VishwaRaj

डॉ. सुशील देशमुख

डॉ. सुशील देशमुख
Dr Sushil (3)
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
एम बी बी एस, एम एस

डॉ. सुशील देशमुख हे कम्प्याशनेट, डायनॅमिक आणि जाणकार / हुशार असे जनरल शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रा मध्ये जवळपास 12 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर हे मूळव्याधाची लेझर बेस्ड शस्त्रक्रिया आणि हर्नियाची मिनिमल एक्सेसिव्ह शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ऍपेनडिसेक्टॉमी, कोलेसिस्टेक्टॉमी यांसारख्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये डॉ. देशमुख हे निष्णात आहेत. हेमीकोलेक्टॉमी, रिसेक्शन आणि ऍनास्टोमॉसीस, हिपॅटीकोजेज्युनोटॉमी, स्प्लेनेक्टॉमी, थायरॉईडेक्टॉमी, स्किन ग्राफ्टिंग, रोटेशनल फ्लॅप, बॅरीऍट्रिक प्रोसिजर्स – स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती करण्यामध्ये देखील डॉक्टरांचे मोठे नाव आहे. ऍबडॉमीनल स्टॅब इंज्युरीज, थोरॅसिक स्टॅब इंज्युरीज, पॉलीट्रॉमा, हेड अँड नेक ट्रॉमा यांसारख्या ट्रॉमा केसेस सुद्धा डॉक्टर व्यवस्थितरीत्या मॅनेज करतात.

🔹शिक्षण :

▪️भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे, महाराष्ट्र येथून एम बी बी एस.
▪️क्रिष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी, कराड, महाराष्ट्र येथून मास्टर ऑफ सर्जरी (एम एस ) (जनरल सर्जरी ).
▪️बेंगलोर येथून मिनिमल ऍक्सेस सर्जरी मध्ये फेलोशिप (एफ एम ए एस ).

🔹कामाचा अनुभव :

▪️वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी – चिंचवड, पुणे, महाराष्ट्र येथे काम केले आहे.
▪️इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, सरिता विहार, नवी दिल्ली येथे काम केलेले आहे.
▪️इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, आळंदी, पुणे येथे काम केले आहे.
▪️इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे येथे ज्युनियर कंन्सलटंट म्हणुन काम केले आहे.

🔹सध्याचा कामाचा अनुभव :

▪️विश्वराज हॉस्पिटल, लोणीकाळभोर, पुणे येथे जनरल कंन्सलटंट आणि लॅप्रोस्कोपीक सर्जन म्हणुन कार्यरत.
▪️मनिपाल हॉस्पिटल, पुणे येथे जनरल कंन्सलटंट आणि लॅप्रोस्कोपीक सर्जन म्हणुन कार्यरत.
▪️इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, विलू पुनावाला हॉस्पिटल, हडपसर येथे जनरल कंन्सलटंट आणि लॅप्रोस्कोपीक सर्जन म्हणुन कार्यरत.
▪️क्लाऊड नाईन हॉस्पिटल, कल्याणी नगर आणि मदरहुड हॉस्पिटल, खराडी येथे व्हिजीटींग कंन्सलटंट म्हणुन कार्यरत.
▪️सह्याद्री हॉस्पिटल, शास्त्री नगर, कोलंबीया एशिया, खराडी, जहांगीर हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनिक, वानवडी येथे पॅनल कंन्सलटंट म्हणुन कार्यरत.
▪️ऑलिव्ह हेल्थ केअर, विमान नगर, येथे कंन्सलटंट सर्जन म्हणुन कार्यरत.