VishwaRaj

मी सायनुसायटिस वर कायमचा उपाय कसा करू शकतो / शकते?

Woman With Sinusitis - VishwaRaj Hospital

सायनुसायटिस किंवा सायनसचा जंतु संसर्ग ही एक वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामध्ये पॅरानेझल सायनसेसला सुज निर्माण होते. यामध्ये पातळ म्युकस तयार होण्यास सुरवात होते ज्यामुळे नाकाच्या आतील मार्ग ओलसर बनतो. परंतु, जेव्हा हा म्युकस अती प्रमाणामध्ये तयार होतो तेव्हा नाकामधील सायनसेस इरिटेट होतात आणि सुज निर्माण होते. सायनुसायटिस निर्माण होण्याची बरीच कारणे आहेत उदा. जिवाणू, विषाणू, ऍलर्जी आणि बुरशी इत्यादी. या सर्वांमुळे सायनस मध्ये सुज निर्माण होते.

याशिवाय, सायनुसायटिसचे विवीध प्रकार आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे, अ ) क्रॉनिक – बऱ्याच कालावधी पासून असलेला सायनुसायटिस, ब ) ऍक्युट – थोड्या कालावधी पासून असलेला सायनुसायटिस, क )रिकरंट – वारंवार होणारा सायनुसायटिस, ड )सबऍक्युट सायनुसायटिस. जरी या परिस्थिती मुळे त्रासदायक संवेदना आणि वेदना होत असतील तरी, ही परिस्थिती मुख्यत्वे कोणतेही औषध उपचार न करता पूर्णतः बरी होते. परंतु, जर लक्षणे अतिशय गंभीर बनली तर, वैद्यकीय समुपदेशन अतिशय महत्वाचे आहे.

🔹सायनुसायटिस साठी विवीध उपचार पद्धती पुढीलप्रमाणे :


सायनुसायटिस साठी विवीध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पद्धती या साध्या औषधांच्या मदतीने आजार बरा करू शकतात, तर काही पद्धतीं मध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता लागू शकते. याचबरोबर, सायनुसायटिस साठी विवीध घरगुती उपाय देखील आहेत ज्यांचा अवलंब तुम्ही सायनसच्या जंतूसंसर्गा पासून सुटका मिळवण्यासाठी करू शकता.

▪️औषधोपचार :


अशी बरीच औषधे आहेत जी सायनुसायटिसला बरे करण्यासाठी मदत करू शकतात. त्यापैकी काही औषधे पुढे नमूद केलेली आहेत.


1) ओरल कॉर्टीकोस्टिरॉइड्स :


जेव्हा अतिशय गंभीर लक्षणे असतील तेव्हाच ही औषधे दिली जातात. जे रुग्ण नाकामधील पॉलिप्सने त्रस्त असतात ते ही औषधे घेऊ शकतात. जर प्रदीर्घ काळासाठी या औषधांचे सेवन केले तर त्यामुळे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा नाकामधील कॉर्टीकोस्टिरॉइड्स असफल होतात तेव्हाच डॉक्टर ही औषधे लिहुन देतात.

2)नेझल कॉर्टीकोस्टिरॉइड्स:


ही नाकामध्ये फवारण्याची औषधे असतात जी नाकामधील सुज कमी करण्यास मदत करतात. बुडेसोनाईड, फ्ल्युटीकॅसोन इत्यादी प्रकारची औषधे डॉक्टर प्रीसक्राईब करू शकतात. परंतु, जर या औषधांचा काही परिणाम झाला नाही तर, वैद्यकीय तज्ञ नेझल रिनसिंगचा उपाय सुचवू शकतात. हे नेहमी एका सोल्युशन च्या मदतीने ज्यामध्ये सलाईन असते आणि काही प्रकारच्या औषधांच्या मदतीने केले जाते.

3)नेझल स्प्रे :


नेझल स्प्रे म्हणजे नाकामध्ये फवारण्याचे औषध जे कोणत्याही औषधाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असते. या औषधा मुळे स्त्राव कमी होण्यास मदत होते आणि त्रासदायक घटक बाहेर टाकण्यास सुद्धा मदत होते.

4)अँटीबायोटीक्स :


तुम्हाला झालेल्या जंतुसंसर्गाचे कारण जर जिवाणू असतील तर, अँटीबायोटीक्स प्रीसक्राईब करणे योग्य ठरेल. काहीवेळा, डॉक्टर इतर औषधां बरोबर ही औषधे प्रीसक्राईब करतात. याच कारणांमुळे काही रोगनिदानसूचक तपासण्या कराव्या लागतात त्यामुळे योग्य मूल्यांकन करणे शक्य होते.

5)इम्युनोथेरपी :


जर सायनुसायटिस होण्या मागचे कारण काही ऍलर्जीज असतील तर, इम्युनोथेरपी हा शक्य असलेला उपचाराचा एक पर्याय आहे. ऍलर्जी शॉट्स घेतल्या नंतर, परिस्थिती कदाचित व्यवस्थित होऊ शकते कारण शरीराची ऍलर्जन्स बरोबरची रिऍक्शन कमी झालेली असते.

▪️शस्त्रक्रिया :


जर औषधोपचारा नंतर सायनुसायटिस कमी किंवा बरा झाला नाही तर, डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करतात. बलून सायनोप्लास्टी आणि इंडोस्कोपी या सर्वात जास्त प्रचलित शस्त्रक्रिया आहेत.

1)बलून सायनोप्लास्टी:


या शस्त्रक्रियेच्या पद्धती मध्ये, शस्त्रक्रिया तज्ञ हे नाकामध्ये अगदी लहान ट्यूब इन्सर्ट (घुसवतात) करतात. या ट्यूबच्या एका बाजूला अगदी लहान आकाराचा फुगा बसवलेला असतो. त्यानंतर, हा फुगा जंतु संसर्गाच्या दिशेने आत घुसवला जातो. याच्या नंतर, तो फुगा तिथे आत फुगतो.
फुगा फुगल्यामुळे, सायनसच्या सर्व जागा क्लिअर होतात. एकदा का ही प्रक्रिया झाली, की शस्त्रक्रिया तज्ञ ट्यूब काढून घेतात.
तथापि, ही शस्त्रक्रिया सर्वांसाठी नसते, विशेषकरून, ज्या रुग्णांच्या सायनसच्या मार्गामध्ये सीस्ट मुळे अडथळा निर्माण झालेला असतो त्यांच्यासाठी असते.

2)इंडोस्कोपी :


सायनोप्लास्टीच्या तुलने मध्ये इंडोस्कोपी ही सामान्यपणे केली जाते. या प्रक्रिये मध्ये शस्त्रक्रिया तज्ञ हे लवचिक परंतु पातळ उपकरण ( इंडोस्कोप्स ) नाकामध्ये घालतात. या उपकरनां पैकी काही उपकरनांना कॅमेरा बसवलेला असतो याच्या मदतीने डॉक्टरांना नाकाच्या आतील छायाचित्रे मिळवता येतात.
या छायाचित्रांच्या मदतीने शस्त्रक्रिया तज्ञ हे इतर इंडोस्कोप्सला सायनसचा मार्ग क्लिअर करण्याच्या दिशेने पुढे नेतात. त्यानंतर ते स्कार टिश्यु, पॉलिप्स इत्यादी मार्गामधून घालवून टाकतात. नेहमी, शस्त्रक्रियेच्या करण्या पूर्वी स्थानिक भूल दिली जाते. शस्त्रक्रियेच्या दिवशीच तुम्ही घरी जाऊ शकता.

▪️घरगुती उपाय :


तुम्ही घरगुती उपाय देखील निवडू शकता. या उपायांनी परिस्थिती कदाचित पूर्णपणे बरी होणार नाही, परंतु नक्कीच ती कमी करण्यासाठी मदत होईल. या शिवाय, तुम्हाला वेदनां पासून सुद्धा आराम मिळेल.

1) आराम करणे :


तुम्ही आराम करणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे तुमचे शरीर जंतु संसर्गा विरुद्ध लढू शकते. जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमचे डोके उशी वापरून वरील बाजूस राहील याची खात्री करून घ्या. त्यामुळे तुम्हाला श्वास घेणे सोपे होण्यास मदत होईल.

2)वाफ घेणे :

वाफ घेणे हा सायनस पासून सुटका मिळविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वाफेच्या भांड्या मध्ये तुम्ही काही विशिष्ट प्रकारची तेलं देखील मिसळू शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही गरम पाण्याने शॉवर खाली अंघोळ करू शकता. याचबरोबर, तुम्ही गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल तोंडावर ठेऊ शकता.

3)नेझल इरीगेशन :


तुमच्या नाकाच्या आतील मार्ग धुण्यासाठी सलाईन मिक्सचरचा वापर करा. यासाठी तुम्ही, नेती पॉट, सलाईन कॅनीस्टर इ. यांचा वापर करू शकता. वापरणार असलेले पाणी स्वच्छ आणि भांडी निर्जंतुक असल्याची खात्री करून घ्या.

4)वॉर्म कॉम्प्रेसेस :


सुज आलेल्या भागावर तुम्ही वॉर्म कॉम्प्रेसेसचा वापर करू शकता. हे तुम्ही हळुवारपणे करा आणि कापड स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि वेदना यांपासून आराम मिळेल.

5)पातळ पदार्थ :


तुम्ही भरपुर प्रमाणात पातळ पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जास्तीत जास्त ज्यूस आणि पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे म्युकसचा थर पातळ व कमकुवत होण्यास मदत होईल. तथापि, तुम्ही दारूचे सेवन नक्कीच टाळले पाहिजे.

6)स्पाईसी – मसालेदार पदार्थ :


तिखट सॉस, तिखट मिरे इ. यांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे नाकाच्या आतील मार्ग क्लिअर होण्यास मदत होते. तथापि, तुम्ही सतर्क असले पाहिजे कारण मसालेदार पदार्थ टाळावे लागतील असा आजार जर तुम्हाला असेल तर हे करू नका.

▪️निष्कर्ष :


सायनुसायटिस वरील उपचार हे त्याचा प्रकार, त्याची तीव्रता आणि इतर संलग्न गोष्टींवर अवलंबुन असतात. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत, आलेली सुज ही आपोआप निघुन जाते. वैद्यकीय उपचारांची आवश्यकता लागत नाही. तथापि, जेव्हा परिस्थिती सुधारत नाही तेव्हा तज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय योग्य ठरतो.
जर तुम्हाला सायनुसायटिस वर कायमचा उपाय हवा असेल तर, तुम्हाला डॉक्टरांचे समुपदेशन घेणे गरजेचे आहे. डॉक्टर विवीध तपासण्या करून घेतील आणि, तुम्हाला साजेशी उपचार पद्धती सुरु करतील. तथापि, डॉक्टरांच्या सल्याने तुम्ही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. कदाचित ही समस्या साधी वाटु शकते परंतु, जर यावरील कोणत्याच तपासण्या केल्या नाहीत तर सायनुसायटिस मुळे पुढे मेनींजायटीस सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...