VishwaRaj

गुडघा प्रत्यारोपणा नंतरची खबरदारी

गुडघा प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे ज्यामध्ये डॉक्टर गुडघ्याचा वेदनादायक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसवतात. गुडघा प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये फिमर बोन चे टोक बाहेर काढले जाते आणि तेथे मेटल शेलचे प्रत्यारोपण केले जाते. डॉक्टर याबरोबरच खालच्या पायाच्या हाडाचे म्हणजे टीबीयाचे टोक सुद्धा काढतात. नंतर त्या जागी चॅनल असलेला प्लास्टिकचा तुकडा ज्याला मेटल ची दांडी – स्टेम असते तो बसवला जातो.

एका अभ्यासानुसार, जवळपास 90 % लोक जे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेतात त्यांच्या बाबत असे निदर्शनास आले की या शस्त्रक्रिये मुळे त्यांच्या वेदना कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही या प्रक्रियेमधून खूप मोठ्या काळासाठी जात असाल तर तुम्ही याचा विचार करू शकता.
शिवाय, गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे खालील प्रमाणे 3 वेगवेगळे प्रकार पडतात:
1) टोटल नी रिप्लेसमेंट : यामध्ये संपूर्ण गुडघ्याचे प्रत्यारोपण केले जाते.
2) पार्शियल नी रिप्लेसमेंट : या शस्त्रक्रिये मध्ये फक्त गुडघ्याचा जो भाग खराब किंवा बाधित झालेला असतो तोच बदलला जातो.
3) बायलॅटरल नी रिप्लेसमेंट : या शस्त्रक्रिये मध्ये दोन्ही गुडघ्याचे प्रत्यारोपण केले जाते.

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा कोणी विचार करावा?

ज्या व्यक्ती ऑस्टिओआर्थ्रायटिस -( सांध्याची झीज) ने ग्रस्त असतात मुख्यत्वे त्या व्यक्ती गुडघा शस्त्रक्रिया करण्यासाठी जातात. परंतु, खालील प्रकारच्या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सामान्य असते :
▪️ गुडघ्याला झालेल्या इजे मध्ये मेनिस्कस फाटणे किंवा लिगामेंट – अस्थीबंध फाटणे
▪️ऱ्हुमॅटॉइड आर्थ्ररायटिस – आमवात
▪️ जन्मजात गुडघ्याचे विकार

तथापि, काही लोकांना गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिये ची आवश्यकता भासत नाही, त्यांची समस्या खालील उपाय केल्यामुळे बरी होते:
▪️ दररोज नियमितपणे व्यायाम करणे
▪️ अतिरिक्त वजन घटवणे
▪️ इंजेक्शन्स
▪️मेडिकल मधुन औषधे घेणे

🔹गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये किती प्रमाणात वेदना होतात?

शस्त्रक्रिये नंतर काही काळासाठी वेदना होणार याची तुम्ही अपेक्षा करू शकता आणि या वेदनांचा सामना करण्यासाठी, डॉक्टर तुम्हाला काही प्रकारची औषधे देतात. त्यामुळे तुमच्या परिस्थिती बाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांना माहिती दिलीत आणि औषधे किती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ते सांगितले तर तुम्हाला त्याची मदत होईल. त्याच बरोबर, तुम्हाला औषधां मुळे कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांचा अनुभव येत असेल तर ते देखील तुमच्या डॉक्टरांना कळू द्या.

🔹 शस्त्रक्रियेच्या संबंधित गुंतागुंतीच्या समस्या :

जसे प्रत्येक शस्त्रक्रिये बरोबर गुंतागुंतीच्या समस्या असतात, त्याचप्रमाणे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिये बरोबर देखील असतात. गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्या नंतर, तुम्हाला खालील समस्या उद्भवण्याचा धोका होऊ शकतो :
▪️ रक्ताच्या गुठळ्या होणे
▪️ जंतुसंसर्ग
▪️ कडकपणा
▪️ जरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी, वेदना चालू राहणे

🔹 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही किती काळापर्यंत व्यवस्थित राहण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता?

कृत्रिम गुडघ्याला ( एक्सपिरेशन डेट )कालबाह्य होण्याची तारीख असते आणि जेव्हा तो दिवस येतो तेव्हा तुम्हाला पुन्हा दुसरी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. संशोधना नुसार, जवळपास 82 % लोक ज्यांनी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे, त्यांच्यामध्ये 25 वर्षांनंतर देखील गुडघ्याचे कार्य व्यवस्थित चालू असल्याचे दिसून आले. त्यामुळे, बऱ्याच रुग्णांमध्ये हे कंपल्सरी नाही की त्यांना पुन्हा दुसऱ्या शस्त्रक्रिये मधून जावे लागले असेल.

🔹 तुमची गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या नंतर तुम्ही घ्यावयाची खबरदारी :
शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या नंतर, गुंतागुंतीच्या समस्या टाळण्या साठी आणि कृत्रिम गुडघा बराच काळ टिकवून ठेवण्या साठी तुम्ही खालील खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
▪️ शस्त्रक्रियेच्या जखमेची काळजी :
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना चिरफाड करण्याची आवश्यकता असते त्यालाच इन्व्हॅसीव प्रक्रिया असे म्हणतात, त्यामुळे तुमच्या जखमेवर टाके आणि स्टेपल्स घातलेले असतात.
तुम्ही कोणत्याही परिस्थिती मध्ये हे टाके घरीच स्वतःहून बिल्कुल तोडायचे नाहीत कारण त्यामुळे तुमची जखम अजून बळावत जाईल. हे टाके फक्त आणि फक्त वैद्यकीय तज्ञांकडूनच काढून घ्यावे लागतात.

▪️ रक्ताच्या गुठळ्या होणे टाळणे:
शस्त्रक्रिया झाल्यानंतर च्या पहिल्या काही आठवड्यां मध्ये, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे, अँटीकोऍग्युलंट म्हणजे रक्ताच्या गुठळ्या रोखण्याची औषधे घेणे अत्यावश्यक असते जे तुमचे शस्त्रक्रीया तज्ञ तुम्हाला देतात. लालसरपणा, सुज, पोटऱ्यांमध्ये अतिप्रमाणात वेदना आणि उपचार केलेल्या भागामध्ये इरीटेशन इत्यादी प्रकारची रक्ताच्या गुठळी ची लक्षणे तुम्हाला जर दिसली तर सावध रहा.

▪️ शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवा:
तुम्ही शस्त्रक्रिये मधून गेल्या नंतर लगेचच, प्रत्यारोपण केलेल्या सांध्या वर तुमच्या शरीराचा पूर्ण भार टाकला जाणार नाही याची तुम्ही काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या सांध्या वर किती प्रमाणामध्ये प्रेशर देऊ शकता याबाबत तुमचे शास्त्रक्रिया तज्ञ तुम्हाला पूर्णपणे सूचना देतील. याच्या परिणामी, तुम्ही इजा होणे, हानी होणे किंवा तुमचा सांधा निखळणे अशा प्रकारच्या समस्या टाळू शकता. शिवाय, शस्त्रक्रिया झाल्या नंतर च्या पहिल्या काही आठवड्यां मध्ये डॉक्टर तुम्हाला क्रचेस, क्रेन किंवा सभोवताली चालण्या साठी काठीचा वापर करण्याचा सल्ला देतील.
इतर सूचनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल :
▪️ फक्त आणि फक्त अशा प्रकारच्या खुडच्यां मध्ये बसा ज्यांची उंची तुमच्या गुडघ्याच्या उंची एवढी असेल.
▪️ तुमच्या गुडघ्यांची तीडी घालू नका किंवा पायांना पिळ देऊ नका.
▪️ अति प्रमाणामध्ये गुडघे खाली टेकने टाळा.
▪️ बऱ्याच तासांसाठी उभे राहू नका.
▪️ झोपताना एका साईड वर झोपू नका.
▪️ एकावेळी एकच पायरी चढा

🔹 निष्कर्ष:
जे लोक गुडघ्याच्या सांध्या मधील अतितीव्र वेदनेने ग्रस्त असतील त्या लोकांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अतिशय आवश्यक असते. जी प्रक्रिया केली जाते त्यामध्ये चिरफाड असेल आणि कदाचित काही प्रमाणामध्ये धोका असेल परंतु, ही प्रक्रिया तुम्हाला तुम्ही सहन करत असलेल्या अति तीव्र वेदनां मधुन बऱ्याच काळासाठी मुक्त होण्यास मदत करेल. याच बरोबर, कोणत्याही प्रकारची पुढची गुंतागुंतीची समस्या टाळण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

संबंधित पोस्ट


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...