VishwaRaj

महिलांमध्ये आढळणारी हार्ट अटॅकची लक्षणे:

हार्ट अटॅक हा पुरुषांमध्ये तसेच महिलांमध्ये जीवघेणा आहे; तथापि, दोघांमध्ये आढळणारी लक्षणे विवीध प्रकारची असतात. छातीमध्ये वेदना, काही क्षणांसाठी जाणवणारी अस्वस्थता ( बरेचदा वारंवार जाणवते ) किंवा छातीमध्ये दबाव जाणवणे इत्यादी प्रकारची लक्षणे पुरुष व महिला दोघांमध्येही सामान्यपणे सापडतात.

महिलांमध्ये अनेकदा हार्ट अटॅक लक्षणांमध्ये छाती मधील वेदना होत नाही त्यामुळे तो लक्षा मध्ये येत नाही.

महिलांमध्ये आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे :

जबडा, मान, खांदा, पाठीचा वरील भाग किंवा पोट यांमध्ये अस्वस्थता जाणवणे. वेदना या वरील भागांमधील एखाद्या ठिकाणी निर्माण होतात किंवा एकाच वेळी सर्व भागांमध्ये निर्माण होतात. झोपलेल्या अवस्थेमध्ये धाप लागण्या बरोबरच सामान्यपणे थकवा किंवा छातीमध्ये वेदना जाणवतात परंतु सरळ बसलेल्या स्थितीमध्ये आराम वाटतो व त्रास जाणवत नाही.
खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाम येणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय अति प्रमाणामध्ये थंडी वाजणे,
एका किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना जाणवणे,
अपचन, मळमळ, उलटी इत्यादी प्रकारची अन्नपचन संस्थेशी निगडित लक्षणे उद्भवतात.

थकव्या बरोबरच चक्कर येणे, चिंता वाटणे किंवा भोवळ येणे इत्यादी लक्षणे एकत्रितपणे जाणवतात.

झोपेच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण झाल्याने झोप येण्या मध्ये अडचण, झोप लागलेली असताना मधेच जाग येणे, व्यवस्थित झोप झालेली असताना देखील थकल्यासारखे वाटणे

रजोनिवृत्तीच्या काळ हा महिलांसाठी अतिशय धोक्याचा काळ मानला जातो कारण या काळामध्ये महीलांच्या शरीरामधील इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरकाची पातळी कमी झालेली असते त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता खूप वाढलेले असते.
रजोनिवृत्तीच्या काळामधील हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणे :
अतिशय तीव्र छातीमधील वेदना,
कोणत्याही हालचाली शिवाय अति प्रमाणामध्ये घाम येणे,
अति जलद किंवा एकतर्फी हृदयाचे ठोके,
जबडा, मान, हात, पाठ किंवा पोट यांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता.

सुरुवातीच्या काळामध्ये ही लक्षणे अगदी अस्पष्ट असतात. शिवाय, मानसिक ताण तणाव हा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे सक्रीय करण्यास कारणीभूत ठरतो. या लक्षणा मागील कारणे अस्पष्ट आहेत कारण महिलांमध्ये छोट्या छोट्या धमन्यां बरोबरच मोठ्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले असतात. ही सर्व लक्षणे नेहमीच आरामदायक स्थितीमध्ये बसलेले असताना किंवा झोपलेले असतानाच्या अवस्थेमध्ये उद्भवतात. अशाप्रकारच्या असामान्य लक्षणांमुळे महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्या ची गंभीर स्थिती ओळखता येणे कठीण होते. बरेचदा या लक्षणांचे रोग निदान हे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आणि हृदयाची बरीच हानी झाल्यानंतर होते.

आमच्या पूर्वीच्या ब्लॉगमध्ये https://vishwarajhospital.com/12-reasons-you-may-want-to-see-a-cardiologist/, आम्ही काही महत्त्वाची कारणे दिली आहेत ज्या कारणांमुळे नियमितपणे हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे हे लक्षामध्ये येते.
निष्णात हृदयरोग तज्ञां बरोबरच हृदय विकारांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज विभाग असलेल्या आमच्या विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम कार्डिओलॉजी डिपार्टमेंट उपलब्ध आहे. बऱ्याच वर्षांपासून आम्ही हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधिचे विकार असणाऱ्या रुग्णांना यशस्वी उपचार देत आहोत. आमच्या पुढील ब्लॉग मध्ये आम्ही महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांची माहिती देणार आहोत. जेव्हा तुम्हाला वर दिलेल्या हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांची जाणीव होईल तेव्हा त्वरित तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवा व सल्ला घ्या.

विश्वराज हॉस्पिटल हे पुण्यामधील सर्वोत्तम हार्ट स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

हार्ट फेल्युअर : प्रकार, लक्षणे, करणे आणि उपचार

हार्ट फेल्युअर हा एक बऱ्याच दिवसांपासून असलेला, वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक

हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचे सहज सोपे मार्ग

जागतिक मृत्यू दरासाठी जरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे मुख्य कारण असले तरी असे बरेच मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही हृदय ...

12 कारणे आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हृदयरोग तज्ञांना भेटावेसे वाटेल

तुम्हाला माहित आहे का की दर वर्षी 17.9 लाख पेक्षा जास्त लोक हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकरांमुळे मृत्यू मुखी पडत ...