VishwaRaj

Video Description

आज Dr. Shraddha Kuspe, Consultant- Dietics and nutrition ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हृदयरोग रोखण्यासाठी ९ टिप्स (9 effective tips to prevent heart diseases) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

आजच्या युगामध्ये , भारतामध्ये जास्तीत जास्त तरुण पिढीमध्ये हृदय रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे . रक्तदाब (blood pressure ), cholestrol , tryglycerides , heartattack ह्या गोष्टींचा वयाच्या ३०शी पासूनच सुरुवात होत चालली आहे . ह्याच मुख्य कारण आहे बदलती जीवन शैली , बदलते खाण्या पिण्याचे प्रकार आणि stress ह्यामुळे हृदय रोग होण्याची शक्यता जास्त होते. तर जाणून घेऊया कि हृदयरोग रोखण्यासाठी ९ कुठल्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात कराव्यात.

  • Choose Healthy Diet

नेहमी पौष्टिक आणि पोषक आहार घ्यावा .

  • Heart healthy diet

आपल्या आहारामध्ये फळ , भाज्या , fiber युक्त पदार्थ , योग्य प्रकारचे proteins , इत्यादी गोष्टींचा समावेश असला पाहिजे .

  • Maintaining proper food schedule

आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असल्या पाहिजे . अवेळी जेवण जेऊ नये.

  • Be physically active

कायम सक्रिय राहा . दिवसातून २० मिनिटे तरी brisk walking करा . आठवड्यातील तीन दिवस व्यायाम करा .

  • Maintain healthy weight

तुमचं वजन कायम नियंत्रणात ठेवा . आपल्या शरीराच्या उंची आणि वयानुसार वजन असले पाहिजे . त्यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घ्या . Nutrional supplement घ्यायची गरज नाही . तुम्हाला डाएट करायचं असेल तर clinical nutritionist चा सल्ला घ्यावा .

  • Manage your stress

जास्त तणाव घेऊ नका . stress मुळे शरीरात असलेल्या arteries वरती blood pressure वाढवतो व त्यांना damage करतो . कायमstress मध्ये राहिल्याने कालांतराने arteries damage होऊ शकतात आणि त्याचे रूपांतर हृदय रोगात होण्यासाठी वेळ लागत नाही . त्यामुळे stress manage करणे खूप आवश्यक आहे.

  • Engage into good habits

योगासने करा किव्हा ध्यान ( meditation) करा , एखादा छंद जोपासा .

  • Avoid unhealthy habits

धूम्रपण किव्हा मद्यपान वर्ज्य करा . रोज रोज बाहेरच खाणं टाळा.

  • Regular check-up

आपली cholesterol आणि triglyceride लेवल दार ६ महिन्याने तपासा . वयाच्या ३०शी नंतर ह्या गोष्टीच भान ठेवणे खूप महत्वपूर्ण आहे .

Related Videos