VishwaRaj

सर्वात सामान्यपणे आढळणार्‍या झोपेच्या समस्या कोणत्या आहेत? आणि त्यांवर उपचार कसे केले जातात?

Sleep Disorder - VishwaRaj Hospital

झोपेच्या समस्या असणे या वैद्यकीय स्थिती आहेत ज्या व्यक्तीच्या दररोजच्या झोपण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. अशी असंख्य कारणे आहेत जी या समस्या वाढवू शकतात. हे अतिशय गंभीर वाटु शकणार नाही, परंतु झोपेच्या समस्या या खरेतर जागतिक महामारी आहेत ज्या आरोग्यच्या मानकांमध्ये आणि 45% जागतिक लोकसंख्येच्या आयुष्याच्या गुणवत्ते मध्ये अडथळा निर्माण करतात. हे स्पष्टपने दर्शवते की झोपेच्या समस्या या गंभीर समस्या आहेत आणि त्यांच्यावर तितक्याच तत्परतेने उपचार केले पाहिजेत.

साध्या, बरेच लोक हे नेहमी त्यांच्या व्यस्त दिनाचर्ये मुळे किंवा अती मानसिक ताण तणावामुळे झोपेच्या समस्यांना सामोरे जातात. हे अतिशय सामान्य समजले जाते. परंतु, जर दररोज ही दिनचर्या अधिक कालावधी साठी सातत्याने चालु राहिली, तर वैद्यकीय मदत घेणे सर्वोत्तम ठरेल. कारण हे शेवटी तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये अडथळा निर्माण करेल. थकल्यासारखे वाटणे, याचबरोबर ताकद कमी झाल्या सारखे वाटणे आणि मुड स्विंग्स होणे इत्यादी मुळे तुमचे शारीरिक आरोग्य धोक्या मध्ये येऊ शकते.
याशिवाय, झोपेच्या समस्या निर्माण होणे म्हणजे इतर वैद्यकीय परिस्थिती असण्याचे लक्षण असे देखील असु शकते. या परिस्थिती मध्ये जेव्हा वैद्यकीय परिस्थिती सुधारेल तेव्हा झोपेची समस्या आपोआप कमी होईल. परंतु, झोपेच्या समस्या या जर इतर वैद्यकीय परिस्थितीशी संबंधित नसतील तर तुम्हाला योग्य उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हे उपचार उशीर न करता लवकरात लवकर घेणे अतिशय महत्वाचे आहे. जरी सुरवातीला या समस्या निरूपद्रवी वाटत असल्या तरी, भविष्या मध्ये त्यांच्या मुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.

🔹काही सामान्य झोपेच्या समस्या आणि त्यांचे उपचार :


जवळपास 80 प्रकारच्या झोपेच्या समस्या आहेत. येथे, सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या झोपेच्या समस्या नमूद केलेल्या आहेत. याशिवाय, त्यांच्या वरील उपचार पद्धती देखील दिलेल्या आहेत.

▪️स्लिप ऍप्नीया :


स्लिप ऍप्नीया ही सामान्यपणे आढळणारी परंतु झोपेची गंभीर समस्या आहे. या मध्ये, व्यक्तीला झोपेत असताना श्वासोउच्छवास घेणे अशक्य होते. याच्या परिणामी, ती व्यक्ती खूप जोराने घोरते किंवा गुदमरल्या सारखा आवाज निर्माण होतो. याशिवाय, मेंदू आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे त्या व्यक्तीला जाग येते.
थकल्यासारखे वाटणे, घशामध्ये खवखव होणे, ताकद कमी वाटणे, घोरणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात. स्लिप ऍप्नीया साठी विविध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. कंटीन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर थेरपी ( सी पी ए पी ) या उपचार पद्धतीची तुम्ही निवड करू शकता. याशिवाय, तुमच्याकडे शस्त्रक्रिया आणि पोझिशनल थेरपी या पद्धतींचा सुद्धा पर्याय आहे. कोणतीही उपचार पद्धत करण्यापूर्वी तुम्ही स्लिप फिजिशियनचे मार्गदर्शन घेणे अतिशय महत्वाचे आहे.

▪️ निद्रानाश :


निद्रानाश ही अतिशय सामान्यपणे आढळणारी झोपेची समस्या आहे. यामध्ये, व्यक्तीला झोपणे अवघड झालेले असते किंवा दीर्घ काळासाठी व्यक्ती जागीच रहाते. याचे मुख्य दोन प्रकार पडतात, ते पुढीलप्रमाणे – क्रॉनिक इनसोमॅनिया – दीर्घकाळापासूनचा निद्रानाश आणि ट्रान्सीयंट इनसोमॅनिया (शॉर्ट टर्म )- थोड्या दिवसांपासून होणारा निद्रानाश. तुम्ही अतिशय दमलेले असताना देखील झोपणे अशक्य होणे, झोपे दरम्यान अस्वस्थता किंवा बैचेनी, मरगळल्या सारखे वाटणे, इत्यादी लक्षणे आहेत का हे तुम्ही तपासून पाहु शकता.
सध्या, निद्रानाशा साठी जास्तकरून वैयक्तिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. ही उपचार पद्धती मुख्यत्वे विकाराच्या कारणावर अवलंबून असते. जर आवश्यकता असेल, तर डॉक्टर तुम्हाला गरजेची औषधे लिहुन देतील. तथापि, कॉग्नीटीव्ह बिहेविअर थेरपी, स्टीम्युलस कंट्रोल, आणि जीवन शैली मधील बदल हे वैद्यकीय उपचारां शिवाय इतर काही मार्ग आहेत.

▪️स्लिप पॅरालिसीस :


स्लिप पॅरालिसीस या विकारा मध्ये तुम्ही शुद्धीवर असाल तरी देखील शरीराची कोणतीही हालचाल करण्यास असमर्थ असता. ही पूर्णपणे भयावह गोष्ट आहे. हा प्रकार दोन परिस्थितीं मध्ये होतो – झोपेतून उठत असताना (हायप्नोपॉम्पिक स्लिप पॅरालिसीस ) आणि झोप लागत असताना (हायप्नागॉगीक स्लिप पॅरालिसीस ).
हालचाल करण्यास असमर्थ असण्या शिवाय इतरही लक्षणे निर्माण झालेली असतात. घाम येणे, बोलण्यास असमर्थ असणे, डोके दुखणे, जाणीवपूर्वक जागरण होत असल्याची भावना होणे, स्नायूमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षानांचा समावेश असतो. डॉक्टरांची मदत घेणे हा सर्वोत्तम मार्ग आणि निर्णय आहे. स्लिप पॅरालिसीस वर प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही विशिष्ट उपचार पद्धत नाही आहे. परंतु, डॉक्टर विवीध उपचार पद्धती सुचवू शकतात उदा. औषधोपचार किंवा जीवनशैली मध्ये बदल करणे.

▪️रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (आर एल एस ):


रेस्टलेस लेग्स सिंड्रोम हा एक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला आराम करत असताना किंवा झोपेत पाय हालवण्याची अनियंत्रित इच्छा होत असते. याच्याबरोबर जळजळ होणे, वेदना होणे, कीटक वळवळल्या सारखे वाटणे आणि तुमच्या पायामध्ये मुंग्या येणे इत्यादी लक्षणे असतात. ही लक्षणे नेहमीच आराम करण्याच्या वेळी किंवा जेव्हा तुम्हाला झोपायचे असते तेव्हा निर्माण होतात. झोपेवर याचा त्वरित परिणाम होतो, त्यामुळे झोप अशक्य आणि अवघड होते. याच्या परिणामी, तुम्ही व्यवस्थित झोप लागण्यास अपयशी होता. आर एल एस साठी विवीध प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. तथापि, काही वेळा अंतर्गत समस्ये वर उपचार केल्याने समस्या दुर होऊ शकते. परंतु, जर काही अंतर्गत समस्या नसेल तर डॉक्टर काही औषधोपचार सुचवतील आणि जीवनशैली मध्ये सुधारणा करण्यास मार्गदर्शन करतील.

▪️नार्कोलेप्सी :


नार्कोलेप्सी ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जिच्यामुळे व्यक्तीला दिवसा सुद्धा झोप येते, तेव्हा वेळ आणि ठिकाण यांचा काही फरक पडत नाही. याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, टाईप 1, (कॅटाप्लेक्सी अँड स्लिपीनेस ) आणि टाईप 2, (दिवसाच्या वेळी अती प्रमाणामध्ये झोप येणे ). स्लिप पॅरालिसीस, हायप्नागॉगिक हॅलुसिनेशन्स, आणि कॅटाप्लेक्सी ( अनएक्सपेक्टेड मसल विकनेस ).
सध्याच्या काळामध्ये, नार्कोलेप्सीवर कोणताही उपचार नाही आहे. तथापि, स्लिप स्पेशालिस्ट काही विशिष्ट औषधे लिहुन देतील आणि जीवनशैली मध्ये बदल सुचवतील.

▪️पॅरासोमनिया :


पॅरासोमनियाज हा झोपेच्या समस्यांचा ग्रुप आहे ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान असामान्य घटना घडत असतात. त्यामधील सर्वात सामान्य प्रकार पुढीलप्रमाणे – झोपेमध्ये चालणे, स्लिप टेरर्स, आर इ एम (रॅपिड आय मुव्हमेंट – डोळ्यांची जलद गतीने हालचाल ), स्लिप इटिंग – झोपेमध्ये खाण्याची सवय, इत्यादी. हे झोपेच्या कोणत्याही पातळीवर निर्माण होऊ शकते.

अशा प्रकारां बरोबर असंख्य प्रकारची लक्षणे असतात. शिवाय, पॅरासोम्नियाच्या या प्रकारांची कारणे अजुन स्पष्ट पणे समजलेली नाहीत. या मुद्यावर अजुन संशोधन चालु आहे. तथापि, व्यवस्थित रोगनिदान झाल्या नंतर, उपचार पद्धतींचे पर्याय उपलब्ध आहेत. वैद्यकीय तज्ञ कदाचित तुम्हाला, अँटी डिप्रेसन्ट आणि इतर औषधे लिहुन देतील.

▪️निष्कर्ष :


झोप हा जीवनाचा महत्वाचा घटक आहे जो दिवसभरा मध्ये व्यवस्थित काम करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काही लोक हे भाग्यवान असतात जे कोणत्याही समस्ये शिवाय व्यवस्थित झोपु शकतात. परंतु, जे लोक झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे एक आव्हान बनलेले असते. अतिशय उशीर करण्या ऐवजी समस्या लवकर समजून घेणे महत्वाचे असते. त्वरित रोगनिदान आणि उपचार या साठी त्वरित वैद्यकीय समुपदेशन अतिशय महत्वाचे आहे.

झोपेच्या समस्या निर्माण करणारी बरीच विवीध कारणे आहेत. त्यामधील काही थोड्या कालावधी पुरती असतात तर काही कारणे जाण्यासाठी बराच कालावधी लागतो. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत, जीवनशैली मध्ये योग्य बदल केले तर त्याची खुप मोठी मदत होते. हे लक्षात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे की, अन्न आणि पाणी यांच्या बरोबरीनेच झोप तेवढीच महत्वाची आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...