VishwaRaj

तरुण वयामध्ये होणाऱ्या गुडघ्यां मधील वेदना समजावून घ्या.

जॉन हा एक 25 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा, त्याने ठरवले की बैठ्या जीवनशैली पासून सुटका मिळवायची आणि त्यामुळे त्याने जसे लॉकडाऊन उघडले तसे काही किलो वजन कमी केले. त्याला याची काहीच कल्पना नव्हती की, एका आठवड्या मध्ये तीन मैलां पेक्षा जास्त जॉगिंग केल्यामुळे पुढील काही दिवसां साठी त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. जॉन प्रमाणेच, फिटनेसच्या बाबतीत उत्साही असलेले बरेच तरुण हे अति वापर केल्यामुळे गुडघ्यांना झालेल्या इजे मुळे ग्रस्त आहेत.

understand-the-knee-pain-at-a-young-age

काही वर्षांपूर्वी, 50 – 55 वर्षां वरील प्रौढ लोकांमध्ये वयाशी संबंधित गुडघ्या मध्ये वेदना होणे ही गोष्ट अतिशय सामान्य होती. परंतु, अलीकडच्या काळामध्ये बैठी जीवनशैली आणि कमी काळामधील अतिशय जोर जोराचा व्यायाम यामुळे, तरुण लोक गुडघ्या मधील वेदनेने ग्रस्त होणे ही गोष्ट असामान्य राहिलेली नाही.

जरी लक्षणे ही कमी अधिक प्रमाणा मध्ये एक समान असली म्हणजे गुडघ्या मधील वेदना तरी, गुडघ्यांवर परिणाम करणाऱ्या गोष्टींचे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत आहेत. बहुतेक वेळा, तरुण लोकां मधील गुडघ्याच्या वेदना या अति वापर केल्यामुळे झालेल्या इजेशी संबंधित असतात. असे होण्या मागचे कारण म्हणजे, जोर जोराच्या व्यायामा मुळे वारंवार स्नायू, लिगामेंट – अस्थीबंध आणि गुडघ्याच्या सभोवताली असलेले कार्टिलेज – कुर्च्या यांच्या वर आलेला ताण होय. इतर अत्यंत क्लेशकारक इजा उदाहरणार्थ लिगामेंट – अस्थिबंध, मेनीस्कस आणि कार्टिलेज – कुर्च्यां च्या इजा या अचानक पणे वेदना सुरू होण्यास कारणीभूत असतात.

1) अतिवापरा मुळे झालेल्या इजा :
▪️पटेलोफिमोरल सिंड्रोम (रनर्स नी )
▪️ऑसगुड – स्चलॅटर डिसीज
▪️पटेलर टेंडीनोपॅथी (जंम्पर्स नी )
▪️आय टी बँड सिंड्रोम
▪️इंडिंग – लार्सन जॉहन्सन सिंड्रोम
▪️होफाज डिसीज
▪️बायपारटाईट पटेला

2) इतर कारणे :
▪️हायपर – लॅक्सिटी
▪️फ्लॅट फिट
▪️जीवनसत्व डी 3 ची कमतरता
▪️आर्थ्रायटिस

🔹पटेलोफिमोरल सिंड्रोम (रनर्स नी ) :
या प्रकारा मध्ये गुडघ्याच्या वाटीच्या सभोवताली वेदना असतात. या प्रकारची समस्या अशा व्यक्तींमध्ये दिसून येते ज्या व्यक्ती वारंवार त्यांच्या गुडघ्यांवर ताण देतात किंवा अगदी कमी कालावधी मध्ये काही ऍक्टिव्हिटीज अचानक पणे त्यांना जुळवून न घेता वाढवतात. हे सामान्यपणे जॉगर्स, ट्रेकर्स आणि सायकलिस्ट्स या लोकांमध्ये आढळून येते. जसे की यासाठी कोणत्याही विशिष्ट उपचार पद्धतीची आवश्यकता नसते. सुरुवातीच्या उपचार व्यवस्थापना मध्ये तुम्ही करत असलेला व्यायाम प्रकार किंवा खेळत असलेला खेळ यांपासून ब्रेक घेणे / थांबवणे आणि हळूहळू ताकद वाढवणारे गुडघ्याचे व्यायाम प्रकार करणे यांचा समावेश असतो. भविष्या मध्ये त्याच प्रकारची समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू विशिष्ट व्यायाम प्रकार किंवा विशिष्ट खेळा बरोबर स्वतःला जुळवून घेणे होय.

▪️ऑसगुड – स्चलॅटर डिसीज:
ऑसगुड – स्चलॅटर डिसीज म्हणजे ऑस्टिओकॉन्ड्रिटिस – अस्थी व कूर्चा यांचा दाह होणे किंवा एक्स्टेन्सर मेकॅनिसम म्हणजे अवयव सरळ करणारा किंवा लांब प्रसरण करणाऱ्या स्नायूच्या यंत्रणेवर वारंवार अतिरिक्त ताण आल्या मुळे टीबीअल ट्यूबरकल चे ट्रॅक्शन ऍपोफायसीस ( म्हणजे सामान्यत: एखाद्या अस्थीची वाढ किंवा त्यावर असलेला उंचवटा ) होणे होय, या सर्व समस्या उड्या मारणे आणि धावणे यासारख्या ऍक्टिव्हिटी केल्यामुळे होतात. ज्या लोकांमध्ये अस्थि व स्नायू संस्था पूर्णपणे तयार झालेली नसते आणि तरीही ते खालील खेळ खेळत असतील तर गुडघ्याच्या समोरील बाजू मध्ये वेदना होण्याचे हे एक सामान्य कारण आहे.:
बास्केट बॉल,
व्हॉलीबॉल,
फुटबॉल,
स्प्रिंटिंग – धावणे,
जिम्नॅस्टिक्स.

याच्या शास्त्रीय प्रेझेंटेशन मध्ये गुडघ्याच्या पुढील बाजू मध्ये वेदना आणि जिथे पटेलर टेंडोन – स्नायू बंध हा टीबीअल ट्यूबरॉसीटी वर इन्सर्ट होतो तिथे टेंडरनेस असणे. ही एक स्वतःहून बरी होणारी समस्या आहे. सुरुवातीच्या उपचार व्यवस्थापना मध्ये बर्फ लावणे, वेदनाशामक ( एन एस ए आय डी )गोळ्या घेणे, हालचालीं मध्ये सुधारणा करणे आणि खेळामधील सापेक्ष विश्रांती यांचा समावेश असतो. पुढे स्टार्चिंग आणि ताकद वाढवणारे प्रोग्राम हे अंतर्गत बायो मेकॅनिकल फॅक्टर्स वर मात करण्यासाठी महत्त्वाचे असतात. काही लोकांमध्ये रिकव्हरी ही उशिरा होऊ शकते आणि त्यामुळे खेळामधून खूप मोठा ब्रेक घ्यावा लागू शकतो.

▪️पटेलर टेंडीनोपॅथी (जंम्पर्स नी):
ही एक वेदनादायक समस्या आहे आणखी अशा लोकांमध्ये निर्माण होते जे लोक बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, लॉंग जंप आणि स्किइंग म्हणजे स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे अशा प्रकारचे खेळ खेळतात, या खेळांमध्ये वारंवार उड्या मारणे, लँडिंग, ऍसलरेशन – वेग वाढवणे, डिसलरेशन – वेग कमी करणे आणि कटिंग यांचा समावेश असतो. एक्सटेन्सर मेकॅनिसम चे वारंवार विक्षिप्त लोडींग झाल्यामुळे पटेला (गुडघ्याची वाटी )च्या इन्फेरिअर पोल मधील पटेलर टेंडॉन ला छोटे छोटे छेद जातात. उपचार हे मुख्यत्वे कंझरवेटिव्ह असतात. सुरुवातीच्या उपचार व्यवस्थापना मध्ये पुरेशी विश्रांती आणि वेदनाशामक औषधे( एन एस ए आय डी ) यांचा समावेश असतो. पुन्हा कार्य सुरळीत होण्यासाठी स्नायूंची ताकद वाढवणारे प्रोग्रॅम्स अतिशय महत्वाचे असतात. शस्त्रक्रिया ही शेवटचा उपचार म्हणुन केली जाते.

▪️ आय टी बँड सिंड्रोम :
लांब पल्ल्याच्या अंतरावर धावणे, सायकलिंग करणे आणि स्कीइंग करणाऱ्या तरुण लोकांमध्ये गुडघ्याच्या बाहेरील बाजूस वेदना होण्याच्या कारणांपैकी हे एक कारण आहे. याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या समस्येला कारणीभूत असलेल्या बऱ्याच शक्यता आहेत उदाहरणार्थ, आय टी बँड आणि लॅटरल फिमोरल इपीकोन्डाईल यांच्यामध्ये घर्षण होणे, फॅट पॅडचे कॉम्प्रेशन होणे आणि बर बर्सासायटीस इत्यादी.

सुरुवातीच्या उपचार व्यवस्थापना मध्ये क्रायोथेरपी आणि विश्रांती यांचा समावेश असतो. फिजिकल थेरपी मध्ये मायोफेशियल रिलीज, आय टी बी स्ट्रेचिंग आणि हीप ऍबडक्शन स्ट्रेदनींग – बळकटीकरण यांवर अधिक फोकस केला जातो. त्याच वेळी, इर्गोनॉमिक्स आणि प्रॉपर ट्रेनिंग पोस्चर हे रिहॅबिलिटेशन चा महत्त्वाचा भाग पार पाडतात.

▪️सिंडिंग – लार्सन – जॉहन्सन सिंड्रोम :
हा सिंड्रोम पौगंडावस्थे मधील 10 ते 14 वर्षे वयोगटातील मधील मुलांमध्ये दिसून येतो जी मुले फुटबॉल, धावणे, व्हॉलीबॉल आणि जिम्नॅस्टिक हे खेळ खेळतात. वैद्यकीय दृष्ट्या या परिस्थिती मध्ये गुडघ्याच्या वाटीच्या खालील भागा मध्ये ( लोवर पोल ) वेदना होतात, या वेदनांची तीव्रता गुडघा वाकवल्या नंतर वाढत जाते. ऑसगुड – स्चलॅटर डिसीज प्रमाणे ही समस्या देखील ट्रॅक्शन ऍपोफायसायटीस सारखी असते परंतु गुडघ्याच्या वाटीच्या खालच्या भागाची असते. विश्रांती घेण्या शिवाय, वेदनाशामक औषधे ( एन एस ए आय डी ), ब्रासिंग, स्ट्रेचिंग आणि स्नायूंचे बळकटीकरण हे अतिशय महत्त्वाचे आहे.

▪️होफाज डिसीज :
होफाज डिसीज म्हणजे हलक्या आघाता मुळे इन्फ्रापटेलर बर्सा मध्ये सुज येणे त्याच बरोबर गुडघ्यावर हायपर एक्सटेन्शन म्हणजे सांधा जास्त जोराने वाकवणे आणि रोटेशनल स्ट्रेन येणे. एकदम आतील स्नायूंची कमजोरी ही गुडघ्यांवर पुढे अजुन ताण व जोर देते. हे सामान्यपणे डान्सर्स, धावपटू, बॅडमिंटन आणि टेनिस खेळाडू यांच्यामध्ये दिसून येते.
पुरेशी विश्रांती घेऊन तसेच गुडघा आणि एकदम आतील स्नायूंचे बळकटीकरण करून यावर कंझरवेटिव्ह उपचार केले जातात. रीफ्रॅक्टरी केसेस मध्ये अर्थ्रोस्कोपिक रीसेक्शन केले जाते.

▪️बायपारटाईट पटेला :
ही समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे ऑसीफिकेशन (हाडे एकमेकांशी जुळणे )सेंटर जुळण्याच्या प्रक्रियेमध्ये फेल – अपयशी होते आणि त्यामुळे फ्रॅगमेंट आणि गुडघ्याच्या वाटीची फायब्रस नॉन युनियन होते. या मध्ये नेहमीच कोणतीही लक्षणे दिसत नाहीत परंतु याचा कोणत्या तरी प्रसंगामुळे शोध लागतो. परंतु, पौगंडावस्थे मधील मुलां मध्ये अति वापर केल्यामुळे किंवा जोर जोराच्या हालचाली केल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे गुडघ्याच्या समोरील बाजूस वेदना होतात त्याच्या बऱ्याच कारणांपैकी हे एक कारण असू शकते. याचे उपचार कंझरवेटीवली केले जातात. जर हे उपचार अपयशी ठरले तर शस्त्रक्रिया उपचार केले जातात.

▪️हायपर लॅक्सिटी :
सांध्यांचा ढिलेपणा किंवा त्यांची हालचालीची श्रेणी वाढणे यालाच हायपर लॅक्सिटी म्हणतात. हे सामान्यपणे तरुण लोकांमध्ये आढळून येते खासकरून महिलांमध्ये. हायपर लॅक्सिटी ही सांध्यांमध्ये वेदना होण्याच्या प्रसंगा मध्ये वाढ होण्याशी आणि सॉफ्ट टिशू ची इजा खासकरून ए सी एल यांच्याशी संबंधित असते. स्नायूंची ताकद आणि आंतरेंद्रिये संवेदना वाढवणे यांचा याच्या उपचारां मध्ये समावेश होतो.

▪️फ्लॅट फिट :
यामध्ये पायाच्या तळव्यात असणारी मध्यवर्ती रेखांशाची कमान (मेडीयल लॉंजीट्यूडिनल आर्च ) ही पूर्णपणे सपाट झालेली असल्यामुळे तिचा आधार नाहीसा होतो. हे सामान्यपणे स्नायूंच्या आणि लिगामेंट्स च्या ढिलेपणा मुळे लहान मुलांमध्ये दिसून येते परंतु याचा प्रभाव वय वाढेल तसा कमी होत जातो.

फ्लॅट फिट चा चालताना आणि धावताना पायावर प्रभाव वाढलेला असतो याच्या मुळे पुन्हा पाया मध्ये वेदना, प्लांटर फॅसायटीस, गुडघ्या मध्ये वेदना, कंबरे मध्ये वेदना आणि पायाला इजा होणे अशा प्रसंगांमध्ये वाढ होते. मेडीयल आर्च ला सपोर्ट देण्या बरोबर याचे उपचार हे कंझरवेटिव्ह असतात आणि या शिवाय पाय आणि घोट्याचे बळकटीकरण करणारे व्यायाम दिले जातात.

▪️ जीवनसत्व डी 3 ची कमतरता:
आज कालच्या आधुनिक जीवनशैली मुळे आणि अपुऱ्या सूर्यप्रकाशा मुळे आपल्या लोकांमध्ये जीवनसत्व डी 3 ची कमतरता असते. जीवनसत्व डी 3 च्या कमतरते मुळे लहान मुलांमध्ये रिकेट्स म्हणजे मुडदूस आणि प्रौढ लोकां मध्ये ऑस्टियोमॅलेशिया म्हणजे हाडे मऊ होणे हे विकार उद्भवतात. प्रौढ लोकांमध्ये सांध्यांमध्ये वेदना, स्नायूं मध्ये वेदना आणि स्नायूंमध्ये पेटके येणे याचे मुख्य कारण जीवनसत्व डी 3 ची कमतरता हे आहे. वैज्ञानिक माहिती नुसार गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थ्रायटिस बरोबर याचा जवळचा संबंध आहे. उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीरा मध्ये जीवनसत्व डी 3 ची निर्मिती होते. या जीवनसत्वा चे आहारा मधील स्त्रोत अतिशय कमी आहेत. कमतरता भरून काढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तज्ञांच्या सल्ल्या नुसार सप्लीमेंट्स घेणे हा आहे.

▪️आर्थ्रायटिस:
खाली नमूद केलेल्या परिस्थिती या गुडघ्याच्या काइनमॅटिक्स म्हणजे गती शास्त्रा मध्ये बदल करतात आणि कमी वयामध्ये आर्थ्रायटिस निर्माण करतात. तरुण वयामध्ये गुडघ्यात होणाऱ्या वेदनांच्या बऱ्याच कारणां पैकी हे एक कारण आहे.
▪️ लिगामेंट – अस्थिबंध, मेनीस्कस आणि कार्टिलेज – कुर्च्या यांची इजा
▪️ फ्लॅट फिट
▪️ हायपर लॅक्सिटी
▪️जीवनसत्व डी कमतरता
▪️नॉक नी किंवा बोवलेग

जीवनशैली मध्ये बदल आणि पूर्णपणे लिगामेंट – अस्थिबंध फाटणे आणि कार्टीलेज – कुर्च्या ची इजा या समस्यां साठी शस्त्रक्रिया उपचारांची आवश्यकता असते त्यामुळे या समस्या सोडुन इतर समस्यां साठी बळकटीकरण करणारे व्यायाम याबरोबर याचे उपचार हे कंझरवेटीव्ह असतात.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...