VishwaRaj

व्हिडीओचे वर्णन

श्री. दत्तात्रय एकनाथ काळभोर हे शेतकरी आहेत आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामुळे दुर दुर पर्यंत बराच प्रवास करावा लागतो.

फुले वितरणाचे काम असल्याने ते वयाच्या 69 व्या वर्षी मैलोन मैल प्रवास करत असत. दैनंदिन जीवनामधील कामे करत असताना त्यांना जाणवले की त्यांच्या गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या आहेत. शेवटी, वेदना अतिशय वाढल्या आणि नंतर श्री. दत्तात्रय काळभोर यांनी बऱ्याच डॉक्टरांकडून त्यासाठी उपचार करून घेतले परंतु गुडघ्याच्या वेदना या कमी होण्याऐवजी वाढतच होत्या. वेदना एवढ्या तीव्र होत्या की त्यांना चालणे अशक्य होते आणि त्यामुळे रांगावे लागत होते. या सर्व परिस्थितीमुळे डॉक्टरांनी श्री. दत्तात्रय यांना गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

शेवटी, श्री. दत्तात्रय यांना डॉक्टर उमेश नागरे – सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ यांच्या विषयी माहिती मिळाली. त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने डॉ. उमेश नागरे यांच्याकडून समुपदेशन घेतले आणि त्यांचा डॉक्टरांवर तसेच विश्वराज हॉस्पिटल वर विश्वास बसला. डॉ. उमेश नागरे यांनी काळभोर कुटुंबाला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती व्यवस्थित पणे दिली तसेच त्यांना गुडघा प्रत्यारोपणाचे फायदे देखील समजावून सांगितले.

या सर्वांनंतर शेवटी, श्री. दत्तात्रय यांची शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पणे झाली आणि आता ते त्यांच्या दैनंदिन जीवनामधील सर्व कामे व्यवस्थितपणे व वेदनेशिवाय करत आहेत. ते दररोज जिम मध्ये जातात आणि तेथील लोकांना प्रशिक्षण सुद्धा देतात व स्वतःची रोजची कामे अगदी सहजतेने करतात.

सध्या ते त्यांचे काम आणि आयुष्य अतिशय आनंदाने व्यतीत करत आहेत कारण डॉ. उमेश नागरे यांचे कौशल्य पूर्ण प्रयत्न आणि विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, मधून त्यांना मिळालेली सर्वोत्तम उपचार सेवा.

Related Videos