VishwaRaj

प्रत्येक स्त्रीला तीच्या वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत त्वचारोगतज्ञांना भेटणे का महत्वाचे आहे ?

फक्त इमर्जन्सी मध्येच त्वचारोगतज्ञांना भेटतात ही एक प्रचलित झालेली चुकीची धारणा आहे. परंतु, खरा प्रश्न अनुत्तरितच राहतो. रोज वाढणारे प्रदूषण, ताण तणाव आणि हेक्टिक शेड्युल यांमुळे त्वचेची नियमित काळजी घेणे गरजेचे नाही का? शरीराच्या प्रत्येक भागा प्रमाणे, तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळेच बरेच तज्ञ असा सल्ला देतात की स्त्रियांनी 25 वयापर्यंत नियमितपणे त्वचारोगतज्ञांना भेट द्यावी. इमर्जन्सी परिस्थिती मध्ये त्वचारोगतज्ञां बरोबर जलद समुपदेशनाची अपॉइंटमेंट घेणे हा काही व्यवहार्य / योग्य पर्याय नाहीये. तुम्ही 25 वयाचे होई पर्यंत त्वचेला बऱ्याच प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त होते. काही वेळा, तुम्ही त्वचेच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाची खात्री केली पाहिजे त्यामुळे त्वचेची लवचिकता आणि मऊपणा राखून ठेवता येईल. ही वास्तविकता प्रचलित आहे की त्वचेच्या काळजी साठी ठोस पाऊले उचलणे हे अचानक केलेल्या समुपदेशनापेक्षा अतिशय उत्तम आहे.

Dermatologist - VishwaRaj Hospital

🔹प्रत्येक स्त्रीला तीच्या वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत त्वचारोगतज्ञांना भेटणे का महत्वाचे आहे याची कारणे खालीलप्रमाणे :
अशी असंख्य कारणे आहेत जी त्वचारोगतज्ञांना भेटण्याचे समर्थन करू शकतात. तथापि, तुम्ही त्वचेची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्हाला मऊ, गुळगुळीत त्वचा हवी असेल तर, तिची काळजी घेणे आवश्यक आहे. का तज्ञांबरोबर समुपदेशन करणे अनिवार्य आहे याची खाली काही कारणे दिली आहेत ती तपासून पहा.

▪️तुम्ही स्किन काउंसेलर शोधा:
तुम्ही मेकअप करण्याच्या बाजूचे असाल आणि तरीही तुम्हाला समजत नसेल की त्वचेच्या विवीध समस्यांवर कसे उपाय करावेत. बरेच विवीध ब्रँडस हे विवीध प्रसाधने करत आहे आणि बाजारा मध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहे. याशिवाय, ब्रँड नेहमी क्लेम करतात की ते सर्वोत्तम प्रॉडक्ट देत आहेत आणि यामुळे अजुन कन्फ्यूजन होते. नेहमी, लोक काहीही वापरण्याचा प्रयत्न करण्यास घाबरतात कदाचित ते त्वचेची अजुन जास्त हानी करून घेतात.
अशावेळी तुम्हाला स्किन काऊंसीलर मदत करू शकतात. त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांना अतिशय सखोल ज्ञान असते आणि ते तुम्हाला अतिशय मौल्यवान सल्ला देऊ शकतात. त्वचारोगतज्ञां बरोबर व्यवस्थित संबंध निर्माण केल्यास तुमच्या त्वचेचे आरोग्य व्यवस्थित राखण्यास खुप मदत होईल. तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न विचारू शकता आणि प्रॉडक्ट बद्दल व्यवस्थित समजावून घेऊ शकता. याचबरोबर, यामुळे प्रश्नांची उत्तरे तुमची तुम्ही शोधण्यापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळेल.

▪️त्वचेच्या कर्करोगासाठी तपासण्या :
जरी जास्तकरून हा कर्करोग बरा होणारा असला, तरीही त्वचेच्या कर्करोगाला जीवघेणे परिणाम सुद्धा असु शकतात. जर वेळेमध्ये याचे निदान झाले नाही तर तो अजुन घातक असु शकतो. यामुळे त्वचारोगतज्ञां बरोबरच्या भेटी अजुन गंभीर आणि महत्वाच्या बनतात. तज्ञांच्या म्हणण्या नुसार, कर्करोगाचे निदान करण्यासाठी संपूर्ण त्वाचेची तपासणी ही वर्षा मधुन किमान एकदा तरी झाली पाहिजे.
स्त्रियांमध्ये 25 – 29 या वयोगटामध्ये त्वचेच्या कर्करोगाचा प्रसार हा पहिल्या क्रमांकावर आहे. अशी असंख्य लक्षणे असतात जी दर्शवतात की जखम निर्माण झालेली आहे. त्वचेवर सामान्यपणे कोणत्याही प्रकारची वाढ झालेली असेल तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. याच बरोबर, त्वचेच्या कोणत्याही भागाचा आकार, जाडी, रंग किंवा टेक्सचर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला आहे का ते तपासून पाहावे.

▪️ पुरळां वरील उपचार:
पुरळ जरी जीवघेणे नसले तरी, त्यांच्यामुळे त्वचेवर डाग उठतात. पुरळे ही मुरूम, व्हाइट हेड्स, सिस्ट आणि ब्लॅक हेड्स तयार होण्यास कारणीभूत होऊ शकतात. यांवर जर उपचार केले गेले नाहीत, तर शेवटी यांचे डाग पडतात. हे डाग मान, छाती, चेहरा, खांदे, आणि पाठ या भागांवर निर्माण होऊ शकतात.

डर्मेटॉलॉजिस्ट हे विविध प्रकारच्या उपचार पद्धती सांगू शकतात. पुरळांच्या गंभीरते वर उपचार अवलंबून असतात. तोंडावाटे औषधे, जेल, लेझर थेरपी इत्यादी प्रकारचे उपचार डॉक्टर सुचवू शकतात. तुम्ही तुमच्या जीवनशैली मध्ये देखील काही बदल करू शकता.

▪️ केस गळती बरोबर सामना :
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे जी सर्वच स्त्रियांसाठी पीडादायक आहे. केस गळण्यास कारणीभूत असणारी अशी असंख्य कारणे आहेत. काहीवेळा, याचे कारण मानसिक ताण तणाव असू शकतो, तर इतर वेळी अनुवांशिक परिस्थिती देखील कारणीभूत असू शकते. कोणत्याही प्रकारे, त्वचारोग तज्ञांना भेटणे मदतीचे ठरू शकते.
काही तपासण्या केल्या नंतर, ते तुम्हाला उपचारांचे विविध पर्याय देतील. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होईल. काही केसेस मध्ये, केसांची वाढ जपण्या मध्ये देखील मदत होऊ शकते.

▪️ त्वचेच्या डागांवरील उपचार :
त्वचेवरील डागांचे परिणाम हे फक्त शारीरिकच होतात असे नाही तर त्या व्यक्तीच्या मनावर देखील त्याचे परिणाम होतात. प्रत्येक जण डागां बरोबर जगु शकत नाही. आणि, काहीवेळा, त्यांच्या बरोबर ऍडजेस्ट करायला ते खुप भयंकर असतात. अशा केसेस मध्ये, डर्मेटॉलॉजिस्टला भेटणे केव्हाही मदतशीर ठरू शकेल. डागाच्या प्रकारा नुसार ते बऱ्याच प्रकारच्या उपचार पद्धती सुचवू शकतात. जरी डाग जाण्याची कोणतीही गॅरंटी नसेल तरी, त्याच्या अपीअरन्स मध्ये नक्कीच सुधारणा होईल.
किलॉईड आणि पुरळांच्या डागांसाठी तुम्ही डॉक्टरांना भेटण्याचे शेड्युल्स बनवू शकता. याशिवाय, डर्मेटॉलॉजिस्ट तुम्हाला प्रतिष्ठित प्लास्टिक सर्जन चे रेफरल देऊ शकतात. हे अशा केसेस साठी असते ज्यांचे डाग अतिशय गंभीर असतात, उदाहरणार्थ भाजलेल्याचे डाग.

▪️त्वचेचे ब्राईटनींग :
डल रंगाच्या त्वचेमुळे स्त्री मध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही. त्याच्या बरोबर जगणे कदाचित शक्य असेल आणि शेवटी त्याला स्वीकारले देखील जाईल. अनियमित पीगमेंटेशन आणि दीर्घ काळासाठी ऊन्हा बरोबर संम्पर्क यामुळे ही हानी होऊ शकते. परंतु, जेव्हा ही समस्या सोडणव्याची शक्यता असेल, तेव्हा डॉक्टरां बरोबर भेट निश्चित करणे योग्य ठरेल. त्वचा उजळवण्यासाठी डर्मेटॉलॉजिस्ट विवीध मार्ग सुचवू शकतील. या प्रक्रिये मध्ये मदत करतील असे असंख्य मार्ग आहेत.

त्वचारोग तज्ञ व्हिटॅमिन सी सिरम किंवा त्वचेवर लावण्यासाठीची इतर टॉपिकल प्रॉडकट्स सुचवू शकतील. तथापि, त्वचेच्या विशिष्ट प्रकारावर हे उपचार बदलू शकतात. याशिवाय, त्वचेला झालेली हानी ही अती प्रमाणात असेल तर, डॉक्टर फ्रॅक्शनल रीसर्फेसिंग सुद्धा रिकमेंड करू शकतात.

▪️स्किन एजिंग कसे हाताळावे :
जसे तुमचे वय वाढते, तसे तुमच्या त्वचेच्या टेक्सचर मध्ये झालेले बदल दिसायला सुरु होतात. हे बदल म्हणजे त्वचेला पडलेल्या सुरकुत्या, बदललेला रंग आणि कोरडेपणा हे असतात. यांनाच वाढत्या वयाची लक्षणे असेही म्हणतात. याशिवाय, धूम्रपाण, यु व्ही रेझ चा अती संपर्क आणि आरोग्याला घातक जीवनशैली यांमुळे देखील अकाली वृद्धत्व लवकर येऊ शकते.
जरी तुम्ही आरोग्यपुर्ण आहार खाण्याची सवय लावली आणि धूम्रपाण बंद केले तरी डर्मेटॉलॉजिस्ट ला भेटणे हा सुद्धा पर्याय आहे. अशा बऱ्याच उपचार पद्धती आहेत ज्या फायदा देऊ शकतात. लेझर पद्धती, रिंकल फीलर अशा काही पद्धतींचा त्या मध्ये समावेश आहे.

▪️निष्कर्ष :
तुमची त्वचा तुम्हाला कदाचित कोणताही त्रास देत नसेल, जरी काही अंतर्गत समस्या असतील तरी. तथापि, तुम्ही डर्मेटॉलॉजिस्ट ला नियमितपणे भेटणे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमची इच्छित त्वचा मिळवण्या मध्ये स्वारस्य असेल, तर तुम्ही तिची अतिशय काळजी घेतली पाहिजे. यामध्ये वैद्यकीय समुपदेशन, औषधे आणि कदाचित तुमच्या जीवनशैली मध्ये बदल यांचा समावेश असेल. याशिवाय, तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील बदल करू शकता आणि आरोग्यपुर्ण व तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचा सुद्धा समावेश करू शकता. तसेच, हे लक्षात ठेवा की वयाच्या 25 वर्षी पासून त्वचारोग तज्ञांना भेटणे अतिशय आवश्यक आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...