VishwaRaj

डॉ. संगीता एच. खराटे

डॉ. संगीता एच. खराटे
Untitled design (18)
लॅक्टेशन कन्सल्टंट
बी. एच. एम. एस., आय. बी. सी. एल. सी.

डॉ. संगीता या विश्वराज हॉस्पिटल मध्ये स्तनपान मार्गदर्शक आहेत. स्तनपानाचे महत्व आणि फायदे यांसाठी गरोदर आईचे प्रसूतीपूर्वीचे समुपदेशन, प्रसूती नंतर लवकरात लवकर स्तनपान सुरु करणे, हाय रिस्क केसेस मध्ये लवकरात लवकर मॅनेजमेंट करणे यांच्याशी संबंधित असलेल्या स्तनपानाच्या क्षेत्रा मध्ये डॉ. संगीता या कौशल्यपूर्ण काम करत आहेत. याचबरोबर त्या गरोदर आईला पॅलाडीयम किंवा कप फिडींग, कांगारू मदर केअर, ओरोमोटार स्टीम्यूलेशन, नॉन न्यूट्रिटिव्ह सकिंग यामध्ये सुद्धा प्रशिक्षित करतात.

सी सेक्शन, लुप इलेक्ट्रोसर्जिकल एक्सिजन प्रोसिजर (एल इ इ पी ), लॅपरोटॉमी, नॉन – डिसेंडन्ट व्हजायनल हिस्टेरोक्टॉमी (एन डी व्ही एच ) यांसारख्या प्रमुख शस्त्रक्रियांमध्ये असिस्ट करण्यामध्ये डॉ. संगीता या ऍक्टिव्हली इनव्हॉल्व आहेत.

नीओनॅटोलॉजी मध्ये, इंट्राकॅथ इंसर्शन, लंबार पंक्चर, इंट्युबेशन, पी आय सी सी, अंबीलीकल लाईन इंसर्शन, व्हेन्टीलेटरी मॅनेजमेंट या सारख्या नीओनॅटल प्रोसिजर्स करण्यामध्ये डॉ. संगीता या कौशल्यपूर्ण आहेत.

🔹शिक्षण / एज्युकेशन :

▪️महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स मधुन बॅचलर्स इन होमिओपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी
▪️लॅक्टेशन एज्युकेशन रिसोर्सेस (एल इ आर ) मधुन ब्रेस्टफिडींगचे ऑनलाईन शिक्षण
▪️इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट ( आय बी सी एल सी )

🔹पूर्वीचा अनुभव :

▪️ गनानाम हॉस्पिटल नागपूर मध्ये असिस्टंट डॉक्टर
▪️ नोबेल हॉस्पिटल पुणे येथे क्लिनिकल असिस्टंट म्हणून सेवा केली
▪️ सध्या विश्वराज हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल पुणे येथे लॅक्टेशन कंसल्टंट आणि क्लीनिकल असिस्टंट म्हणून कार्यरत.

🔹 विशेष स्वारस्य:

▪️ स्त्रीरोग शास्त्र आणि प्रसूती शास्त्र