VishwaRaj

हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचे सहज सोपे मार्ग

जागतिक मृत्यू दरासाठी जरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे मुख्य कारण असले तरी असे बरेच मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही हृदय आरोग्यपुर्ण ठेवू शकतात. अवयव आरोग्यपूर्ण स्थितीमध्ये आहे याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. हृदयाने सातत्याने आणि संपूर्ण कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी तुम्ही त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हृदयरोग तज्ञांना भेटणे हा केव्हाही आनंददायक अनुभव नाही. तुम्हाला रोगनिदान आणि त्यानंतर उपचाराबाबत दिल्या जाणाऱ्या सल्ल्या बद्दल ताण येईल. तथापि, असे बरेच सोपे मार्ग आहेत ज्यांमार्फत तुम्ही हृदयावर नियंत्रण मिळवू शकता. याची सुरुवात तुम्ही तुमच्या जीवनशैली मध्ये अगदी साधे परंतु ठोस बदल करून करू शकता.

🔹 हृदय आरोग्यपूर्ण ठेवण्याचे मार्ग:
हृदय हा निःसंशयपणे मानवी शरीरामधील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो अविरतपणे त्याचे कार्य करत असतो त्यामुळे त्याला व्यवस्थित काळजी ची आवश्यकता असते. जर तुम्ही हृदयाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली नाही तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधीच्या खूप मोठ्या आजारांना सामोरे जावे लागेल.
खाली दिलेले काही उपाय अंगीकारा आणि आरोग्यपूर्ण हृदय मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

1) आहारामध्ये वरून घेण्यात येणाऱ्या साखरेचे प्रमाण अतिशय कमी करा:
हृदय विकार होण्यासाठी फक्त लठ्ठपणा हा एकटाच कारणीभूत नसतो. तुमचे वजन अगदी प्रमाणामध्ये असले तरीसुद्धा तुम्हाला हृदय विकार असू शकतात. अन्नपदार्थां मधील एक मुख्य घटक जो की हृदय व रक्तवाहिन्यां संबंधिच्या विकारांचा धोका वाढतो तो म्हणजे साखर होय. विविध संशोधनांच्या अहवालांनुसार आहारामधील साखरेचे अति प्रमाण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर या विकाराला कारणीभूत ठरते, पुढे या विकारामुळे हृदय विकार होण्याची दाट शक्यता वाढते

यावरून असे दिसते की आहारामधील साखरेचे प्रमाण अतिशय कमी करणे गरजेचे आहे.

2) आहारामध्ये पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश :
संशोधनानुसार, ज्या लोकांच्या आहारामध्ये वनस्पतीजन्य पदार्थांचा जास्त समावेश आहे त्यांना हृदय विकार होण्याची शक्यता खूप कमी आहे. तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या आणि फळांचा अधिक समावेश केल्यास तुम्हाला त्याचा त्वरित फायदा होईल कारण ते अतिशय पौष्टिक आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्याने त्या तुम्हाला रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणा मध्ये ठेवण्यास मदत करतील तसेच त्या अतिशय चविष्ट देखील असतात. लिंबूवर्गीय / सिट्रस फळे, बीट रूट, आंबा, रताळे आणि इतर पालेभाज्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.

3) मिठाचे सेवन कमी करा :
मिठाचा उच्चरक्तदाबाशी सरळ संबंध असतो. उच्च रक्तदाब असताना हृदय विकार होण्याची मोठी शक्यता असते. असा सल्ला दिला जातो की तुम्हाला शक्य आहे तितक्या प्रमाणामध्ये मिठाचे सेवन कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात घ्या की प्रौढ लोकांना दररोज ( जास्तीत जास्त )फक्त 6 ग्रॅम मिठाचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.
तुम्ही अन्नपदार्थ शिजवताना मिठाचे प्रमाण कमी ठेवून सेवन कमी करू शकता तसेच प्रक्रिया केलेल्या अन्ना मधली मिठाचे प्रमाण देखील लक्षात घ्या.

4) व्यायामाचा विचार करा:
व्यायामामुळे तुम्ही फक्त तंदुरुस्त राहता असे नाही तर तुमचे हृदय देखील आरोग्यपूर्ण राहते. शिवाय, त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. तथापि, तुम्ही कोणताही तीव्र स्वरूपाचा व्यायाम प्रकार करू नका. सर्वोत्तम परिणामांसाठी मध्यम स्वरूपाचे व्यायाम प्रकार करा.

संपूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम कराल अशा पद्धतीने व्यायामाचा आराखडा तयार करा यामुळे तुम्हाला हृदय विकाराचा धोका कमी करण्यास मदत होईल. तुम्ही दररोज 30 मिनिटे चालण्याच्या व्यायामाची देखील निवडू शकता.

5)कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवा:
मानवाच्या शरीरामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन ( बॅड कोलेस्टेरॉल ) आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन ( गुड कोलेस्टेरॉल ) हे ते दोन प्रकार आहेत. हृदयविकार टाळण्यासाठी तुम्हाला बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवणे आवश्यक आहे.
ओट्स, सफरचंद, सोयाबीन, बार्ली / सातू, द्विदल पदार्थ / सुका मेवा इत्यादी प्रकारचे अन्नपदार्थ आहारामध्ये सेवन करून तुम्ही कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे तपासणी करा.

6)धूम्रपान टाळा:
धूम्रपान हे नुसतेच त्रासदायक व्यसन मानले जात नाही तर त्याचे बरेच गंभीर परिणामही पहावयास मिळतात. धूम्रपान हे रक्तामध्ये गुठळ्या होण्याचा धोका, स्ट्रोक ची तीव्रता वाढवते. शिवाय, ते ऍथेरोस्क्लेरोसिस (रक्तवाहिन्यांच्या भिंती क्षार साठुन जाड होणे )चा धोका वाढवते आणि रक्ताच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करते. अजूनही तुम्ही धूम्रपान करत असाल तर ताबडतोब थांबवा. लक्षात ठेवा व्यसनमुक्ती चा प्रवास हा अतिशय अवघड असेल.

7)पुरेशी झोप घ्या :
हृदयाला आरोग्यपुर्ण ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल, तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधीचे विकार उद्भवण्याचा धोका वाढतो. तसेच दिवसभर काम करताना कामामध्ये अपुऱ्या ऊर्जेमुळे अडथळा निर्माण होतो.

दररोज किमान 7-8 तास झोप घेणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला निद्रानाशा चा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे.

8)वजन अटोक्यामध्ये ठेवा :
लठ्ठपणा हा नेहमी हृदय विकारा बरोबर संलग्न असणारा धोकादायक घटक आहे. जर तुमचे वजन सामान्य पातळी पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कोलेस्टेरॉल ची पातळी वाढणे आणि उच्च रक्तदाब निर्माण होण्याचा धोका वाढलेला असतो. तसेच टाईप 2 प्रकारचा मधुमेह आणि स्ट्रोक उद्भवण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे तुम्ही लठ्ठ बनणे केव्हाही योग्य नाही. यासाठी तुम्ही व्यायाम करण्यास आणि आहारामध्ये पालेभाज्या आणि फळे यांचे सेवन करण्यास सुरवात करा.

9) माफक प्रमाणामध्ये दारूचे सेवन :
दारूचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयाच्या स्नायूंचा ऱ्हास होणे इत्यादी प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होतात. तथापि, थोड्या प्रमाणामध्ये दारुचे सेवन करणे या मागील फायदे / तोटे अजूनही अस्पष्ट आहे. कमीत कमी प्रमाणामध्ये दारुचे सेवन करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. अति प्रमाणामध्ये दारू घेतल्याने तुमचे कोणतेही हित साधणार नाही.

10) तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या:
हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये नेहमीच मानसिक आरोग्याला विचारामध्ये घेतले जात नाही. जर तुम्हाला हृदय आणि रक्तवाहिन्यां संबंधीच्या विकारांना टाळायचे असेल तर तुम्हाला मानसिक आरोग्य व शांतता अतिशय आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नैराश्याचा हृदय विकारा बरोबर अतिशय जवळचा संबंध आहे.

जे लोक तणाव मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये जगतात त्यांना हृदय विकार होण्याच्या शक्यता अतिशय कमी असतात. ताण तणाव हा हृदयाला हानी पोहोचवण्या चे काम करतो. त्यामुळे, कुटुंबासमवेत आणि मित्र परिवाराबरोबर थोडा अधिक वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. तसेच जे लोक तुम्हाला चिंता आणि ताण तणाव देण्यास कारणीभूत ठरतात त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.

▪️ निष्कर्ष:
हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचे बरेच उत्तम मार्ग आहेत. जंक फूड खाण्यापेक्षा तुम्ही आरोग्यपूर्ण संतुलित आहार सेवन करा. याशिवाय, धूम्रपान आणि दारूचे सेवन बंद केल्यामुळे सुद्धा तुम्हाला मदत होईल. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही हृदयाला योग्य परिस्थितीमध्ये ठेवले तरच ते व्यवस्थित रित्या काम करत राहील.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

हार्ट फेल्युअर : प्रकार, लक्षणे, करणे आणि उपचार

हार्ट फेल्युअर हा एक बऱ्याच दिवसांपासून असलेला, वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक

महिलांमध्ये आढळणारी हार्ट अटॅकची लक्षणे:

हृदयविकाराचा झटका हा पुरुषांमध्ये तसेच महिलांमध्ये जीवघेणा आजार आहे; तथापि, दोघांमध्ये आढळणारी लक्षणे विवीध प्रकारची असतात.

12 कारणे आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हृदयरोग तज्ञांना भेटावेसे वाटेल

तुम्हाला माहित आहे का की दर वर्षी 17.9 लाख पेक्षा जास्त लोक हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकरांमुळे मृत्यू मुखी पडत ...