VishwaRaj

मज्जासंस्थेच्या समस्या या श्वसनाच्या समस्या निर्माण करू शकतात का?

मज्जासंस्थेच्या समस्या या श्वसनाच्या समस्या निर्माण करू शकतात. असे बरेच मज्जासंस्थेचे विकार आहेत जे अखेरीस फुफ्फुसाचे कार्य कमजोर करण्यापर्यंत परिणाम करतात. तथापि, पार्किन्सन्स डिसीज आणि मल्टिपल स्क्लेरॉसिस सर्वात सामान्यपणे त्यामध्ये येतात. बहुतांश रुग्णांमध्ये श्वसनाच्या गुंतागुंतीच्या समस्या या परिस्थिती चिघळवतात किंवा मृत्यूस कारणीभूत ठरतात.

🔹 श्वसनाच्या गुंतागुंतीच्या समस्यां ची पार्किन्सन्स डिसीज मधील लक्षणे :

पार्किन्सन्स डिसीज चे बरेच विवीध प्रकार आहेत. तथापि, ज्यांना ऑटोनॉमिक डिसफ़ंक्शनचा त्रास असेल त्यांच्यामध्ये श्वसनाच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूमधील ज्या भागावर परिणाम होतो तो भाग श्वसनक्रियेवर नियंत्रण असणाऱ्या मुख्य भागाच्या जवळ असतो.
काही लक्षणे खालील प्रमाणे :
– मुख्य श्वसन क्रिया बंद होणे
– सेंट्रल हायपोव्हेंटिलेशन
– असामान्य श्वसन क्रिया
-चायने स्ट्रोक पॅटर्न
-ऍप्नेऑस्टीक ब्रिथिंग
-क्लस्टर ब्रिथिंग

🔹 श्वसनाच्या विकारांची मल्टिपल स्क्लेरॉसिस मधील लक्षणे :
अजून एक मज्जासंस्थेचा विकार जो फुफ्फुसाच्या समस्या निर्माण करतो तो म्हणजे मल्टिपल स्क्लेरॉसिस. बहुतांश रूग्णांमध्ये कोणत्या भागाला इजा झालेली आहेत यावर लक्षणे अवलंबून असतात.
काही लक्षणे खालील प्रमाणे :
-डायफ्रॅमॅटीक पॅरेलीसीस
-ऑटोनॉमिक रेस्पिरेशन
-ऍप्नेऑस्टीक ब्रिथिंग
-पॅरॉक्सिजमल हापरव्हेंटिलेशन
-न्युरोजेनिक इडीमा

🔹मज्जासंस्थेच्या समस्या या श्वसनाच्या समस्या कशा प्रकारे निर्माण करू शकतात?

जेव्हा तुम्ही मज्जासंस्थेच्या विकारांनी ग्रस्त असता तेव्हां श्वसनाच्या समस्या निर्माण होण्यासाठी काही काळ जातो. नेहमी तुम्ही या समस्यांचे आजाराच्या शेवटच्या पायरीमध्ये निरीक्षण करू शकता. बहुतांश रुग्णांमध्ये याची सुरुवात एखाद्या जंतुसंसर्गाने किंवा तापाने होते. यामुळे, शरीराच्या श्वसनक्रियेची मागणी वाढते आणि श्वसनक्रियेचे काम करणारे स्नायू संपूर्ण कार्यक्षमतेने कार्य करण्यास असमर्थ ठरतात. जेव्हा अशा प्रकारच्या श्वसनक्रियेच्या समस्या सुरू होतात तेव्हा मेंदू त्याबरोबर जुळवून घेण्यास सुरुवात करतो त्यामुळे मुख्य केंद्रीय श्वसनक्रिया संस्था तिचे कार्य वाढवते आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजनची योग्य पातळी राखण्यास सुरुवात करते. तथापि, हे सर्व होत असताना, रुग्ण अतिशय जलद गतीने श्वासोच्छवासाची क्रिया करण्यास सुरुवात करतो.

जसजसा आजार अधिक बळावतो, तसे उथळ श्वसन – हायपोव्हेंटिलेशन निर्माण होते. थकवा येऊ नये म्हणून हा शरीराचा अनुकूल प्रतिसाद असतो. इतर अजून बरेच प्रकार आहेत ज्यामुळे श्वसनाच्या समस्या सुधारता येऊ शकतात. उदाहरणार्थ, हानी पोहोचलेला श्वसन मार्ग व्यवस्थित करून जास्तीची मागणी कमी करणे.

🔹फुफ्फुसांच्या समस्या दर्शवणारी लक्षणे :
अशी बरीच लक्षणे आहेत जी दर्शवतात की तुम्हाला श्वसनाच्या समस्या आहेत. जर तुम्हाला ती माहित असतील तर तुम्ही आवश्यक ती पावले उचलू शकता.
खाली नमूद केलेली काही लक्षणे तपासून घ्या :
-ऑर्थोप्निया – ऊर्ध्वस्थ श्वसनाची सुरवात
-घोरण्याची अनुपस्थित
– झोपून उठल्यानंतर देखील आळसटल्या सारखे वाटणे
– झोपे मध्ये समस्या
– सकाळच्या वेळेत होणारी डोकेदुखी

जर तुम्ही वरील पैकी कोणत्याही समस्यांनी ग्रस्त असाल तर, वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. फक्त योग्य रोग निदान आणि मूल्यमापन उपचारामध्ये मदत करू शकते.

🔹 मज्जासंस्थेच्या विकारां बरोबर संबंधित असणारी इतर लक्षणे :
मज्जासंस्थेच्या विवीध विकारां बरोबर इतर काही लक्षणे सुद्धा निर्माण होतात.
ही लक्षणे खालील प्रमाणे :
-फेफरे येणे
– अर्धांगवायु ( पूर्ण किंवा आंशिक)
– जागृत किंवा दक्ष राहण्याची संवेदना कमी होणे
– स्नायूंमध्ये कमजोरी
– आकलन क्षमता कमी होणे
– बधिरपणा
– अचानक मनाचा कल /स्वभावाच्या लहरी बदलणे
– अनपेक्षित भावनेचा उद्रेक
– नैराश्य

याव्यतिरिक्त, विवीध विकारांना सुद्धा काही विशिष्ट लक्षणे असतात. जर तुम्हाला ती माहित असतील तर तुम्ही ती वेळीच ओळखू शकता. शिवाय, तुम्हाला हे देखील लक्षात येईल की मदतीसाठी केव्हा इतरांना बोलवायचे आहे.

मज्जासंस्थेचे विकार आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये जवळचा संबंध आहे. आणि काही वेळा, फुफ्फुसांच्या समस्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला कोणत्याही श्वसनाच्या समस्या असतील तर, सर्वोत्तम पाऊल म्हणजे त्वरित वैद्यकीय मदत मिळवणे होय. शिवाय, जर तुम्हाला आधीपासूनच मज्जासंस्थेचा विकार असेल तर, वैद्यकीय समुपदेशन घेण्यामध्ये उशीर करू नका.

संबंधित पोस्ट