VishwaRaj

स्तनाच्या कर्करोगाची कोणती 5 धोक्याची लक्षणे असतात

स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगां पैकी सामान्यपणे दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग होय, त्यामुळे स्त्रियांनी कोणतीही लक्षणे आढळून येत आहेत का त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. स्त्री, जेव्हा ती वयाची चाळीशी गाठते तेव्हा तीने वर्षातून एकदा स्तनांची तपासणी म्हणजे स्क्रिनिंग करून घेतलेच पाहिजे आणि काही लक्षणे आहेत का हे पाहण्यासाठी स्वतः च स्वतः च्या स्तनांची तपासणी नियमितपणे केली पाहिजे. त्यामुळे, हे बदल कसे होतात ते माहित असणे अतिशय महत्वाचे आहे आणि केव्हा ही लक्षणे धोक्याची लक्षणे असु शकतात हे देखील माहित असणे अतिशय महत्वाचे आहे.

Warning Signs Of Breast Cancer

🔹सामान्यपणे स्तनाची रचना कशी असते?

निरोगी स्तनांच्या जोडीला एक सामान्य ऍनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्र असते आणि स्तनांना निपल्स व एरीओला असतात. स्तनांचा आकार हा प्रत्येक स्त्री नुसार वेगवेगळा असतो, आकार हा काही स्त्रियांमध्ये लहान तर काही स्त्रियांमध्ये मोठा असतो. हार्मोन्स च्या कमीजास्त प्रमाणामुळे स्तनांची रचना आणि आकार वेगवेगळा असु शकतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. ज्या स्त्रीया गरोदर असतात त्यांच्या स्तनांमध्ये थोड्या प्रमाणात सुज असते तर ज्या स्त्रीयांची रजोनिवृत्ती झालेली असते त्या स्त्रीयांचे स्तन हे खालच्या दिशेने लोंबत असतात त्यालाच सॅगींग असे म्हणतात. जस जसे स्त्री चे वय वाढत जाते तस तसे स्तनांचे सॅगींग सुरु होते.

🔹ज्या कडे लक्ष दिले पाहिजे / पाहणी केली पाहिजे अशी धोक्याची लक्षणे :

स्त्रीने नेहमी स्तनांच्या कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांची पाहणी केली पाहिजे. काहीवेळा स्तनांचे कर्करोग हे सुरवातीच्या स्टेज मध्ये आढळून येत नाहीत परंतु ज्या स्त्रीचे वय 40 पेक्षा जास्त आहे त्या स्त्रीने नियमितपणे स्वतःच्या स्तनांची स्वतः तपासणी केली पाहिजे. स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची काही लक्षणे खालीलप्रमाणे :

▪️ब्रेस्ट लंप :
ब्रेस्ट लंप शोधणे हे स्तनाचा कर्करोग शोधण्याचे पहिले लक्षण आहे. स्तनामध्ये लंप असणे हे दर्शवते की स्तनामध्ये ट्युमर तयार झालेला आहे आणि त्याला त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. काहीवेळा स्तनामध्ये सिस्ट निर्माण होतो आणि शेवटी त्याचे रूपांतर ट्युमर मध्ये होते. ब्रेस्ट लंप हा काखे मध्ये देखील निर्माण होऊ शकतो.
स्त्रीने तिचे हात सरळ खाली करून स्वतः देखील सरळ उभे राहावे आणि हळुवारपणे गोलाकार हात फिरवत स्तनाची तपासणी करावी. स्त्रीया या खाली जमिनीवर सरळ झोपुही शकतात आणि उजव्या हाताने डावे स्तन व डाव्या हाताने उजवे स्तन तापासू शकतात. यामुळे स्तनाची रचना समजावून घेण्यास मदत होते आणि स्ताना मध्ये कोणता लिंफ आहे का तेही शोधता येते.

▪️निपल्स मधुन स्त्राव :
जर एका किंवा दोन्ही स्ताना मधुन कोणता स्त्राव, रक्त किंवा पु येत असेल, तर स्तनामध्ये काही तरी समस्या चालु आहे हे दर्शवणारे एक धोक्याचे लक्षण आहे. जर एखादी स्त्री गरोदर नसेल आणि तरीही स्तना मधुन दुध स्त्रवत असेल, तर स्तनाचा कर्करोग असल्याचे हे धोक्याचे लक्षण असु शकते.

▪️निपल रीट्रॅक्शन :
निपल चा सामान्य आकार म्हणजे निपल चे टोक बाहेरील बाजूस आलेले असते. तथापि, जर एखाद्या स्त्रीला तिचे निपल आत खेचल्या सारखे वाटत असेल तर ते धोक्याचे लक्षण असु शकते. पुरुषांनी सुद्धा अशा धोक्याच्या लक्षणांकडे लक्ष ठेवले पाहिजे कारण स्तनाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये सुद्धा सामान्यपणे आढळतो.

▪️ त्वचेमध्ये बदल :
स्तनाचा कर्करोग हा त्वचे वर धोक्याची सूचना देतो. स्तनाच्या आणि निपल्स च्या सभोवताली असणाऱ्या त्वचेवर ढपल्या निर्माण होतात आणि त्वचा लालसर होते. काहीवेळा स्तनाच्या बाहेरील लेयर ला अतिशय तीव्र वेदना होतात आणि त्यावरील त्वचा लालसर होते व खाज सुटते. काही स्त्रियांना स्तनाच्या सभोवताली असणारी त्वचा जाड बनल्याचा अनुभव देखील येतो.
स्तनाच्या कर्करोगाची ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत ज्यांच्या कडे दुर्लक्ष होता कामा नये.
तथापि, अजुन काही अशा परिस्थिती आहेत ज्या मध्ये स्तन ही वरल लक्षणे दाखवतात. जर ही लक्षणे रोजच दिसत असतील किंवा वारंवार दिसत असतील, तर तुम्ही त्वरित ऑन्कोलॉजीस्ट – कर्करोग तज्ञांना भेटले पाहिजे.

▪️स्तनाच्या आकारामध्ये किंवा रचणे मध्ये बदल :
स्तनाच्या आकारामध्ये बदल झाला तर हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे धोक्याचे लक्षण असू शकते. जर स्तनाचा आकार खूपच जलद गतीने वाढत असेल किंवा जर स्तनावर मोल किंवा तीळ निर्माण होण्यास सुरुवात झाली असेल, तर हे स्तनाच्या कर्करोगाचे धोक्याचे लक्षण असू शकते. स्त्रीने नियमितपणे स्तनाच्या आकारा मध्ये काही बदल होत आहेत का हे तपासलेच पाहिजे.

🔹 डॉक्टरांना केव्हा भेटावे?:
जर रुग्णाला वर नमूद केलेली सर्व लक्षणे आढळून आली, तर त्यांनी त्वरित ऑन्कोलॉजीस्ट ला भेटले पाहिजे. जेवढ्या लवकरात लवकर रुग्ण डॉक्टरांना भेटेल तेवढ्या लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येऊ शकतील. तथापि, स्तनामध्ये होणारी प्रत्येक वेदना म्हणजे त्या रुग्णाला स्तनाचा कर्करोग आहे असे नाही. स्तनामध्ये होणार्‍या वेदनेला इतर बरीच विवीध कारणे असू शकतात. हार्मोन्स च्या पातळी मधील कमी-जास्त पणामुळे देखील स्तना मध्ये टेंडरनेस निर्माण होतो आणि त्यामुळे काहीवेळा वेदना सुद्धा निर्माण होतात. गरोदर पणाच्या पहिल्या ट्रायमेस्टर दरम्यान स्तनामध्ये टेंडरनेस आणि वेदना होणे अगदी सामान्य आहे कारण त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्स ची पातळी वाढलेली असते. जर एखाद्या व्यक्तीला छातीला इजा झाली असेल तर स्तनांमध्ये वेदना होतात.

स्त्रियांच्या बाबतीत, व्यवस्थित रित्या ब्रा घातली न जाणे, फिटिंग व्यवस्थित नसणे हे देखील स्तनांमध्ये वेदना होण्याचे मुख्य कारण आहे. ज्या स्त्रीया 20 तासा पेक्षा जास्त वेळ ब्रा घालून ठेवतात त्या स्त्रियांना संपुर्ण स्तना मध्ये वेदना निर्माण होतात. काही स्त्रियांना स्तनपणा दरम्यान देखील सौम्य वेदनांचा अनुभव येतो.
जर स्तना मध्ये लालसरपणा आणि लंप यांच्या बरोबर खुप काळासाठी वेदना होत असतील तर डॉक्टरांचे समुपदेशन घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे, धोक्याच्या लक्षणांची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे कारण त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होईल. पुरुषांनी देखील या धोक्याच्या लक्षणांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे कारण पुरुषांमध्ये देखील कर्करोग आढळतो. काहीवेळा, ही धोक्याची लक्षणे इतर काही कारणामुळे उद्भवलेली असु शकतात उदा. औषधांचा परिणाम. त्यामुळे फक्त ऑन्कोलॉजीस्ट हे तज्ञ डॉक्टरच नक्की काय समस्या आहे हे ओळखू शकतात आणि रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून शकतात.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...