे
▪️ स्तनांमध्ये सूज आणि स्पर्श झाल्यास वेदना होणे
▪️ काही पदार्थ खाण्याची टाळता न येण्यासारखी तीव्र इच्छा किंवा काही अन्नपदार्थांचा तिटकारा
▪️ वारंवार लघवीला लागणे
▪️ बद्धकोष्टता
▪️ सततची डोकेदुखी
▪️ छाती मध्ये जळजळ
▪️ वजन वाढणे / वजन कमी होणे

2)दुसरे ट्रायमेस्टर:-
(आठवडा 13 – आठवडा 28)
हा एक असा टप्पा आहे जिथे बऱ्याच स्त्रियांना पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये अनुभवलेली लक्षणे कमी झाल्याचे दिसून येते.
दुसऱ्या ट्रायमेस्टरच्या दरम्यान तुमचे बाळ हळूहळू वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बरेच शारीरिक बदल होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
▪️ पोटाचा घेर वाढणे
▪️ पाठी मध्ये वेदना, पोटाचा काही भाग आणि मांड्यांमध्ये वेदना
▪️स्तन, पोट, मांड्या किंवा अगदी नितंबांवर देखील स्ट्रेच मार्क्स यायला सुरवात होते किंवा येतात
▪️निपल्स च्या आजूबाजूची त्वचा अधिक गडद रंगाची होण्यास सुरवात होते
▪️बेंबी पासून ओटी पोटाच्या खालील भागा पर्यंतच्या त्वचेवर एक सरळ रेष उमटण्यास सुरवात होते
▪️गाल, नाक, ओठांच्या वरील भाग, कपाळ इत्यादी भागांवरील त्वचेवर गडद रंगाचे डाग येण्यास सुरवात होते
▪️हातांमध्ये बधिरपणा
▪️पोटाचा भाग, हाताचे तळवे, पायाचे तळवे यांवर खाज येते
▪️चेहरा, बोटे, घोटा यांवर सुज येते

3)तिसरा आठवडा :-
(आठवडा 29 – आठवडा 40)
दुसऱ्या ट्रायमेस्टर मधील काही लक्षणे गरोदरपणाच्या तिसऱ्या ट्रायमेस्टर दरम्यान अनुभवयास / पहावयास मिळतात. गरोदरपणाच्या या टप्प्या दरम्यान, तुमची श्वासोच्छवासाच्या समस्यांना सामोरे जाण्यास सुरुवात होते आणि तुम्हाला वारंवार वॉशरूम मध्ये जाऊन यावे लागते. या दोन मोठ्या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे बाळ आता आकाराने मोठे होत असते आणि त्यामुळे अंतर्गत अवयवांवर जास्तीचा दाब पडण्यास सुरुवात होते. गरोदरपणाच्या तीसऱ्या ट्रायमेस्टर दरम्यान तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या नवीन बदलांचे ( खाली दिल्या प्रमाणे ) स्वागत करण्यासाठी तयार राहा.

▪️ श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये थोड्या प्रमाणात समस्या
▪️चेहरा, बोटे, घोटा यान वर सूज येणे
▪️ मुळव्याध झाल्याचे निदर्शनास येणे ( गुदद्वार आणि गुदाशयाच्या खालील भागामध्ये फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा पुंजका )
▪️ स्तनांमध्ये स्पर्श झाल्यास वेदना होणे आणि त्यामधून पातळ दुधासारखा द्रव म्हणजे चीक बाहेर येणे
▪️ सावधगिरी : तुमची बेंबी आता बाहेरील बाजूस आलेली असेल
▪️ झोपेमध्ये निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जावे लागणे
▪️ बाळ कदाचित तुमच्या पोटाच्या खालील बाजूकडे स्थलांतरित होण्यास सुरुवात झालेली असेल
▪️ तुम्हाला कदाचित पोटामध्ये कळा येत असल्याचा अनुभव होईल परंतु या खऱ्या प्रसूतिवेदना / कळा नसून तात्पुरत्या वेदना असतात.

▪️ निष्कर्ष:-
स्त्रीच्या आयुष्यामधील कोणत्याही इतर क्षणांपैकी गरोदरपण हा एक सर्वात जादुई क्षण असतो ज्यामध्ये ती तिच्या आत मध्ये असलेल्या दुसऱ्या जीवाचा अनुभव घेते! असेही म्हटले जाते की उपचारापेक्षा खबरदारी नेहमीच चांगली असते आणि त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, भविष्या मधील कोणत्याही प्रकार चा धोका टाळण्यासाठी स्त्री रोग आणि प्रसूतिशास्त्र यांमध्ये सर्वोत्तम असलेल्या आणि स्पेशलायझेशन मीळवलेल्या हॉस्पिटल मधून समुपदेशन घ्यावे.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...