VishwaRaj

मूळव्याधा साठी करण्यात येणाऱ्या लेझर उपचाराचे साधक आणि बाधक मुद्दे

Pros And Cons For Laser Treatment For Piles

मूळव्याधा साठी करण्यात येणारी लेझर शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्यपणे करण्यात येणारी आणि आधुनिक उपचार पद्धती आहे. अलीकडेच या उपचार पद्धतीने लक्षणीय छाप निर्माण केली आहे. जेव्हा रुग्ण गंभीर पणे त्रस्त असतो आणि वेदना अतिशय त्रासदायक असतात तेव्हा ही उपचार पद्धती सर्वोत्तम समजली जाते.

वेदनादायक मूळव्याधा पासून सुटका मिळविण्या साठी बरेच पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही त्या पैकी सर्वात परिणाम कारक आहे, खासकरून जेव्हा एखादी व्यक्ती शेवटच्या पायरी मध्ये पोहोचलेली असेल तेव्हा. जर तुम्हाला पारंपरिक उपचार पद्धतीने आराम मिळत नसेल तर, तुम्ही मूळव्याधा साठी लेझर उपचाराचा विचार करू शकता.

जरी लेझर उपचार पद्धती सध्याच्या काळात जरा जास्त लोकप्रिय झालेली असेल तरी, तीच्या बद्दल काही साधक आणि बाधक मुद्दे आहेत जे सर्वांना माहिती असले पाहिजेत.

▪️का लोक मूळव्याधा साठी लेझर उपचार करण्याला प्राधान्य देतात याची कारणे खालीलप्रमाणे :

▪️कमी वेदनादायक आणि अतिशय सुरक्षित :

लेझर उपचार ही मूळव्याधा साठीची सर्वात कमी वेदना होणारी एक शस्त्रक्रिया पद्धती आहे. पूर्वी, लेझर उपचाराने वेदना होतील अशी भीती असायची. तथापि, लेझर शस्त्रक्रिया उपचारा मध्ये कोणत्याही प्रकारच्या ठिणग्या, वाफ किंवा धूर येत नाही. या मुळे ही शस्त्रक्रिया सुरक्षित समजली जाते.

▪️अगदी कमी रक्तस्त्राव :

लेझर शास्त्रक्रियेचा अगदी कमी रक्तस्त्राव हा एक मोठा फायदा आहे. लेझर हिमोऱ्हॉईड शस्त्रक्रिया ही रक्तवाहिन्या आणि टिश्युला पूर्णपणे बंद करून रक्तस्त्राव कमी करण्यासाठी मदत करते. ही शस्त्रक्रिया मूळव्याधाच्या सभोवतालच्या टिश्युला कसल्याही पद्धतीने अजिबात धक्का लावत नाही किंवा त्यावर परिणाम करत नाही. कमीत कमी रक्तस्त्रावाच्या फायद्या मुळे लेझर उपचाराला मुळव्याध बरा करण्याचा उत्तम पर्याय बनवतो.

▪️त्वरित उपचार :

लेझर उपचाराचा मूळव्याधा साठी अजुन एक फायदा म्हणजे लेझर शस्त्रक्रिया उपचार करण्यास लागणारा कालावधी अतिशय कमी असतो. जास्तीत जास्त रुग्णां मध्ये, शस्त्रक्रिया करण्यास फक्त 45 मिनिटांचा कालावधी लागतो. इतर उपचाराच्या पर्याया मध्ये पुर्ण बरे होण्यास काही दिवस ते काही आठवडे एवढा कालावधी लागू शकतो. यामुळे लेझर उपचार पद्धती ही उत्तम पर्याय बनते. बरे होण्याच्या प्रक्रिये साठी लेझर शस्त्रक्रिया तज्ञ जी पद्धत वापतात ती व्यक्ती ते व्यक्ती आणि केस टू केस वेगळी असु शकते.

▪️त्वरित डिस्चार्ज :

यात काही शंका नाही, की हॉस्पिटल मध्ये दीर्घ काळासाठी राहणे हा आनंदाचा अनुभव नसतो. जे रुग्ण लेझर हिमोऱ्हॉईड शस्त्रक्रिये मधुन जातात त्यांना हॉस्पिटल मध्ये सम्पूर्ण दिवस राहावे लागत नाही. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत, शस्त्रक्रिया पुर्ण झाल्या नंतर त्यांना फक्त एक तासा मध्येच डिस्चार्ज देऊन घरी सोडले जाते. यामुळे रात्रभर हॉस्पिटल मध्ये राहून जे बिल वाढणार असते ते देखील कमी होते.

▪️त्वरित उपचार :

कमीत कमी दोन दिवसांच्या आरामा नंतर रुग्ण त्यांच्या नेहमीच्या दैनंदिन कामास सुरवात करू शकतात. शस्त्रक्रिये नंतर जरी रुग्ण एक तासा मध्ये घरी परत जाऊ शकत असला तरी, थोड्या काळासाठी रुग्णाला आराम करणे शस्त्रक्रिये मधुन सम्पूर्ण बरे होण्यासाठी गरजेचे असते. असे असले तरीही, बरे होण्याच्या प्रक्रिये साठी आवश्यक असलेला वेळ अगदीच कमी असतो. एखादी व्यक्ती ती किंवा तो त्यांच्या नेहमीच्या कामासाठी परत जाण्यास फक्त दोन दिवसांचाच आराम केल्या नंतर फ्री होते.

▪️करण्यास सोपी पद्धत :

नेहमीची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा लेझर शस्त्रक्रिया करण्यास अगदी सोपी असते. याचे कारण म्हणजे शस्त्रक्रिया तज्ञ हे ती प्रक्रिया करण्यामध्ये अतिशय निष्णात असतात. लेझर हिमोऱ्हॉईड शस्त्रक्रिया करण्यामध्ये शस्त्रक्रिया तज्ञांना लागणारे प्रयत्न हे अतिशय कमी असतात.

▪️मूळव्याधाच्या लेझर उपचारासाठी बाधक असणारे घटक :

मुख्यत्वे, प्रत्येक गोष्टीला स्वतः चे फायदे आणि तोटे असतात. म्हणूनच, मूळव्याधाच्या लेझर उपचाराच्या बाबतीत, काही तोटे देखील आहेत.
मूळव्याधाच्या लेझर उपचारा बाबत बाधक असणाऱ्या गोष्टींची यादी खालीलप्रमाणे :

▪️खर्चिक उपकरणे :

लेझर उपचार करण्यासाठी लागणारी उपकरणे ही काही प्रमाणात महाग असतात. या कारणामुळे बऱ्याच क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स ला ही उपकरणे बसवून घेणे अतिशय अवघड होऊन जाते. या कारण मुळे, योग्य क्लिनिक शोधणे अतिशय अवघड होते.

▪️आग लागू शकते :

लेझर हिमोऱ्हॉईड शस्त्रक्रिया करत असताना असे क्वचित होऊ शकते की लेझर शस्त्रक्रिया उपचाराची उपकरणे आग पकडू शकतात. नेहमी, असे होत नाही. असे होत असले तरीही, हा उत्पादन दोष असु शकतो, किंवा उपकरण व्यवस्थित मेंटेन केलेले नसते किंवा व्यवस्थित ऑपरेट केलेले नसते. जर उपकरण काळजी पुर्वक कसे वापरायचे याची माहिती लोकांना नसेल तर उपकरणाला हानी होणे नैसर्गिक आहे. याची खात्री करणे अतिशय महत्वाचे आहे की जे शस्त्रक्रिया तज्ञ लेझर शस्त्रक्रिया करणार असतील त्यांना लेझर शस्त्रक्रिया करण्याचा खुप मोठा अनुभव असला पाहिजे.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...