VishwaRaj

महिलांनी युरॉलॉजीस्टला भेटण्याची 8 कारणे

युरॉलॉजीस्ट हे फक्त पुरुषांसाठीचे स्पेशालिस्ट नाहीयेत तर महिला देखील त्यांना भेटू शकतात. त्यांना मूत्रमार्गा संबंधिच्या समस्यांवर उपचार करण्याचे योग्य प्रशिक्षण मिळालेले असते.

किडनी प्रमाणेच मूत्रमार्गा मध्ये स्नायू, अवयव आणि ट्यूब्सची संपुर्ण संस्था आहे. युरॉलॉजीस्टला स्त्री आणि पुरुष या दोघांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित समस्यांवर सुद्धा उपचार देणे शक्य असते.

स्त्रियांसाठी, तुम्ही असे युरॉलॉजीस्ट बघु शकता ज्यांना युरॉगायनॅकॉलॉजीस्ट असेही म्हणतात. हे युरॉलॉजीस्ट गायनॅकॉलॉजीस्ट असतात ज्यांनी मूत्रमार्ग, स्त्रियांची प्रजनन संस्था आणि मुत्राशयाच्या पिशवीच्या समस्यांवर उपचार करण्याचे स्पेशलायझेशन केलेले असते. बरीच धोका दर्शवणारी लक्षणे असु शकतात जी तुम्हाला ब्लॅडर कंट्रोल प्रॉब्लेम आहे हे दर्शवतात.

Reasons for Women to See Urologist - VishwaRaj Hospital

– लघवी गळणे
– लघवीमध्ये रक्त
– पाठीमध्ये आणि साईडला वेदना होणे
– तुम्हाला थोड्या थोड्या वेळाणे लघवीला लागणे
– लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे

जेव्हा तुम्ही मुत्राशयाच्या पिशवीच्या समस्यांनी त्रस्त असता तेव्हा वरील लक्षणे ही प्रचलित असतात. तुम्ही जर तुमच्या मूत्रसंस्थेच्या समस्यांवर उपचार करण्यामध्ये सक्रिय असाल तर याची तुम्हाला खुप मदत होईल कारण ती प्रजनन संस्थेच्या अतिशय जवळ आहे.

स्त्रियांनी युरॉलॉजीस्टला भेटण्याची कारणे खालीलप्रमाणे :
जलद आणि योग्य रिकव्हरी साठी खालील समस्यांवर सुरवातीच्या काळा मध्ये उपचार करणे सर्वोत्तम ठरेल. जर तुम्ही खालील पैकी कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर याची खात्री करून घ्या आणि युरॉलॉजीस्ट बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करून घ्या.

1)मुत्राशयाच्या पिशवीच्या समस्या :
मुत्राशयाच्या पिशवीच्या नियंत्रणा संबंधित ज्या समस्या असतात त्या स्त्रीच्या वयावर अवलंबून नसतात, त्या कोणा बोरोबर सुद्धा घडू शकतात.या समस्येला युरीनरी इनकॉन्टीनान्स (यु आय )असेही म्हणतात. याशिवाय, ही समस्या स्त्रियांमध्ये पुरुषां पेक्षा जास्त प्रमाणात आढळून येते, जवळपास दुप्पट पटीने जास्त.
जेव्हा तुम्ही युरीनरी इनकॉन्टीनान्स (यु आय) ने ग्रस्त असता, तेव्हा तुम्हाला लघवीवर नियंत्रण ठेवण्या मध्ये समस्या येत असल्याचे जाणवेल, विशेष करून मोठ्याने हसताना, व्यायाम करताना आणि खोकताना. या परिस्थितीला स्ट्रेस इनकॉन्टीनान्स असेही म्हणतात. साधारणपणे जेव्हा मुत्राशयाच्या पिशवीच्या सभोवताली असणारे स्नायू कमजोर बनतात आणि ते पिशवीला आधार देऊ शकत नाहीत तेव्हा हा आजार निर्माण होतो. याव्यतिरिक्त, हा आजार महिलांमध्ये गरोदरपणा नंतर किंवा वर्धक्या मध्ये निर्माण होतो. मुत्राशयाच्या पिशवीच्या संबंधित इतर समस्या खालीलप्रमाणे :

ओव्हरफ्लो यु आय :
लघवी केल्या नंतर देखील, लघवी आपोआप बाहेर येत राहते कारण मुत्राशयाची पिशवी पुर्ण

 – ओव्हररिऍक्टिंग ब्लॅडर :
स्त्रियांना लघवी करण्याची वारंवार आणि अतिजलद भावना होते. तुमची मुत्राशयाची पिशवी भरलेली नसताना देखील तुम्हाला याचा अनुभव येऊ शकतो.

तुम्ही तुमच्या मूत्राशायच्या पिशवीवर खालील प्रकारे नियंत्रण मिळवू शकता :

1) शस्त्रक्रिया
2)औषध उपचार
3)पेलव्हिक मसल्सची ताकद वाढवण्यासाठीचे व्यायाम प्रकार
4)इंजेक्शन किंवा इंप्लांटेड डिव्हाईस

2)युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यु टी आय ):
तुम्हाला मूत्राशयच्या मार्गाच्या जंतु संसर्गाचा अनुभव आलेला असावा किंवा आयुष्यामध्ये केव्हा तरी यु टी आय झालेला असेल. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू तुमच्या मुत्र मार्गामध्ये प्रवेश करतात. जी स्त्री यु टी आय मुळे त्रस्त असेल तिला लघवी करत असताना जळजळ आणि वेदना होत असल्याचा अनुभव येतो. त्यांना वारंवार लघवी करण्याची भावना होते परंतु त्या पुर्ण रित्या लघवी करण्यास असमर्थ ठरतात. यु टी आय हे कधीकधी गंभीर असु शकतात, तथापि, तुम्ही त्यावर अँटिबायोटिक्स घेऊन उपचार करू शकता.

3)किडनी स्टोन :
मुत्रपिंडा मधील खडे हे स्त्रियांपेक्षा पुरुषां मध्ये अतिशय सामान्यपणे अढळतात. तथापि, सात टक्के स्त्रीया असतात ज्यांना मुत्रपिंडा मधील खड्यांचा अनुभव येत. जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिले नाही आणि प्रोटीन भरपुर असलेले अन्नपदार्थ अतीप्रमाणात सेवन केले तर तुम्हाला मूत्रपिंडाचे खडे होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. जर तुम्हाला पूर्वी मूत्रपिंडाचे खडे झालेले असतील तर किंवा तुमचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर हा आजार होण्याची टक्केवारी सुद्धा वाढते. काही औषधांचे साईड इफेक्ट्स असु शकतात उदा. मूत्रपिंडाचे खडे.

तुम्हाला खडे कोठेही म्हणजे मुत्रमार्गाची नलिका, मूत्रपिंड किंवा मुत्राशयाची पिशवी यांमध्ये होऊ शकतात आणि हे खडे मोठ्या प्रमाणात पाणी पिल्याने बाहेर पडू शकतात. तथापि, जर हे खडे आपोआप बाहेर पडले नाहीत तर, तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागते. तुम्हाला पोटामध्ये आणि पाठीच्या खालील भागा मध्ये वेदना होणे, उलटी होणे, लघवीमध्ये रक्त पडणे, लघवी करताना वेदना होणे आणि मळमळ होणे इत्यादी लक्षणे तुम्हाला जाणवू शकतील.

4)कर्करोग :
तुम्हाला खालील अवयवांपैकी कोणत्याही अवयवाचा कर्करोग असु शकतो :
1)मूत्रपिंड
2)मुत्राशयाची पिशवी किंवा त्याचे आवरण
3)मुत्रमार्ग – ज्यामधून लघवी पुढे जाते

जेव्हा तुम्हाला मुत्रमार्गाच्या आतील कर्करोग असतो तेव्हा तुम्ही पाठीच्या खालील भागामध्ये वेदना, लघवीमध्ये रक्त आणि लघवी करताना वेदना होणे या लक्षणांनी त्रस्त असता. तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते. कर्करोगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रॅडिएशन थेरपी आणि बायोलॉजिक्स या उपचारांचा पर्याय असतो.

5) दीर्घकाळापर्यंत मुत्राशयाच्या पिशवीच्या वेदना :
जर तुम्हाला वारंवार आणि दीर्घकाळापर्यंत मुत्राशयाच्या पिशवीमध्ये वेदना होत असतील तर हे मुत्रमार्गाच्या समस्येचे गंभीर लक्षण आहे. याचे कारण अधिक संख्येने सिस्ट असणे किंवा इतर कोणतेही कारण असु शकते. जर वेदनांच्या गंभीरतेमुळे तुम्ही तुमची दैनंदिन कामे करू शकत नसाल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

6)वेदनादायक मुत्राशयाची पिशवी :
या परिस्थिती मध्ये तुम्हाला मुत्राशयाच्या पिशवीमध्ये किंवा बेंबीच्या खालील भागामध्ये वेदना आणि अस्वस्थता जाणवत असते. वेदनेमुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावेसे वाटते, काहीवेळा दिवसामध्ये जवळपास साठ वेळा जावे लागते. याशिवाय, तुमची मुत्राशयाची पिशवी भरलेली असल्याची भावना सतत होत राहते. ही परिस्थिती अतिशय सामान्य नाही आहे तथापि, या परिस्थिती मध्ये तुमच्या आयुष्या मध्ये अतिशय तीव्रपणे व्यत्यय आणण्याची क्षमता आहे. काही स्त्रीया जेव्हा अशा प्रकारच्या परिस्थितीने त्रस्त असतात तेव्हा त्या सामाजिक कार्यक्रम आणि मेळावे यांमध्ये जाणे टाळण्याचा प्रयत्न करतात.

7)फॉलन ब्लॅडर :
ओटीपोटाचा तळ हा नेहमी मुत्राशयाच्या पिशवीला धरून ठेवतो. परंतु काहीवेळा ही पकड ढिली झाल्यास पिशवी योनीमर्गा मध्ये पडते त्यामुळे मुत्राशयाची पिशवी अतिक्रियाशील बनते. ही समस्या लठ्ठपणा, रजोनिवृत्ती, वर्ध्यक्य किंवा ओटीपोटाची शस्त्रक्रिया यांमुळे उद्भवते. मुत्राशयाची पिशवी तीच्या जागेवरून खाली घसरू लागल्यास युरीनरी इनकॉन्टीनेन्स किंवा मुत्र मार्गाचा जंतु संसर्ग अशा समस्या निर्माण होतात. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे मुत्राशयाच्या पिशवीचे आवरण आणि कमकुवत झालेला योनीमार्ग. जेव्हा अती जड वस्तू उचलल्या जातात तेव्हा ही समस्या निर्माण होण्याच्या शक्यता जास्त असतात. मुत्राशयाची पिशवी योनीमार्गा मध्ये घासरण्याचे प्रमाण लठ्ठपणा आणि अतिशय जुना खोकला यांमुळे वाढते.
तुम्ही सिस्टोसील किंवा फॉलन ब्लॅडर शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रिया विरहित पद्धतीने उपचार करू शकता.
शस्त्रक्रिया विरहित उपचार पद्धतीमध्ये मुत्राशयाच्या पिशवीला आधार देण्यासाठी योनीमार्गा मध्ये पेसरी बसवणे होय.

8)पाठीच्या खालील भागामध्ये किंवा जांगेमध्ये वेदना :
जेव्हा तुम्हाला किडनी स्टोन असेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या वेदना होतात. तथापि, हे लक्षण मुत्र मार्गाच्या इतर समस्यांमुळे किंवा किडनीच्या छुप्या जंतु संसर्गामुळे देखील निर्माण होऊ शकते. जर तुम्ही लवकरात लवकर यावर उपाय केलेत तर तुम्ही पुढील बऱ्याच गुंता गुंतीच्या समस्या टाळू शकता. त्यामुळे, केव्हाच मुत्र मार्गा संबंधिच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या टाळू नका.
बऱ्याच स्त्रीया याकडे दुर्लक्ष करतात कारण त्या विचार करतात की हे साधे पाठ दुखीचे दुखणे आहे. परंतु अशा मुत्र मार्गा संबंधिच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. मुत्रसंस्था ही प्रजनन संस्थेच्या अतिशय जवळ असते त्यामुळे त्याकडे आवश्यक लक्ष आणि काळजी करण्याची आवश्यकता असते.

▪️निष्कर्ष :
जर तुम्ही वर नमूद केलेल्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्ही त्वरित युरॉलॉजीस्टची भेट घेतली पाहिजे. तथापि, जर तुम्ही मुत्र मार्गाच्या समस्यांच्या सुरवातीच्या पायरी मध्ये असाल तर, तुम्ही मोठ्या प्रमाणात पाणी पिऊन या समस्या नैसर्गिकरीत्या बऱ्या केल्या पाहिजेत. त्याचबरोबर, तुमच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि नियमितपणे व्यायाम करा.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...