VishwaRaj

गरोदरपणाचे प्लॅनिंग करत असताना अशा कोण कोणत्या गोष्टी आहेत ज्या कराव्यात आणि करू नयेत ?

गरोदरपण राहण्यासाठी प्रयत्न करत असताना काही सामान्य गोष्टी ज्या कराव्यात आणि करू नयेत याबाबत बरेच लोक जागरूक असतात. तथापि, बऱ्याच लोकांना सर्वोत्तम जीवन शैली कशी व्यतीत करावी याबाबत माहीत नसते. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण परिस्थितीशी जुळवून घेण्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु शेवटी जेव्हा गरोदरपण राहते तेव्हा याचे महत्व आपल्या लक्षात येते किंवा या गोष्टी त्यांचे महत्व आपल्याला दाखवून देतात. तुमच्या लहान बाळाचे योग्यरीत्या पालनपोषण / संगोपन होण्यासाठी आणि योग्य वाढ होण्यासाठी त्याला आरोग्यपूर्ण वातावरण पुरवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

तुम्हाला वरील कार्यामध्ये मदत करण्यासाठी खाली करावयाच्या आणि न करावयाच्या काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता :-

1)तुमच्या संतुलित आहारामध्ये आवश्यक अशा सर्व जीवनसत्वांचा आणि खनिजांचा समावेश असलाच पाहिजे, त्यामुळे तुमच्या बाळाला आवश्‍यक पोषणतत्त्वे पुरवली जातील. तुमच्या बाळाच्या योग्य वाढीसाठी मदत करणारे शक्य ते सर्व सर्वोत्तम मार्ग घेतले पाहिजेत. तथापि, संतुलित आहार हा नेहमीच पुरेसा असेल असे नाही. गरोदरपणा दरम्यान तुमच्या शरीराला जास्तीच्या जीवनसत्वांची आवश्यकता असते. गरोदर स्त्रीला गरोदरपणा मध्ये घेतलेल्या जीवनसत्वांमुळे खुप मोठ्या प्रमाणात पोषण घटक पुरवले जातात.
मुख्य जीवनसत्वे खालील प्रमाणे :-
▪️कॅल्शियम
▪️लोह – आयर्न
▪️फोलिक ऍसिड

वरील जीवनसत्वे अती धोका असलेले गरोदरपण आणि जन्मजात आजार यांना प्रतिबंध घालतात. तथापि, डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे असते, कारण जीवनसत्वांचा अती प्रमाणातील डोस हानिकारक परिणामांना कारणीभूत ठरतो.

2)अती प्रमाणामध्ये कॅफीनचे सेवन करू नका :-
जेव्हा तुमच्या बाळाला आरोग्यपूर्ण राहण्याचे वातावरण देण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता, तेव्हा कॅफीनचे प्रमाण कमी करणे अतिशय आवश्यक असते. कॅफीनचे सेवन कमी केल्यामुळे गरोदरपण राहण्याच्या शक्यता वाढतात. तुमचे संपूर्ण दिवसामधील कॅफीनचे सेवन हे 100 मिली ग्रॅम एवढेच असले पाहिजे. हे 100 मिली ग्रॅम प्रमाण म्हणजे दर दिवशी एक कप कॅफीनयुक्त चहा किंवा कॉफी.

3)नियमित व्यायाम करा :-
ते दिवस गेले जेव्हा गरोदर स्त्रियांना पूर्णपणे बेड रेस्ट घेण्यास सांगितले जात होते. आता हे आपल्या सर्वांना माहित आहे की नियमित व्यायाम हा बाळ आणि तुम्ही दोघांसाठी देखील अतिशय उत्तम आहे. नियमित व्यायाम केल्याने गरोदरपणा मधील बऱ्याच समस्यांवर मात करण्यास तुम्हाला मदत होते उदाहरणार्थ :-

▪️सतत बदलते मनाचे कल
▪️निद्रानाश
▪️वाढते वजन
▪️स्नायुं मधील वेदना

जर तुम्हाला आधीपासूनच दररोज व्यायाम करण्याची सवय असेल तर, ती कायम ठेवा. तथापि, जर तुमच्या व्यायामाच्या दिनचर्ये मध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल तर तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन घ्या. काही व्यायाम प्रकार हे शेवटच्या ट्रायमेस्टर मध्ये केले जात नाही त्यामुळे ते करण्याचा सल्ला दिला जात नाही. शिवाय, जर तुम्ही दररोज व्यायाम करत नसाल तर तुमच्या डॉक्टरांना व्यायामाच्या दिनचर्ये विषयी आवश्य विचारा. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आरामदायक, सुरक्षित आणि सोयीस्कर असतील असेच व्यायाम प्रकार तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील.

4) अतिप्रमाणात मानसिक ताण तणाव घेऊ नका :-
जरी तुम्हाला वाटत असले तरी मानसिक ताण तणाव ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही आणि ती अवघड देखील असु शकते. हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे देखील मानसिक ताण तणाव निर्माण होऊ शकतो. तथापि, ओव्युलेशन च्या दरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी मानसिक ताण तणावावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मेडिटेशन, पुरेशी झोप आणि आरोग्यपूर्ण सवयी यांच्या मदतीने मानसिक ताण तणाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. उत्तम परिणामांसाठी श्वसनाचे व्यायाम म्हणजेच प्राणायाम करण्याची देखील सवय लावा.

5) आहारात मासे सेवन करा :-
माशांमध्ये जीवनसत्वांचे आणि खनिजांचे खूप मोठे प्रमाण असते याच बरोबर झिंक, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे पोषण घटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. हृदयाचे आरोग्य राखणारी ही जीवनसत्वे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अतिशय आवश्यक आहेत. तथापि, मासे खाण्यापूर्वी ते कच्चे किंवा अर्धवट शिजलेले नाहीत ना याची खात्री करा. अर्धवट शिजलेले मासे गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा मासे पूर्णपणे शिजतात तेव्हा त्यामधील सर्व जीवाणू आणि विषाणू नाहीसे होतात. याशिवाय, गरोदर स्त्रीने अर्धवट शिजलेले कच्चे मासे आणि ज्या माशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मर्क्युरी असेल असे मासे खाल्ले नाही पाहिजेत.
ज्या माशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मर्क्युरी असतो अशा माशांची काही उदाहरणे खालील प्रमाणे :-
▪️टाईल फिश
▪️स्वोर्ड फिश
▪️किंग मॅकरेल
▪️शार्क

एखाद्या विशिष्ट खनिजाचे अतिसेवन होऊ नये म्हणून विविध प्रकारचे मासे खा, एकच प्रकारचा मासा वारंवार खाऊ नका. याशिवाय, आठवड्यातून 12 आऊन्स म्हणजे 340.194 ग्रॅम पेक्षा जास्त मासे खाऊ नका.

6) फ्लूची लस घ्या :-
मॅनुफॅक्चरर ने दिलेल्या सूचनेनुसार जर तुम्हाला ऍलर्जी नसेल तर गरोदर स्त्री ने फ्लूची लस घेणे याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणून शिफारस केली जाते. जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा गरोदरपणामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे आधीच प्रतिबंधात्मक काळजी घेणे नेहमी उत्तम असते. जर तुम्हाला कदाचित फ्लूची लागण झाली तर, तुमची परिस्थिती ही इतर कोणत्याही गरोदर नसलेल्या स्त्रीच्या तुलनेत अतिशय गंभीर असेल. फ्लूची लस तुम्हाला आणि तुमच्या बाळाला गंभीर परिस्थिती पासून सुरक्षित ठेवेल.

7) ल्युब्रीकंट चा वापर करू नका :-
जेव्हा तुम्ही बाळ राहण्यासाठी प्रयत्न करत असाल तेव्हा मेडिकल मध्ये मिळणाऱ्या स्टॅंडर्ड किंवा रेग्युलर ल्युब्रीकंटचा वापर करू नका, कारण याच्या वापरामुळे गरोदर राहण्याची शक्यता कमी होते. ल्युब्रीकंट बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या घटकांचे स्पर्म च्या मोटीलिटी वर विपरीत परिणाम असू शकतात. तथापि, जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर काही परिस्थितींमध्ये ल्युब्रीकंट वापरणे आवश्यक बनते. तथापि, काही ल्युब्रीकंट्स हे गरोदर पण राहण्याच्या शक्यता वाढवतात, त्यामुळे योग्य प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचा व्यवस्थित शोध घ्या. जर तुम्हाला स्पर्म फ्रेंडली ल्युब्रीकंट बद्दल सल्ला हवा असेल तर, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन सुद्धा घेऊ शकता.

8) नियमितपणे योगा करा :-
हॉट योगा किंवा बिकराम योगा सोडुन योग्य योगा करणे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. गरोदर स्त्रियांसाठी खास तयार करण्यात आलेल्या योग्य, सौम्य किंवा प्रीनॅटल योगा शेड्युल साठी तुम्ही फिटनेस गुरूंचे समुपदेशन घेऊ शकत. इंस्ट्रक्टर ला योगासनांचे कोणते प्रकार तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी योग्य आहेत आणि कोणते योगासनांचे प्रकार टाळले पाहिजेत याचा अनुभव आणि पूर्ण कल्पना असते. जर शक्य असेल तर, योगा क्लासेस जॉईन करा आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या इंस्ट्रक्टर च्या समोर योगा प्रॅक्टिस करा. परंतु काही लोकांना हे कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे योगा करण्यापूर्वी त्याबद्दल योग्य सूचना व माहिती जाणून घ्या. तथापि, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवले तर त्वरित तुमच्या इंस्ट्रक्टर चे किंवा डॉक्टरांचे समुपदेशन घ्या.

9) धूम्रपान करू नका :-
आयुष्यामधील नेहमीच्या दिवसांमध्ये देखील धूम्रपान करू नये असा सल्ला दिला जातो, परंतु गरोदरपणा मध्ये तुम्ही कटाक्षाने कधीच धूम्रपान केले नाही पाहिजे. बाळाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, त्याला/ तिला हानिकारक हवेपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. गरोदर पण ठेवण्यापूर्वी, तुम्ही धूम्रपान पूर्णपणे बंद करणे आणि यापुढे तुम्हाला त्याचे बिलकुल व्यसन नाही हे अतिशय महत्वाचे आहे.

10) तुमचे वजन वाढवा परंतु स्मार्टली :-
‘दोघांसाठी खा’ असा सल्ला दिला जातो त्याचा दुरुपयोग करून अथकपणे खाऊ नका. प्रमाणामध्ये खाणे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या खाण्याच्या सवयीं साठी योग्य शेड्यूल असले पाहिजे. अति प्रमाणामध्ये खाऊ नका. तुम्ही कसे खात आहात आणि काय खात आहात याची योग्य काळजी घ्या. गरोदर असताना जर तुम्ही खूप वजन वाढवून घेतलेत तर, ते तुमच्या बाळासाठी हानिकारक ठरेल. पहिल्या ट्रायमेस्टर दरम्यान तुम्हाला तुमच्या बाळासाठी जास्तीच्या फक्त 100 कॅलरीजची आवश्यकता असते. तिसऱ्या ट्रायमेस्टर दरम्यान तुम्हाला जास्तीच्या 300 ते 500 कॅलरीजची आवश्यकता असते.

▪️ निष्कर्ष:-
गरोदरपण राहण्यासाठी प्रयत्न करण्यापूर्वी करावयाच्या आणि न करावयाच्या सर्व गोष्टी शोधण्यासाठी तणाव घेणे हे पूर्णपणे प्रचलित आहे. परंतु, अति विचार करून अति तणाव घेणे टाळण्याचा प्रयत्न करा. एकदा का तुम्ही तुमच्या गरोदरपणाचा प्रवास सुरू केला की अखेरीस तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत आणि कोणत्या करावयाच्या नाहीत. जर तुम्हाला केव्हाही कोणतीही समस्या असेल तर नेहमी तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन द्या.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...