VishwaRaj

सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत कोणत्या आहेत?

वैद्यकीय आणीबाणीच्या परस्थिती या व्यापक असतात, ही काही अशी गोष्ट नाही की जी खुप क्वचित घडते. परंतु याचा अर्थ असा नाही की ती सहज आणि समजण्यासारखी आहे. वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती कशी ओळखावी आणि त्या विशिष्ट क्षणी त्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, काय कृती करावी यासाठी प्रत्येक व्यक्ती व्यवस्थितपणे जागरूक असला पाहिजे. नेहमी, वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती अशावेळी उद्भवते ज्यावेळी तुम्ही त्याची कमीत कमी अपेक्षा करत असता, जसे की किराणा दुकानामध्ये, शहरा मधील रस्त्यांवर, किंवा कोठे खेळत असताना. एक प्रश्न त्वरित तुमच्या मनामध्ये येईल तो म्हणजे की मी आता काय केले पाहिजे?त्यामुळे येथे आम्ही काही केसेस आणि त्याबद्दल चे सल्ले देत आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्हाला लक्षणांचा अनुभव येईल तेव्हा नेमके काय केले पाहिजे.

🔹 सर्वात सामान्यपणे आढळणार्‍या वैद्यकी आणीबाणीच्या परस्थिती:
येथे खाली आम्ही काही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती दिलेल्या आहेत ज्यांचा अनुभव तुम्हाला केव्हाही आणि कुठेही येऊ शकतो.

रक्तस्त्राव :
साधे कापल्याने आणि साधी जखम झाल्याने देखील तुम्हाला रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो. परंतु ही काही अशी गोष्ट नाही की त्या क्षणी खुप घाबरून गेले पाहिजे. जेव्हा खोलवर कापलेले असेल आणि गंभीर जखमा असतील तेव्हा आणीबाणीची परिस्थिती उद्भवते ज्याला त्वरित उपचारांची आवश्यकता असते. अशा परिस्थिती ज्या मध्ये तुम्ही आणीबाणीची परिस्थिती शोधू शकता त्या खालील प्रमाणे :
▪️योग्य ते प्राथमिक उपचार करून देखील तुम्ही रक्तस्त्राव थांबवू शकत नसाल तर
▪️तुमच्या त्वचेमध्ये जर एखादी गोष्ट खोलवर टोचली गेली असेल आणि अती खोल असल्यामुळे तुम्ही ती काढू शकत नसाल तर
▪️जर जखमेमुळे तुम्हाला तुमचे हाड किंवा मांसल भाग दिसत असेल तर

जर तुम्ही अशा प्रकारच्या स्थितीं मध्ये उपचारासाठी उशीर केलात तर, अती रक्तस्त्रावामुळे चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, चेहरा पांढरा पडणे आणि काही परिस्थिती मध्ये तुम्ही तुमची शुद्ध देखील हरपू शकता. तथापि, असे झाले तर मात्र ही अतिशय आणीबाणीची परिस्थिती असेल.

अपस्मार किंवा झटका :
अपस्माराचे झटके येणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे, दहा व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला त्याच्या आयुष्या मध्ये एकदा तरी अपस्माराचा झटका येऊन गेलेला असतो. परंतु या मध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे झटका येऊन गेल्या नंतर तुम्हाला त्वरित उपचारांची आवश्यकता लागत नाही. ज्या लोकांमध्ये अपस्माराच्या झटक्यांचे निदान झालेले असते त्याच लोकांमध्ये हे झटके सामान्यपणे येतात.

या आजारामध्ये तुम्हाला स्नायू अखडल्याचे जाणवते, शरीराच्या एखाद्या भागा मध्ये किंवा संपुर्ण शरीरामध्ये कंप किंवा थरथर निर्माण होते, हे सर्व बदल अनैच्छिक आणि अनियंत्रित असतात. अपस्माराचा अजून एक प्रकार म्हणजे जेव्हा तुम्ही बिल्कुल हालू शकत नाही किंवा शरीराचा अगदी थोडा भाग हलवू शकता आणि डोळे एका ठिकाणी स्थिर केलेले असतील, यावेळी शरीर कोणालाही प्रतिसाद देऊ शकत नाही.

जर एखाद्या व्यक्तीला अपस्माराचा झटका आला असेल, तर त्यांच्या शरीराची होणारी थरथर जोपर्यंत त्यांना धोका नाही तोपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू नका. झटका येऊन गेल्यानंतर, योग्य उपचारांसाठी डॉक्टरांकडे जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि जर अपस्मारा चे झटके तुमच्यामध्ये सामान्यपणे येत असतील तर तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे जसे की झटका येऊन गेल्यानंतर तुम्ही काय केले पाहिजे.

 

हृदय विकाराचा झटका :
वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीच्या प्रकारांमध्ये हृदयासंबंधी ची आणीबाणी कदाचित सामान्य नसेल परंतु, गंभीर समस्यांपैकी ही एक समस्या आहे. योग्य ती कृती करण्यासाठी लक्षणे आणि योग्य वेळ कशी ओळखावी हे जाणून घेतल्याने बऱ्याच जणांचे आयुष्य वाचवता येईल.

हृदय विकाराच्या झटक्याने दरम्यान, रक्त प्रवाहामध्ये अचानक अडथळा निर्माण होतो आणि यामुळे अतिशय गंभीर वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे खालील प्रमाणे:
▪️ श्वास घेण्यामध्ये समस्या किंवा धाप लागणे
▪️ घाम येणे
▪️ छातीमध्ये अति तीव्र किंवा गंभीर वेदना, छाती मध्ये दाब निर्माण होणे, छातीच्या मधोमध पिळवटल्या सारखे होणे आणि घट्टपणा जाणवणे
▪️ डाव्या हाता मध्ये वेदना छाती मधून सुरू होतात. काही रुग्णांमध्ये वेदना या दोन्ही हात, जबडा, मान, पोट आणि पाठ या भागांमध्ये पसरलेल्या असतात.
▪️ आजारी असल्यासारखे वाटणे
▪️ चक्कर येणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे

जेव्हा तुम्हाला छातीमध्ये अतिशय गंभीर वेदना असतील, त्यावेळी तुम्ही हृदयविकाराचा झटका अनुभवत असण्याची शक्यता अति मोठ्या प्रमाणामध्ये असते. तथापि, काही केसेस मध्ये, लोकांना अतितीव्र वेदनांचा अनुभव होत नाही, फक्त अपचना समान सौम्य अस्वस्थपणा जाणवतो.

स्ट्रोक :
स्ट्रोक ही एक अजून गंभीर आणि जीवघेणी वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे. ही परिस्थिती मुख्यत्वे जेव्हा मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही तेव्हा निर्माण होते. ही समस्या मुख्य करुन दोन कारणांमुळे निर्माण होते एक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव किंवा मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी निर्माण होणे.

स्ट्रोक मध्ये वेळ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी ठरवू शकते की तुम्ही जगणारा आहात किंवा मरणार आहात. जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला वैद्यकीय उपचार मिळतील, तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही बरे होण्याच्या शक्यता वाढतील. त्यामुळे योग्य वेळी योग्य कृती करणे अतिशय आवश्यक आहे. खाली नमूद केलेली लक्षणे लक्षा मध्ये ठेवा, जी अॅक्रोनीम एफ ए एस आर वरून लक्षात ठेवणे अतिशय सोपे आहे.

▪️ एफ फॉर फेस :
चेहऱ्यामध्ये कोणता बदल झाला आहे? तुम्ही हसण्यास सक्षम आहात का? चेहऱ्याने त्याचे स्वरूप बदलले आहे का आणि चेहरा एका बाजूला झुकला आहे का? खास करून तोंडाच्या आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या भागामध्ये तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील.

▪️ए फॉर आर्म :
तुम्ही तुमचे दोन्ही हात वर उचलण्यास सक्षम आहात का? अपस्माराच्या झटक्या दरम्यान दोन्ही हातानं पैकी एक हात हा बधिर झालेला असतो.

▪️एस फॉर स्पीच :
जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपस्माराचा झटका आलेला असतो, त्यांची बोलण्याची पद्धत बदललेली असते आणि काहीशी अस्पष्ट झालेली असते, त्यांच्या बोलण्यामध्ये काही अर्थ आहे किंवा नाही याची तपासणी करावी. किंवा इतर व्यक्ती जर काही बोलत असतील तर तो व्यक्ती ते समजण्यास सक्षम आहे का ? त्याची देखील तपासणी करावी.

▪️टी फॉर टाईम :
जर ही वरील लक्षणे तुमच्या निदर्शनास आली तर, तुम्हाला हे समजले पाहिजे की या परिस्थितीमध्ये जास्त वेळ नाहीये, आणि तुम्ही त्वरित कृती केली पाहिजे. शक्य असेल तेवढ्या लवकरात लवकर वैद्यकीय उपचारांची मदत घेतली पाहिजे.

 अचानक श्वासोच्छ्वासाच्या समस्या :
जर एखाद्या व्यक्तीला अचानक श्वासोच्छ्वासाच्या समस्येचा अनुभव येऊ लागला, तर ही गोष्ट अंतर्गत आरोग्याची समस्या असल्याचे दर्शवते. यामागे बरीच कारणे असू शकतात, काही करणे पुढीलप्रमाणे ऍलर्जीक रिऍक्शन, ऍनाफीलॅक्सीस, दम्याचा झटका, फ्ल्यू, सी ओ पी डी आणि रेस्पायरेटरी सीनसीटीयल व्हायरस.

शारीरिक हालचाली किंवा व्यायाम यामुळे देखील श्वासोच्छ्वासाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु या समस्या जर कोणत्याही योग्य कारणा शिवाय निर्माण झाल्या तर ती एक वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती असू शकते. प्राथमिक लक्षणे तुमच्या निदर्शनास येऊ शकतील ती खालील प्रमाणे :
▪️ धाप लागल्याची जाणीव होणे
▪️ श्वासोच्छवास करताना शिट्टी सारखा किंवा घरघर असा विशिष्ट आवाज येणे
▪️ खोल श्वास घेत असताना छातीमध्ये वेदना होणे
▪️ नेहमीपेक्षा अतिजलद श्वासोच्छवास

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची इतर कोणतीही व्यक्ती श्वासोच्छ्वासाच्या समस्यांनी ग्रस्त असेल, तर घाबरून जाऊ नका कारण त्याने परिस्थिती अजून गंभीर बनेल. त्यापेक्षा, त्वरित वैद्यकीय उपचारांची मदत घ्या.

डोळ्याला इजा होणे:
एखाद्या व्यक्तीला डोळ्याला इजा होते जेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्याला डायरेक्ट मार लागतो. याचे कारण म्हणजे डोळ्यांना जोरात तडाखा लागतो, किंवा डोळा मागे जातो अशा कारणांमुळे नेहमी डोळ्या खालील त्वचेच्या सभोवती रक्ताच्या गुठळ्या होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामान्य पणे ज्या लक्षणांनी ग्रस्त होऊ शकता ती लक्षणे खालील प्रमाणे:
▪️ जखम आणि वेदना
▪️ कापणे
▪️ वेदना होणे
▪️ डोळ्यांची हालचाल कमी होणे
▪️ डोळ्याच्या बाहुलीच्या आकारामध्ये बदल होणे
▪️ बुबूळा वर रक्त जमा होणे

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य वैद्यकीय उपचार घेत आहात याची खात्री करून घ्या

▪️ निष्कर्ष:
जर तुम्ही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती आणि त्यांची लक्षणे याबाबत जागरूक असाल तर, बऱ्याच केसेस मध्ये तुम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकता. परंतु जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, जेवढ्या लवकरात लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर त्यावर योग्य उपचार घेण्यासाठी वैद्यकीय मदत घ्या. याशिवाय, अशा परिस्थिती मध्ये घाबरून न जाण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे ही परिस्थिती अजून गंभीर बनते, त्याऐवजी शांत राहा आणि आवश्यक ती पावले उचला.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...