VishwaRaj

जीन्स म्हणजे जनुके कर्करोगाच्या वाढीवर कसा परिणाम करतात?

जीन्स म्हणजे जनुके कर्करोगाच्या वाढीवर कसा परिणाम करतात?

भारतामध्ये कर्करोग हा सामान्य आणि जीवघेण्या आजरां पैकी एक आजार मानला जातो. बहुतेक प्रकरणांमध्ये, कर्करोग हा जनुके आणि बाहेरील घटक यांच्या संयोगाने निर्माण होतो. बऱ्याच प्रकारचे कर्करोग हे अनुवंशिक असतात आणि बाहेरील घटकांच्या संपर्कात आल्यामुळे उदाहरणार्थ धूम्रपान किंवा जनुकांचे म्यूटेशन झाल्यामुळे कुटुंबातील सदस्यां मार्फत ते पुढे नेले जातात त्याच बरोबर असामान्य जनुके सुद्धा पिढ्या न पिढ्या पुढे नेली जातात.

जरी, कर्करोगाला कोणतेही एक विशिष्ट कारण नसले तरी कर्करोग होण्यास बऱ्याच गोष्टी किंवा बरेच घटक कारणीभूत ठरतात.

कर्करोग निर्माण होण्यास कारणीभूत असणारे काही घटक खालील प्रमाणे आहेत.:

▪️ जीवनशैली मधील घटक उदाहरणार्थ धूम्रपान, अति तेलकट आहार आणि कामाच्या ठिकाणी वातावरणामध्ये अति प्रमाणात विषारी केमिकल्स असणे या काही गोष्टी आहेत ज्यांमुळे प्रौढ लोकांमध्ये कर्करोग निर्माण होऊ शकतो असे मानले जाते.
▪️ बालवया मध्ये निर्माण होणाऱ्या काही कर्करोगांना निःसंशयपणे अनुवंशिकता, जननशास्त्र, कुटुंबाची हिस्ट्री हे घटक कारणीभूत असतात.
▪️ईपस्टीअन बार व्हायरस आणि एच आय व्ही सारख्या विषाणूंच्या संपर्कात आल्यामुळे बालवया दरम्यान कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला जातो.
▪️ वातावरणामधील काही घटक उदाहरणार्थ फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स यांच्या अति प्रमाणामध्ये संपर्कात आल्यामुळे बालवया दरम्यानचे कर्करोग होण्याचा धोका खुप मोठ्या प्रमाणात वाढतो.
▪️ अनुवंशिक विकारांमध्ये स्टेम सेल्स (बोन मॅरो मधील ) ला हानी पोहोचलेली असते आणि या सेल्स अजुन हानी पोहोचलेल्या सेल्स ची निर्मिती करतात म्हणजेच कर्करोगाच्या सेल्स (पेशी ).
▪️जी लहान मुले कर्करोगाच्या सुरवातीच्या स्टेज ने ग्रस्त असतात ती मुले जेव्हा किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी च्या हाय डोसच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा हे डोसेस त्यांच्या प्रतिकारशक्ती संस्थेमध्ये बदल होण्यास कारणीभूत ठरतात. अशा परिस्थिती ला नेहमी सेकंडरी मॅलीग्नन्सी असे म्हणतात कारण ती विवीध कर्करोगाच्या उपचारा दरम्यान निर्माण होते.

या आर्टिकल मध्ये जनुके कर्करोगच्या वाढीवर कसा परिणाम करतात ते सखोल पणे पाहणार आहोत. कर्करोगाच्या अशा बऱ्याच केसेस आहेत ज्या अनुवंवशिकतेमुळे नाही तर जनुकीय बदलामुळे निर्माण झाल्या आहेत, हे योगायोगाने घडू शकते किंवा वातावरणाच्या संपर्कात आल्या मुळे घडू शकते. मुख्यत्वे 3 प्रकारची जनुके आहेत जी पेशीच्या वाढीवर परिणाम करतात, ती खालील प्रमाणे आहेत.:

1) ऑन्कोजीन्स:
ही जनुके पेशीची सामान्य वाढ होण्यासाठी मदत करतात. हे अद्यापही अज्ञात आहे की कोणती गोष्ट या जनुकांना चालना देते आणि ही जनुके पेशीच्या सामान्य वाढीवरील त्यांचे नियंत्रण गमावून बसतात आणि कर्करोगाच्या असामान्य पेशींना वाढण्याचे उत्तेजन देण्याची परवानगी देतात.

2)ट्युमर सप्रेसर जीन्स:
मानवी शरीरामधील ही अशी जनुके आहेत ज्यामध्ये जनुकीय म्यूटेशन होत असल्याचे ओळखण्याची आणि सामान्य पेशी कर्करोगाच्या पेशीमध्ये रूपांतरित होण्या आधीच ते रोखण्याची क्षमता आहे. जर एखाद्या कारणामुळे ट्युमर सप्रेसर जीन्स ने काम करणे थांबवले, तर मानवी शरीराला म्यूटेशन्स ओळखणे आणि खुप उशीर होण्या आधी त्याला थांबवणे कठीण होऊन जाते त्यामुळे कर्करोग तयार होण्यास सुरवात होते.

3) डी एन ए रिपेअर जीन्स :
जेव्हा नवीन पेशी तयार करण्यासाठी डी एन ए हा कॉपी केला जातो तेव्हा जर काही त्रुटी असेल तर ती ओळखण्यासाठी या जीन्सची / जनुकाची मदत होते. जेव्हा डी एन ए पूर्णपणे मॅच होत / जुळत नाही तेव्हा हे जनुक विसंगती दुरुस्त करते आणि त्रुटी दुरुस्त करते. जर एखाद्या कारणामुळे डी एन ए रिपेयर जीन्सने व्यवस्थितपणे काम करणे बंद केले, तर डी एन ए मधील त्रुटी नवीन पेशी मध्ये पुढे नेली जाते या कारणामुळे त्या पेशीला हानी पोहोचते. शेवटी, याच्यामुळे मुटेशन्स होतात आणि परिणामी कर्करोग निर्माण होतो.

▪️ निष्कर्ष:
जर तुम्ही कर्करोगाची हिस्ट्री असणाऱ्या कुटुंबाचे संबंधित असाल तर तुम्हाला ऑन्कॉलॉजीस्ट कडुन तपासून घेणे गरजेचे आहे आणि जनुकीय कर्करोगाबाबत सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला निश्‍चितपणे योग्य प्लॅनिंग करण्यास आणि भविष्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यास मदत होईल.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...