VishwaRaj

मूळव्याध : स्टेपलर उपचारा पेक्षा लेझर उपचार उत्तम आहेत का?

मूळव्याध म्हणजे हिमोऱ्हॉईड्स. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतमध्ये किंवा बाहेर मोठ्या झालेल्या वाहिन्या होय. या मोठया झालेल्या वाहिन्या गुदद्वाराचे संतुलन राखण्याचे महत्वाचे काम करतात परंतु जर या वाहिन्या सामान्य अकरापेक्षा खुप मोठया झाल्या आणि गुदद्वाराच्या जागी सुजलेले टिश्यु साठले तर, त्याच्यामुळे मूळव्याध निर्माण होतो.
मूळव्याध हे नेहमी लहान, गोलाकार आणि विशिष्ट रंगाच्या गाठी असतात. या गाठी गुदद्वाराच्या जागी निर्माण होतात किंवा गुदद्वाराच्या कॅनाल मधुन या गाठी खाली लोंबतात.

मूळव्याधा वर जर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याच्यामुळे बऱ्याच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये खालील परिणामांचा समावेश होतो :

– जंतु संसर्ग
– स्ट्रॅन्ग्यूलेटेड हिमोऱ्हॉईड्स मध्ये हिमोऱ्हॉईड्सचा रक्तप्रवाह कट झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात.
– गुदद्वारामधुन अती प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ऍनिमिया – रक्तक्षय निर्माण होतो.
– फिकल इनकाँटीनेन्स म्हणजे व्यक्तीला शौचास लागल्यास तीच्यावर कंट्रोल राहत नाही.
– ऍनल फिसच्युला – या मध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर त्वचेचा नवीन थर तयार होतो.

▪️लक्षणे :


– शौचास झाल्या नंतर ब्राईट लाल रंगाचा रक्तस्त्राव
– गुदद्वाराच्या सभोवती सोअर, लालसरपणा आणि खाज.
– गुदद्वाराच्या सभोवती कडक लालसर गाठ जाणवू शकते.
– शौचास करत असताना वेदना होणे.
– शौचास केल्या नंतर देखील पोट गच्च असल्यासारखे वाटणे.

▪️ग्रेड – पायऱ्या :


मूळव्याधाच्या l ते lV अशा पायऱ्या पडतात. प्रत्येक पायरीची माहिती खाली नमूद केलेली आहे :
▪️पायरी 1 :
या पायरी मध्ये मूळव्याध दिसत नाही कारण ते आकाराने लहान असतात आणि नेहमी गुदद्वाराच्या लाइनिंगच्या आत मध्ये असतात.
▪️पायरी 2 :
पायरी 1 पेक्षा पायरी 2 मध्ये मूळव्याध आकाराने मोठे असतात. परंतु गुदद्वाराच्या लाइनिंग च्या आत मध्येच असतात. आणि शौचास करत असतानाच ते बाहेर येतात व शौचास झाल्या नंतर पुन्हा आत मध्ये जातात.
▪️पायरी 3 :
या पायरीमध्ये मुळव्याध हे गुदद्वाराच्या बाहेरच राहतात आणि गुदद्वारा मधुन खाली लोंबत असल्यासारखे वाटतात परंतु सहजपने पुन्हा आतही जातात. मूळव्याधाच्या या प्रकाराला प्रोलॅपस्ड हिमोऱ्हॉईडस असेही म्हणतात.

▪️पायरी 4:
या पायरी मधील मुळव्याध पायरी 3 सारखाच असतो, परंतु हा आकाराने खुप मोठा असतो आणि सहजपने पुन्हा गुदद्वारा मध्ये जात नाही म्हणजे तो गुदद्वाराच्या बाहेरच राहतो.

पायरी 3 आणि 4 मध्ये कंपल्सरी उपचार आणि शस्त्रक्रिया या गरजेच्या असतात.

▪️मूळव्याधाची कारणे :

– गरोदरपणा
– अनुवांवशीकता
– बद्धकोष्टाता
– वय (45 – 65 )
– दीर्घ काळासाठी बसने
– लठ्ठपणा
– गंभीर जुलाब
– शौचास करताना कुंथने किंवा
– ऍनल इंटरकोर्स
– जड ओझे उचलणे

▪️मूळव्याधा वरील उपचार :


खालील काही गोष्टींच्या मदतीने मूळव्याधावर उपचार केले जाऊ शकतात :
– जीवनशैली मध्ये बदल उदा. आहार, योग्य वजन राखणे, काही विशिष्ट पदार्थ टाळणे इत्यादी.
– औषध उपचार
– शस्त्रक्रिया पर्याय

शस्त्रक्रिये मध्ये मूळव्याधावर उपचार करण्याचे बरेच विवीध पर्याय आहेत ते खालीलप्रमाणे :


1. बँडिंग :


ही प्रक्रिया मूळव्याधाच्या पायरी 3 आणि पायरी 4 मध्ये परिणाम कारक असते. यालाच रबर बँडिंग लायगेशन असेही म्हणतात. या प्रक्रिये दरम्यान, डॉक्टर लहान ट्यूब इन्सर्ट करतात जिला पुढे लाईट असते त्याला ” ऍनोस्कोप ” असे म्हणतात. ही ट्यूब रुग्णाच्या गुदद्वाराच्या आतमध्ये मूळव्याधाच्या गाठी येई पर्यंत घुसवली जाते. ऍनोस्कोप बरोबर ” लायगेटर ” नावाचे दुसरे उपकरण गुदाशयाच्या आतमध्ये घुसवले जाते. याच्या मदतीने मूळव्याधाच्या मुळाशी रक्तप्रवाह कमी करण्यासाठी एक किंवा जास्त रबर बँडस बांधले जातात.

2. इन्फ्रारेड कोऍग्युलेशन (आय आर सी ) :


ही प्रक्रिया पायरी 4 च्या खाली असणाऱ्या मूळव्याधा वर परिणाम कारक असते. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर एक उपकरण वापरतात ज्यामधून इन्फ्रारेड लाईट चा एक तीव्र बीम तयार केला जातो त्याच्या उष्णते मधुन टिश्यु मध्ये स्कार निर्माण केला जातो आणि मूळव्याधचा रक्तप्रवाह कट केला जातो. या प्रक्रिये मुळे, मुळव्याध नष्ट केला जातो आणि गुदद्वाराच्या मार्गाच्या आवरणा वर स्कार तयार केला जातो ज्यामुळे जवळपास असणाऱ्या वाहिन्यांना एकाजगी पकडून ठेवले जाते त्यामुळे त्या गुदद्वाराच्या मार्गा मध्ये पुन्हा मोठ्या होत नाहीत.
ही प्रक्रिया इतर उपकरणे उदा. लेझर किंवा इलेक्ट्रिकल करंट यांच्या साह्याने सुद्धा केली जाऊ शकते.

3. स्क्लेरोथेरपी :


ही प्रक्रिया मूळव्याधाची पायरी 4 आणि पायरी 3 या प्रकारांसाठी परिणाम कारक असते. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर एक लहान ट्यूब गुदद्वारा मध्ये इन्सर्ट करतात त्याच्या टोकाला लाईट असते, या ट्यूबला ” प्रोक्टोस्कोप ” असे म्हणतात. प्रोक्टोस्कोपच्या मदतीने क्वीनीन, पॉलीडोकेनॉल (झिंक क्लोराईड ) इत्यादी औषधे असणारे लिक्विड हे मोठ्या झालेल्या मूळव्याधाच्या गाठींच्या सभोवताली सोडले जाते. हे लिक्विड मूळव्याधाच्या गाठींच्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करून त्यांचे आकुंचन करते आणि त्याचा रक्तप्रवाह देखील कमी करते. ही प्रक्रिया काही आठवडे केली जाते.

4. हिमोऱ्हॉईडेक्टॉमी :


पायरी 4 मध्ये असणाऱ्या मूळव्याधा साठी ही प्रक्रिया परिणाम कारक असते. या प्रक्रिये मध्ये, मोठ्या झालेल्या मूळव्याधाच्या गाठी कात्री, स्कालपेल, किंवा लेझर ही उपकरणे वापरून काढून टाकल्या जातात. शस्त्रक्रिया तज्ञ हे ” ओपन “, ” पार्शियली ओपन “, किंवा ” क्लोस्ड ” इत्यादी प्रकारच्या शस्त्रक्रिया पद्धती करतात. याचा अर्थ काही रुग्णांमध्ये जखम शस्त्रक्रिये नंतर उघडीच ठेवली जाते आणि काही रुग्णांमध्ये जखम अर्धवट किंवा पूर्णपणे बंद केली जाते.
जखम अर्धवट किंवा पूर्णपणे ओपन ठेवण्याचा फायदा म्हणजे टाके आणि जखम यामध्ये कमीत कमी गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होणे. परंतु ओपन ठेवल्या मुळे जखम बरी होण्यास बराच कालावधी लागतो.

5. हिमोऱ्हॉईड स्टॅपलिंग :


या प्रकारचे उपचार हे पायरी 3 मध्ये असणाऱ्या मूळव्याधा साठी केले जातात. स्टॅपलिंग हे आता शोधण्यात आलेले तंत्रज्ञान आहे. या प्रक्रिये मध्ये, डॉक्टर प्रथम काही मोठ्या झालेल्या मूळव्याधाच्या गाठी काढून टाकतात आणि नंतर राहिलेला टिश्यु गुदद्वाराच्या लाइनिंगला स्टेपल करून टाकतात.

▪️मूळव्याधाचे लेझर उपचार विरुद्ध स्टेपलर उपचार :


लेझर उपचार हे मूळव्याधाच्या पायरी 2 किंवा पायरी 3 मध्ये परिणाम कारक असतात तर स्टेपलर उपचार हे पायरी 4 मध्ये परिणाम कारक असतात. लेझर उपचारा मध्ये, रुग्णाला वेदना रहित उपचारांचा अनुभव येतो कारण त्या मध्ये कोणत्याही प्रकारचे छेद घेतले जात नाहीत किंवा कोणतेही टाके घातले जात नाहीत आणि त्या नंतर रुग्ण 48 तासांमध्ये कामावर परत येतो. मुळव्याध हा लेझर उपचारांनी पूर्णपणे बरा होतो जर रुग्णाने डॉक्टरांनी सांगितलेल्या शस्त्रक्रिये नंतर पाळायच्या सूचनांचे पालन केले तर.
स्टेपलर उपचारा मध्ये, रुग्णाला नेहमीच्या पारंपरिक उपचार पद्धती पेक्षा कमीत कमी वेदना सहन कराव्या लागतात.
स्टेपलर उपचाराचा एकमेव तोटा म्हणजे मुळव्याध लवकरच पुन्हा वाढतो आणि गुदद्वाराच्या बाहेर येतो. त्यामुळे रुग्णाला वरचे वर हे उपचार पुन्हा करून घ्यावे लागतात.

▪️निष्कर्ष :


मूळव्याधाची कारणे आणि त्यांवरील उपचार यांचे सर्वोत्तम ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्या जवळील पाईल्स आणि फिशचूला क्लिनिक ला भेट द्या किंवा पुण्यामधील मूळव्याध वरील सर्वोत्तम लेझर शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्वोत्तम क्लिनिक आणि हॉस्पिटल ला भेट द्या. जर तुम्ही तुमच्या मूळव्याधा च्या शस्त्रक्रिये साठी सर्वोत्तम हॉस्पिटल चा शोध घेत असाल तर पुण्यामध्ये मूळव्याधा वरील शस्त्रक्रिया आणि लेझर उपचार करणारी सर्वोत्तम हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...