VishwaRaj

पाठीच्या वेदनांसाठी - कंबरदुखी साठी केव्हा शस्त्रक्रिया करायला हवी?

 जेव्हा रुग्णांना कंबरेमध्ये अतिशय तीव्र व गंभीर स्वरूपाच्या वेदना होत असतात आणि सलग 2 – 3 महिने (6-12 आठवडे ) शस्त्रक्रिया विरहित पारंपारिक उपचार पद्धती घेऊन सुद्धा काही फरक पडत नसेल तेव्हा कंबरेची शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.
शस्त्रक्रिया विरहित किंवा पारंपारिक उपचार पद्धती खालील प्रमाणे :
– गरजेनुसार वेदनाशामक औषधे
– भौतिक चिकित्सा उपचार
– बर्फाने आणि गरम पाण्याने शेकणे
– इपिडयुरल इंजेक्शन

 

तुम्हाला कंबरेच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता का असते?

कंबरेची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय हा शस्त्रक्रिया विरहित व पारंपारिक उपचार पद्धती अवलंबल्या नंतर घेतला जातो. परंतु समस्या जर अतिशय गंभीर असेल आणि मणक्यामध्ये यांत्रिक समस्या उद्भवत असेल तर रुग्णांना त्यांच्या वेदना व्यवस्थापन करणाऱ्या डॉक्टरां बरोबर किंवा न्युरोलॉजीस्ट – मज्जासंस्थाशास्त्र तज्ञां बरोबर समस्येबद्दल चर्चा करावी लागेल.

मणक्यामधुन येणारे मज्जातंतू जर दाबले गेले असतील तर एका किंवा दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये बधिरपणा येतो, पारंपारिक उपचारांना प्रतिसाद न मिळण्याचे हे एक मुख्य कारण असु शकते.

मणक्याचे मज्जातंतू दाबले जाण्याची काही कारणे खालील प्रमाणे :
▪️मणक्यांच्या मधील चकतीच्या समस्या :
चकती सरकणे हा एक विकार आहे ज्यामध्ये मणक्यांच्या मधील चकत्या या मणक्याच्या नलिकेमध्ये ढकलल्या जातात. यामुळे मणक्यावर आणि मज्जातंतू वर दबाव निर्माण होतो परिणामी पाठीमध्ये किंवा मज्जातंतू जसा पसरला आहे त्या भागामध्ये वेदना होतात बरेचदा याला ‘सायाटीका’ असे म्हणतात. यामध्ये जळजळ, बधीरपणा किंवा मुंग्या येणे आणि कंबरेमधून, नितंबामध्ये पुढे मांडीची मागील बाजू, पाय व तळव्यापर्यंत वेदना पसरणे ही लक्षणे असतात. या विकारामध्ये बरेचदा वेदना या औषधाने आणि भौतिक चिकित्सने बऱ्या होतात, काही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता लागते.

▪️स्पायनल स्टीनॉसीस:
स्पायनल स्टीनॉसीस म्हणजे मणक्याची नलिका अरुंद होणे. हा विकार सामान्यपणे मध्यम वयोगट आणि वयोवृद्ध लोकांमध्ये उद्भवतो. स्पायनल स्टीनॉसीस हे पाठ दुखी चे अजून एक कारण आहे यामध्ये एक किंवा दोन्ही पायात बधिरपणा बरोबर वेदना असतात. लिगामेंटस जाड होणे, हाडांची वृद्धी किंवा संधीवातामुळे हाडांचे कार्टिलेज वाढणे इत्यादी कारणांमुळे स्पायनल स्टीनॉसीस होऊ शकतो. या समस्येमुळे पाठीमध्ये वेदना सुरू होतात व मध्यम आणि बऱ्याच काळासाठी उभे राहणे किंवा चालणे यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतात याच बरोबर दोन्ही पायांमध्ये जडपणा, मुंग्या येणे आणि बधीरपणा ही लक्षणे देखील असतात.

▪️ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट :
शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट आणि परिणाम हे कोणत्या प्रकारचा आजार आहे किंवा अंतर्गत समस्या आहे त्यावर अवलंबून असतात.
शस्त्रक्रियेसाठी तातडीच्या उद्दिष्टांचे  प्रकार खालील प्रमाणे :
1. मणक्याचे स्टॅबिलायझेशन
2. न्युरोलॉजीकल स्ट्रक्चरचे डीकॉमप्रेशन
3. वरील 1 आणि 2 चे एकत्रिकरण
पाठीच्या शस्त्रक्रिये मध्ये मुख्य ध्येय हे वेदना कमी करणे आणि रुग्णाची कार्यक्षमता व हालचाली वाढवणे हे असते.

🔹 कंबरदुखी साठी च्या शस्त्रक्रियांचे प्रकार :
1) डिसेक्टॉमी :
डिसेक्टॉमी ही कंबरे मधील हानी झाल्यामुळे बाहेर आलेला चकतीचा भाग जो एखाद्या मज्जातंतूच्या मुळावर किंवा मज्जारज्जूवर दबाव निर्माण करत असेल त्याला काढून टाकण्यासाठी केली जाते.

2)लॅमीनेक्टॉमी किंवा लॅमीनोक्टॉमी:
लॅमीनेक्टॉमी लाच डिकॉमप्रेशन शस्त्रक्रिया असे म्हणतात ज्यामध्ये मणक्याचा भाग ज्याला लॅमिना म्हणतात तो काढून टाकला जातो.

लॅमिना हा मणक्याच्या नलिकेचे छप्पर असतो. या प्रक्रियेमध्ये मणक्याची नलिका मोठी केली जाते आणि मज्जारज्जू किंवा मज्जातंतूवर आलेला दबाव कमी केला जातो.
ऑस्टियोआर्थ्रायटिस (मणक्याचा संधिवात )असणाऱ्या रुग्णांमध्ये मज्जारज्जू किंवा मज्जातंतूवर दबाव निर्माण होतो. जर लक्षणे ही अतिशय गंभीर आणि तीव्र असतील तरच लॅमीनेक्टॉमी करण्याचा सल्ला दिला जातो.

3)स्पायनल फ्युजन :
पाठीच्या कण्यामधील मणक्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी स्पायनल फ्युजन केले जाते. या प्रक्रियेमध्ये, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मणके हे एकमेकात जुळलेले असतात, ते वेगवेगळे केले जातात. मुळतः स्पायनल फ्युजन हे वेदनादायक हालचाली कमी करण्यासाठी आणि मणक्याची स्टॅबिलिटी पूर्ववत करण्यासाठी केले जाते.

4) आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट :
हा एक अर्थ्रोप्लास्टि चा प्रकार आहे. या प्रकारची शस्त्रक्रिया ही लंबार किंवा सर्वायकल मणक्‍यामधील झीजलेली चकती काढून तेथे कृत्रिम चकती बसवली जाते.

▪️ निष्कर्ष:
जड वस्तू उचलणे, चुकीच्या स्थितीमध्ये झोपणे, व्यवस्थित न बसणारे बॅकपॅक घालने, तीव्र स्वरूपाचे व्यायाम, बराच काळ बसणे किंवा झोपणे इत्यादी विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनामधील सवयी सुद्धा पाठीच्या वेदनेला कारणीभूत असतात. अशा प्रकारच्या हालचाली आणि सवयी या पाठीवर किंवा मणक्यावर ताण निर्माण करतात.

जेव्हा तुम्हाला पाठी मध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना जाणवतील तेव्हा त्यामागील कारण शोधण्यासाठी आणि पुढील हानी / इजा टाळण्यासाठी शक्य असेल तेवढ्या लवकरात लवकर वेदना व्यवस्थापन चिकित्सालयाला भेट द्या. वेदना व्यवस्थापन करणारे डॉक्टर हे तुमच्या रोगनिदान अहवालानुसार तुम्हाला व्यवस्थित औषधे आणि इतर पारंपरिक उपचार पद्धती पुरवतात. जर या सर्व उपचार पद्धती सलग 3 महिने अवलंबल्या नंतर देखील लक्षणे कमी होत नसतील तर वेदना व्यवस्थापन करणारे डॉक्टर हे तुम्हाला पाठीच्या किंवा मणक्याच्या कोणत्या भागाला हानी पोहोचलेली आहे त्यानुसार पाठीची किंवा मणक्याची शस्त्रक्रिया सुचवतात.
शस्त्रक्रिये नंतर शस्त्रक्रिया तज्ञांनी दिलेल्या सर्व सूचनांचे व्यवस्थित पालन करा आणि शस्त्रक्रिया तज्ञांना नियमितपणे दिली जाणारी भेट टाळू नका.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

सामान्यपणे आढळणारे मज्जासंस्थेचे विकार कोणते आहेत?

मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये मज्जातंतू, मणका आणि मेंदू यांच्या विकारांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारांनी ग्रस्त होतात, त्यामधील हजारो लोक ...