VishwaRaj

आरोग्यपुर्ण दात आणि हिरड्यांसाठी सर्वोत्तम सवयी

एखाद्या व्यक्ती कडुन वैयक्तिक स्वछता किंवा नेहमीची काळजी घेत असताना दातांची काळजी घेणे ही एक सर्वात दुर्लक्षित सवय आहे. दात दुखणे, हिरड्यांचे आजार, कॅव्हीटीज – दात किडने, दातांवर डाग पडणे, तोंडामधून दुर्गंधी येणे यांसारख्या बऱ्याच दातांच्या समस्या आहेत. दररोज दातांची काळजी किंवा स्वछता करणे किती महत्वाचे आहे याकडे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा या अशा समस्या उद्भवतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या सर्व कार्यांपैकी एक महत्वाचे कार्य म्हणजे अन्न खाणे किंवा चघळने की जे कार्य आरोग्यपुर्ण दात आणि हिरड्या यांच्याशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे दातांची व हिरड्यांची दैनंदिन काळजी घेणे हे प्रत्येक व्यक्तीने मग ते लहान मूल असो, प्रौढ व्यक्ती असो किंवा वयस्कर व्यक्ती असो त्यांनी त्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

या ब्लॉग मध्ये आम्ही, तुमचे दात आणि हिरड्या यांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वोत्तम सवयी काय आहेत ते नमूद करणार आहोत.

1. फ्ल्युओराईड टूथपेस्ट :

मानवाचे दात हे इनॅमलच्या कोटिंग / थराने अच्छादलेले असतात. तुमच्या दातांवर जमा झालेल्या डेंटल प्लाक्स मधुन ऍसिड सोडले जाते त्यामुळे या कोटिंग वर विपरीत परिणाम होतो. हे डेंटल प्लाक्स फक्त इनॅमललाच हानी पोहोचवतात असे नाही तर दातांमध्ये कॅव्हीटी – पोकळी निर्माण करतात.
फ्ल्युओराईड असलेल्या टूथपेस्टने तुमचे दात घासल्याने तुमचे दात किडन्यापासून वाचतील.

2. तुमच्या हिरड्या स्वच्छ ठेवा :

दातां प्रमाणेच, डेंटल प्लाक्स हे तुमच्या हिरड्यांच्या वर आणि सभोवताली साठायला सुरवात होते आणि त्यामुळे दातां प्रमाणेच तुमच्या हिरड्या स्वच्छ ठेवणे तितकेच महत्वाचे असते. हिरड्यांचे गंभीर आजार टाळण्यासाठी, तुम्हाला खालील गोष्टी पाळणे अनिवार्य आहे :
▪️फ्ल्युओराईड बेस्ड टूथपेस्टने तुमचे दात दिवसा मधुन दोन वेळा घासा.
▪️नियमित पणे फ्लॉस करणे – फ्लॉस या धाग्याने दातांमध्ये अडकलेली घाण काढणे.
▪️नियमितपणे तुमच्या डेंटिस्ट कडे तपासणी साठी आणि दात स्वच्छ करण्या साठी जात जा.
▪️धूम्रपानाची सवय पूर्णपणे सोडुन दया.

3. तुमचे दात व्यवस्थितरीत्या ब्रश करा :

तुमचे दात व्यवस्थितरीत्या ब्रशने घासण्यामागे कोणत्याही प्रकारचे रॉकेट सायन्स नाही आहे. तुमचे दात हळुवारपणे गोलाकार पद्धतीने घासण्यासाठी तुम्हाला श्यून्य मेहनत करावी लागेल आणि यामुळे डेंटल प्लाक्स निघुन जाण्यासाठी मदत होईल. याचबरोबर दर 3 – 4 महिन्यांनी तुमचा टूथ ब्रश बदलण्याची सवय लावुन घ्या.

4. पाण्याचे सेवन वाढवा :

पाण्याला तहान भागवण्याचा सार्वत्रिक स्त्रोत मानला जातो आणि ते सर्वात आरोग्यपुर्ण प्येय सुद्धा आहे ज्यावर मानव डोळे झाकून विसंबून राहु शकतो. कमी पाणी पिणे किंवा अन्न खाण्या नंतर पाण्याने चुळा भरून तोंड साफ करण्याने चिकट आणि ऍसिडिक अन्नाचे घातक परिणाम कमी करण्यास मदत होते.

5. ऍसिडिक आणि गोड अन्नपदार्थ यांचे सेवन कमी करा :

जेव्हा साखरेचे सेवन केले जाते तेव्हा त्याचे रूपांतर ऍसिडिक फॉर्म मध्ये होते त्यामुळे इनॅमलच्या थराला हानी पोचु शकते आणि शेवटी दात किडून तुमच्या दातांमध्ये पोकळ्या निर्माण होऊ शकतात. फळे, चहा, आणि कॉफी यांसारखे ऍसिडिक अन्नपदार्थ सुद्धा इनॅमल ला हानीकारक असतात असे सिद्ध झाले आहे.

6. तोंडाच्या कर्करोगाचा धोका टाळा :

एखादी व्यक्ती तोंडाच्या कर्करोगचा धोका खालीलप्रमाणे कमी करू शकते :
▪️तंबाखू – जन्य पदार्थ उदा. सिगारेट्स, सिगार्स, पाईप्स किंवा तंबाखूचे चावून सेवन करणे या सर्वांना नाही म्हणा किंवा टाळा.
▪️तुमचे दारू पिण्याचे प्रमाण प्रमाणात ठेवा.
▪️तुमच्या ओठांवर सन्सक्रिन लावायचे बंद करा.

7. नेहमी माऊथवॉशचा वापर करा :

बऱ्याच लोकांना अजुन माऊथवॉशचा वापर करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे व महत्व माहिती नाही. जेव्हा माऊथवॉश दैनंदिन जीवना मध्ये वापरले जाईल तेव्हा दातांचे पुन्हा मिनरलायझेशन होण्यामध्ये मदत होईल, तोंडामधील ऍसिडचे प्रमाण कमी होईल आणि हिरड्यांच्या सभोवतालचा भाग स्वच्छ होईल.

8. ताजी फळे आणि भाज्या यांचे सेवन करा :

रेडी टु इट, रेडी टु कुक अन्नपदार्थ खान्या ऐवजी ताजी फळे आणि भाज्या यांचे सेवन करा कारण त्यामध्ये आरोग्यपुर्ण तंतुमय पदार्थ असतात आणि त्यांना तुमच्या दातांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणुन सुद्धा मानले जाते.

▪️निष्कर्ष :

दातांची नियमितपणे तपासणी करण्यामुळे भविष्या मधील दातांच्या विविध गंभीर समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. जरी तुम्हाला कोणतीही दातांची समस्या नसेल तरी आम्ही तुम्हाला तुमच्या डेंटिस्ट ला वर्षातून किमान दोन वेळा भेटण्याची शिफारस करतो. उपचारापेक्षा खबरदारी नेहमीच उत्तम असते!

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...