VishwaRaj

नैराश्य आणि गरोदरपण - लक्षणे, धोका आणि रोगमुक्तता / बरे होणे

प्रसूती नंतर येणाऱ्या नैराश्या बद्दल तुम्हाला कदाचित माहीत असेल, परंतु गरोदरपणा दरम्यान नैराश्याचा सामना करण्या बाबत तुम्ही कधी ऐकले आहे का? अभ्यासा नुसार हे सिद्ध झाले आहे की जवळपास 7 % स्त्रिया या त्यांच्या गरोदरपणा मध्ये नैराश्या मधुन जात असतात. हे नेहमीच आनंदी क्षणांनी भरलेले आणि सर्वकाही फुललेले असते असे नाही. हा रोलर कॉस्टर चा प्रवास आहे ज्यामध्ये स्त्रीला बऱ्याच मोठ्या संप्रेरक – हार्मोनल, शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जावे लागते.

तथापि, बहुतेक वेळा गरोदरपणा मधील नैराश्य हे ओळखले जात नाही कारण गरोदरपणा दरम्यान येणाऱ्या नैराश्याची लक्षणे ही गरोदरपणाच्या लक्षणां सारखीच असतात.
ही लक्षणे खालील प्रमाणे :
▪️ झोपेच्या नेहमीच्या सवयी मध्ये बदल
▪️ ऊर्जेच्या पातळी मध्ये( – एनर्जी लेवल )बदल
▪️ भूक आणि कामवासने मध्ये बदल
▪️ मनाच्या कलाच्या लहरी – मूड स्विंग्स

🔹 गरोदरपणा दरम्यानचे नैराश्य दाखवणारी अतिरिक्त लक्षणे खालील प्रमाणे :
▪️ तुमच्या बाळाच्या बाबतीतली कमालीची उदासीनता, खिन्नता, अवस्था
▪️ज्या ऍक्टिव्हिटीज करन तुम्हाला आवडायचं त्यापासून आता आनंद मीळवण्यास तुम्ही असमर्थ होत आहात
▪️ आत्मसन्मान कमी होणे – लो सेल्फ इस्टीम
▪️ काही किलोने वजन वाढणे
▪️ आत्महत्या करण्याचे विचार
▪️ धूम्रपान, दारू पिणे

🔹 गरोदरपणा दरम्यान नैराश्य येण्यास कारणीभूत असणारे काही धोकादायक घटक येथे नमूद केले आहेत :
▪️ कुटुंबामध्ये नैराश्या ची हिस्ट्री असणे
▪️चिंता
▪️ जीवणा विषयी ताण तणाव – लाईफ स्ट्रेस
▪️ नको असलेले गरोदरपण
▪️ नैतिक / मानसिक आधार नसणे
▪️ जोडीदारा कडून हिंसा होणे

🔹 कोणत्या मर्यादेपर्यंत चे नैराश्य तुमच्या गरोदरपणा वर परिणाम करू शकते?

गरोदरपणा दरम्यान येणारे नैराश्या हे तुमच्या साठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाऊ शकते.
त्याचा तुमच्यावर पुढील प्रकारे परिणाम होऊ शकतो :

▪️ स्वतःची काळजी घेणे हे गरोदरपणा मध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नैराश्य तुमची हीच क्षमता तुमच्या पासून हिरावून घेते. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे अगदी कमी किंवा अजिबात लक्ष न देण्यास सुरु करता. याचाच अर्थ असा की तुम्ही तुमची औषधे, झोपेचा नित्यक्रम आणि आहार जो तुमचे उत्तम आरोग्य राखण्या साठी अतिशय महत्वाचा आहे त्यालाच तुम्ही कदाचित वगळू शकता.
▪️नैराश्य तुम्हाला दारू, तंबाखू, ड्रग्ज – अमली पदार्थ, धूम्रपानाची सवय अशा हानिकारक व्यसनाधीन पदार्थांचे सेवन करण्याकडे ढकलू शकते.
▪️नैराश्य तुम्हाला तुमच्या बाळा बरोबर नातेसंबंध तयार करण्यापासून देखील थांबवू शकते जे पुन्हा तुमच्या बाळाच्या वाढीवर परिणाम करते. तुमच्या आवाजाचा ताल, कोणत्या पट्टीत तुम्ही बोलत आहात आणि तुमच्या आवाजतील ताण तणाव या सर्वां वरून तुमच्या उदरा मधील बाळ तुमच्या हर एक भावनेचा अनुभव घेऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही नैराश्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आणि बऱ्याच काळा साठी त्यावर उपचार न करता त्याचा अनुभव घेत राहिलात तर तुम्ही तुमच्या बाळा बरोबर नातेसंबंध निर्माण करण्यास कदाचित सक्षम नसाल. तुम्ही कदाचित या सर्वांचा शेवट भावनिक रीत्या एकटे वाटण्या कडे कराल.

तुमच्या बाळाची काळजी घेणे हे अतिशय आवश्यक आहे परंतु, स्वतःची काळजी घेणे हे ही त्याच्या एवढेच महत्त्वाचे आहे.
गरोदरपणा मध्ये येणाऱ्या नैराश्या मधून बाहेर पडण्याच्या आणि तुम्ही आत्मसात करू शकता अशा काही सोप्या टिप्स येथे नमूद केलेल्या आहेत :

▪️ कोणत्याही गोष्टींसाठी घाई करू नका, तुमच्या मनाची शांतता धरून ठेवा आणि गोष्टी त्यांच्या गतीने पूर्ण द्या. तुम्हाला स्वतःसाठी ” माझा ” असा थोडासा तरी वेळ गरजेचा आहे, त्या वेळेचा योग्य वापर करा आणि स्वतःला पूर्णपणे आरामशीर वाटू द्या.
▪️ तुमच्या समस्या दुसऱ्यां बरोबर शेअर करा, तुम्हाला कशाचे दडपण आहे त्याबाबत उघडपणे बोला. तुमच्या जोडीदारा कडे, कुटुंबा कडे, मित्र मैत्रिणीं कडे किंवा असे कोणीही ज्याच्या कडे तुम्हाला मानसिक रित्या आरामदायक वाटते त्यांच्या कडे मन मोकळे करा. फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही नैतिक किंवा मानसिक आधार मागतात, तेव्हाच तो तुम्हाला मिळतो.

▪️ निष्कर्ष:
तुमच्या गरोदरपणा मध्ये जर तुम्ही वरील पैकी कोणत्याही लक्षणांचे निरीक्षण करत असाल, तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा जवळील मॅटर्निटी हॉस्पिटल ला भेट द्या आणि स्वतःची संपूर्ण तपासणी करून घ्या. जर इतर कोणाला नाही तर, तुमच्या नैराश्या बाबत तुमच्या डॉक्टरांना तरी शेयर करा ते निश्चितपणे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सर्वोत्तम रित्या योग्य असतील ते उपचार देऊ शकतील.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...