VishwaRaj

मला कसे समजेल की माझी हिप रिप्लेसमेंट अपयशी होत आहे?

हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे प्रत्यारोपण आणि हिप जॉईंट ला काढणे ज्यामध्ये मांडीच्या हाडाचा (फिमर )आणि ओटीपोटाच्या हाडाचा (पेलवीस) काही भाग काढला जातो. ही प्रक्रिया फक्त हिप अर्थराइटीसच्या (संधिवात) उपचारा मध्येच केली जाते असे नाही तर अयोग्यरित्या हिप जॉईंट मध्ये वाढ होणे किंवा मोडलेला हिप जॉईंट अशा झालेल्या इजां मध्ये सुद्धा केली जाते. या प्रक्रिये मध्ये, कृत्रिम सांधा हा धातू किंवा प्लास्टिक च्या घटकांपासून बनवण्यात आलेला असतो तो बसवला जातो. हिप रिप्लेसमेंट च्या शस्त्रक्रियेचे अँटेरियर ऍप्रोच आणि पोस्टेरिअर ऍप्रोच हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

🔹शस्त्रक्रियेसाठी कशी तयारी करावी :
जर तुम्ही हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असेल तर, तुमचे अस्थीरोग तज्ञ हे शस्त्रक्रिया करण्यास जाण्या पूर्वी तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशन करायला सांगतात. यामुळे तुम्ही शस्त्रक्रिया करण्यास पुरेशा प्रमाणामध्ये आरोग्यपूर्ण आहात याची खात्री करून घेतली जाते.
▪️ निरनिराळ्या तपासण्या होतात ज्यामध्ये रक्ताच्या तपासण्या आणि लघवीच्या तपासण्यांचा समावेश असतो.
▪️ त्वचेमध्ये सुधारणा करणे हे शस्त्रक्रियेच्या पूर्वी अत्यावश्यक असते.
▪️ तुमच्या शस्त्रक्रिया तज्ञां चे तुम्ही सध्या घेत असलेल्या औषधां बाबत समुपदेशन घ्या कारण फक्त तेच तुम्हाला तुम्ही सध्या घेत असलेली औषधे घ्यावीत किंवा घेऊ नयेत याबाबत चा सल्ला देऊ शकतात.
▪️ अस्थिरोग शस्त्रक्रिया तज्ञ हे तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतील जर तुम्ही शस्त्रक्रियेच्या दृष्टीने लठ्ठ असाल तर कारण या लठ्ठपणामुळे तुमच्या नवीन हिप जॉईंट वर विपरीत परिणाम होतील.
▪️ जर तुमच्या शरीराच्या रक्त प्रवाहामध्ये जिवाणूंचा शिरकाव झाला तर तुम्हाला जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यामुळे, नियमित पणे केले जाणारे दातांचे क्लिनिंग टाळणे अति उत्तम ठरेल.
▪️ ज्या व्यक्तींना वारंवार लघवी चा जंतुसंसर्ग होण्याची हिस्ट्री असेल असेल किंवा अलीकडेच होऊन गेला असेल तर त्या व्यक्तींनी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्या पूर्वी लघवीच्या सर्व तपासण्या करून घेणे अनिवार्य आहे.
▪️ या क्षणांमध्ये तुम्ही नेहमी दुसऱ्या व्यक्ती बरोबर राहणे अत्यावश्यक आहे ती व्यक्ती अशी असावी की ती तुमची खूप मोठी सोबती असेल कारण यावेळी तुम्हाला काही दिवसां साठी चालता येणे शक्य होणार नाही त्यामुळे तुम्हाला थोडे नैराश्य येऊ शकते. जर तुम्ही एकटे राहत असाल तर पैसे देऊन सोशल वर्कर ची मदत घेण्याची शिफारस केली जाते.
▪️ तुमच्या घरा मध्ये काही निश्चित बदल करण्याची देखील शिफारस केली जाते उदाहरणार्थ टॉयलेट ची जागा उंचावर करणे, शॉवर बेंच किंवा खुर्ची ची व्यवस्था करणे, लॉंग हॅन्डल्ड शुहॉर्न – बुटात पायाची टाच चटकन जावी यासाठी वापरले जाणारे बुट आणि बरेच काही.

या सर्वांमुळे शस्त्रक्रिये नंतर तुम्हाला जलद गतीने सामान्य आरोग्य प्राप्तीसाठी मदत होऊ शकते. त्यामुळे, शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी तुमच्या घरा मध्ये हे गरजेचे बदल आवश्य करून घ्या.

🔹 हिप रिप्लेसमेंट अपयशी होत असल्याची लक्षणे खालील प्रमाणे :
असे काही रुग्ण असतात ज्यांच्या मध्ये हिप रिप्लेसमेंट अपयशी होत असल्याची कोणत्याच प्रकारची लक्षणे जाणवत नाहीत किंवा कदाचित त्यांना ते समजणार देखील नाही. परंतु काही लोक या लक्षणां बाबत जागरूक असतात आणि त्यांच्या नवीन हिप जॉईंट मध्ये काही तरी चुकीचे होत असल्याची त्यांना जाणीव होते.
हिप रिप्लेसमेंट अपयशी होत असल्याचे दर्शवणारी काही लक्षणे म्हणजे,
चालताना वेदना होणे आणि काही अंतर चालण्या मध्ये समस्या निर्माण होणे.
तुम्हाला हिप जॉईंट च्या सभोवताली किंवा हिप एरिया मध्ये सुज आणि लालसर पणा असल्याचा अनुभव सुद्धा येऊ शकतो.
तुमच्या हिप एरिया च्या बाधित जागेवर काही लंप्स – गाठी असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
जेव्हा तुमच्या हिप जॉईंट ची हालचाल होईल तेव्हा तुम्हाला करकर असा आवाज येत असल्याचे ऐकू येईल. हे सर्व लक्षणां मध्ये मुख्य आणि सर्वात सामान्यपणे आढळणारे लक्षण आहे ज्यामुळे लक्षात येते की हिप रिप्लेसमेंट अपयशी होत आहे.

🔹 हिप जॉईंट मध्ये वेदना होण्याची इतर काही कारणे :
जरी संधिवात हे बऱ्याच लोकांमध्ये हिप जॉईंट मध्ये वेदना होण्याचे मुख्य कारण असले तरी सुद्धा हिप जॉईंट मध्ये वेदना होण्याची इतर कारणे देखील आहेत.
हिप जॉईंट फ्रॅक्चर,
टेंडीनायटीस,
बर्सायटीस,
स्त्री रोगांमुळे पाठीच्या समस्या,
हर्निया

🔹 शस्त्रक्रिये नंतर तुमच्या डॉक्टरांना केव्हा कॉल करावा?

हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिये नंतर, खालील पैकी कोणतीही लक्षणे जर तुमच्या निदर्शनास आली तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना कॉल करणे अत्यावश्यक आहे.
▪️ तुमच्या पोटरीच्या स्नायूंमध्ये लालसरपणा किंवा टेंडरनेस – (हात लावल्यास वेदना होणे).
▪️ थंडीमुळे अंग थडथड उडणे.
▪️ शस्त्रक्रिया करण्यासाठी फाडण्यात आलेल्या भागा मधून कसल्यातरी प्रकारचा स्त्राव येणे.
▪️ हिप जॉइंट मधील वेदना अधिक अधिक तीव्र होणे.
▪️शस्त्रक्रिया करण्यासाठी फाडण्यात आलेल्या जागी लालसरपणा किंवा सूज येणे आणि ते अतिशय बळावत जाणे.
▪️ जर तुम्हाला 100.4°F (38° C) किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर
▪️ तुमच्या पाया मध्ये किंवा पोटऱ्यां मध्ये सूज किंवा वेदना असणे जे तुमच्या शस्त्रक्रिया झालेल्या जागेच्या संबंधी नसते.

हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाल्या नंतर ती अपयशी होण्याचे टाळावे, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्याची परिस्थिती अतिशय खराब होईल. जर तुम्ही पडला तर ते अखेरीस तुमच्या नवीन हिप जॉईंट ला हानिकारक होऊ शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला केन किंवा वॉकिंग स्टीक यासारख्या मदतनीस उपकरणांची शिफारस करतील ज्यामुळे तुम्हाला चालण्याची पुन्हा ताकत येईपर्यंत या उपकरणांची चालण्या साठी मदत होईल.

▪️ निष्कर्ष:
हिप रिप्लेसमेंट ही बऱ्याच कालावधी साठी टिकते परंतु नवीन हिप जॉईंट ची बराच काळ झीज झाल्यामुळे तो लुज होतो. अशा परिस्थितीमध्ये, तुम्ही पुन्हा हिप रिव्हिजन शस्त्रक्रिया केली पाहिजे. ज्या आरोग्यपूर्ण रुग्णांचे वय 75 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या हृदय विकाराची किंवा फुफ्फुसांच्या विकाराची हिस्ट्री नसेल, ते रुग्ण एकाच वेळी दोन्ही हिप जॉईंट्स ची रिप्लेसमेंट करू शकतात. कधी कधी, एका वेळी एकाच हिप जॉईंट ची रिप्लेसमेंट केल्यामुळे जलद रिकव्हरी होते. भविष्या मध्ये वेदना टाळण्या साठी हिप रिप्लेसमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...