VishwaRaj

12 कारणे आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हृदयरोग तज्ञांना भेटावेसे वाटेल

तुम्हाला माहित आहे का की दर वर्षी 17.9 लाख पेक्षा जास्त लोक हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकरांमुळे मृत्यू मुखी पडत आहेत.
जागतीक स्तरावर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकरांमुळे मृत्यू दरामध्ये वाढ होत असताना, तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे. हृदय हे जरी आपल्या मुठीच्या आकाराचे असले तरी ते मानवी शरीरामधील इतर कोणत्याही अवयवाच्या मानाने कठीण काम करत असते.

शिवाय, हृदय हे अविरतपणे काम करून प्रत्येक दिवशी साधारणपणे 1,15,000 वेळा धडकत असते/ ठोके देत असते.
तुम्ही कल्पना करू शकता का की कोणत्याही विश्रांती शिवाय अविरतपणे काम केल्याने हृदयावर कोणत्या प्रकारचा ताण येत असेल? हृदय त्याचे काम एका क्षणासाठी देखील थांबवू शकत नाही त्यामुळेच हृदयाच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर हृदयाची काळजी घेत नसाल किंवा तुम्ही हृदयाच्या उपचारामध्ये विलंब करत असाल तर यामुळे अतिशय हानिकारण परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

हृदयरोग तज्ञांना भेटण्याची काही कारणे खालील प्रमाणे :

जर तुम्हाला अस्वस्थ आणि त्रासदायक वाटत असेल तर जवळील डॉक्टरांना दाखवणे हा केव्हाही योग्य निर्णय असेल. पुढे हे डॉक्टर तुम्हाला हृदय विशेषज्ञ (हृदयरोग तज्ञ) यांच्याकडे पाठवतील. हृदया संबंधी कोणतीही त्रासदायक लक्षणे दुर्लक्षित करणे हा बिल्कुल सुद्धा चांगला विचार नाही. तथापि, योग्य प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी तुम्हाला काही लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे.


खाली दिलेली 12 कारणे समजावून घ्या कदाचित त्यामुळे तुम्हाला हृदयरोग तज्ञांचे समुपदेशन घेणे आवश्यक वाटेल.

▪️ कौटुंबिक इतिहास:
काहीवेळा, हृदय विकार हे अनुवंशिकतेमुळे उद्भवू शकतात. त्यामुळे पूर्णपणे आत्मविश्वास मिळविण्यासाठी तुम्हाला काही तपासण्या कराव्या लागतील. कुटुंबातील सदस्यांकडून, दूरच्या नातेवाईकांकडून माहिती एकत्रित करा तसेच तुमच्या कुटुंबाचे फॅमिली ट्री तयार करा. जर काही लक्षणांचे नमुने तुमच्या लक्षात आले असतील त्यामध्ये उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांचा समावेश असेल तर हीच वेळ आहे जिथे तुम्हाला हृदयरोग तज्ञांची भेट नियोजित करायला हवी.

▪️ छातीमध्ये वेदना :
छातीमध्ये वेदना हे हृदय विकाराचे एक सामान्य कारण आहे. इतर बरीच कारणे आहेत ज्यामुळे छातीमध्ये वेदना होतात उदा. अपचन तरी देखील तुम्ही कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. शिवाय, छाती मधील वेदना म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण होय. जर तुम्ही हे गंभीरपणे घेतले नाही तर अखेरीस तुम्ही तुमचा मृत्यू ओढवून घ्याल. केव्हाही तुम्हाला जर छातीमध्ये वेदना झाल्या, तर त्यांना दुर्लक्षित करू नका.

▪️ संबंधित लक्षणे :
छातीमध्ये वेदना होण्याशिवाय, इतर बरीच लक्षणे आहेत जी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अतिशय थकवा जाणवत असेल किंवा श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल, तर हे काळजी करण्याचे कारण आहे. कदाचित हे काही गंभीर किंवा हृदयाशी संबंधित नसेलही. परंतु जर ते हृदयाशी संबंधित असेल तर काय? तुम्ही धोका पत्करण्यास तयार आहात का? चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, हृदयामध्ये किंवा छाती मध्ये जडपणा जाणवणे, तीव्र प्रमाणामध्ये अपचन इत्यादी प्रकारची इतर लक्षणे तपासणे उचित व आवश्यक आहे.

▪️ कोलेस्टेरॉलची उच्च पातळी :
कोलेस्ट्रॉलची पातळी अती प्रमाणामध्ये वाढणे याचा भयावह पैलू म्हणजे सहज दिसणाऱ्या लक्षणांची अनुपस्थिती होय. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांची नियमित भेट घेऊन कोलेस्टेरॉलची पातळी व्यवस्थित आहे का हे तपासले पाहिजे. हे लक्षात ठेवा की कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी हा एक हृदयविकारा संबंधिचा मोठा धोकादायक भाग आहे. कोलेस्टेरॉलची पातळी अति प्रमाणामध्ये वाढू न देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पौष्टिक संतुलित आहार सेवन करणे.

▪️ धूम्रपानाची सवय :
धूम्रपान ही एक अतिशय धोकादायक आणि अपायकारक सवय आहे ज्यामुळे हृदयाच्या आरोग्या संबंधीच्या अतिशय मोठ्या समस्या उद्भवू शकतात. हा एक दुसरा धोकादायक घटक आहे जो अखेरीस कर्करोग आणि उच्च रक्तदाबास कारण ठरतो. लक्षात घ्या की, हा एक असा घटक आहे ज्या पासून सुटका मिळविण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही पूर्वी धूम्रपान करत असाल, तर तुम्ही हृदयरोग तज्ञांची भेट घेणे हा सर्वोत्तम विचार आहे.

▪️ उच्च रक्तदाब :
उच्च रक्तदाब हे अजून एक हृदय विकाराचे लक्षण आहे. ते प्रमाणामध्ये ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही महिन्यातून एकदा तरी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. तसेच, उच्च रक्तदाब हे स्ट्रोक चे देखील लक्षण आहे. जर तुम्हाला नेहमीच उच्च रक्तदाब राहत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांची भेट नियोजित करा.

▪️ मधुमेह :
तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण हृदयरोग आणि मधुमेह हे एकमेकांशी अतिशय जवळून जोडलेले असतात. रक्तामधील साखरेच्या उच्च किंवा कमी पातळीचे रक्तवाहिन्यांवर घातक परिणाम होतात ही एक वस्तुस्थिती आहे. शिवाय, याचा परिणाम रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर देखील होतो. पुढे जाऊन मधुमेह हा हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधी चे विकार निर्माण करण्याच्या शक्यता वाढवतो. तुम्ही हृदयरोग तज्ञांच्या संपर्का मध्ये राहून प्रतिबंधात्मक उपाय करू शकता.

▪️ मूत्रपिंडाचे विकार :
हृदय विकार निर्माण करण्यामध्ये मूत्रपिंडाच्या विकारांचा संभाव्य संबंध आहे. जर तुम्हाला आधीपासूनच मूत्रपिंडाचे विकार असतील, तर तुम्हाला धमन्यांचे विकार होण्याची अधिक शक्यता आहे.

▪️ अनपेक्षित व्यायाम :
जरी व्यायामामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होत असतील, तरी ते हृदयावर परिणाम करत असतात. तुम्हाला धोकादायक समस्या असताना जर तुम्ही अति तीव्रतेचे व्यायाम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यास अतिशय हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तीव्रतेचा व्यायाम करणार असाल तर तज्ञांचा योग्य सल्ला घेणे हे केव्हाही उत्तम ठरेल.

▪️ प्रीइक्लाम्पशीया:
प्रीइक्लाम्पशीया हे कारण फक्त गरोदर स्त्रियांच्या बाबतीत दिसून येते. ही एक वैद्यकीय समस्या आहे ज्यामध्ये गरोदरणा दरम्यान रक्तदाबा मध्ये वाढ होते. ही समस्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधिचे विकार व उच्च रक्तदाब उद्भवण्याच्या शक्यता वाढवते. जर तुम्हाला प्रीइक्लाम्पशीयाचे निदान झाले असेल तर लगेचच तज्ञांची भेट नियोजित करा.

▪️ पेरिफेरल आरटेरियल डिसीज – धमण्यांचा विकार:
शरीरामध्ये पसरलेल्या सर्व धमण्या या शुद्ध रक्त हृदयाकडून शरीरामधील प्रत्येक अवयवा पर्यंत पोहोचवतात. जर सध्या तुम्हाला धमण्यांच्या विकाराचे निदान झाले असेल तर हे काळजी करण्याचे कारण आहे. कारण की अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये हृदय विकार निर्माण होण्याच्या सर्वाधिक शक्यता असतात. अशावेळी हृदयरोग तज्ञांना भेटणे केव्हाही योग्य ठरेल.

▪️ कंजनायटल हार्ट डिसीज – जन्मजात हृदय विकार:
जर तुम्हाला जन्मजात हृदय विकार असेल तर तुम्ही नियमितपणे आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. हा एक चुकीचा समज आहे की जन्मजात हृदय विकाराचे एकदा उपचार केले की त्यानंतर त्याला उपचाराची किंवा काळजीची आवश्यकता नाही. परंतु हे इतके सहज आणि सोपे नाहीये. तुम्हाला विविध नियमांचे पालन करावे लागते आणि वेळोवेळी हृदयरोग तज्ञांकडुन आरोग्य तपासणी करून घ्यावी लागते.

▪️ निष्कर्ष:
तुम्ही हृदयाचे महत्त्व समजून घेणे अतिशय महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, त्याच्या आरोग्या कडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी गंभीर परिणामांना कारण ठरेल. तसेच ते तुमच्यासाठी काही क्षणांमध्ये जीवघेणे बनू शकते. वर नमूद केलेल्या कारणां शिवाय इतरही बरीच कारणे आहे ज्यामुळे तुम्हाला हृदयरोग तज्ञांना भेटणे आवश्यक ठरू शकते. तथापि, त्यामधील बरीच कारणे अशी आहेत की जी जीवनशैलीमध्ये काही बदल करून प्रतिबंधित करता येऊ शकतात. जर तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य हवे असेल तर तुम्हाला काही विवेकी व गंभीर बदलांची अंमलबजावणी करावी लागेल.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

हार्ट फेल्युअर : प्रकार, लक्षणे, करणे आणि उपचार

हार्ट फेल्युअर हा एक बऱ्याच दिवसांपासून असलेला, वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक

महिलांमध्ये आढळणारी हार्ट अटॅकची लक्षणे:

हृदयविकाराचा झटका हा पुरुषांमध्ये तसेच महिलांमध्ये जीवघेणा आजार आहे; तथापि, दोघांमध्ये आढळणारी लक्षणे विवीध प्रकारची असतात.

हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचे सहज सोपे मार्ग

जागतिक मृत्यू दरासाठी जरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे मुख्य कारण असले तरी असे बरेच मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही हृदय ...