VishwaRaj

युरॉलॉजीस्ट तुम्हाला कशा प्रकारे तपासतात?

युरॉलॉजीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मुत्र मार्गाच्या समस्यांवर उपचार केले जातात. जर तुम्हाला मुत्रमार्ग, मुत्राशयाची पिशवी, मूत्रपिंड किंवा मूत्रवाहिनी यांच्या संबंधित काही समस्या असतील तर युरॉलॉजीस्टला भेटणे ही उत्तम कल्पना आहे.

मुत्रमार्गा संबंधिच्या समस्या या कोणाबरोबरही निर्माण होऊ शकतात, त्याचा वयाबरोबर काही संबंध नाही. तथापि, स्त्री आणि पुरुष यांच्या मधील तपासणीच्या प्रक्रियेमध्ये काही वेगळे बदल आहेत. तुमच्या सोयीसाठी आम्ही त्यावर वेगवेगळी माहिती खाली दिली आहे.

Urologist and Patient - VishwaRaj Hospital

🔹पुरुषांच्या मूत्रमार्गा संबंधिच्या आजरांची तपासणी :

पुरुषांमध्ये जेव्हा तुम्ही युरॉलॉजीस्टला भेटता तेव्हा ते तुमच्यावर खालील तपासण्या करतात :

▪️प्राथमिक तपासणी :
या सुरवातीच्या स्टेज मध्ये युरॉलॉजीस्ट तुमची सर्व माहिती आणि तुमची वैद्यकीय हिस्ट्री घेतात. या माहितीलाच ऍनामनेसीस असेही म्हणतात. ही माहिती शारीरिक बदलांचे मूल्यांकन आणि लिंफ नोड्स व अंतर्गत अवयव हाताने तपासण्यासाठी आवश्यक असते.

▪️लॅबोरेटरीमधील तपासणी :
या तपासण्यांमध्ये रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी,
बायोकेमिकल रक्ताची तपासणी, स्पर्मोग्राम आणि पी एस ए तपासणी यांचा समावेश असतो.
रक्ताच्या तपासणी मध्ये, डॉक्टर सुज येण्याची प्रक्रिया तपासतात. लघवीच्या तपासणी मध्ये डॉक्टर मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मुत्राशयाची पिशवी यांचे कार्य तपासतात. तथापि, बायोकेमिकल रक्ताच्या तपासणी मध्ये ते मूत्रपिंड आणि यकृत हे दोन्ही अवयव तपासतात. स्पर्मोग्राम मध्ये, डॉक्टर स्पर्म – शुक्राणुची मोटिलिटी आणि त्यांची गुणवत्ता तपासतात. आणि शेवटी, पी एस ए मध्ये, डॉक्टर प्रोस्टेट कर्करोगाची अगोदर ओळख होण्यासाठी तपासणी करतात.

▪️युरोडायनॅमिक तपासणी :
ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारी तपासणीची पद्धत आहे जी मूत्रसंस्थेचे कार्य आणि परिस्थिती कशी आहे ते दर्शवते. या तपासणी मध्ये, तुम्ही प्रेशर फ्लो युरोडायनॅमिक कंडिशन तपासता, तसेच मुत्राशयाच्या पिशवीचा आकार मोजला जातो. ही तपासणी, शिल्लक राहिलेल्या लघवीचे प्रमाण सुद्धा तपासते.

▪️इंडोस्कोपीक तपासणी :
या तपासणी मध्ये, युरॉलॉजीस्ट एक विशिष्ट उपकरण वापरतात, या उपकरणाला इंडोस्कोप असे म्हणतात. या उपकरणामुळे डॉक्टरांना जेनाइटोयुरीनरी सिस्टीमचे काळजीपूर्वक मूल्यांकन करता येते. मूत्रनलिका, मूत्रमार्ग, मूत्रपिंड आणि मुत्राशयाची पिशवी यांची तपासणी हे उपकरण करते.

▪️अल्ट्रासाउंड डायग्नोस्टिक्स :
मूत्रसंस्थेची अल्ट्रासाउंड तपासणी ही पॅथोलॉजीज ओळखण्या साठीची सर्वात महत्वाची आणि अतिशय परिणामकारक पद्धत आहे. अल्ट्रासाउंडचा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रास्ट एजन्टची आवश्यकता लागत नाही. अजुन दुसरा फायदा म्हणजे मुत्रपिंडाच्या फ़ंक्शनल कंडिशनच्या आऊटकम बरोबर तुम्ही इंडिपेंडन्ट असता.

▪️तपासण्याची रॅडिएशन मेथड :
मूल्यांकणाच्या या पद्धती मध्ये डॉक्टर रॅडिओपॅक सबस्टन्सचा वापर करतात. रिनल अँजीओग्राफी, एम आर आय, टोमोग्राफी, युरोग्राफी इत्यादी सारखे रिसल्ट्स ही पद्धत दाखवते.
मुत्रसंस्थेच्या विकारांचे रोगनिदान किंवा उपचार हे नेहमी विकाराची परिस्थिती आणि त्याची स्टेज यावर अवलंबून असते. त्यामुळे, तुमची वैद्यकीय हिस्ट्री आणि आजाराची परिस्थिती यानुसार डॉक्टर तुमची तपासणीची पद्धत बदलू शकतात.

🔹स्त्रियांमधील मुत्रसंस्थेच्या विकरांची तपासणी :
स्त्रियांमध्ये लघवी आपोआप बाहेर वाहने – युरीन इनकॉन्टीनेन्स हा व्यापक ब्लॅडर कंट्रोल प्रॉब्लेम आहे. ही एक अशी परिस्थिती आहे ज्या मध्ये तुम्हाला अचानक लघवी बाहेर येत असल्याचा अनुभव येईल. ज्याच्या परिणामी, हे अतिशय असहनीय त्याच बरोबर लज्जासपद असु शकते. तुमच्या समस्येचे प्राथमिक कारण शोधण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या दोन प्रकारच्या तपासण्या करून घेतील. डॉक्टरांकडुन केल्या जाणाऱ्या तपासण्या खालीलप्रमाणे :

▪️शारीरिक तपासणी :
तुमचे डॉक्टर तुम्हाला दोन प्रकारच्या शारीरिक तपासण्या करण्याचा सल्ला देतील.
एक म्हणजे पेलव्हिक एक्झाम आणि दुसरी म्हणजे रेक्टल एक्झाम.

पेलव्हिक एक्झाम ही एक स्ट्रेस एक्झाम आहे जी तुम्हाला मुत्राशयाची पिशवी भरलेली असताना करावी लागेल. तुम्ही लघवी थांबवून ठेवलेली असताना डॉक्टर तुम्हाला खोकायला सांगतील. त्याचबरोबर डॉक्टर तुम्हाला झोपायला सांगतील पेलव्हिक रीजन तपासण्यासाठी. मुत्राशयाच्या पिशवीच्या सभोवताली असणाऱ्या स्नायूंची ताकद सुद्धा ते तपासतील.
तुमच्या पेलव्हिक तपासणीच्या बरोबरच डॉक्टर तुमची रेक्टल तपासणी सुद्धा करतील. ते तपासणीसाठी ग्लोज वापरतील ज्याला लुब्रीकंट लावलेला असेल ज्यामुळे रेक्टमच्या आतील आवरण तपासता येईल. ही तपासणी त्या जागेमध्ये काही अडथळे आहेत का ज्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे ते तपासण्यासाठी आवश्यक असते.

▪️उत्तरे लिहुन घ्या :

तुमचे डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील जसे की :
– तुमची लघवी शिंकताना, उचलताना, खोकताना, हसताना किंवा संभोगाच्या दरम्यान बाहेर आली का?
– तुम्ही किती वेळा बाथरूमला भेट देता? तुम्ही रात्री सुद्धा टॉयलेट ला जाता का?
– बाथरूम मध्ये पोहोचे पर्यंत तुम्हाला तुमची लघवी थांबवण्याची क्षमता आहे का?
– नेहमी / प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची मुत्राशयाची पिशवी भरलेली असल्याची भावना होते का?

या सत्रा मध्ये तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या अनुसार डॉक्टर त्यांचे उपचार सुरु करतात. तुमच्या डॉक्टरांना बरोबर उत्तर दिल्याची खात्री करून घ्या. अजिबात लाजू नका.

▪️युरीन कलेक्शन :
लॅब मध्ये तपासण्यासाठी डॉक्टर तुमच्या लघवीचा नमुना घेतील. या तपासणी नंतर लघवीमध्ये रक्त किंवा कोणत्या प्रकारचा जंतु संसर्ग आहे का ते समजते. दुसरी तपासणी ही किती प्रमाणात लघवी बाहेर पडली आहे आणि किती मुत्राशयाच्या पिशवीमध्ये शिल्लक आहे याचे प्रमाण दर्शवते. तुमच्या मुत्राशयाच्या पिशवीमध्ये काही प्रमाणात लघवी आहे का ते तपासण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाउंड करतात किंवा स्टराईल ट्यूबचा वापर करतात.
जर तुमच्या मुत्राशयाच्या पिशवीमध्ये काही प्रमाणात लघवी असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या मूत्रमार्गा मध्ये काहीतरी आहे जे अडथळा निर्माण करत आहे. तथापि, याचाच दुसरा अर्थ असा असु शकतो की, मुत्राशयाच्या सभोवताली असणारे स्नायू आणि नर्व्ह यांची काहीतरी समस्या आहे. तुमचे डॉक्टर रक्ताचे घेतलेले नमुने सुद्धा लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवतील. लॅबोरेटरी ही तुमच्या किडनीच्या कार्या संबंधी रिझल्ट्स दाखवेल आणि तुमच्या शरीराच्या बॉडीकेमिस्ट्रीचे मूल्यांकन करेल.

▪️इन – डेप्थ टेस्ट :
करणाचे अधिक गहण आणि योग्य आकलण होण्यासाठी डॉक्टर काही खास तपासण्या करू शकतील. या खास तपासण्यांमध्ये खालील तपासण्यांचा समावेश होतो :
– सिस्टोस्कोपी :
या तपासणीमध्ये, डॉक्टर तुमच्या मुत्राशयाच्या पिशवीचे आतील आवरण तपासतात. या प्रक्रियेसाठी डॉक्टर पातळ, स्लेंडर ट्यूब ज्याला लहान आकाराची लेन्स असते ती मूत्रमार्गा मध्ये इन्सर्ट करतात.

– सिस्टोग्राम :
ही तपासणी तुमच्या मुत्राशयाच्या पिशवीचा त्याचे कार्य चालु असताना एक्सरे घेते. यावेळी डॉक्टर तुमच्या मूत्रमार्गा मध्ये आणि त्याचबरोबर मुत्राशयाच्या पिशवीमध्ये डाय इंजेक्ट करण्यासाठी एक लहान ट्यूब वापरतात. त्यामुळे तुम्ही लघवी करत असताना, डॉक्टर हे तापासू शकतात की नक्की काय घडतेय आणि खरी समस्या नक्की कुठे अस्तित्वात आहे.

– युरोडायनॅमीक टेस्टिंग :
सर्वप्रथम, युरोलॉजीस्ट तुमची मुत्राशयाची पिशवी ही कॅथेटरच्या मदत घेऊन लिक्विड किंवा पाण्याने भरून घेतात. त्यानंतर तुमच्या मुत्राशयाच्या पिशवी मधील प्रेशर मोजण्यासाठी, मॉनिटरवर त्याचे स्क्रीनींग केले जाते. याशिवाय, तुमच्या मुत्राशयाच्या पिशवीला आधार देणारे आणि लघवीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंची ताकद तपासण्यासाठी देखील या तपासणीची मदत होते. समस्या शोधण्यासाठी या तपासणीची खुप मोठी मदत होते.

– पेलव्हिक अल्ट्रासाउंड :
ही तपासणी तुमच्या जेनाईटल्स किंवा मूत्रमार्गाच्या आतील भागाचे फोटो दाखवते. तुमच्या समस्येचे असामान्य कारण शोधण्यासाठी ही तपासणी मदत करते.

▪️निष्कर्ष :
तपासण्या कशा होतील आणि त्या तुम्ही पुर्ण करू शकाल का असा विचार करून तपासणी करण्यास उशीर करू नका. उपचारांना खुप उशीर केलेला केव्हाही योग्य ठरणार नाही कारण जर समस्या गंभीर झाली तर ती अजुन खुप मोठ्या समस्या निर्माण करेल. जरी तुम्ही स्त्री किंवा पुरुष असाल तरी तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही कारण योग्य वैद्यकीय उपचारांनी तुम्ही या आजारावर उपाय करू शकता.


Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142
Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...