VishwaRaj

अन्नपचनसंस्थेचे सामान्य विकार कोणते आहेत?

लोकांमध्ये अन्नपचनसंस्थेचे विकार हे अतिशय व्यापक प्रमाणात आहेत परंतु लोकांना त्याबद्दल बोलणे आवडत नाही. छातीती जळजळ होणे, पोटात गॅसेस होणे, पोटामध्ये वेदना होणे आणि इतर वेदना या काही मोठ्या चिंतेच्या किंवा गंभीर समस्या नाहीत परंतु अंतर्गत गंभीर विकारांची ही लक्षणे असू शकतात. तुम्ही तुमच्या समस्यांना दुर्लक्षित करू नका. खाली दिलेल्या लक्षणांपैकी जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणती लक्षणे आढळली तर त्वरित तुम्हाला डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.

🔹अन्नपचन संस्थेचे सामान्यपणे आढळणारे 10 विकार :
काही सामान्यपणे आढळणारे अन्नपचन संस्थेचे विकार तुमच्यासाठी येथे नमूद केलेले आहेत. या विकारां पैकी जर तुम्ही कोणत्याही विकाराने त्रस्त असाल तर त्वरित तुम्ही तज्ञांना दाखवा.

▪️पोटाचा फ्ल्यू :
पोटाचा फ्ल्यू हा एक प्रकारचा जंतुसंसर्ग आहे जो लहान आतड्याच्या वरील भागास होतो. पोटाच्या फ्ल्यू मुळे क्रॅम्पस – स्नायूंमध्ये पेटके येणे, अतिसार, उलट्या इत्यादी तुम्हाला त्रस्त करणारी सामान्य लक्षणे असतात. नोराव्हायरस आणि रोटाव्हायरस हे मुख्य विषाणू आहेत ज्यांमुळे पोटाचा फ्ल्यू होतो. हा आजार स्वतः आपोआप बरा होतो. तथापि, उलट्या आणि अतिसारामुळे तुमच्या शरीरामधुन बऱ्याच प्रमाणात द्रवपदार्थ – फ्ल्युड कमी होतो. भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिऊन आणि इलेकट्रोलाईट्स पेय पिऊन तुम्ही डीहायड्रेशन टाळू शकता.

▪️अल्सर :
तुमच्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे म्हणजे तुमचा आहार आणि तुमचा ताण तणाव यामुळे आढळणारा पेप्टिक अल्सर हा अतिशय सामान्य विकार आहे. परंतु अलीकडेच शास्त्रज्ञांना असे आढळून आले की पेप्टिक अल्सर हा विकार जीवाणूंच्या संसर्गामुळे होत आहे. याच बरोबर सूज कमी करणारी स्टिरॉइड विरहित नॅप्रोक्सिन आणि आयब्युप्रोफेन सारखी औषधे अतिप्रमाणात घेतल्याने सुद्धा अल्सर होतात. ही औषधे पोटाच्या आतील म्युकस नावाच्या आवरणाला हानी पोचवतात त्यामुळे जेव्हा हे आवरण हानी पोहोचल्यामुळे खराब होते तेव्हा पोटामधील ऍसिडचा टिशू बरोबर सरळ संपर्क येतो त्यामुळे पेप्टिक अल्सर निर्माण होतात.

▪️ गॅस्ट्रोइसोफेजीयला रिफ्लक्स डिसीज ( जी इ आर डी ):
जर तुम्हाला सातत्याने छातीमध्ये जळजळ होत असेल तर तुम्ही जी इ आर डी या विकाराने त्रस्त आहात. एल इ एस – लोवर इसोफेजीयल स्पिंक्टर हा पोट आणि अन्ननलिके मधील जोडणीचे काम करतो. जेव्हा हा स्पिंक्टर कमकुवत बनतो तेव्हा पोटामध्ये तयार झालेले ऍसिड अन्ननलिके मध्ये वरील बाजूस जाते यामुळे तुम्हाला छातीमध्ये जळजळ जाणवते. जर ही प्रक्रिया खूप दिवस तशीच चालू राहिली तर त्यामुळे तुमच्या अन्ननलिकेची गंभीर हानी होईल. तथापि, तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून तुम्ही यावर उपाय करू शकता. जेवताना थोड्या प्रमाणामध्ये जेवणे आणि नियमित व्यायाम यांमुळे तुम्हाला बरीच मदत होईल.

▪️ इरीटेबल बॉवेल सिंड्रोम ( आयबीएस ):
आय बी डी आणि आय बी एस हे दोन्ही वेगवेगळे विकार आहेत. आयबीएस मध्ये 30 दिवसां मधून किमान तीन वेळा आणि असे सलग तीन महिने तुम्हाला पोटामध्ये वेदना होतात. याबरोबर तुम्हाला अतिसार किंवा बद्धकोष्टता असू शकते. आयबीएस हा आयबीडी सारखा गंभीर विकार नाही, तो अन्नपचन संस्थेला काही हानी पोहोचवत नाही आणि तो अतिशय प्रचलित आहे. तथापि, या विकाराचे नक्की कारण अस्पष्ट आहे. तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये जेवण करून आणि ज्याने हा आजार वाढेल ते टाळून हा आजार बरा करू शकता. काही लोक आयबीएस बरा करण्यासाठी प्रोबायोटिक्स आणि तंतुमय पदार्थांचे सप्लीमेंट्स घेतात.

▪️ खूप दिवसांपासून ची बद्धकोष्टता :
खूप दिवसांपासूनच्या बद्धकोष्टते मध्ये तुम्हाला एका आठवड्यामध्ये फक्त तीन वेळा शौचास होते आणि असे सलग तीन आठवडे किंवा त्या पेक्षा जास्त दिवसांसाठी चालु राहते. अशा वेळी तुम्हाला जाणवेल की तुम्हाला अतिशय कडक शौचास होत आहे आणि ती गुदद्वारा मधून बाहेर येण्यास खूप त्रास होत आहे. अतिसारा प्रमाणे, बद्धकोष्ठतेच्या कारणाचे निदान तुम्ही लगेच करू शकत नाही.
या समस्येवर उपचार करण्यासाठी तुम्हाला तंतुमय पदार्थांचे सप्लीमेंट्स आणि शौचास मऊ करणाऱ्या औषधांची आवश्यकता लागेल. तुमच्या रोजच्या आहारामध्ये पातळ पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा, मुख्यत्वे पाण्याचा. हे सर्व उपाय केल्यानंतर देखील जर तुम्हाला आराम वाटला नाही तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. या परिस्थितीमध्ये तुमच्या अन्नपचन संस्थेला मदत करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही व्यायाम प्रकार सांगतील.

▪️ मुळव्याध :
मूळव्याध हा वेदनादायक असू शकतो. या विकारामध्ये गुदाशया मधील रक्तवाहिन्या सुजलेल्या असतात. शौचास झाल्यानंतर लाल रक्त पडणे, वेदना आणि खाज सुटणे ही या विकाराची लक्षणे आहेत. गरोदरपण आणि बद्धकोष्टता या दोन मुख्य कारणांमुळे मुळव्याध उद्भवतो. बऱ्याच लोकांना 45 वयानंतर मुळव्याध उद्भवतो असे दिसून आले आहे.

बद्धकोष्ठतेवर उपचार केल्यानंतर तुम्ही मुळव्याध बरा करू शकता त्यामध्ये तुमच्या जीवनशैलीत भरपूर पाणी आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करा. याबरोबरच तुम्ही मुळव्याधासाठी मिळणारे मलम वापरू शकता आणि खाज व वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये सिट्झ बाथ देखील करू शकता.

▪️ इनफ्लामेट्री बॉवेल डिसीज ( आयबीडी ):
आय बी डी मध्ये तुम्ही बऱ्याच दिवसांपासून अन्नपचन संस्थेला आलेल्या सुजे मुळे त्रस्त असता. अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉहन्स डिसीज हे आय बी डी चे दोन मुख्य प्रकार आहेत. प्रतिकारशक्ती संस्थेचा चुकीच्या प्रतिसादामुळे हे विकार उदभवतात. या विकारा दरम्यान तुम्हाला सूज आणि दाह निर्माण झालेला असतो त्यामुळे पोटामध्ये वेदना, ताप, अतिसार आणि वजनामध्ये घट ही लक्षणे उद्भवतात. तथापि, अल्सरेटिव्ह कोलायटिस हा विकार गुदाशय आणि मोठ्या आतड्याला होतो. जी औषधे प्रतिकारशक्ती संस्थेचा प्रतिसाद थांबवू शकतात ती या विकरावर उपचार करण्यास मदत करू शकतील.

▪️डायव्हरटीक्युलर डिसीज :
या विकारामध्ये मोठ्या आतड्याच्या आतील आवरणावर छोटे कप्पे तयार होतात आणि तेथे सूज देखील निर्माण होते. हा विकार जास्त करून 60 – 80 या वयोगटामध्ये आढळून येतो. डायव्हरटीक्युलॉसीस मध्ये पोटाच्या खालील बाजूस वेदना, बद्धकोष्टता आणि पोट फुगणे ही लक्षणे तुम्हाला जाणवतील. तथापि, खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही हा विकार बरा करू शकता. परंतु गुदाशयामधून रक्त पडणे अशा गंभीर समस्यांच्या वेळी तुम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टर तुम्हाला हा विकार बरा करण्यासाठी पातळ पदार्थ सेवन करण्यास सुचवतील आणि अँटिबायोटिक्स किंवा शस्त्रक्रिया सुचवतील.

▪️पित्ताशयामधील खडे :
बाईल ज्यूस किंवा पचनास आवश्यक असणारा द्रवपदार्थ जेव्हा पित्ताशयाच्या पिशवीमध्ये साठवला जातो आणि तो कडक बनतो तेव्हा त्याचे खड्यां मध्ये रूपांतर होते. तथापि, हे खडे प्रत्येकवेळी त्रासदायक नसतात. बरेचदा यामध्ये कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत आणि आपोआप हा विकार बरा होतो. कदाचित, काही रुग्णांमध्ये जंतूसर्ग होतो किंवा अतिशय तीव्र वेदना होतात. ताप, उलटी आणि मळमळ ही देखील लक्षणे या विकारात दिसून येतात. पित्ताशयाच्या खड्यां साठी डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रिया सुचवू शकतात.

▪️सिलीयाक डिसीज :
सिलीयाक डिसीज आणि ग्लूटीन सेन्सिटिव्हिटी समस्येमध्ये सारखीच लक्षणे असतात. या दोन्ही मध्ये पोटामधील वेदना, पोट फुगणे आणि अतिसार ही लक्षणे असतात. जेव्हा तुम्हाला शंका येईल की तुम्ही या आजाराने त्रस्त आहात तेव्हा स्वतः रोगनिदान करू नका, रोगनिदानासाठी त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. सर्व लक्षणे समान असली तरी सिलीयाक हा ऍटोइम्यून डिसीज आहे जो लहान आतड्याला हानी पोहोचवू शकतो. ग्लूटीन युक्त आहार टाळला तर तुम्हाला यामध्ये हा विकार बरा करण्यास थोडी मदत होईल. ग्लूटीन चे सेवन कमी करण्यासाठी बार्ली (जव / सातू ), ओट्स, रे आणि गहु हे अन्नघटक टाळण्याचा प्रयत्न करा.

▪️ निष्कर्ष:
जर तुम्ही वर नमूद केलेल्या कोणत्याही विकाराने त्रस्त असाल तर आहारामध्ये बदल करून तो बरा करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आरोग्यपूर्ण सवयी अंगीकारा उदा. सकाळी व्यायाम करणे. हे सर्व केल्यानंतरही जर तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये कोणतीही प्रगती जाणवत नसेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर भेटणे आवश्यक आहे. जर ठराविक कालावधी नंतर लक्षणे पुन्हापुन्हा येत असतील तर त्यांच्याकडे केव्हाही दुर्लक्ष करू नका. यावर चर्चा करणे कठीण असू शकते परंतु उशीर होण्याआधीच नेहमी रोगनिदान करून घ्यावे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

आंबीलीकल – बेंबीमधील हर्नियाची लक्षणे:

शरीरामधील टिश्यु किंवा स्नायूच्या कमजोर भागामधून शरीरातील अंतर्गत अवयव हा स्वतःला बाहेर ढकलतो आणि त्यामुळे हर्नियाची समस्या उद्भवते.