VishwaRaj

किमोथेरपी हे उपचार घेत असताना कोणत्या गोष्टी करू नयेत

किमोथेरपी ही एक उपचार पद्धती आहे जी कर्करोगाच्या रुग्णांवर कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी केली जाते. किमोथेरपी मध्ये, डॉक्टर हे विवीध प्रकारचे ड्रग्ज किंवा केमिकल्स चा वापर आजार बरा करण्यासाठी करतात. तथापि, या उपचार पद्धतीचे काही परिणाम आहेत ज्याचा त्रास कर्करोगाच्या रुग्णाला सहन करावा लागतो. हा साईड इफेक्ट होण्या मागचे कारण म्हणजे या प्रक्रिये मध्ये बऱ्याच हेल्थी पेशी सुद्धा मारल्या जातात. त्यामुळे, तुम्हाला पुढे जाऊन शरीरास कोणत्याही प्रकारची हानी होणे टाळण्यासाठी जास्तीची काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असते.

Women after Chemotherapy - VishwaRaj Hospital

🔹किमोथेरपी नंतर टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी :
किमोथेरपी ही उपचार पद्धती केल्या नंतर रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये या गोष्टींबद्दल बरेच रुग्ण जागरूक नसतात. तथापि, डॉक्टर्स आणि फिजिशियन्स हे त्यांच्या रुग्णांना त्यांना माहित नसलेल्या उपचारामध्ये त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे ते समजावून सांगतात. त्यामुळे खाली काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत

▪️गर्दीची ठिकाणे टाळा :
किमोथेरपी उपचार केल्या नंतर असे नाही की तुम्ही सामाजिक कारेक्रम टाळले पाहिजेत. हे फक्त असे आहे की तुम्ही गर्दीची ठिकाणे टाळा. जर तुम्ही ते टाळले तर त्याने तुमची मदतच होणार आहे कारण तुम्ही तुमच्या आरोग्याच्या सर्वोत्तम काळा मधे नसता. त्यामुळे थेटर, मॉल किंवा घरगुती कारेक्रम टाळा जिथे खुप सारे लोक असतील आणि तुम्ही खुप साऱ्या जंतु संसर्गाच्या संपर्कामध्ये याल.

त्या ऐवजी, तुम्ही तुमची जीवनशैली थोडी बदलू शकता ज्यामध्ये तुम्ही मोकळी हवा मिळवण्यासाठी पार्क मध्ये जा किंवा रमतगमत एखादी रपेट मारून या. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्हाला ताज्या ऑक्सिजनचा पुरवठा मिळेल. तथापि, ज्या ठिकाणी अतिशय प्रदूषण असेल ती ठिकाणे टाळा.

▪️कॅन मधील – डब्बा बंद खाद्यपदार्थ खाणे टाळा :
किमोथेरपी मधुन गेल्या नंतर तुमची प्रतिकारशक्तीची पातळी जरा कमी झालेली असते. त्यामुळे ती वाढवण्यासाठी तुम्हाला ताजी फळे आणि भाज्या यांची आवश्यकता असते. डब्बा बंद खाद्यपदार्थ खाणे टाळा कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्सची कमतरता असते जे तुम्हाला पुन्हा जलद गतीने आरोग्य प्राप्ती मिळवून देतात. त्याऐवजी, आहारामध्ये आले, कोरफड आणि लसुण यांचा समावेश वाढवा कारण त्यामुळे सुज कमी होते.याच बरोबर बेरीज फळे खा आणि अजुन मदत व्हावी म्हणुन हर्बल चहाचे सेवन करा.

▪️असे खाद्यपदार्थ जे तुम्ही टाळले पाहिजेत :
तुम्ही काय खात आहात याकडे बारकाईने लक्ष दिल्याने तुम्हाला जलद आणि उत्तम आरोग्यप्राप्ती होण्यास मदत होईल. त्यामुळे, असे काही खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही पूर्णपणे खाणे टाळले पाहिजेत ते खालीलप्रमाणे :

1) थंड पदार्थ टाळा ज्यामध्ये कच्चा हॉट डॉग आणि रोज दुपारच्या जेवणात मटण यांचा समावेश असेल.
लक्षात ठेवा तुमचे खाद्यपदार्थ खायला घेण्यापूर्वी नेहमी गरम करा आणि मटण पूर्णपणे शिजवून घ्या.

2) कच्चे किंवा अनपाश्‍चराईज्ड दूध किंवा इतर दुधाचे पदार्थ यांचे सेवन करू नका.

3) केव्हाही ताज्या परंतु न धुतलेल्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करू नका.
या खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणात घाण जमलेली असते जी उघड्या डोळ्यांनी दिसण्या योग्य नसते. त्यामुळे हे खाद्य पदार्थ खाण्यापूर्वी ते व्यवस्थित धुतल्याची खात्री कारा.

4)काही प्रकारचे मासे कच्चे किंवा शिजवलेले खाणे टाळा कारण त्यामध्ये मर्क्युरीचे प्रमाण उपलब्ध असते.

5)कच्चे अंडे खाऊ नका किंवा कच्च्या अंड्या पासून बनलेला कोणताही पदार्थ जसे की कुकीज चे मळलेले पीठ.
तुम्ही कोणत्याही प्रकारचे कच्चे किंवा अनपाश्‍चराईज्ड खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. त्याचबरोबर, तुम्ही भविष्यामध्ये केव्हा नेहमीचे खाद्यपदार्थ खाणे चालु करू शकता याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

▪️ दुसऱ्यांबरोबर वस्तू शेअर करणे टाळा :
दुसऱ्यां बरोबर वस्तू शेअर करणे टाळणे याचे कारण कर्करोग हा संसर्गजन्य आहे असे नाही. परंतु याचे कारण म्हणजे किमो केल्या नंतर तुमची प्रतिकारशक्ती कमजोर झालेली असते. त्यामुळे, जर तुम्हाला जंतु संसर्ग झाला तर तुम्ही पुन्हा रिकव्हर होणे तुम्हाला शक्य होणार नाही. यामुळे दुसऱ्यांच्या टॉवेल्स, नॅपकिन, कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तू वापरणे किंवा तात्पुरते घेणे टाळा, जरी त्या व्यक्ती तुमच्या कुटुंबाच्या सदस्य असतील तरी. वैयक्तिक वस्तुंची देवाण-घेवाण केल्यामुळे तुम्हाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.

▪️ गोळ्या औषधे घेण्याची वेळ चुकवू नका :
किमोथेरपीला, मोठ्या प्रमाणामध्ये साईड इफेक्ट्स आहेत. तथापि, योग्य गोळ्या औषधे घेऊन तुम्ही ते साईड इफेक्ट्स कमी करू शकता. किमोथेरपी झाल्या नंतर तुम्ही आधीच बर्‍याच साइड इफेक्ट्स ला सामोरे गेलेले असता आणि या मध्येच जर तुम्ही गोळ्या-औषधे चुकलीत तर ती खूप मोठी घोडचूक ठरू शकते.
जरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवत नसतील तरीही तुमच्या डॉक्टरांनी लिहुन दिलेल्या गोळ्या घेणे योग्य आहे. त्याने काही होत नाही असे म्हणुन कृपया गोळ्या मधेच बंद करण्याचा किंवा आठवड्यातून एखाद वेळी किंवा असे केव्हाही करण्याचा निर्णय घेऊ नका. तुम्हाला हे कधीच माहित नसते याचा परिणाम कसा होईल.

▪️जंतु संसर्गाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :
तापा शिवाय इतर काही लक्षणे असतील तर ते दर्शवतात की तुम्ही जंतु संसर्गाचा अनुभव घेत आहात. जर कोणतेही लक्षण तुमच्या लक्षात आले, तर ते टाळू नका. अशा लक्षणांमध्ये घशा मध्ये खवखव होणे, खोकला येणे आणि थंडी वाजणे, वेदना होणे, मानेमध्ये कडकपणा जाणवणे, नाक चोंदणे आणि इन्सिजन एरिया मध्ये लालसरपणा निर्माण होणे इत्यादिंचा समावेश असतो. यामध्ये अजुन तुम्हाला पोटामध्ये वेदना, योनीमार्गा मधुन असामान्य स्त्राव, लघवी करताना वेदना आणि वारंवार लघवीला लागणे या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.

त्यामुळे, जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर त्वरित तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा. या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका कारण याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतील.

▪️समुपदेशन सत्र केव्हाही चुकवू नका :
किमोथेरपी नंतर, लोक मनाच्या बदललेल्या कलामध्ये, डिप्रेशन मध्ये आणि इतर तणावपूर्ण परिस्थिती मध्ये राहतात. त्यामुळे तुमच्या सर्व समस्यांवर उपाय मिळविण्यासाठी तुम्ही प्रत्येक समुपदेशन सत्राला हजर रहाणे अतिशय आवश्यक आहे. याने चिडचिडेपणा, अस्वस्थता, अशक्तपणा आणि इतर अशाच काही समस्या कमी करण्यास मदत होईल. समुपदेशन टाळून तुम्ही तुमच्या समस्या वाढवत आहात.

▪️तुमच्या डॉक्टरांपासून काहीही लपवू नका :
तुमच्या डॉक्टरांपासून काहीही लपवले नाही पाहिजे कारण जर त्यांना सर्व काही माहित असेल तर ते तुम्हाला त्यावर जास्तीचे मार्गदर्शन करतील. त्याऐवजी, तुम्ही कोणत्या समस्येने त्रस्त आहात ती समस्या लिहुन ठेवा आणि पुढील समुपदेशन सत्रा मध्ये डॉक्टरांना सांगा. अजिबात लाजू किंवा घाबरू नका, आणि यामुळे समस्या तुमच्या पर्यंतच ठेऊ नका. डॉक्टरांना संपूर्ण परिस्थिती माहित असणे आवश्यक आहे.

▪️सुस्तावलेले राहु नका :
आळशी राहु नका आणि डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितला आहे असे कारण पुढे करू नका. तुम्हाला कोणीही सांगणार नाही कि जॉगिंगला किंवा रनिंग ला जा परंतु तुम्ही तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण नुसत्या चालण्याने किंवा रूममध्ये इकडेतिकडे करण्याने सुद्धा व्यवस्थित ठेवू शकता. यामुळे पुन्हा ताकद येण्यास मदत होईल आणि रक्ताभिसरण सुधारेल. तुमच्याच घरामध्ये जरी तुम्ही फेरी मारत राहिलात तरी तुमचे चालण्याचे काम होऊन जाईल.

▪️तुमची स्वतः ची स्वछता टाळू नका :
तुमची स्वतः ची स्वछता टाळू नका, खासकरून किमो झाल्या नंतर. याचे कारण म्हणजे या केमिकल प्रोसेस नंतर तुमच्या कर्करोगाच्या पेशीं बरोबर तुमच्या आर बी सीज आणि डब्लू बी सीज सुद्धा मारल्या जातात. याच्या परिणामी, तुम्हाला जंतु संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक वाढलेला असतो. त्यामुळे, तुम्हाला तुमची स्वतः ची स्वछता आणि त्याचबरोबर तुमच्या खाण्याच्या सवयी व्यवस्थित ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

▪️निष्कर्ष :
उपचार मिळविण्या विषयी आशावादी दृष्टिकोण ठेवणे आवश्यकच आहे, परंतु या बरोबर योग्य ती काळजी घेणे आणि किमो झाल्या नंतर पुढील गुंतागुंतीच्या समस्या टाळण्यासाठी काळजी घेणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. तुमची किमोथेरपी झाल्या नंतर वरील मुद्दे तपासून पाहणे आवर्जून लक्षात ठेवा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...