VishwaRaj

आंबीलीकल - बेंबीमधील हर्नियाची लक्षणे:

शरीरामधील टिश्यु किंवा स्नायूच्या कमजोर भागामधून शरीरातील अंतर्गत अवयव हा स्वतःला बाहेर ढकलतो आणि त्यामुळे हर्नियाची समस्या उद्भवते. फिमोरल हर्निया, इंग्वायनल हर्निया, हयाटल हर्निया, अंबिलीकल हर्निया इत्यादी हर्नियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. अभ्यासानुसार, अंबिलीकल हर्निया हा इंग्वायनल हर्निया नंतर प्रौढ लोकांमध्ये सामान्यपणे आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा हर्निया आहे.

▪️ हर्निया कसा निर्माण होतो? :
प्रौढ लोकांमध्ये वाढते वजन आणि पोटावरील ताण या कारणांमुळे हर्निया निर्माण होतो. तसेच बऱ्याच दिवसांपासून चा खोकला किंवा गरोदरपणा नंतर देखील हर्निया निर्माण होतो. तथापि, अभ्यासानुसार गरोदरपणामध्ये अंबिलीकल हर्निया निर्माण होण्याचा धोका हा फक्त 0.08% एवढाच आहे.
पोटाच्या स्नायूंमधून बाळाची नाळ बाहेर पडते परंतु नंतर ते स्नायू पूर्णपणे बंद होत नाहीत आणि त्यामुळे त्या जागी आंबीलीकल हर्निया निर्माण होतो. हे समस्या जास्त करून प्रौढ लोकांपेक्षा लहान बाळांमध्ये उद्भवते.

आफ्रिकन- अमेरिकन बालके, ज्या बालकांचे वजन जन्माच्या वेळी कमी असते आणि जी बालके दिवस पूर्ण होण्याआधीच जन्म घेतात त्यांमध्ये हर्निया निर्माण होतो. सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर यांच्या मते मुले आणि मुली दोघांमध्ये देखील हा आजार निर्माण होण्याच्या टक्केवारी मध्ये काहीच फरक नाही.

तथापि, इतर परिस्थिती खालील प्रमाणे :
वारंवार गरोदरपण,
पोटामध्ये अतिप्रमाणात द्रव पदार्थ,
पोटाच्या शस्त्रक्रिया,
जुळी किंवा तीळी मुलं असणे

▪️ हर्निया ची लक्षणे काय असतात?
जेव्हा तुम्हाला आंबीलीकल हर्निया होतो, तेव्हा बेंबी मध्ये लंप किंवा गाठ असल्याचे तुमच्या लक्षात येईल. रडताना, हसताना, खोकताना किंवा शौचास करताना लहान बालकांमध्ये आंबीलीकल हर्निया सर्वात स्पष्टपणे दिसून येतो. तथापि, लहान मूल जेव्हा झोपलेले असते आणि आराम करत असते तेव्हा लंप पुन्हा बारीक होतो. शिवाय, बऱ्याच वेळा लहान मुलांमधील आंबीलीकल हर्निया हा वेदनारहित आणि निरूपद्रवी असतो परंतु प्रौढ लोकांमध्ये तो वेदनादायक असतो. हिर्निया चे मुख्य लक्षण म्हणजे बेंबी जवळ आलेला फुगवटा किंवा सुज होय. अशा परिस्थिती मध्ये शस्त्रक्रिया उपचार करणे योग्य ठरते.
याशिवाय, जर तुम्हाला खालील लक्षणे अढळली तर तुम्हाला त्वरित वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.

अचानकपणे बाळ जर उलटी करत असेल,
लहान मुलाला अतिशय वेदना होत असतील,
फुगलेला भाग, लहान मूल किंवा प्रौढ व्यक्ती मध्ये सुजलेला, हात लावल्यास वेदना होणारा आणि रंग बदललेला असेल तर?

▪️आंबीलीकल हर्निया मुळे कोणत्या संबंधित गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात?

लहान मुलांमध्ये फारसा काही गुंतागुंतीच्या समस्या उद्भवत नाहीत. परंतु काही प्रौढ आणि लहान रुग्णांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात. हर्निया मुळे बाहेर आलेला आतड्यांचा भाग हा पुन्हा पोटामध्ये ढकलने अतिशय अशक्य बनते. त्यामुळे या भागाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि अतिशय तीव्र वेदना होतात व तेथील टिश्यु मृत्यू पावतात. या सर्वामुळे जीवघेणा जंतूसर्ग होऊ शकतो किंवा मृत्यू देखील होतो.
या कारणांमुळे आंबीलीकल हर्निया ला ताबडतोब शस्त्रक्रिये ची आवश्यकता असते.
जेव्हा तुमच्या आतड्यांना पीळ पडेल किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होईल तेव्हा त्वरित डॉक्टरांना किंवा तातडीच्या सेवा विभागाला संपर्क करा.
जेव्हा खालील लक्षणे उद्भवतील किंवा जाणवतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आंबीलीकल हर्नियाला पीळ पडलेला आहे :
बद्धकोष्टता,
ताप,
मळमळ आणि उलटी,
पोटामध्ये तीव्र वेदना,
डाग पडणे किंवा लालसरपणा,
पोटामध्ये फुगलेला लंप.

जेव्हा तुम्हाला हर्निया निर्माण होतो तेव्हा कोणत्या डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे?

जर तुम्हाला हर्निया असेल तर प्राथमिक काळजी देणाऱ्या डॉक्टरां पासून सुरुवात करणे उत्तम ठरेल. तथापि, जर परिस्थिती अतिशय गंभीर असेल आणि तुम्हाला हर्निया रिपेयर साठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया तज्ञांना भेटणे अत्यावश्यक आहे.
जर तुम्हाला खात्री नसेल की ही समस्या हर्निया आहे किंवा नाही तर वाट न बघता लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घ्या. कारण की दुर्लक्षित हर्निया काळानुसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढून, काळपट डाग असलेला आणि अतिशय वेदनादायक बनू शकतो. पुढे जाऊन त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात आणि त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता लागू शकते. या सर्वांपेक्षा जर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेतली तर शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची जास्तीत जास्त संधी असते, वेदना कमी होतात आणि उत्तम आरोग्य प्राप्ती होते.

▪️ हर्नियाच्या शस्त्रक्रीया उपचारांपासून तुम्ही काय अपेक्षा करू शकता?

शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आणि सूचना डॉक्टर तुम्हाला देतील. या सूचनांमध्ये मुख्यत्वे आहाराचा आराखडा, शारीरिक ताण कसा टाळायचा आणि शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या भागाची कशी काळजी घ्यायची यांचा समावेश असतो. साधारणतः सामान्यपणे, रिपेअर शस्त्रक्रियेनंतर हर्निया पुन्हा उद्भवन्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते. हे प्रामुख्याने प्रदीर्घ उपचार आणि टीश्युंची कमजोरी या कारणांमुळे होऊ शकते. शिवाय, लठ्ठपणा आणि धूम्रपान ही देखील हर्निया पुन्हा उद्भवण्याची कारणे असतात.

▪️ निष्कर्ष:
हर्निया रिपेयर शस्त्रक्रिया ही अतिशय साधी, सोपी आणि सामान्य प्रक्रिया आहे. बहुतांश मुले ही शस्त्रक्रियेच्या दिवशीच कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्यां शिवाय घरी सुखरूप परततात. तथापि, हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही त्यामुळे त्याची लक्षणे लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्यावर उपचार करण्यात येतील याची खात्री करा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

अन्नपचनसंस्थेचे सामान्य विकार कोणते आहेत?

लोकांमध्ये अन्नपचनसंस्थेचे विकार हे अतिशय व्यापक प्रमाणात आहेत परंतु लोकांना त्याबद्दल बोलणे आवडत नाही. छातीती जळजळ होणे,