VishwaRaj

कोणत्या प्रकारचा त्वचेचा कर्करोग तुमच्यासाठी जीवघेणा असु शकतो?

Cancer Treatment - VishwaRaj Hospital

कर्करोगाच्या प्रकारां पैकी सर्वात प्रचलित कर्करोग म्हणजे त्वचेचा कर्करोग होय. हा कर्करोग निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्वचेमध्ये अनियंत्रित आणि असामान्य पेशींची वाढ होणे होय. सामान्यपणे हा कर्करोग चेहरा, टाळू, छाती, हात, कान, ओठ इत्यादी भागांवर निर्माण होतो. त्वचेचे कर्करोग निर्माण होणे हे त्वचेचा कोणत्या प्रकारचा टोन आहे यावर अवलंबुन नसते.


त्वचेच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार असतात, ते खालीलप्रमाणे –

▪️मेलॅनोमा
▪️स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (एस सी सी )
▪️बेझल सेल कार्सिनोमा (बी सी सी )

याव्यतिरिक्त त्वचेच्या कर्करोगाचे काही दुर्मिळ प्रकार देखील आहेत. ते पुढीलप्रमाणे – सीबॅसीअस ग्लॅन्ड कार्सिनोमा, कापोसी सर्कोमा, डरमॅटोफायब्रोसर्कोमा प्रोट्रूबरन्स आणि मार्केल सेल ट्यूमर्स.
बेझल सेल कार्सीनोमा, स्क्वॅमस सेल कार्सीनोमा, आणि मेलॅनोमा हे सर्व मॅलीग्नांन्ट कर्करोगाचे प्रकार आहेत. तथापि, बेझल सेल कार्सीनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सीनोमा हे मेलॅनोमा एवढे घातक नसतात. कारण ते शरीराच्या ठराविक भागा पर्यंतच मर्यादित असतात आणि ते उपचारा नंतर बरे होण्यासारखे असतात. परंतु, जर यांवर वेळीच योग्य उपचार झाले नाहीत तर यांच्यामुळे बरेच घातक परिणाम होऊ शकतात.

🔹त्वचा कर्करोग, त्यांचे विवीध प्रकार आणि लक्षणे खालीलप्रमाणे :

त्वचेचा कर्करोग हा जास्तकरून ऊन्हाच्या संपर्का मधे येणाऱ्या भागां मध्ये निर्माण होतो. ज्यामध्ये ओठ, मान, टाळू, कान, छाती, हात, पाय इत्यादी भागांचा समावेश असतो. तथापि, ऊन्हाच्या संपर्का मधे न येणाऱ्या भागां मध्ये देखील कर्करोग निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, बोटांच्या नखांच्या खाली, जननेंद्रीयांचा भाग, तळवे इत्यादी.
त्वचेचा कर्करोग होणे आणि त्वचेचा टोन यांमध्ये चुकीची धारणा आहे. परंतु, वास्तविकपने, त्वचेचा कर्करोग हा विवीध प्रकारचा त्वचेचा टोन असणाऱ्या लोकांमध्ये निर्माण होतो. त्वचेच्या कर्करोगाचे विवीध प्रकार आहेत आणि त्यांची विवीध व विस्तृत लक्षणे आहेत.

1. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा:-

नेहमी, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा ऊन्हाच्या संपर्का मधे येणाऱ्या भागांमध्ये निर्माण होतो उदा. चेहरा, हात, पाय इत्यादी. तथापि, ज्या लोकांच्या त्वचेचा रंग हा अती गडद असतो त्यांच्या मध्ये ऊन्हाच्या संपर्का मधे न येणाऱ्या भागांमध्ये देखील कर्करोग निर्माण होतो. त्याची लक्षणे खालीलप्रमाणे :
▪️पपुद्रा आणि खवले असलेली सपाट जखम.
▪️लालसर गाठ (जी कठीण असते ).

2. बेझल सेल कार्सीनोमा :-

बेझल सेल कार्सीनोमा हा सुद्धा मान, ओठ आणि चेहरा या भागांमध्ये निर्माण होतो. हे भाग असे आहेत ज्यांचा ऊन्हा बरोबर अती जास्त प्रमाणा मधे संपर्क येतो. काही लक्षणे खालीलप्रमाणे :
▪️वारंवार कर्करोग निर्माण होणे (जरी तो बरा होणार असेल ).
▪️मेनासारखे किंवा पर्ल सारखे टेंगुळ.
▪️अलर्सर मधुन रक्तस्त्राव ज्यावर पपुद्रा देखील असतो.
▪️सपाट स्कार – सारखी जखम (त्याला ब्राऊनिश अपीअरन्स असतो )

3. मेलॅनोमा :-

त्वचेचा वेगवेगळा टोन असणाऱ्या लोकांमध्ये मेलॅनोमा निर्माण होऊ शकतो. ऊन्हाच्या संपर्का मधे न येणाऱ्या भागांवर देखील हा कर्करोग निर्माण होतो. याशिवाय, तो शरीराच्या कोणत्याही भागावर निर्माण होऊ शकतो. पुरुषां मध्ये, या प्रकारचा कर्करोग हा चेहऱ्यावर निर्माण होऊ शकतो. तथापि, स्त्रियां मध्ये हा कर्करोग पायाच्या खालील भागा मध्ये निर्माण होऊ शकतो. ज्या लोकांचा त्वचेचा रंग हा अतिशय गडद असतो त्यांच्या मध्ये मेलॅनोमा हा पायाचे तळवे, हाताचे तळवे, आणि नखांच्या खालील भागा मध्ये निर्माण होऊ शकतो.
मेलॅनोमाची बरीच लक्षणे आहेत त्यांपैकी काही लक्षणे खालीलप्रमाणे :
▪️जखम होणे आणि खाज सुटणे (यामध्ये जळजळ होऊ शकते आणि ते काही प्रमाणात वेदनादायक असते.)
▪️ब्राऊनिश स्पॉट (मोठा आणि त्याबरोबर गडद रंगाचे ठिपके )
▪️लहान आकाराची जखम जिच्या कडा अनियमित असतात (याचा काही भाग हा निळा – काळा, लाल, निळा, किंवा पांढरा दिसू शकतो )
▪️आधीपासूनच जर त्वचेवर तीळ असतील तर त्यामध्ये बदल होतात (तिळाच्या आकारामध्ये, रंगामध्ये आणि टेक्सचरमध्ये बदल होऊ शकतात. त्यामधुन रक्तास्त्राव देखील येऊ शकतो.)
▪️तोंड, हाताचे तळवे, नाक, पायाचे तळवे, योनीमार्ग, बोटांची टोके, गुदद्वार, आणि पायाचे अंगठे इत्यादिं मध्ये गडद रंगाची जखम.

4. मार्केल सेल कार्सीनोमा :

मार्केल सेल कार्सीनोमा हा हेअर फॉलीकल्स आणि त्वचेच्या खाली शाईनी नोड्युल सारखा निर्माण होतो. या कर्करोगाला न्युरोइंडोक्राईन कार्सीनोमा असेही म्हणतात. या प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगाचे कारण हा अजूनही चालु असलेल्या संशोधनाचा विषय आहे. तथापि, मार्केल सेल पॉलीमाव्हायरस हा या प्रकारचा कर्करोग निर्माण करण्यास कारणीभूत आहे असे संशोधकांच्या संशोधनात आलेले आहे. परंतु, अजुन तपशीला शिवाय, निश्चितपणे काहीही म्हणू शकत नाही. वेदनारहित गाठ हे मार्केल सेल कार्सीनोमाचे अग्रगण्य लक्षण आहे. कलरेशन हे लाल, पर्पल, निळे, किंवा त्वचेच्या रंगाचे असु शकते. हे जास्त करून चेहरा, मान इत्यादी भागांवर निर्माण होते. तथापि, हे शरीराच्या इतर कोणत्याही भागावर निर्माण होऊ शकतात.

5. कॅपोसी सर्कोमा :

कॅपोसी सर्कोमा हा क्वचितपणे आढळणारा त्वचा कर्करोगाचा प्रकार आहे. हा कर्करोग एच एस व्ही – 8 (हर्पेज सिम्प्लेक्स व्हायरस 8) या विषाणू मुळे होतो. हा त्वचेच्या रक्तवाहिन्यां मध्ये निर्माण होतो. बहुतांश केसेस मध्ये, हा कर्करोग अशा लोकांना होतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर असते. उदाहरणार्थ, ज्या लोकांना एड्स असतो किंवा जे लोक काही प्रकारची औषधे घेत असतील जी औषधे नैसर्गिक प्रतिकारशक्ती मध्ये अडथळा निर्माण करत असतील. ज्या रुग्णां मध्ये अवयव प्रत्यारोपण झालेले असते त्या रुग्णां मध्ये देखील हा कर्करोग प्रचलित असतो.
कॅपोसी सर्कोमाचे मुख्य लक्षण म्हणजे जखम होणे. या मध्ये लालसर – ब्राऊन, पर्पल किंवा लालसर रंग आलेला असतो आणि हे म्युकस मेंब्रेन वर किंवा त्वचेवर निर्माण होतात.

6. सीबॅसियस ग्लॅन्ड कार्सीनोमा :

जरी हा कर्करोग दुर्मिळ असला तरी तो अतिशय घातक आहे. हा कर्करोग सीबॅसियस किंवा त्वचेच्या ग्लॅन्ड मध्ये निर्माण होतो. हा मुख्य करून पापणी मध्ये निर्माण होतो.
या प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण म्हणजे त्वचेवर वेदनारहित गाठ निर्माण होणे. तसेच त्वचा कडक होणे अशा स्वरूपात देखील लक्षण असु शकते. तथापि, हा कर्करोग जसा जसा पसरत जातो तसा रक्तस्त्राव सुद्धा सुरु होतो. जर गाठ शरीराच्या इतर कोणत्याही भागावर आलेली असेल तर तिचा रंग पिवळसर असतो.

▪️त्वचेचा कर्करोग जीवघेणा असु शकतो का?

त्वचेच्या कर्करोगाच्या सर्व प्रकारांमध्ये मेलॅनोमा हा सर्वात घातक प्रकार असतो. याला इतर शारीरिक भागा पर्यंत पसरण्याची प्रवृत्ती असते. कर्करोगाचे इतर प्रकार हे कमी घातक असतात आणि ते शरीराच्या ठराविक भागा पर्यंतच मर्यादित असतात. तथापि, ते शरीराच्या इतर भागा पर्यंत देखील पसरू शकतात. यामध्ये फक्त किती प्रमाणात घतकपणा असेल याचाच फरक असतो. हा घातकपणाच मेलॅनोमा ला इतर त्वचा कर्करोगां पासून अतिशय हनिकारकर बनवतो.
त्वचा कर्करोगाची क्षमता वाढवणारे काही धोकादायक घटक आहेत, त्यांपैकी काही खालीलप्रमाणे :
अती प्रमाणामध्ये ऊन्हाचा संपर्क, तीळ, ऍक्टिनीक केरॅटोसिस इत्यादी.
वेळोवेळी स्वतः स्वतः ची तपासणी करणे महत्वाचे आहे. तीळ असेल तर त्यामधील बदल, अल्सर्स, त्वचे मधील असामान्यपणा, स्टबोर्न इनफ्लामेशन इत्यादी प्रकारचे बदल असतील तर तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्वांमुळे त्वचा कर्करोग होऊ शकतो. लवकरात लवकर जर रोगनिदान झाले तर योग्य उपचार मिळविण्यास मदत होते. जर तुम्ही सुरवातीच्या काळा मध्ये कर्करोगावर उपचार केलेत तर आयुष्य वाढण्याच्या शक्यता वाढतात.

▪️निष्कर्ष :

त्वचा कर्करोगाचे विवीध प्रकार आहेत. तथापि, जे अतिशय मॅलीग्नान्ट असतात ते अतिशय घातक असतात. सर्व मॅलीग्नान्ट कर्करोगांपैकी मेलॅनोमा हा अतिशय काळजी वाढवण्याचे काम करतो. तो अतिशय घातक असतो आणि नेहमीच रुग्णाचा जीव घेतो. तथापि, लक्षणांची माहिती असल्यास आणि स्वतः ची जागरूकता असल्यास, तुम्ही सुरुवातीची लक्षणे शोधू शकता.
त्वचे मध्ये थोडासा जरी बदल झाला तरी ते गंभीरपने घेतले पाहिजे. लवकरात लवकर जर रोगनिदान झाले तर, पूर्णतः बरे होण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढतात. वैद्यकीय क्षेत्रा मधील अत्याधुनिक तंत्रज्ञाना मुळे, प्रत्येक दिवशी जगण्याचा दर वाढत आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...