VishwaRaj

हृदयविकाराचा झटका येण्या पूर्वी तुमचे शरीर तुम्हाला चेतावणी किंवा धोक्याची सुचना देते का?

जेव्हा हृदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यालाच मायोकार्डीयल इनफाक्शन असेही म्हणतात. हृदयविकाराचा झटका हा वेगाने काही क्षणात प्राणघातक बनतो. तथापि, प्रगत वैद्यकीय उपचार पद्धतींमुळे, आता लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे.

आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला धोक्याची सूचना देते का? या साठी, तुम्हाला हे माहीत असायला हवे की प्रत्येक हृदय विकाराचा झटका हा एक समान नसतो. काही हृदय विकाराच्या झटक्यां मध्ये खूप प्रमाणात लक्षणे असतात तर काहींमध्ये अतिशय कमी. परंतु काही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे झटके अचानक पणे उदयास येतात.

तथापि, बऱ्याच रुग्णांमध्ये शरीर हे भरपूर प्रमाणात धोक्याच्या सूचना देत असते.
सामान्यपणे, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे उद्भवलेली असतात. तुम्ही फक्त ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखण्या मध्ये सक्षम असणे हे प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी अतिशय गरजेचे आहे.

🔳 हृदयविकाराच्या झटक्याची धोक्याची लक्षणे:
हृदयविकाराच्या झटक्याचा प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला त्याच्या संबंधीच्या लक्षणांची कल्पना असणे अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लक्षणे ध्यानात घ्या:

▪️ निद्रानाश :
जरी व्यापकपणे माहीत नसले तरी निद्रानाशाचा हृदयविकाराच्या झटक्या बरोबर अतिशय जवळचा संबंध आहे. ज्या लोकांमध्ये हृदया संबंधी समस्या असतील त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे चिंता, अस्वस्थता आणि निद्रानाश निर्माण होतो. जर तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ञांना भेटणे ही उत्तम कल्पना आहे.

▪️ थकवा :
अनपेक्षित थकवा हा अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो. हा प्रकार स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळतो आणि बरेच दिवस याचा त्रास राहतो. लक्षात ठेवा हा थकवा शारीरिक किंवा मानसिक परिश्रमांमुळे नसतो. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि तो अंघोळ करण्या सारख्या साध्या साध्या कामांमध्ये देखील अडथळा निर्माण करतो.

▪️ श्वास घेण्यामध्ये समस्या :
श्वास घेण्यासाठी पुरेशी हवा उपलब्ध नसण्याची जाणीव म्हणजे खरे तर एक वैद्यकीय समस्या आहे तिला डिसप्नीया असे म्हणतात. हे हृदय विकाराचे विशेष लक्षण नाही. तुम्ही कदाचित इतर विवीध विकारांसाठी या लक्षणाचा अनुभव घेत असाल. हृदय विकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिने पूर्वीपासूनच हे लक्षण पुरुष आणि स्त्रिया मध्ये निर्माण होते.

▪️ छातीमध्ये वेदना :
छातीमध्ये वेदना होणे, हे जरी सामान्यपणे आढळणारे लक्षण असले तरी, पुरुष आणि स्त्रियांमध्ये त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. त्याची तीव्रता देखील दोघांमध्ये एक सारखी नसते. या वेदना हात, मान, जबडा आणि पोटापर्यंत हळूहळू पसरत जातात. छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.

▪️ पोटामध्ये वेदना :
रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही त्यामुळे कदाचित तुम्ही पोट फुगणे, मळमळ आणि पोटामध्ये वेदना होणे यांचा अनुभव घेत असाल. ही लक्षणे स्त्री आणि पुरुषांमध्ये एकसमान पद्धतीने उद्भवतात. लक्षात ठेवा या वेदनांना झटक्यासारखे येण्याचे वैशिष्ठ्य आहे. याच बरोबर, असा सल्ला दिला जातो की या लक्षणांचे फक्त पचनाच्या समस्या म्हणून उपचार करू नका.

▪️ असामान्यपणे घाम येणे :
हृदयविकाराचा झटका येण्याचे अजून एक लक्षण म्हणजे अति प्रमाणामध्ये घाम येणे. जर हे कोणत्याही कारणाशिवाय होत असेल तर हा नक्कीच हृदयविकाराचा झटकाच असू शकतो. विशेष म्हणजे, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे लक्षण दिसून येते. तथापि, हे लक्षण रजोनिवृत्ती मध्ये होणाऱ्या हॉट फ्लॅशेस आहेत असे चुकीचे समजले जाते.

हृदय विकाराच्या झटक्या पुर्वी येणारी ही काही धोक्याची लक्षणे आहेत. या लक्षणांना ओळखणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्ही यांना ओळखले नाही आणि दुर्लक्ष केले तर ते कदाचित हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरेल.

संबंधित पोस्ट