VishwaRaj

सतत ची चिंता मेंदूला हानी पोहोचवू शकते का?

चिंता करणे हा एक विकार आहे त्यामुळे उदासीनता, एकदम घाबरून जाणे आणि भीती निर्माण होणे, हे मुख्यत्वे मानसिक विकार आहेत. भूतकाळा मधील काही घटना, ताण तणाव आणि हार्मोन्स चे असंतुलन यांमुळे हा विकार उद्भवतो.


चिंता करणे हा काही मज्जासंस्थेचा विकार नाहीये परंतु त्याच्यामुळे मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे निर्माण होतात. शिवाय, बऱ्याच मज्जातंतुच्या विकारांमध्ये चिंता हे लक्षण असु शकते. परिणामी हे अतिशय गुंतागुंतीचे आणि काळजी घेण्याचे मुख्य कारण आहे.

🔹चिंतेमुळे आलेली शारीरिक लक्षणे :
चिंतेमुळे बऱ्याच प्रकारची लक्षणे येऊ शकतात. त्यामध्ये,
डोकेदुखी,
पाठीमध्ये वेदना,
चक्कर येणे,
श्वास घेण्यामध्ये त्रास,
स्नायूंमध्ये थरथर,
थकवा,
मळमळ,
माने मध्ये वेदना,
मुंग्या येणे,
छातीमध्ये वेदना,
पचनाचे विकार,
झोपेमध्ये समस्या

🔹चिंतेशी संबंधित भावनिक लक्षणे :
शारीरिक लक्षणां शिवाय, भावनिक लक्षणे सुद्धा चिंते बरोबर संबंधित असतात. त्यापैकी काही खालील प्रमाणे :
अस्वस्थता,
पॅनिक अटॅक,
उदासीनता,
सक्तीचे वर्तन – कम्पलसीव्ह बिहेवीअर,
ध्यास लागणे – मन व्यापून टाकणारी कल्पना करणे इत्यादी.

चिंताग्रस्त लोक नेहमी दुरगामी परिणामांनी त्रस्त असतात. ते नेहमी निद्रानाश, नैराश्य, आत्महत्येचे विचार, अमली पदार्थांचे सेवन आणि बर्‍याच दिवसांपासून च्या वेदने च्या समस्या इ. बरोबर झगडत असतात.

▪️ ही चिंता आहे किंवा मज्जासंस्थेचा विकार आहे?

चिंतेची अति तीव्रता ही कधी कधी मज्जासंस्थेच्या विकरांची विवीध लक्षणे घेऊन येते. चिंतेने ग्रस्त असलेले लोक शारीरिक लक्षणे दाखवतात, ही लक्षणे काही प्रमाणात मज्जासंस्थेच्या विकारांच्या सारखीच असतात उदा. ब्रेन ट्यूमर्स, मल्टिपल स्क्लेरॉसिस आणि लाईम डिसीज इ.
काहीवेळा, लक्षणे अतिशय एक सारखी असतात आणि त्यामुळे डॉक्टर तुम्हाला बऱ्याच आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यास सांगतात. या तपासण्यांचे अहवाल आजाराचे योग्य मूल्यांकन करण्यास मदत करतात. आजाराविषयी गोंधळ दूर निर्माण करण्यासाठी तुम्ही त्वरित वैद्यकीय तज्ञांची मदत घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

🔹 चिंतेमुळे उद्भवणारी मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे :
हे अगदी बरोबर आहे की चिंतेमुळे कोणत्याही मज्जातंतू ला हानी पोहोचत नाही. परंतु तरीही ती लक्षणे निर्माण करते. अशा प्रकारची काही लक्षणे खाली नमूद केलेली आहेत :

▪️ डोळ्यांच्या दृष्टीमध्ये समस्या :
चिंता व तिच्याबरोबर असणारी हायपरव्हेंटिलेशन आणि मायग्रेन सारखी इतर लक्षणे डोळ्याच्या दृष्टीच्या समस्या निर्माण करतात. यामुळे डोळ्याच्या भावल्या विस्तीर्ण होतात आणि व्यवस्थित रित्या दिसण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

▪️ थकवा :
चिंतेमुळे सामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे थकवा होय. शिवाय, चिंताग्रस्त लोकांना नेहमीच निद्रानाशाचा देखील त्रास असतो. झोपण्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे अतिप्रमाणात थकवा येतो.

▪️ डोकेदुखी :
चिंतेमुळे विवीध प्रकारची डोकेदुखी निर्माण होते. यामध्ये प्रामुख्याने मायग्रेन आणि टेन्शन हेडऍक चा समावेश असतो. डोकेदुखी बरोबर इतर विवीध लक्षणे देखील असतात. परंतु चिंतेमुळे या सर्व लक्षणांना चालना मिळते जरी हे बिल्कुल स्पष्ट नाही की चिंता ही सर्व लक्षणे कसे निर्माण करते.

▪️नर्व्ह पेन – मज्जातंतू मधील वेदना :
चिंतेमुळे मज्जतंतू मध्ये वेदना होते. यालाच सायकोजेनिक वेदना असेही म्हणतात. चिंतेमुळे मेंदू वेदनेचे सेन्सर्स जागृत करतो. तथापि, या वेदनेला कारणीभूत असणारे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

▪️ मुंग्या येणे:
चिंतेमुळे निर्माण होणारी हायपरव्हेंटिलेशन आणि ऍड्रीनॅलीन यांमुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. हायपरव्हेंटिलेशन मुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे हात आणि पायांना होणाऱ्या रक्तप्रवाह चे प्रमाण कमी होते. हा परिणाम ऍड्रीनॅलीन च्या परिणामाच्या एकदम विरुद्ध आहे. ऍड्रीनॅलीन मुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि स्नायूंकडे जास्तीत जास्त रक्तप्रवाह पाठवतात. यामुळे लोकांना बधिरपणा, मुंग्या येणे आणि गरम किंवा गार संवेदना होतात.

🔹 चिंतेचे मेंदूवरील परिणाम :
कमी प्रमाणा मधील चिंता ही सामान्य समजली जाते परंतु अति प्रमाणा मधील चिंतेमुळे मेंदुवर गंभीर परिणाम होतात. जेव्हा तुमच्या मध्ये चिंतेची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढते तेव्हा शरीर ‘फाईट ऑर फ्लाईट’ पवित्र्या ची तयारी करण्यास सुरुवात करते. जेव्हा अमायगडॅला हायपोथॅलॅमस ला डिसस्ट्रेस कोड्स पाठवतो तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. आता, हायपोथॅलॅमस हे मेंदूचे कमांड सेंटर बनते. आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी हायपोथॅलॅमस बऱ्याच प्रकारचे हार्मोन्स सोडण्यास सुरुवात करते.
परिणामी, तुमचे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढला जातो. याशिवाय, रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवासामध्ये देखील वाढ होते. याचा मतितार्थ असा की, हायपोथॅलॅमस शरीराला पळून जाण्याच्या किंवा लढण्याच्या परिस्थितीसाठी तयार करते.
या सर्व प्रक्रियेसाठी लक्षणीय प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर केला जातो. या सर्वांची भरपाई म्हणून, हिप्पोकॅम्पस कॉर्टीसॉल नावाचे हार्मोन सोडण्यास सुरू करतो. हे हार्मोन शरीरामध्ये ऊर्जा पुन्हा साठवण्यासाठी सोडले जाते.

आता, जर तुम्ही चिंता या विकाराने ग्रस्त असाल तर, वाढलेली कॉर्टीसॉल ची पातळी ही मेंदूवर परिणाम करून मेंदूच्या पेशींना हानी पोहोचवते.
या व्यतिरिक्त, वाढलेली कॉर्टीसॉल ची पातळी ही इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा निर्माण करते. याचाच अर्थ आता तुम्हाला टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. अभ्यासानुसार, टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना अल्झायमर्स डिसीज होण्याची शक्यता अति प्रमाणात असते.

🔹 चिंतायुक्त विकारा वरील उपचार :
चिंतायुक्त विकारासाठी कोणत्याही उपचार पद्धतीची निवड करण्यापूर्वी, तुम्ही त्याचे व्यवस्थित रोगनिदान करणे अत्यावश्यक आहे. यासाठी वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. या विकारासाठी मुख्यत्वे दोन प्रकारच्या उपचार पद्धती आहेत – औषधोपचार आणि सायकोथेरपी. काहीवेळा, या दोन्ही पद्धती एकत्र वापरल्याने सर्वोत्तम परिणाम मिळतो.

सहसा, चिंता कमी करण्यासाठी अँटी डिप्रेसन्ट आणि सीडेटीव्ही ची मोठी मदत होते. तथापि, डॉक्टरांनी जर सल्ला दिला तर तुम्ही ही औषधे घेऊ शकता. ही औषधे प्रदीर्घ काळासाठी घेतली जात नाहीत.

सायकोथेरपी पद्धतीमध्ये, चिंतायुक्त विकारावर उपाय करण्यासाठी तुमचे थेरापीस्ट बरोबर सत्र आयोजित केले जाते. हे थेरापीस्ट तुमच्या समस्या अगदी निष्णात पणे हाताळण्या मध्ये प्रशिक्षित असतात. तुम्ही कॉग्नीटीव्ह बिहेविअरल थेरपी ( सी बी टी ) ची सुद्धा निवड करू शकता.

▪️ निष्कर्ष:
सौम्य प्रमाणामध्ये चिंता असणे हे अगदी सामान्य आहे आणि ही कमी अधिक प्रमाणा मध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये असते. परंतु, जेव्हा चिंता ही खूप दिवसांपासून अस्तित्वात असते किंवा कोणत्याही विकाराला कारणीभूत ठरते तेव्हा योग्य उपचारांची आवश्यकता असते. जोपर्यंत तुम्ही चिंता वाढवणारी गोष्ट शोधून काढत नाही, तोपर्यंत ती तुम्हाला संपूर्ण दिवसभर सहन करावी लागेल. यामुळे फक्त तुमच्या आयुष्यावरच परिणाम होणार नाहीत तर तुमच्या प्रियजनांवर देखील होणार आहेत.

तथापि, आधुनिक वैद्यकीय प्रगतीच्या मदतीने, तुम्ही वैद्यकीय समुपदेशना बरोबरच योग्य उपचार मिळवू शकता. तुम्ही स्वतःला थेरपीमध्ये गुंतवून मेडिटेशन ला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनू शकता. शेवटी, सौम्या परंतु महत्वाचे बदल हे तुम्हाला चिंतायुक्त विकार हाताळण्यास मदत करतील.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

सामान्यपणे आढळणारे मज्जासंस्थेचे विकार कोणते आहेत?

मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये मज्जातंतू, मणका आणि मेंदू यांच्या विकारांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारांनी ग्रस्त होतात, त्यामधील हजारो लोक ...

पाठीच्या वेदनांसाठी – कंबरदुखी साठी केव्हा शस्त्रक्रिया करायला हवी?

जेव्हा रुग्णांना कंबरेमध्ये अतिशय तीव्र व गंभीर स्वरूपाच्या वेदना होत असतात आणि सलग 2 – 3 महिने (6-12 आठवडे ) ...