VishwaRaj

एनजिओप्लास्टी नंतर करावयाचे जीवनशैली मधील बदल

हे अतिशय स्पष्ट आहे की अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिये नंतर नेहमीपेक्षा जरा वेगळी जाणीव निर्माण होते. शारीरिक बदलांशिवाय तुम्हाला बरेच मानसिक बदल सुद्धा जाणवतील,
तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेले जाणवतील परंतु ते लवकरात लवकर स्वीकार करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
अँजिओप्लास्टी नंतर येणारी पथ्ये आणि काही बंधनांमुळे पुन्हा तुमच्या पूर्वीच्या सामान्य जीवनशैलीमध्ये जाणे म्हणजे तुमच्यासाठी मोठे आव्हान असेल.

अँजिओप्लास्टी प्रक्रियेनंतर अर्थातच तुमच्या धमन्यांमधील रक्त प्रवाह हा एकदम सुरळीत झालेला असेल परंतु पुन्हा क्षार साठून त्यांचा अडथळा ( प्लाक्स ) निर्माण होण्याची शक्यता देखील असते.

अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर खाली दिल्याप्रमाणे आरोग्यपूर्ण जीवनशैली व्यतीत करणे फायदेशीर ठरेल.

▪️ पौष्टिक आरोग्यपूर्ण आहार:
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये करावयाचा पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे तुमचा आहार. जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि अँटीऑक्सीडेंट्स या पोषण घटकांनी तुमचा आहार संतुलित आहे का याची खात्री नक्की करून घ्या. याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये मटन, मासे ( ओमेगा 3 फॅटी ऍसिड ), पूर्ण धान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ ( कमी फॅट असलेले), आरोग्यपूर्ण फॅट्स ( नट्स, बिया, अव्होकॅडो ), पाणी आणि इतर पदार्थांचा समावेश करू शकता.
याच बरोबर आहारामधील मिठाचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी करा व साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.

▪️व्यायाम :
उच्च रक्तदाब, रक्तामधील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, मधुमेह आणि लठ्ठपणा इत्यादी प्रकारचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे अतिशय महत्वाचे आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी 10 मिनिटे वार्म अप करावा. यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके हळूहळू वाढतील आणि हृदयावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. वार्म अप हा तुमच्या स्नायूंना देखील मुख्य व्यायाम प्रकार करण्यासाठी सक्रिय करेल. तसेच व्यायाम प्रकार केल्यानंतर स्ट्रेचिंग आणि सावकाश चालण्याने स्वतःला शिथिल करण्यास विसरू नका. तथापि, कोणत्या प्रकारचे व्यायाम प्रकार तुमच्यासाठी सुरक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर नियमितपणे व्यायाम केल्याने तुम्हाला लवकरात लवकर पुन्हा आरोग्यप्राप्ती करण्यास मोठी मदत होईल.

▪️ तुमच्या वजनाकडे लक्ष द्या:
तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्हाला लठ्ठपणा असेल आणि जर काही किलो वजन तुम्ही कमी केलेत तर तुमची कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि रक्तामधील साखरेची वाढलेली पातळी कमी करण्यास मदत होईल. काही किलो कमी केल्यानंतरच तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठी आराखडा तयार करून घेऊन त्याप्रमाणे त्यावर काम करू शकता.

▪️ धूम्रपान बंद करा :
जर तुम्ही अति प्रमाणामध्ये धूम्रपान करणारे व्यसनी असाल तर तुम्हाला ते ताबडतोब बंद करणे अतिशय आवश्यक आहे. धूम्रपान हे फक्त तुमच्या फुफ्फुसांनाच हानी पोहोचवत नाही तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांना देखील हानी पोहोचवते आणि रक्तदाबाच्या व कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये वाढ करते. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिये नंतर धूम्रपान बंद करून तुम्ही आरोग्यपूर्ण जीवनशैली कडे वाटचाल करण्यामधील एक सर्वोत्तम पाऊल उचलेले असेल.

▪️ तुमच्या भावनां कडे लक्ष द्या:
अँजिओप्लास्टी चे रुग्ण हे नेहमी नैराश्याने त्रस्त असतात आणि यासाठी शारीरिक किंवा मानसिक घटक कारणीभूत असतात. जर नैराश्याचे उपचार योग्य वेळेत केले नाहीत तर ते तुमचे आरोग्य पूर्णपणे खराब करेल. तुमच्या भावनांकडे संपूर्ण लक्ष द्या, आणि तुम्हाला असे थोडे जरी वाटले की तुम्ही नैराश्या ने ग्रस्त आहात तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

▪️ उत्तम झोप :
संशोधनानंतर असे सिद्ध झाले आहे की अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांमध्ये निद्रानाशाचा त्रास असेल तर त्यांना 4 वर्षांमध्ये पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते. भविष्यामध्ये अशी परिस्थिती टाळण्यासाठी रोज रात्री पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. संध्याकाळच्या वेळी दारू, कॉफी आणि अति प्रमाणामध्ये जेवण घेणे टाळावे.

▪️निष्कर्ष:
कोणत्याही प्रकारच्या नवीन क्रियांमध्ये भाग घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अँजिओप्लास्टी नंतर कोणत्याही प्रकारची थोडी जरी अस्वस्थता जाणवली तरी संबंधित डॉक्टरां बरोबर ताबडतोब संपर्क साधा.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

हार्ट फेल्युअर : प्रकार, लक्षणे, करणे आणि उपचार

हार्ट फेल्युअर हा एक बऱ्याच दिवसांपासून असलेला, वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक

महिलांमध्ये आढळणारी हार्ट अटॅकची लक्षणे:

हृदयविकाराचा झटका हा पुरुषांमध्ये तसेच महिलांमध्ये जीवघेणा आजार आहे; तथापि, दोघांमध्ये आढळणारी लक्षणे विवीध प्रकारची असतात.

हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचे सहज सोपे मार्ग

जागतिक मृत्यू दरासाठी जरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे मुख्य कारण असले तरी असे बरेच मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही हृदय ...