VishwaRaj

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया का आवश्यक असते?

दोन पायांवर चालण्याची गुणवत्ताच मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे बनवते परंतु याची मोठी किंमत मानवाला मोजावी लागते. आपल्या गुडघ्यांना बराच भार सहन करावा लागतो, पायऱ्या चढत असताना आपल्या शरीराच्या वजनाच्या तीन पट भार गुडघ्यांवर पडतो तर स्क्वॅटिंग व्यायाम प्रकार करत असताना आपल्या शरीराच्या वजनाच्या सात पट भार गुडघ्यांवर पडतो. आपल्या आयुष्यामध्ये हे वारंवार केल्यामुळे नैसर्गिक रित्या गुडघ्याच्या सांध्या ची झीज होते आणि खास करून मांडी व नडगी यांच्यामधील कार्टिलेज – कुर्च्या ची झीज होते. या समस्येच्या सुरुवातीच्या काळामध्ये सांध्याला सुज येते त्यामुळे वेदना निर्माण होतात परंतु, गंभीर रुग्णांमध्ये पाय वाकण्या पर्यंत परिस्थिती बळावत जाते.

गुडघ्यां मधील वेदना या फक्त दैनंदिन ऍक्टिव्हिटीज वर विपरीत परिणाम करतात असे नाही तर एखाद्या व्यक्तीला व्यायाम करण्यापासून परावृत्त देखील करतात ज्याच्या मुळे शारीरिक वजनामध्ये वाढ होते परिणामी गुडघ्यांवर अजून भार निर्माण होतो आणि पुढे कार्टीलेज – कुर्च्या आणि हाडांच्या भागाला हानी पोहोचते व हे दुष्ट चक्र असेच पुढे चालत राहते. या प्रकाराची ची लक्षणे आणि विकृती वर उपचार करण्यासाठी गुडघा प्रत्यारोपण केले जाते.

या विकाराच्या सुरुवातीच्या काळात केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये वेदनाशामक औषधे आणि सूज कमी करणारी औषधे, फिजिकल थेरेपी, कॅल्शियम आणि जीवनसत्व ड सप्लीमेंट्स यांचा समावेश असतो. एक नेहमीची तक्रार म्हणजे मी या डॉक्टर कडून त्या डॉक्टर कडे जातो ते मला काही प्रकारची औषधे देतात, ही औषधे घेईपर्यंत माझ्या वेदना कमी होतात परंतु जर औषधे थांबवली तर त्या क्षणापासून वेदना पुन्हा सुरू होतात. अजून एक सामान्यपणे आढळणारी तक्रार म्हणजे, मी बऱ्याच काळापासून कॅल्शियम सप्लीमेंट्स घेत आहे. एखाद्या व्यक्तीने आजाराची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार यासंबंधी व्यवस्थित माहिती घ्यावी. वेदनाशामक औषधे ही तात्पुरता आराम देतात. फिजिकल थेरेपी, कॅल्शियम आणि जीवनसत्व ड सप्लीमेंट्स हे पुढे होणारी हाडांची हानी थांबवतात.

🔹 पर्यायी उपचार:
▪️ इंट्रा – आर्टिक्युलर स्टिरॉइड इंजेक्शन :
लहान सुईच्या साह्याने 1 ते 2 मिली स्टिरॉइड हे बाधित गुडघ्याच्या सांध्या मध्ये सोडले जाते यामुळे सांध्या च्या आतील सूज कमी होते त्याचबरोबर वेदना देखील कमी होतात. या इंजेक्शन चा परिणाम 2 ते 3 महिने टिकून राहतो.

▪️ विस्कोइलॅस्टीक सप्लीमेंट्स:
या मध्ये मुख्यत्वे हायल्यूरॉनीक ऍसिड चा समावेश होतो जो की गुडघ्याच्या सांध्या मध्ये आढळणारा नैसर्गिक द्रवपदार्थ आहे ज्याच्यामुळे सांध्या मधील द्रव पदार्थाचा चिकट पणा वाढतो. त्याच बरोबर हे सूज निर्माण करणारी केमिकल्स कमी करते ज्यामुळे वेदना सुद्धा कमी होतात आणि काही मर्यादेपर्यंत कार्टिलेज – कुर्च्यांची हानी कमी करण्याचा प्रयत्न करते. ही इंजेक्शन्स महाग आहेत. यांचा परिणाम 3 ते 6 महिन्यापर्यंत टिकून राहतो.

▪️हाय टीबीया ऑस्टीओटॉमी :
ही शस्त्रक्रिया टीबीया नावाच्या हाडाचा अँगल – कोन गुडघ्याच्या पातळीवर बदलण्यासाठी केली जाते. गुडघ्या मध्ये वजन संतुलित करण्यासाठी स्पेशियल मेटल प्लेट च्या सह्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णांचा मेडियल नी जॉईंट अर्थराइटिस सुरुवातीच्या पायरी मध्ये असेल आणि जे रुग्ण तरुण असतील ज्यांच्यामध्ये हीलिंग कपॅसीटी उत्तम असेल अशा काही सेलेक्टेड रुग्णांमध्येच ही शस्त्रक्रिया केली जाते.

जेव्हा उपचाराच्या सर्व प्रकारच्या पद्धती अपयशी ठरतील आणि वेदना अती प्रमाणामध्ये वाढलेल्या असतील ज्यामुळे दैनंदिन जीवनामधील ऍक्टिव्हिटीज वर परिणाम झालेला असेल किंवा पाय गंभीर रीत्या वाकलेला असेल, तेव्हा गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही वेदना आणि शारीरिक दुबळेपणा चे दुष्टचक्र थांबवण्या साठी आणि आयुष्याची क्वालिटी वाढवण्या साठी सुचवली जाते.

🔹 कशी :
विशेष उपकरणांच्या मदतीने, संपूर्ण निर्जंतुक परिस्थिती मध्ये, मोकळी शुद्ध हवा असलेल्या शस्त्रक्रिया गृह बरोबर, अनुभवी अस्थिरोग शस्त्रक्रीया तज्ञ आणि सहयोगी कर्मचारी वर्ग बाधित गुडघ्यावर शस्त्रक्रिया करतात. गुडघ्याचा सांधा हा पुढील बाजूने उघडला जातो, खराब झालेले किंवा हानी पोचलेले कार्टिलेज – कुर्च्या आणि हाडांचा पृष्ठभाग हा प्रत्येक व्यक्तीला साजेशा स्पेशलाईझड मेटल पृष्ठभाग ने बदलला जातो आणि दोन्ही पृष्ठभागांच्या मध्ये पॉलिमर स्पेसर बसवला जातो. कधी कधी गुडघ्याच्या वाटीच्या खालील पृष्ठभाग देखील बदलला जातो.

🔹 परिणाम:
गुडघा प्रत्यरोपण केल्यामुळे जेव्हा दुष्टचक्र मोडते तेव्हा त्या व्यक्तीला फिजिकल थेरेपी उत्तम प्रकारे करता येते कारण पहिल्या पेक्षा वेदना या लक्षणीय प्रमाणात कमी झालेल्या असतात. एखादी व्यक्ती वजन कमी करण्याचे प्लॅनिंग सुद्धा करू शकते आणि स्वतःच्या आयुष्याचे सर्वोत्तम व भविष्याचे वेदनारहित व्यवस्थापन करू शकते. शस्त्रक्रिये बरोबर काही प्रकारचे धोके निर्माण होतात उदाहरणार्थ, जंतुसंसर्ग, इतर आजारां मुळे शस्त्रक्रिये नंतर ची रिकव्हरी वेगाने होत नाही त्यामुळे हॉस्पिटल मध्ये राहण्याच्या दिवसां मध्ये वाढ होते. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिये नंतर फॅट ऍम्बोलीजम सिंड्रोम सारख्या गुंतागुंतीच्या समस्या सुद्धा दिसून येतात परंतु हे अवश्य लक्षात घेतले पाहिजे की अशा प्रकारच्या समस्या या शस्त्रक्रिये नंतर क्वचित आढळतात कारण या प्रकारच्या गुंतागुंतीच्या समस्या टाळण्या साठी सर्व रुग्णां मध्ये अत्यंत सावधगिरी आणि काळजी घेतली जाते.

🔹 पुरुष विरुद्ध स्त्रीया :
गुडघ्याची झीज करणारा ऑस्टिओआर्थ्रायटिस हा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे दिसून येतो आणि विकृती या नेहमी पुरुषां पेक्षा अतिशय गंभीर असतात. रजोनिवृत्ती नंतर, इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरकाच्या पातळी मध्ये लक्षणीय घट होते त्यामुळे कॅल्शियमचा निगेटिव्ह बॅलन्स तयार होतो, साध्या भाषेमध्ये हाडे व्यवस्थित तयार होण्या पेक्षा हाडांची मोठ्या प्रमाणात झीज होते. हाडे कमकुवत बनतात आणि त्यामुळे वाकतात व सहजपणे फ्रॅक्चर होतात.

🔹किती :
विश्वराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे श्री. विश्वनाथ कराड यांची दृष्टी आहे ज्यांनी आपल्या महान देशाच्या सेवे साठी बऱ्याच शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत आणि त्यांचा मुख्य उद्देश समाजा मधील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सेवा अगदी माफक दरामध्ये पुरवण्याचा आहे. आपले गुडघा प्रत्यारोपण पॅकेजेस हे इतर वैद्यकीय संस्थांच्या पॅकेजेस पेक्षा जवळपास 20% ने स्वस्त आहेत आणि पुण्या मधील मुख्य हॉस्पिटल्सच्या किंमतीच्या 1/3 एवढे आहेत. शस्त्रक्रियेच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या उपभोग्य वस्तू किंवा शस्त्रक्रिये साठी वापरण्यात येणाऱ्या इम्प्लांट्स बाबत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. आम्ही आमच्या साठी अगदी कमीत कमी मारजीन ठेवतो आणि आम्हाला रुग्णांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा असतो.

🔹रोबॉटिक्स :
प्रत्येक दिवशी नवनवीन शोध लागत असतात आणि आरोग्यसेवा याला अपवाद नाही. असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आम्ही असे ऐकले नाही की रोबॉट्स ने मानवाची जागा घेतली किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता चमत्कार घडवत आहे परंतु एक विचार करणे आवश्यक आहे की मानव हा निर्माता आहे आणि तो कोणतीही निर्मिती नाहीये. संधी दिली तर अशा किती लोकांना वाटेल की रोबॉट कडून शस्त्रक्रिया करून घ्यावी आणि अशा किती लोकांना वाटेल की बर्‍याच वर्षांचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या शस्त्रक्रिया तज्ञांकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी?
या स्पर्धात्मक जगामध्ये आणि मार्केटिंगच्या काळामध्ये, आपण रोबॉटीक शस्त्रक्रिये बद्दल ऐकतो आणि सहज त्या कडे ओढले जातो. परंतु, रोबॉटीक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे इतर काहीही नसून स्पेशलाइज्ड कम्प्युटरची अँगल्स मध्ये मदत आणि धातूचे इम्प्लांट्स व्यवस्थित पणे बसवण्या साठी बोनी कट्स मध्ये अचूकतेची गरज एवढेच आहे. मानवाच्या आयुष्या मध्ये बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्या मध्ये कोणत्याही प्रकारची हानी नाही परंतु आम्हाला असे वाटते की त्याचा वापर रुग्णांच्या बिलांमध्ये बदल / वाढ करण्यासाठी होऊ नये.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...