VishwaRaj

सामान्यपणे आढळणारे मज्जासंस्थेचे विकार कोणते आहेत?

मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये मज्जातंतू, मणका आणि मेंदू यांच्या विकारांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारांनी ग्रस्त होतात, त्यामधील हजारो लोक प्राणघातक परिणामांना सामोरे जातात. हे विकार फक्त त्या विशिष्ट रुग्णा वरच नाहीतर त्याच्या सभोवताली असणाऱ्या लोकांवर देखील परिणाम करतात. तुमच्या प्रियजनांना या विकारांनी ग्रस्त झालेले पाहणे खूप कठीण बनून जाते.

 

मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये असंख्य प्रकार आहेत. सर्व विकारां बाबत सविस्तरपणे माहिती जाणणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे, परंतु तुम्ही तुमच्या प्रियजनांना मदत करण्यास उत्सुक असाल तर, आमचा असा सल्ला राहील की आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला या प्रकारां बाबत माहिती असेल तर तुम्ही योग्य उपचार पद्धती शोधू शकता आणि त्यांना मदत करू शकता.

मज्जासंस्थेचे बरेच विकार हे काहीतरी लक्षणे दाखवत असतात. परंतु काही रुग्ण असे असतात ज्यांच्यामध्ये रोगनिदान करणे कठीण असते. तथापि, वैद्यकीय तज्ञांना विवीध उपचार पद्धतींची माहिती असते. ते काही आरोग्य तपासण्या करून घेतात आणि जलद रोग मुक्ततेसाठी सर्वोत्तम उपचार पद्धती सुचवतात.

🔹 सामान्यपणे आढळणारे मज्जासंस्थेचे विकार :
मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये बरेच विवीध प्रकार आहेत. त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेतल्यास तुम्ही इतरांना होणाऱ्या वेदना समजून घेऊ शकता. त्यांपैकी काही येथे नमूद केले आहेत त्यांवर जरा नजर फिरवा:

▪️फेफरे – सीझर्स :
मेंदूच्या विद्युत लहरिं मध्ये बदल झाल्यामुळे फेफरे येते. अशी असंख्य लक्षणे आहेत जी फेफरे हा विकार दर्शवतात. जरी ही लक्षणे वेगवेगळी असली तरी बरीच लक्षणे सामान्यपणे आढळतात. उदाहरणार्थ, चिंता, भीती, गोंधळात पडणे आणि हातांची किंवा पायांची अचानक थरथर होणे ही लक्षणे तुम्हाला दिसून येतील.

बऱ्याच रुग्णांमध्ये, फेफरे हे अपस्मारा मुळे आलेले असते. परंतु ते, जोराचा ताप, दारू बंद करणे, ठराविक औषधे इत्यादी कारणांमुळे देखील फेफरे येऊ शकते. तुम्ही त्वरित वैद्यकीय तज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.

▪️ डोकेदुखी :
हे जरा आश्चर्यकारक वाटेल, परंतु डोकेदुखी चा मज्जासंस्थे च्या विकारांमध्ये समावेश आहे. टेन्शन, क्लस्टर आणि मायग्रेन असे डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. जर तुम्ही सतत होणाऱ्या डोकेदुखी ने त्रस्त असाल, तर वैद्यकीय तज्ञांना भेटणे हा महत्त्वाचा निर्णय असेल. टेम्पोरल आरटेरायटीस, उच्च रक्तदाब इत्यादी कारणांमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. वैद्यकीय तज्ञ हे डोकेदुखी च्या प्रकारा नुसार उपचार सुचवतात.

▪️स्मृतिभ्रंश:
स्मृतिभ्रंश हे सामान्य लक्षण आहे ज्यामुळे विवीध प्रकारचे मज्जासंस्थेचे विकार उद्भवतात. हे नेहमी वयानुसार वाढत जाते. शिवाय, यामुळे हळूहळू मेंदूच्या टीश्युंचा ऱ्हास होत जातो. स्मृतिभ्रंश हा मेंदूच्या विविध भागांवर परिणाम करतो उदा. स्मृती, विचार शक्ती, वर्तणूक इत्यादी.

तुम्ही त्वरित वैद्यकीय तज्ञांचे समुपदेशन नियोजित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्मृतिभ्रंशावर वेळीच उपचार केले नाहीत तर तो वाढतच जाईल.

▪️स्ट्रोक :
हा सामान्यपणे आढळणारा परंतु अचानक उद्भवणारा मज्जासंस्थेचा विकार आहे. काहीवेळा, स्ट्रोक हा काही मिनिटांमध्ये उद्भवतो तर काही रुग्णांमध्ये त्याची लक्षणे दिसून येतात. जेव्हा मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हा विकार होतो.

असंतुलित स्मितहास्य, हात वर घेण्यामध्ये समस्या, अस्पष्ट बोलणे, धुसर दृष्टी, डोकेदुखी, गोंधळात पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर तुम्हाला स्ट्रोक हा विकार असेल तर तुम्हाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. औषधोपचारा शिवाय जीवनशैलीमध्ये काही बदल केल्याने सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत होईल.

▪️ पार्किन्सन्स डिसीज:
मज्जासंस्थेचा अजून एक मोठा विकार. हा विकार नेहमी वय वर्षे 60 या वयोगटामध्ये आढळून येतो आणि हा शारीरिक हालचालींवर परिणाम करतो. यामध्ये मेंदूच्या ज्या पेशी डोपामाइन तयार करतात त्यांचा ऱ्हास होत असतो.
स्नायूंमध्ये कडकपणा, अस्पष्ट किंवा अडखळत बोलणे, वास घेण्याची संवेदना कमी होणे, बोटांची थरथर इत्यादी प्रकारची लक्षणे या विकारामध्ये असतात.
या विकाराच्या विवीध रोगनिदान तपासण्या आहेत ज्यामुळे डॉक्टरांना उपचार सांगण्यास मदत होते. काही रुग्णांमध्ये, औषधांमुळे पार्किन्सन्स डिसीज निर्माण होतो.

▪️ मल्टिपल स्क्लेरॉसिस:
मल्टिपल स्क्लेरॉसिस (एम एस ) हा एक ऑटोइम्यून विकार आहे ज्यामध्ये चेता पेशींच्या ( नर्व्ह सेल्स ) आवरणावर हल्ला/ परिणाम केला जातो. या आवरणाचा ऱ्हास झाल्यामुळे मज्जातंतूंना हानी पोहोचते. विवीध लोकांमध्ये विवीध लक्षणे दिसून येतात.

तुम्हाला सौम्य लक्षणे देखील असू शकतात. परंतु गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांमध्ये, लिहिणे, बोलणे आणि चालण्याची क्षमता नाहीशी झालेली असते. मल्टिपल स्क्लेरॉसिस ला जरी कोणताही उपचार नसला तरी तुम्ही या आजाराची वाढण्याची गती कमी करू शकता. भौतिक चिकित्से बरोबर इतर औषधे यामध्ये मदत करू शकतात.

▪️ अपस्मार:
अपस्मारा मुळे मेंदूच्या अनियमित क्रिया होतात आणि त्यामुळे फेफरे सुद्धा निर्माण होते. 50% रुग्णांमध्ये याचे कारण अस्पष्ट असते. परंतु, स्ट्रोक, डोक्याला इजा होणे, अनुवंशिकता इत्यादी काही ठराविक कारणे आहेत.

चिंता, तात्पुरते गोंधळात पडणे, जागरूकतेचा अभाव इत्यादी या विकाराची लक्षणे आहेत. या विकाराला ला जरी कोणताही कायमचा उपचार नसला तरी तुम्ही या आजाराची वाढण्याची गती कमी करू शकता. जर या विकारावर उपचार केले नाहीत तर तो मेंदूला हानी पोहचवू शकतो.

▪️ सेरेब्रल ऍन्यूरीजम :
सेरेब्रल ऍन्यूरीजम ला ब्रेन ऍन्यूरीजम असेही म्हणतात. या विकारामध्ये मेंदूमधील रक्तवाहिनीला फुगवटा निर्माण होतो. जेव्हा हा फुगवटा वाढत जातो तेव्हा तो फुटतो आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. या वेळी या परिस्थितीला सबअरॅकनॉइड हिमोरेज ( एस ए एच )असे वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतात. त्यामुळे हिमोरेजीक स्ट्रोक निर्माण होतो.
जेव्हा हे ऍन्यूरीजम फुटलेले नसते तेव्हा काही लक्षणे उद्भवतात :
डोळ्यांमध्ये वेदना होणे,
डोळ्यांच्या हलचाली मंदावणे,
दृष्टी विषयी समस्या होणे इत्यादी.
ब्रेन ऍन्यूरीजम साठी विवीध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तथापि, ऍन्यूरीजम चा आकार, स्थान आणि तो फुटल्यानंतर ची स्थिती या सर्वांवर उपचार अवलंबून असतात. जेव्हा ऍन्यूरीजम फुटतो तेव्हा आणीबाणीची वैद्यकीय उपचार सेवा मिळणे अतिशय आवश्यक असते.

▪️अटॅक्सीया :
अटॅक्सीया मुळे हात आणि पायांच्या स्नायुं मधील नियंत्रण गेलेले असते. शेवटी या परिस्थितीमुळे शारीरिक समन्वय आणि संतुलन यामध्ये अडथळा निर्माण होतो. मज्जातंतूंची हानी, ट्यूमर, स्ट्रोक आणि पोषण घटकांची कमतरता इत्यादी कारणांमुळे हा विकार होऊ शकतो.
या विकाराची काही लक्षणे आहेत ती तुम्ही लक्षात घेऊ शकता. यामध्ये अस्पष्ट किंवा अडखळत बोलणे, डोळ्यांची असामान्य पणे हालचाल आणि शारीरिक संतुलना संबंधी समस्या इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. दुःखद गोष्ट ही की, या विकारावर कोणताही उपाय नाही. डॉक्टर नेहमी विशिष्ट औषधे आणि इतर उपचारात्मक पद्धतींनी या विकाराची वाढण्याची गती कमी करतात.

▪️ निष्कर्ष:
मज्जासंस्थेचे काही विकार हे सामान्यपणे आढळतात. परंतु यात काहीच शंका नाही की, या विकारांमध्ये बरेच प्रकार आहेत. नेहमीच, या विकारांच्या मार्गक्रमणा ची नोंदणी ठेवणे कठीण असते. परंतु जेव्हा तुमचे प्रियजन या विकारांनी त्रस्त होतात, तेव्हा याबद्दल अधिक जाणून घेणे आवश्यक बनते. या माहितीच्या आधारे, तुम्ही योग्य वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधून मदत मिळवू शकता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या तंत्रज्ञाना मधील प्रगतीमुळे, विवीध विकारांवर उपचार करण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

पाठीच्या वेदनांसाठी – कंबरदुखी साठी केव्हा शस्त्रक्रिया करायला हवी?

जेव्हा रुग्णांना कंबरेमध्ये अतिशय तीव्र व गंभीर स्वरूपाच्या वेदना होत असतात आणि सलग 2 – 3 महिने (6-12 आठवडे ) ...