VishwaRaj

डॉ. विलास शिंगारे

डॉ. विलास शिंगारे
Dr Vilas Shingare - VishwaRaj Hospital
न्युरोसायन्सेस
एम बी बी एस, एम डी ( जनरल मेडिसिन)
डी एम ( न्यूरो )

डॉ. विलास सी शिंगारे हे नामांकित न्युरॉलॉजीस्ट (मज्जासंस्था रोग तज्ञ ) आहेत, त्यांना या क्षेत्रा मध्ये 12 वर्षांचा मोठा अनुभव आहे. डोके दुखणे, अपस्मार, स्ट्रोक, पार्किंसन्स डिसीज, चक्कर येणे, मानेमध्ये वेदना / पाठीमध्ये वेदना / स्पॉन्डीलॉसीस, पेरिफेरल न्युरोपॅथी, फायब्रोमायालजिया, मल्टीपल स्क्लेरॉसीस, मायास्थेशीया ग्रॅवीस, झोपेच्या समस्या इत्यादी आजारांवर उपचार करण्यामध्ये डॉक्टर निष्णात आहेत. संशोधनामधील त्यांच्या स्वारस्या मुळे त्यांनी न्युरॉलॉजी वरील पेपर्स आणि पोस्टर्स विवीध कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केलेले आहेत. डॉ. विलास हे इंडियन अकॅडम ऑफ न्युरॉलॉजी चे मेंबर देखील आहेत.

🔹शिक्षण :

▪️जी एम सी औरंगाबाद, एम यु एच एस नाशिक येथून एम बी बी एस.
▪️टी एन एम सी आणि बी वाय एल नायर हॉस्पिटल, मुंबई, एम यु एच एस नाशिक येथून एम डी मेडिसिन.
▪️टी एन एम सी आणि बी वाय एल नायर हॉस्पिटल, मुंबई, एम यु एच एस नाशिक येथून डी एम न्युरॉलॉजी.

🔹कामाचा अनुभव :

▪️दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे एक्स कंसलटन्ट न्युरॉलॉजीस्ट.
▪️रुबीहॉल क्लिनिक, सातारा येथे एक्स कंसलटन्ट न्युरॉलॉजीस्ट.
▪️बी जे एम सी आणि ससून हॉस्पिटल, पुणे येथे एक्स असिस्टंट प्रोफेसर (न्युरॉलॉजी).

🔹सध्याचा अनुभव :

▪️विश्वराज हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, नगर रोड येथे कंसलटन्ट न्युरॉलॉजीस्ट.
▪️राओ नर्सिंग होम, पुणे येथे कंसलटन्ट न्युरॉलॉजीस्ट.
▪️एस के नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर (न्युरॉलॉजी).