VishwaRaj

आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असलेले 10 अन्नपदार्थ:

जर तुमच्या आतड्यांचे कार्य असंतुलित असेल तर, ते बऱ्याच आजारांना निमंत्रण देईल. आतड्यां मधील चांगल्या जीवाणूंचे (बॅक्टेरीया / मायक्रोबायोम )संतुलन राखण्यासाठी विशिष्ट अन्न पदार्थ खाण्यास सुरुवात करा जे तुमच्या आतड्यांच्या आतील आवरण मजबूत करण्यास, पुन्हा व्यवस्थित करण्यास मदत करतील. प्रीबायोटीक्स आणि प्रोबायोटीक्स म्हणजे प्रतिजैविक पदार्थांचे सेवन आहारामध्ये वाढवा त्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात होईल. प्रोबॅक्टेरिया हे आरोग्यपूर्ण जीवाणूं सारखे काम करतात आणि ते प्रतिजैविक – प्रीबायोटीक्स पदार्थांमधून मिळतात. प्रीबायोटीक्स हे अपचनीय तंतुमय पदार्थ असतात.

आतड्यांचे संतुलित आरोग्य हे पोषण घटकांचे शोषण, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि योग्य अन्नपचन यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे इनफ्लामेट्री रिस्पॉन्स हा आरोग्यपूर्ण राहतो आणि प्रतिकारशक्ती संस्था मजबूत बनते.

🔹10 अन्नपदार्थ जे आतड्यांचे आरोग्य वाढवतील:
तुमच्या आतड्यांमध्ये वाढत असलेल्या जिवाणूंचा प्रकार हा तुम्ही सेवन करत असलेल्या आहारावर अवलंबून असतो. त्यामुळे असे काही अन्नपदार्थ आहेत जे खाण्याची तुम्ही सवय लावलीत तर तुम्ही आतड्यांचे उत्तम आरोग्य राखू शकाल.

1)मिसो :
तांदुळ आणि बार्ली (जव / सातू ) हे सोयाबीन बरोबर आंबवले तर तुम्ही मिसो तयार करू शकता. यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यपुर्ण एन्झाईम्स आणि जिवाणू असतात. तुम्ही याबरोबर सोवेरी पेस्ट म्हणजे चवदार मिश्रण ड्रेसिंग साठी किंवा सुप घेऊ शकता तसेच मॅरीनेटिंग टोफू किंवा सालमोन साठी डिप्स म्हणुन वापरू शकता. जर तुम्ही जॅपनीज अन्नपदार्थ बनवत असाल तर हा मुख्य अन्नपदार्थ असेल आणि तो दुधाच्या पदार्थांसारखे पोषणघटक देईल. जर तुम्ही मिसो हा आहारामधील मुख्य अन्नपदार्थ म्हणुन सेवन केलात तर तुमच्या आतड्यांचे आरोग्य सर्वोत्तम राहील आणि पचनाचे विकार कमी करण्यास मदत होईल.

▪️ऑलिव्ह ऑइल :
जेव्हा सूक्ष्मजंतू आणि जीवाणूंना पॉलीफेनॉल्स व फॅटी ऍसिड्स भरपुर प्रमाणात असलेले अन्नपदार्थ मिळतील तेव्हा त्यांची वाढ अतिशय उत्तम रित्या होईल. यावरील अभ्यासानुसार, हे घटक आतड्यांमधील सुज कमी करण्यास देखील मोठी मदत करतात. ऑलिव्ह ऑइल तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांवर ड्रेसिंग म्हणुन वापरू शकता
किंवा तयार केलेल्या भाज्यांवर वरून शिंपडू शकता. काही संशोधन अहवालांनुसार ऑलिव्ह ऑइल हे पचनाचे विकार बरे करण्यास देखील मदत करते. याचबरोबर ते पचनास लागणारे एन्झाईम्स चे उत्पादन कमी करून तुमच्या स्वादुपिंडास सुद्धा मदत करते.

▪️ दही – योगर्ट:
दह्याचे आहारामध्ये सेवन केल्याने प्रोबायोटिक सारख्या आरोग्यपूर्ण जिवाणूंची वाढ होते. परंतु दही खाताना ते साखर विरहीत असावे आणि पूर्ण फॅट / क्रीम असलेले असावे. नाष्ट्या मध्ये खाताना तुम्ही तुमच्या आवडीची फळे त्यामध्ये घालून खाऊ शकता. दह्या मध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचे जिवाणू असतात जे आतड्यांचे उत्तम आरोग्य राखण्यास अतिशय महत्वाचे असतात. परंतु त्या मध्ये साखर घातल्याने त्याची ही गुणवत्ता नाहीशी होते.

▪️वाटाणे :
आतड्यांमधील जिवाणूंना वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते त्यामुळे हे पदार्थ पुरवण्यासाठी भरपुर प्रमाणात पालेभाज्या आणि फळांचे सेवन करा. वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोल्युबल आणि इनसोल्युबल तंतुमय पदार्थ असतात. ते तुमच्या आतड्यांचे संतुलन राखण्यास मदत करतात. तुम्ही वाटाण्याला मोड आणू शकता, सुप किंवा सॅलेड मध्ये घालु शकता आणि त्याची भाजी देखील करू शकता.

▪️लसूण :
लसूण हा अतिशय उत्तम अन्नघटक आहे जो तुमच्या आतड्यांना आरोग्यपूर्ण ठेवतो. त्यामध्ये अँटीफ़ंगल आणि अँटीबॅक्टेरियल हे दोन्ही गुणधर्म असल्याने हानिकारक जिवाणूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच लसूण हा आतड्यांमध्ये यीस्ट ची संतुलित वाढ करण्यास मदत करतो. तुम्ही तुमचे पदार्थ चवदार बनविण्यासाठी त्याचा वापर करू शकता. शिवाय, तो चांगल्या जिवाणूंची ताकद वाढवून त्यांचे कार्य सुधारण्यास आणि आतड्यांचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत करतो.

▪️आले :
जर तुम्ही नियमितपणे आल्याचे सेवन करत असाल तर ते पोटामधील ऍसिड तयार करण्यास आणि अन्नपचन संस्थेला ऊर्जा देऊन अन्नाची व्यवस्थित हालचाल होऊन पुढे जाण्यास मदत करते. तुम्ही ताजे आले सूप, स्मूदी, चहा, स्टिव्हज यामध्ये घालू शकता किंवा फोडणीमध्ये वापरू शकता. ताजातवाना करणारा आल्याचा चहा जर तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये आले किसून टाकून ते उकळावे लागेल.

▪️केफीर :
केफीर हे एक प्रोबायोटिक योगर्ट आहे ते तुम्ही दूध आंबवून करू शकता. आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यामध्ये भरपूर प्रमाणात चांगले जिवाणू असतात. हा पदार्थ युरोप आणि आशिया च्या मधील पहाडी भागातील तसेच मध्य आशिया आणि रशिया येथील आहे. हे योगर्ट सूप आणि स्मूदी मध्ये घातल्यास अतिशय चविष्ट लागते किंवा सॅलेड वर ड्रेसिंग म्हणून सुद्धा वापरता येते.

▪️किमची :
किमची हा कोरियातील खास पदार्थ आहे. पालेभाज्यांना आंबवून हा पदार्थ तयार केला जातो आणि त्यामध्ये चांगले जिवाणू निर्माण केले जातात. यामध्ये तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे देखील असतात. तुम्ही अंडे, सॅलेड किंवा मटण यांच्या जोडीला हा चविष्ट पदार्थ सेवन करू शकता. कोरिया मध्ये हा पदार्थ एवढा प्रसिद्ध आहे की फोटो काढताना तेथील लोक चीज ऐवजी किमची म्हणतात.

▪️कोंबूचा :
आपल्या सर्वांना माहीत आहे की भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिण्याचे आरोग्यपूर्ण फायदे आहेत परंतु पाण्याशिवाय इतर पातळ पदार्थांचे काय? कोंबूचा हा एक चहासारखा पिण्याचा पातळ पदार्थ आहे, तो आंबवून तयार केला जातो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात चांगले जिवाणू उपलब्ध असतात. हा मंचुरिया मधील पदार्थ आहे. त्याला व्हिनेगार सारखी आंबट चव असते आणि तो ताजातवाना करणारे पेय म्हणुन प्रसिद्ध आहे. तुम्ही कंबूचा नुसते पिऊ शकता किंवा त्यामध्ये मसाले आणि फळे घालु शकता. कॉकटेल पेयाच्या बेस साठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता.

▪️बदाम :
बदामामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ, पॉलीफेनॉल्स आणि फॅटी ऍसिड्स असतात त्यामुळे ते प्रोबायोटिक गुणधर्मांनी युक्त आहे. आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंना बादाम म्हणजे मेजवानीच असते. जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असेल तुम्ही मूठ भर बदाम खाऊ शकता, हे उत्तम स्नॅक्स आहेत.

▪️ आहारा शिवाय इतर कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो?

वर दिलेल्या आहारा शिवाय अशा काही गोष्टी आहेत ज्या अंगिकारून तुम्ही तुमच्या आतड्यांचे आरोग्य राखू शकता.

@ पुरेशी झोप :
आतड्यांच्या आरोग्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो ते लोक मळमळ आणि पचनाच्या इतर विकारांनी त्रस्त असतात.

@ नियमित व्यायाम :
नियमित व्यायामामुळे ताण तणाव कमी होतो आणि शरीराचे योग्य वजन राखण्यास मदत होते. जर तुमचे वजन योग्य असेल तर तुम्हाला आतड्यांचे किंवा पचनाचे कोणतेही विकार होणार नाहीत.

@अँटिबायोटिक्स :
अँटिबायोटिक्स मुळे आतड्यांमधील हानिकारक जीवाणूं बरोबर चांगले जिवाणू देखील मारले जातात. त्यामुळे छोट्या कारणांसाठी उदाहरणार्थ घसा बसणे किंवा सर्दी, यांसाठी अँटिबायोटिक्स घेणे टाळावे. अशा प्रकारचे संसर्ग हे नेहमी विषाणूंमुळे झालेले असतात आणि ते अँटिबायोटिक्स ने बरे होत नाहीत.

▪️ निष्कर्ष:
वरील विश्लेषणा नुसार असे लक्षात येते की, पालेभाज्या आणि फळे हे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. नेहमी आहारामध्ये लाल मांस वापरा जळालेले मांस वापरू नका ते टाळा. त्यामुळे आतड्यांचा आणि पोटाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. याबरोबरच दारू आणि कॉफी यांचे सेवन देखील टाळा त्यामुळे पोटामधील ऍसिड प्रमाणामध्ये राहील. डाळी, नट्स आणि बिया यांमार्फत भरपुर प्रमाणात तंतुमय पदार्थ व प्रथिने यांचे सेवन करा, ते तुम्हाला मोठी मदत करतील.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

अन्नपचनसंस्थेचे सामान्य विकार कोणते आहेत?

लोकांमध्ये अन्नपचनसंस्थेचे विकार हे अतिशय व्यापक प्रमाणात आहेत परंतु लोकांना त्याबद्दल बोलणे आवडत नाही. छातीती जळजळ होणे,

आंबीलीकल – बेंबीमधील हर्नियाची लक्षणे:

शरीरामधील टिश्यु किंवा स्नायूच्या कमजोर भागामधून शरीरातील अंतर्गत अवयव हा स्वतःला बाहेर ढकलतो आणि त्यामुळे हर्नियाची समस्या उद्भवते.