VishwaRaj

मूळव्याध : स्टेपलर उपचारा पेक्षा लेझर उपचार उत्तम आहेत का?

Varicose veins treatment

व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे काय आणि त्यावर कोणते उपचार असतात

▪️वाहिन्या म्हणजे काय?


वाहिन्या म्हणजे ट्यूब सारखा आकार असलेली रचना होय. या वाहिन्या शरीराच्या विवीध भागा मधुन अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदया कडे वाहुन नेतात.

▪️वाहिन्यांना काय असते?


वाहिन्यांना मधे मधे दारा सारख्या झडपा (व्हालव्ह ) असतात.

▪️झडपांचे कार्य काय आहे?


अशुद्ध रक्त पाया मधुन हृदया कडे वाहुन नेणे हे वाहिन्यांचे काम असते म्हणजे वरील दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने. वाहिनीच्या झडपा या रक्त फक्त वरील दिशेने प्रवाहित करतात आणि एकदा का झडपा बंद झाल्या की रक्त पुन्हा खालच्या दिशेने वाहत नाही म्हणजे पुन्हा पायामध्ये येत नाही.

▪️वाहिन्यां मध्ये कोणत्या प्रकारचे विकार निर्माण होऊ शकतात?


सर्वात मोठा विकार वाहिन्यां मध्ये निर्माण होतो तो म्हणजे व्हेरीकोज व्हेन्स. व्हेरीकोज व्हेन्स मुख्यत्वे पायाच्या मागील बाजूस म्हणजे पिंढऱ्यां मध्ये निर्माण होतात.

▪️जेव्हा तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्स असतात तेव्हा नक्की काय होते?


सुरवातीला नमूद केल्या प्रमाणे झाडापा या वाहिनीच्या मुख्य हिरोज असतात. जेव्हा या झडपा काम करायच्या थांबतात तेव्हा वाहिनी मधील रक्त असमान दिशेने वाहायला सुरवात होते. यामुळे वाहिनीच्या नैसर्गिक आकारामध्ये विकृती निर्माण होते आणि वाहिन्या सामान्य अकारापेक्षा खुप मोठ्या होतात आणि कोष्ट्याच्या जाळ्या सारख्या दिसायला लागतात.

▪️व्हेरीकोज व्हेन्स मुळे तुम्हाला कोणता त्रास होतो?


– बाधित भागा मध्ये सुज येणे आणि त्यामुळे वेदना होणे.
– पायामध्ये जडपणा येणे.
– स्नायुंमध्ये पेटके येणे (जास्त करून रात्रीच्या वेळी ).
– जळजळ होणे, खाज येणे आणि बाधित भागा मध्ये ठणका निर्माण होणे.
– त्वचेचा रंग निळसर पर्पल झालेला असतो.

▪️व्हेरीकोज व्हेन्सच्या पायऱ्या :


पायरी 1 : स्पायडर व्हेन्स :
या पायरी मध्ये फुगलेल्या रक्त वाहिन्या पाया मध्ये कोष्ट्या च्या जाळ्या सारख्या दिसतात. काही रुग्णांमध्ये पाया मध्ये वेदना होऊ शकतात. व्हेरीकोज व्हेन्स वर जर या पायरी मध्ये उपचार केले तर हा आजार पुढे वाढत नाही.

▪️पायरी 2 : व्हेरीकोज व्हेन्स :
या पायरी मध्ये वाहिन्यांना दोरखंडा सारखा आकार आलेला असतो आणि त्या फुगलेल्या असतात तसेच त्वचे मधुन नेहमी बाहेर आलेल्या असतात. जर या पायरी दरम्यान योग्य ते उपचार केले नाहीत तर लक्षणांची गंभीरता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आणि परिस्थिती अजुन बिघडू शकते व त्यामुळे दैनंदिन जीवन मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

▪️पायरी 3 : लेग ईडीमा – पायाची सुज :
जेव्हा हा आजार वेळेनुसार वाढत जातो तेव्हा पाया मध्ये सुज निर्माण होते. पुर्ण दिवसभर काम केल्या नंतर किंवा खुप वेळ उभे राहिल्या नंतर पायाला क्रॉनिक सुज निर्माण होते. रेस्ट लेस लेग सिंड्रोम, त्वचेला खाज सुटणे, गंभीर वेदना होणे किंवा पेटके येणे ही इतर काही लक्षणे असतात.

पायरी 4 : त्वचे मधील बदल :
जस जसा हा वाहिन्यांचा आजार वाढत जातो तस तसे वाहिन्यांमधून रक्त बाहेर लीक व्हायला सुरवात होते आणि हे रक्त टिश्यु मधे साठुन तिथला त्वचेचा रंग बदलतो. त्वचेचा रंग ब्राऊन होतो आणि त्वचेला तिथे डाग पडल्या सारखे होते.

▪️पायरी 5 : लेग अल्सर :
या वाहिन्यांच्या आजाराची शेवटची पायरी म्हणजे पायाला अल्सर होणे ज्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर गंभीर परिणाम होतात. या पायरी मध्ये अतिशय तीव्र वेदना होत असतात, खाज सुटते, आणि सतत काळजी घ्यावी लागते आणि ड्रेसिंग करावे लागते.

▪️या व्हेरीकोज व्हेन्स पासून तुम्हाला काही आराम मिळु शकतो का?


होय, व्हेरीकोज व्हेन्स साठी उपचार पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला सौम्य लक्षणे असतील तर तुम्हाला मोठ्या शस्त्रक्रिये ची किंवा उपचाराची आवश्यकता नाही. या साठी आराम मिळावा म्हणुन काही सोपे नैसर्गिक उपाय आहेत.

▪️नैसर्गिक उपाय किंवा घरगुती औषधे :


1. व्यायाम :
तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली तुम्ही नियमितपणे साध्या प्रकारचे व्यायाम करून व्हेरीकोज व्हेन्स पासून सुटका मिळवू शकता.

2. बाधित पाय उंचावर ठवून झोपणे :
आराम मिळण्यासाठी झोपताना तुमचा बाधित पाय उशीवर ठेऊन झोपा. या मुळे तुमच्या वाहिन्यां मधुन सुरळीत रक्तप्रवाह प्रवाहित होईल.

3. वजन कमी करा :
जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्स झाल्या असतील तर, योग्य आहार सेवन करून, व्यायाम करून आणि जीवनशैली मध्ये काही बदल करून तुम्ही थोडे वजन कमी करू शकता आणि वेदने पासून थोडा आराम मिळवू शकता.

4. या गोष्टी टाळा :
बाधित पायाला खुप टाईट कपडे घालणे पूर्णपणे टाळा. खुप दीर्घ काळासाठी उभे रहाणे आणि दीर्घ काळासाठी बसने पूर्णपणे टाळा.

5. कॉमप्रेशन स्टॉकिंगज :
तुम्हाला कॉमप्रेशन स्टॉकिंगज कोणत्याही मेडिकल स्टोअर मधुन सहज मिळेल. मेडिकल स्टोअर मधुन तुम्हाला कॉमप्रेशन स्टॉकिंगज मिळतील. या स्टॉकिंगज बाधित पायावर दाब देतील आणि त्यामुळे वाहिन्या पिळल्या जाऊन आपोआपच वाहिन्या आणि हृदया मधील रक्तप्रवाह सुधारला जाईल.

▪️आधुनिक उपचार पद्धती :


जर तुमच्या व्हेरीकोज व्हेन्स तुम्हाला गंभीर पणे त्रास आणि वेदना देत असतील तर, तुम्हाला डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. ते तुम्हाला पुढील उपचार सुचवतील.

1. स्क्लेरोथेरपी :
ही एक ओ पी डी च्या पातळीची उपचार पद्धती आहे त्यामुळे या मध्ये भूल देण्याची आवश्यकता नसते. तुमचे तज्ञ डॉक्टर हे लहान आणि मध्यम आकाराच्या वाहिन्यां मध्ये सोल्युशन किंवा फोम इंजेक्ट करतात आणि त्यांना हानी पोचवून त्यांना बंद करतात. काही वाहिन्यांना ही प्रक्रिया पुन्हा रिपीट करावी लागते त्यानंतर त्या नाहीश्या होतात.

2. लेझर उपचार :
या उपचार प्रक्रिये मध्ये व्हेरीकोज व्हेन्स वर उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या मध्ये कोणत्याही प्रकारचा छेद घेतला जात नाही किंवा लहान आकाराच्या वाहिन्या बंद करण्यासाठी सुयांचा वापर केला जात नाही. या प्रक्रिये मध्ये तज्ञ डॉक्टर्स बाधित वाहिनी वर लाईटच्या स्ट्रॉंग स्फोटचा मारा करतात त्यामुळे ती वाहिनी बंद होते. हळू हळू बाधित वाहिनी कमी कमी होत नंतर कालांतराने पूर्णपणे नाहीशी होते.

3. फ्लेबेक्टॉमी :
याचा अर्थ स्टॅब ऍव्हलशन म्हणजे चीर फाड करणे. या उपचार पद्धती मध्ये डॉक्टर त्वचेवर लहान आकाराचा छेद घेतात आणि त्यातून व्हेरीकोज व्हेन काढून टाकतात.

4. लायगेशन आणि स्ट्रीपिंग :
या उपचार प्रक्रिये मध्ये डॉक्टर व्हेरीकोज व्हेनच्या वर असणाऱ्या त्वचे मध्ये छेद घेतात आणि त्या वाहिन्यांना बांधून टाकतात आणि काढून टाकतात.

5. रेडिओफ्रीक्वेन्सी उपचार पद्धती :
या उपचार पद्धती मध्ये रेडिओफ्रीक्वेन्सी एनर्जी ही बाधित वाहिनी मध्ये सोडली जाते आणि त्यावर जखम केली जाते व ती बंद केली जाते. ही उपचार पद्धती पायामधील गंभीरपने बाधित आणि मोठ्या आकाराच्या वाहिन्यांन साठी वापरली जाते. या प्रक्रिये दरम्यान तज्ञ डॉक्टर हे बाधित वाहिनी मध्ये कॅथेटर इन्सर्ट करतात आणि रेडिओफ्रीक्वेन्सी एनर्जीच्या मदतीने त्याचे टोक गरम करतात. ही तयार झालेली ऊर्जा त्या व्हेरीकोज व्हेनला नष्ट करते आणि तिला कोलॅप्स करून बंद करते.

6. इंडोस्कोपीक व्हेन सर्जरी :
या उपचार पद्धती मध्ये शस्त्रक्रिया तज्ञ पातळ व्हिडीओ कॅमेरा बाधित वाहिनी शोधण्या साठी इन्सर्ट करतात आणि नंतर त्वचेवर छेद घेतात व व्हेरीकोज व्हेन नष्ट करतात. ही उपचार पद्धती अशा रुग्णांमध्ये केली जाते ज्यांचा आजार पायरी 5 मध्ये पोचलेला असतो म्हणजे ज्यांना पायाचे अल्सर्स असतात.

▪️निष्कर्ष :
जेव्हा तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्स ची लक्षणे निदर्शनास येतील तेव्हा खुप उशीर होण्या आधी आणि कोणतीही आधुनिक उपचार पद्धती किंवा शस्त्रक्रिया टाळण्यासाठी तुमच्या जवळील डॉक्टरांना त्वरित भेट द्या.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...